घरफिचर्ससारांशआयुर्वेदातलं एक धाडस

आयुर्वेदातलं एक धाडस

Subscribe

‘आयुर्वेदयात्री’ या पुस्तकाच्या नावातच आयुर्वेद विषयांच्या परिषदा, परिसंवाद आणि यात्रा म्हणजे पर्यटनाचा आस्वाद घेऊन, विविध देशातील आगत-स्वागत, तिथली पर्यटन स्थळं, विहंगम दृश्य या बाबतीत पुस्तकाचे लेखक वैद्यराज सुनिल बी. पाटील आयुर्वेदाचार्य यांनी केलेली वर्णनं उत्तम जमली आहेत. पुस्तक एक विचार असतो, त्याला नक्कीच एक सामाजिक संदर्भ असतो. आजारातून मुक्तीचा मार्ग नव्हे; प्राणतत्व असल्याने स्वान्त सुखाय या शिवाय दुसरे असू शकत नाही.

वैद्यराज पाटील हे नाव महाराष्ट्राला परिचित आहेच. त्याचबरोबर परदेशात आयुर्वेदाच्या प्रचार आणि प्रसारानिमित्ताने त्यांच्या नावाची चर्चा होताना दिसते. या एकूण पुस्तकात अमेरिकेतील एक प्रमुख महर्षि आयुर्वेद केंद्र आहे. या केंद्राचे स्वत:चे रेडिओ स्टेशन होते. तिथे भारतीय शास्त्रीय संगीत पेशंट्सना ऐकविले जाई. डॉ. पाटलांचा महर्षि महेश योगी या युगप्रवर्तक महात्म्याचा परिचय झाला. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. आणि या संदर्भात ते सहज म्हणून जातात. ‘हे मी माझे महाभाग्य समजतो.’

आयुर्वेद प्रसार दौर्‍यात महर्षि योगी यांनी आयुर्वेदाला एका वेगळ्या उंचीवर आणून ठेवले आहे. आजच्या यांत्रिक युगात आयुर्वेदशास्त्र हे संपूर्ण मानव जातीच्या कल्याणासाठी, जीवनातल्या सगळ्याच आरोग्यासाठी उपयोगी पडत राहील यात शंकाच नाही.

- Advertisement -

डॉ. पाटील तिथे गेल्यावर फेटा हा त्यांचा पेहराव पहाताच महर्षि म्हणाले,‘तुम्ही जेव्हा बोलायला उभे रहाल तेव्हा तुमच्या ज्ञानाला सर्वच पाश्चात्य जनता नमस्कार करील. परंतु तुम्हाला पाहता क्षणीच नमस्कार करायला भाग पाडणारा पेहराव आहे. शिवाय ज्ञानपूर्ण डोके सुरक्षित ठेवायला फेटा उत्तम उपाय आहे’, अशी विनोदी पुस्ती त्यांनी जोडताच सर्वत्र हास्याची लाट पसरुन वातावरण मोकळे झाले.

आयुर्वेदाचार्य ही पदवी डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातून सर्वप्रथम क्रमांकाने प्राप्त केल्यावर कोल्हापूरला त्यांनी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस म्हणजे व्यवसाय सुरू केला. ‘आयुर्वेदयात्री’ या पुस्तकात पर्यटनाच्या माध्यमातून अनेक वर्णन डॉ. पाटलांनी सहज सोप्या भाषेत मांडली आहेत. ‘बेलग्रेड-सर्बिया युरोपमध्ये नोव्हीसाद शहरात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन स्टाईन यांचे रहाते घर. काही वर्षे आईनस्टाईन आपल्या पत्नीसह इथे रहात होते. पुढे ते अमेरिकेला गेले. त्यांच्या रहात्या घराचे हॉटेल झाले. मात्र, इमारतीच्या भिंतीवर आईनस्टाईन पती-पत्नीच्या छायाचित्रांसह हा इतिहास लिहिलेला आहे’ अशी माहिती सहजरित्या पुस्तकात वाचकांना ते देऊन जातात.

- Advertisement -

डॉ. पाटलांनी आयुर्वेद व्यवसायाचा ध्यास घेतला नव्हे; विविध देशांच्या परिषदांना जाण्यापूर्वी निसर्गाला म्हणा, देवाला म्हणा साद घातली. तेव्हा त्यांच्या शब्दात सांगावयाचे झाल्यास ‘नियतीने तिचे दान टाकले’ ही आर्त हाक विसरले नाहीत. विजयाचा गोल जो लक्षात ठेवतो तोच यशस्वी होतो.

मॉरिशस, नेदरलँड, बेल्जियम, जर्मनी, सिंगापूर, थायलंड, मलेशिया, नेपाळ, दुबई, श्रीलंका, सर्बिया, हंगेरी, ऑस्ट्रिया, स्लोव्हाक रिपब्लिक, झेक रिपब्लिक, इंग्लंड, कॅनडा, फ्रांस इत्यादी देशात आयुर्वेद प्रसारासाठी जाण्याची संधी डॉ. पाटलांना मिळाली म्हणण्यापेक्षा मिळविली. आकाशात थव्याने उडणार्‍या अनेक पक्ष्यांपेक्षा गरुड एकटाच असतो आणि झेप मोठी असते याच प्रमाणे डॉक्टर पाटील यांची झेप मोठी आहे आणि त्याप्रमाणे अनेक अडचणींवर मात करून आयुर्वेद प्रसारासाठी स्वत:ला झोकून दिले.

पहिली परिषद मॉरिशस येथे आयोजित करून यशस्वीरित्या पार पाडली. त्यानंतर जगातल्या कानाकोपर्‍यात आयुर्वेद यात्रा उत्तमरित्या आखल्या आणि डॉक्टरांचे सहकारी त्यात यशस्वी झाले. त्या त्या देशातील प्रवास वर्णनं त्यांनी ओजस्वी भाषेत लिहिली. तिथली प्रेक्षणीय स्थळं, मॉरिशसचा इतिहास, तिथलं जीवन, प्रदूषणमुक्त बेट, निसर्गाने मुक्त हस्ताने दिलेले सौंदर्य अगदी स्वर्गापेक्षा सुंदर… मॉरिशस असं ते वर्णन करून जातात.

कोल्हापुरात ३७ वर्षे नाडी तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करीत असले तरी वनौषधी विद्यापीठ संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळताना, वनौषधी मासिक – दिवाळी अंकाचे तसेच साप्ताहिक ‘जनमन’चे संपादक असून विविध नियतकालीन लेखन सुरूच आहे. जगाच्या पाठीवर त्यांनी आयुर्वेद परिषदा घेतल्या त्या त्या देेशाचा इतिहास, पर्यटन स्थळांचा सुद्धा त्यांनी सहजगतेने उल्लेख त्यांच्या ओजस्वी भाषेत मांडलेला आहे.

घरटं सोडून घरट्याबाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा वेध घेता येत नाही, तसंच त्यांच्या बाबतीत म्हणता येईल कोल्हापूर सोडल्यावर, त्यांनाही देश-विदेश फिरल्याने नकळत शिकायला मिळालं. ‘ज्ञान’ हा दोन अक्षरी शब्दाचा अर्थही कळायला लागतो. तसंच डॉ. पाटलांचं झालं. केवळ वही आणि पेन घेऊन पुस्तकाची निर्मिती होत नसते. त्यात मानवी रसायन ओतावं लागतं. तेव्हाच पुस्तक हातात धरायला मिळतं. तेव्हा ‘आयुर्वेदयात्री’ आपल्या म्हणण्यापेक्षा अनेकांच्या (आयुर्वेद डॉक्टरांच्या) संग्रही असावे.

शुभेच्छा,
‘आयुर्वेदयात्री’
ले. वैद्यराज सुनिल बी. पाटील (आयुर्वेदाचार्य)
शुभंकर पब्लिकेशन प्रा. लि. (कोल्हापूर)
मूल्य – रुपये २७०/-

–. रमाकांत जाधव
ब / ७ रामपंचायतन साठे
पहिला मजला, शिवमंदिर रोड
डोंबिवली (पूर्व) जि. ठाणे
मो. क्र. ९८७०४७९८१३

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -