घरफिचर्ससारांशबेंचमार्किंग

बेंचमार्किंग

Subscribe

बेंचमार्किंग ही अशी एक प्रकिया आहे, असा काही सराव आहे की, त्याचा वापर करून आपण आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील काही प्रकिया वा कामगिरी आतापर्यंत झालेल्या नेत्रदीपक, देदीप्यमान कामगिरीची ओळख करून घेतो. जाणून घेतो ती नीट समजावून घेतो आणि त्यापेक्षा चांगली कामगिरी आपल्याला कशी करता येईल, यावर विचार करून तसे उदिष्ट ठेवून त्यासाठी वाटचाल करतो, अशा प्रकारे आपली कामगिरी सुधारण्यासाठी उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात सुरवात करतो. अशा प्रकारे संस्थाना, कंपन्यांना आपल्या क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणार्‍या वातावरणात लक्ष केंद्रित करून आपली कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारता येते.

स्पर्धेत टिकून राहावयाचे असेल, तर सातत्याने सुधारण्याशिवाय पर्याय नाही. सतत चांगल्या कामगिरीचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवणारा यशस्वी होतो. हे करायचे असेल, तर ‘बेंचमार्किग’ पद्धत उपयुक्त ठरते. जागतिकीकारण आणि उदारीकरणामुळे भारतीय उद्योजकता आणि व्यवसायात खळबळ माजली. व्यापारात ग्राहक हा राजा ठरू लागला आणि प्रत्येक संस्था जास्तीत जास्त स्पर्धात्मक कसे होतात येईल, याचा विचार करु लागली. आपल्या उत्पादनाच्या रचनेत संस्था उत्पादक धोरणांचा वापर करू लागल्या.

अशा परिस्थितीत सगळ्याच संस्थांना आपली बलस्थानं आणि कमतरता काय आहे याची जाणीव होऊ लागली. आपल्या स्पर्धेत असणार्‍या कंपन्यांच्या तुलनेत आपल्यात काय कमी आहे हे माहिती व्हायला हवे. मग त्या कंपन्या भारतातील वा बहेरील का असेनात. अशा कंपन्याच्या कामाची सतत माहिती घेऊन जागतिक दर्जाच्या सर्व प्रकिया आपण आपल्या संस्थेत अमलात आणल्या तरच आपण जागतिक स्पर्धेचा उत्तम सामना करू शकू आणि स्पर्धेचा योग्य लाभही पदरात पाडू शकू. यासाठी बेंचमार्किंग हे तंत्र आपल्याला मदत करते व अतिशय उपयुक्त ठरते. इतरांच्या अनुभवावरून शिकण्यासाठीही या तंत्राचा उपयोग होतो.

- Advertisement -

‘बेंचमार्किंग’चा विषय निघताच, मला एक गोष्ट आठवली. एकदा दोन कंपन्याचे प्रमुख सहज फिरण्यासाठी एका घनदाट जंगलात गेले होते. दोघेही अगदी मग्न होऊन आपल्या कार्यबद्दल तुलनात्मक गोष्टींवर चर्चा करीत होते. तेवढ्यात त्यांचे लक्ष एका भुकेल्या वाघाकडे गेले तो त्यांच्याच दिशेने धावत येत होता.
‘अरे पळा, पळा’ एक जण ओरडला.
दुसर्‍याने मात्र आपले पळण्याचे बूट बॅगेतून काढले आणि तो ते घालू लागला.

‘अरे हे काय करतोस?’ पहिला म्हणाला, ‘तुला काय वाटते तू काय पळून वाघाच्याही पुढे जाणार आहेस का? त्याला मागे टाकणार आहेस वाटतं?’ मला वाघाला मागे टाकायची गरज नाही, बूट घालणारा म्हणाला, ‘मला फक्त तुला मागे टाकुन पुढे जायला हवे म्हणजे वाघ तुझी शिकार करेल. हेच आहे ते बेंचमार्किंग, या पेक्षा निराळे काही नाही.

- Advertisement -

व्याख्याच करायची झाल्यास बेंचमार्किंग ही अशी एक प्रकिया आहे, असा काही सराव आहे की, त्याचा वापर करून आपण आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील काही प्रकिया वा कामगिरी आतापर्यंत झालेल्या नेत्रदीपक, देदीप्यमान कामगिरीची ओळख करून घेतो. जाणून घेतो ती नीट समजावून घेतो आणि त्यापेक्षा चांगली कामगिरी आपल्याला कशी करता येईल, यावर विचार करून तसे उदिष्ट ठेवून त्यासाठी वाटचाल करतो, अशा प्रकारे आपली कामगिरी सुधारण्यासाठी उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात सुरवात करतो. अशा प्रकारे संस्थाना, कंपन्यांना आपल्या क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणार्‍या वातावरणात लक्ष केंद्रित करून आपली कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारता येते.

बेंचमार्किंगचे फायदे
ृ१) कंपनीची ध्येय आणि नेमकी उद्दिष्टे ठरवता येतात.
२) भविष्यकाळात होणारे बदल आत्मसात करता येतात.
३) कार्यपद्धती आणि प्रकिया सुधारतात.
४) सर्वांना पारंपरिक कामापेक्षा बाहेर काय चालेले आहे ते कळते.
५) सामंजस्य वाढते आणि जागतिक कामगिरीची माहिती मिळते.
६) इतर कंपन्यांच्या अनुभवावरुन शिकण्याची संधी मिळते.
७) जगातील सर्वश्रेष्ठ कंपन्यांच्या तुलनेने आपली कामगिरी कशी आहे याची तुलना करता येते. (पुढील प्रवासाची दिशा ठरवता येते.)
८) संस्थेच्या क्षमता तसेच कमतरता लक्षात येतात.
९) समस्या सोडवायला सोपे जाते. अग्रक्रम ठरवता येतात.
१०) ग्राहकांच्या अपेक्षा कळतात.

बेंचमार्किंग प्रक्रिया
१)आपल्या समस्या काय आणि कोठे आहेत त्या शोधा.
२) आपल्यासारख्याच उत्पादन किंवा सेवा प्रक्रिया कोठे आहेत याचा शोध घ्या.
३) या प्रक्रियेमध्ये कोण श्रेष्ठ आहे याचा शोध घ्या.
४) सर्वोत्तम प्रक्रिया असणार्‍या कंपनीला भेटी द्या आणि त्यांच्या प्रक्रिया सर्वोत्तम का आहेत याची माहिती मिळवा.
५) आपल्या प्रक्रिया त्याच्याप्रमाणेच कशा सर्वोत्तम करता येतील याचा विचार करा आणि आपल्या प्रकियांमध्ये सुधारणा करा.
६) पाहणी, सिंहालोकन करा.

बेंचमार्किंग प्रक्रियेतील नेमक्या पायर्‍या

1 )योजना : कोणत्या गोष्टीत बेंचमार्किंग करायचे ते ठरवा.
कोणत्या कंपनीशी/ संस्थेची तुलना करायची ते ठरवा. माहिती कोणती आणि कशी मिळवायची त्याची योजना आखा आणि प्रत्यक्ष माहिती गोळा करा.

2) पृथक्करण : मिळवलेली माहिती आणि आपली सध्याची परिस्थिती यातील तफावती शोधा, आपल्याला काय मिळवायचे आहे, ते नक्की करा.

3)एकीकरण; बेंचमार्किंग पाहणीवरून काय मिळाले आणि त्यातून आपल्याला काय साध्य करायचे आहे ते सर्वांना सांगा. आपले उदिष्टे, ध्येय काय आहे ते ठरवा आणि सर्वांना त्याची कल्पना द्या.

4) कृती : पुढे काय करायचे याची योजना (कृती आराखडा)तयार करा. त्याप्रमाणे प्रत्यक्ष आणि नेमकी अंमलबजावणी करा आणि त्यावर योग्य नियंत्रण ठेवा. देखरेख करा. कृतीचे परिणाम तपासा.

5)परिपक्वता : आपण या प्रक्रियेत काय सध्या केले आणि आपली किती प्रगती झाली आहे ते तपासा, नवीन शोधलेल्या प्रक्रिया कार्यपद्धतीत सामावून घ्या आणि त्यांचे प्रमाणीकरण करा.

बेंचमार्किंग प्रकार

उत्पादनाचे बेंचमार्किंग: या प्रकारच्या बेंचमार्किंगचे आपल्या उत्पादनाबद्दल बाजारात काय मत आहे. त्याची किंमत योग्य आहे की नाही, त्याचा एकंदरीत मुखवटा कसा आहे. त्यात कोणत्या गोष्टीची भर घालयला हवी याचा स्पष्ट अंदाज येतो. उत्पादनाचे तुलनात्मक डिझाईन(रचना) सुधारण्याची संधी मिळते.

कामगिरीचे बेंचमार्किंग: इतरांच्या तुलनेत आपल्या उत्पादनाची बाजारातील कामगिरी कशी आहे. याची तुलना करता येते आणि त्याप्रमाणे सुधारणा करता येते.

पद्धतींचे बेंचमार्किंग : आपल्या कंपनीच्या सर्वच पद्धती इतर उत्तम कामगिरी असणार्‍या संस्थांच्या तुलनेने कशा आहेत यांचा अभ्यास करून त्यात सुधारणा करता येतात.

डावपेच किवा व्यूहरचनात्मक बेंचमार्किंग: यात इतर उत्तम कंपन्या आपल्या ध्येयधोरणांची योजना कशा आखतात यांची तुलना करून आपले डावपेच सुधारता येतात.

तर अशा प्रकारे तुमची संस्था छोटी असो या मोठी असो बेंचमार्किंग हे फार महत्वाचे आहे. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड यापासून परतावा तपासायचे वेळी नेहमी बेंचमार्किंग परतावा किती आहे याच्याशी तुलना केली जाते. आपल्या संस्थेलासुद्धा स्पर्धेत टिकण्यासाठी सतत बेंचमार्किंग करणे आवश्यक आहे. ऑलिम्पिकमधील एख्याद्या धावपटूने विशिष्ट अंतर किती वेळेत पूर्व केले आहे याच्या बेंचमार्किंगचा इतिहास असतो. नवीन धावपटूला तयारी करताना हे बेंचमार्किग उपयोगी पडते. त्याचा प्रयत्न नेहमी अस्तित्वात असलेले बेंचमार्किंग तोडण्याचा असतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -