घरफिचर्ससारांशपरिवर्तन बिंदू !

परिवर्तन बिंदू !

Subscribe

आयुष्यात जर एखादा अडथळा आला तर तो ओलांडून पुढे जा, जर खूप मोठा अडथळा असेल त्यावर उभे राहून स्वतःची उंची वाढवा, परंतु खचून नका. अनेकदा असं होतं की, आपल्याला इच्छित गोष्ट मिळत नाही, परंतु त्याहीपेक्षा मूल्यवान असे तुम्हाला मिळणार आहे ही आशा तुमच्या मनात निर्माण करा. जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही त्यापासून एक नवा धडा मिळत असतो. तो आपल्या आयुष्यासाठी आवश्यक असतो. म्हणून काही अडथळे पार केल्यानंतर आपले व्यक्तिमत्व कणखर बनत असते व विचार प्रगल्भ व्हायला लागतात.

हल्ली अगदी छोट्या छोट्या अपयशांमुळे तरुण पिढी कुठतरी  झालेली पाहायला मिळाली त्याच अनुषंगाने आज या विषयावर लिहिण्याचे व तुमच्यापुढे विचार मांडण्याचे प्रयोजन केले. आयुष्यात काहीना काही कुरबुरी या चालूच असतात. सातत्याने नवीन पेचप्रसंग उभे राहत असतात आणि त्यांना तोंड देताना नाकीनऊ येतात आणि मग मानसिक संतुलन ढासळण्यास प्रारंभ होतो. पण तुम्हाला हे माहीतच असेल की, लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत तेव्हा आपल्या अशा जीवनाची दशा असल्यावर कोणी गैरफायदा घेतल्यावर त्यात गैर काय असेल ? …..असोत थोडक्यात काय की, प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्णसंधी देत असते, आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते की, तू त्या संधीचे काय केले….

एखादा व्यक्ती जर कधी अपयशी झालाच नाही तर त्याला मोठेपणा कधीही मिळणार नाही. जुनी इमारत कोसळली नाही तर त्या जागी नवीन इमारत बांधणी करणे केवळ अशक्य आहे. अगदी तसच न कोसळणे किंवा अपयशी न होणे यात फार मोठेपणा नाहीच आहे. याउलट संकटांनी किंवा अपयशाने कोसळल्यानंतर पुन्हा जिद्द एकवटून उभे राहण्यात खरे सामर्थ्य आहे. त्या मुंगीची गोष्ट तुम्हाला ठाऊक असेलच. कितीतरी वेळा पडली, घसरली, घायाळसुद्धा झाली, पण शेवटी जिद्दीने पर्वत सर केला. इवलीशी मुंगी ती, तिला हे जमू शकले, मग आपल्याला का नाही जमणार….! आयुष्यात तुम्ही कितीही वेळा कोसळला असाल, खचला असाल तरीही पुन्हा नव्याने उठून उभे राहा कारण या जगात अशक्य असे काहीही नाही. पुन्हा उठणे म्हणजे सामर्थ्य एकवटून जिद्दीने प्रत्युत्तर देणे. आयुष्याला नेहमी हेच उत्तर द्या की, मी पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे, ही लढत अजून संपलेली नाही. कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे उत्तर स्वतःला नेहमी देत रहा. इथे मला कवी सुरेश भट यांच्या कवितेचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो आहे.

- Advertisement -

विझलो जरी आज मी, तरी हा माझा अंत नाही….
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही
माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे…
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही…

- Advertisement -

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतुर…
डोळ्यात जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही….

येतील वादळे खेटेल तुफान,
तरी वाट चालतो…
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

प्रत्येक नवतरुणास प्रेरणा देतील अशी काव्यरचना सुरेश भटांनी या कवितेत केलेली आपल्याला दिसून आलीच असेल. सांगण्याचे तात्पर्य हेच की, कितीही वादळे आली, अगदी आभाळ जरी कोसळलं तरी धैर्याने सामोरे जा. दुःखामुळे ताण आल्यासारखे वाटल्यास त्याच जोमाने उत्साही व्हा व ताणतणावाची सांगड आपल्या उत्साहाशी घालून टाका. जेवढ्या वेगाने अपयश किंवा संकट आपल्याकडे झेपावल असेल, तेवढ्याच वेगाने परत येऊन तुम्ही त्या संकटाचा सामना करा. खचून जाणे हे कोणत्याच अपयशाचा परिणाम अपेक्षित नाहीये तर, गगनझेप घेणे व तेवढे सामर्थ्य स्वत:च्या आत निर्माण करणे हा तो परिणाम असायला हवा आहे.

काल हा आपला भूतकाळ आहे, परंतु आजचा एक नवा कोरा दिवस हा आपला आहे. तुम्ही एक नवी सुरुवात करू शकता. पुढच्या पानावर काहीतरी चांगलं लिहिलं असेल अशा आशेने पुढच पान उलटणे व ते सार्थकी लावणे हेच आयुष्य आहे. आता तुम्हाला एक नव कोर पान तर मिळालेलं आहे, परंतु आता हे तुम्हाला ठरवायचं आहे की, त्यावर एक शब्द लिहायचा आहे की, स्वतः च्या आयुष्याचा जीवनग्रंथ लिहायचा आहे ते. अशा अनेक थोर विभूतींची यासाठी उदारहणे देता येतील की, ज्यांनी अपयशानंतर यशाचे उंच शिखर काबीज केलेले आहे व स्वतः चे नाव इतिहासात अजरामर केलेले आहे. जोपर्यंत तुम्ही माघार घेणार नाही, तोवर कुणीही तुम्हाला मागे सारू शकणार नाही. कोणी कितीही तुम्हाला मागे ढकलण्याचा प्रयत्न करोत, तरी त्याने काहीही फरक पडणार नाही.

मी पुन्हा परतेन, तेव्हा इतरांना माझे अस्तित्व स्वीकारावेच लागेल, अशी जिद्द बाळगा. एक युगाचा शेवटच दुसर्‍या युगाचा आरंभ असतो, एका ऋतूची समाप्ती हीच दुसर्‍या ऋतूची सुरवात असते, तसेच जर एखादे हाती घेतलेले काम सुरवातीलाच संपले किंवा तुम्ही त्यात अपयशी झालात तर ती समाप्ती न समजता एका नव्या वळणाचा शुभारंभ समजा व मार्गक्रमन करा. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक समाप्तीला एक नवे वळण देता येऊ शकते. असे केल्याने अपयशाकडे तुम्ही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला शिकाल व ते अपयश तुमच्या आयुष्यातील परिवर्तन बिंदू असू शकतो. जुन्या गोष्टी नष्ट झाल्यानंतरच नव्या गोष्टींची सुरवात होऊ शकते. मी पुन्हा परतणार,या सत्याची जाणीव स्वतःला नेहमी करून देत रहा. प्रत्येकाला संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची फक्त ही सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला होणे गरजेचे आहे.

आयुष्यात जर एखादा अडथळा आला तर तो ओलांडून पुढे जा, जर खूप मोठा अडथळा असेल त्यावर उभे राहून स्वतःची उंची वाढवा, परंतु खचून नका. अनेकदा असं होतं की, आपल्याला इच्छित गोष्ट मिळत नाही, परंतु त्याहीपेक्षा मूल्यवान असे तुम्हाला मिळणार आहे ही आशा तुमच्या मनात निर्माण करा. जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही त्यापासून एक नवा धडा मिळत असतो. तो आपल्या आयुष्यासाठी आवश्यक असतो. म्हणून काही अडथळे पार केल्यानंतर आपले व्यक्तिमत्व कणखर बनत असते व विचार प्रगल्भ व्हायला लागतात. म्हणूनच आयुष्याला अडथळ्यांची शर्यतसुद्धा म्हणलं गेलं आहे. व्यायाम प्रशिक्षक स्नायू बळकट करण्यासाठी तुम्हाला अवघड व्यायाम करण्यास सांगतात,त्याचप्रमाणे आयुष्य म्हणजे व्यक्तिमत्वाची जणू एक ‘जिम’असते हे लक्षात घ्या. जेवढे अधिक अवघड अपयश तुम्ही पचवाल, तेवढे तुमचे अधिक व्यक्तिमत्व खुलून येईल.

आयुष्य आपल्याला आध्यात्मिक शक्ती मिळवण्याची संधी देत असते. त्यात कोसळून पुन्हा उभे राहण्याची अपरिमित अशी शक्ती असते. एखाद्या विजयातूनही मिळणार नाही,असा अनुभव एखाद्या पराभवातून मिळू शकतो. पराभवातून परिपक्वता येते आणि त्यातूनच पुन्हा सावरण्याची अभूतपूर्व शक्ती संचारते. नेहमी जिंकणारा हरतो, तेव्हाच तो पुन्हा जिंकण्यासाठी जोमाने तयारी करतो. उत्कृष्ट परिणाम देणे,हाच जगाला चोख उत्तर देण्याचा एकमेव मार्ग आहे,हे विजेत्याला ठाऊक असते. कोणत्याही कठीण परीस्थितीत जगाला ‘मी पुन्हा परतेन, नक्की परतेन’ हेच उत्तर देत राहा. जर जिंकायचे असेल तर हरण्याची तयारी ठेवा. जिंकणारा जिंकतो कारण हरणारा पराभव मान्य करतो, तुम्ही जिद्द सोडू नका, विश्वास ठेवा, विजयपताका तुमच्याच नावाची असेल.

–निकिता गांगुर्डे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -