पितृपक्ष…

Subscribe

शास्त्राच्या अंगाने विचार करता, भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष म्हटले जाते. या पंधरवड्यात ज्यांचा स्वर्गवास झाला आहे ते पूर्वज वायू रुपात पृथ्वीवर येतात,अशी धारणा आहे. या दरम्यान ते त्यांच्या वंशजांकडे अन्न आणि जल याची अपेक्षा करत असतात आणि ते घेतल्यानंतर ते तृप्त होत असतात. म्हणून या काळात तिथीनुसार श्राद्ध तर्पण विधी करून आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती द्यावी अशी मान्यता आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात लोक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. &................

प्रत्येक मनुष्य ज्यावेळी जन्माला येतो, त्यावेळी त्याची तीन कर्तव्ये सांगितली आहेत. त्याला तीन ऋण म्हटले जातात. देव ॠण, पितृ ॠण आणि समाज ऋण. यातून उतराई होण्यासाठी आपण दररोज देवाची आराधना करत असतो. त्याचबरोबर पितृ ॠणातून मुक्त होण्यासाठी पितरांचे श्राध्द तर समाज ॠणातून मुक्त होण्यासाठी सामाजिक कार्य करत असतो. भाद्रपदवद्य प्रतिपदा ते अमावस्या याला पितृपक्ष असे म्हटले जाते. याला महालय असे म्हटले आहे. महालय श्राध्द यात ज्या तिथीला मृत्यू झाला त्या तिथिला श्राध्द करावे. पंधरा दिवसात ज्या तिथीला स्वर्गवास झाला असेल त्या तिथीला श्राध्द करावे याला महालय श्राध्द असे म्हणतात. ज्याला तिथी माहिती नसेल तर सर्वपित्री अमावस्येला श्राध्द करतात.

श्राध्दविधीत पिंडदान, तर्पण विधी, ब्राम्हण भोजन सांगण्यात आले आहे. काकवास म्हणजेच कावळ्याला घास द्यावा असे सांगण्यात आले आहे. सर्व प्राणीमात्रांचे आपल्या हातून पालन पोषण व्हावे हा यामागचा हेतू आहे. यामुळे पितृलोक तृप्त होतात व वंशजांना आशीर्वाद देतात असे शास्त्रात सांगितले आहे. या पंधरा दिवसांत पितृलोक वंशजांकडे वायुरूपाने पृथ्वीवर येतात ते अन्न व जल याची अपेक्षा करत असतात त्यामुळे श्राध्दविधीला विशेष महत्व आहे. ज्यावेळी काकवास दिला जातो. त्यावेळी कावळा त्याला स्पर्श करेपर्यंत थांबण्याची गरज नाही. दहाव्या दिवशी जेव्हा पिंडदान केले जाते तेव्हा कावळा घास घेईपर्यंत थांबावे लागते. श्राध्दविधीत काकवास घेईपर्यंत थांबण्याची गरज नाही.

- Advertisement -

शास्त्राच्या अंगाने विचार करता, भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष म्हटले जाते. या पंधरवड्यात ज्यांचा स्वर्गवास झाला आहे ते पूर्वज वायू रुपात पृथ्वीवर येतात,अशी धारणा आहे. या दरम्यान ते त्यांच्या वंशजांकडे अन्न आणि जल याची अपेक्षा करत असतात आणि ते घेतल्यानंतर ते तृप्त होत असतात. म्हणून या काळात तिथीनुसार श्राद्ध तर्पण विधी करून आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती द्यावी अशी मान्यता आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षास पितृपक्ष या नावाने संबोधण्यात येते. या पंधरवड्यात लोक दिवंगत पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण विधि करतात. ज्यात कुत्रा, गाय आणि कावळा यांना विविध खाद्यपदार्थ खाऊ घालण्याची प्रथा आहे. त्यांना खाऊ घालण्यात आलेले पदार्थ पितरांपर्यंत पोहोचतात आणि आत्म्याची तृप्ती होते, त्यांना शांती मिळते असा समज आहे. पितरांच्या मृत्यूतिथीनुसार श्राद्धकर्म करण्यात येते.जर एखाद्या पितराची मृत्यूतिथी माहीत नसली, तर सर्वपित्री अमावस्याला सर्व पितरांचे श्राद्ध कर्म होऊ शकते. मृत्यूनंतर ज्या पितरांचे नियमानुसार श्राद्धकर्म होत नाही, तर त्यांच्या आत्म्यास शांती मिळत नाही असा समज आहे.

पूर्वजांच्या इच्छेनुसार दान पुण्य करावे. या काळात गाईला दान केले पाहिजे. यानंतर तूप, चांदी, पैसा, फळ, मीठ, तीळ, कपडे आणि गुळाचे दान करावे. या दानाचा संकल्प केल्यानंतर आपल्या ब्राम्हणांना द्यावे, श्राध्द काळात हे दान तिथीनुसार करावे,असे केले तर पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या राज्यभरात कमालीची होती. या वर्षभरात ज्यांच्या घरात कुणी मृत्यूमुखी पडले आहे, त्यांचे पितृपक्षात श्राद्ध घालावे का, असा प्रश्न अनेकांना आहे. याविषयी शास्त्र असे सांगते की, ज्यांचा मृत्यू होऊन वर्ष झालेले नाही, अशा मृत व्यक्तींचे श्राध्द भरणी नक्षत्रावर करावे. यंदा गुरुवारी (दि. १५) भरणी श्राद्ध आहे. श्राध्द कोणी घालावे कसे घालावे याविषयी अनेकांच्या मनात विविध प्रश्न असतात. खरे तर, पितृपक्षात परिवारातील मृत व्यक्तीच्या तिथीच्या दिवशी श्राध्द केले जाते.

- Advertisement -

दिवंगत व्यक्ती वाडवडिलांच्या पूर्वजांच्या मृत्यू तिथीला या पंधरवड्यात त्या-त्या तिथीला श्राध्द तर्पण केले जाते. तर्पण केल्याने पितरांना सुख लाभते व ते संतुष्ट होतात अशी भावना आहे. ज्या व्यक्तींचा मृत्यू होऊन अद्याप वर्ष पूर्ण झालेले नाही अशा दिवंगतांचे श्राध्द भरणी नक्षत्रावर घालावे असे शास्त्र सांगते. अशा व्यक्तींचे श्राध्द पुढील वर्षीपासून त्यांच्या मृत्यूच्या तिथीला घालावे असे शास्त्रात सांगितले आहे. तिथीनुसार केलेल्या श्राध्द विधीला महालय श्राध्द म्हटले जाते. अनेकांना आपल्या वाडवडिलांच्या मृत्यूची तिथी माहीत नसते, अशावेळी दिवंगतांचे श्राध्द कसे घालावे याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र ज्यांची मृत्यूची तिथी माहिती नाही त्याने सर्वपित्री अमावस्येला श्राध्द करावे, यंदा २५ सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आहे, या तिथीला अशा व्यक्तींचे श्राध्दविधी करावे.

–सतीश शुक्ल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -