घरफिचर्ससारांशक्लिकबेटची भुलभुलैय्या!

क्लिकबेटची भुलभुलैय्या!

Subscribe

समाज माध्यमांच्या युगात दिलखेचक हेडलाईन किंवा कॅची टायटलला ‘क्लिकबेट’ असे म्हणतात. सामान्यपणे एखाद्या दुव्यावर म्हणजेच इंटरनेटवरील आकर्षक मथळा किंवा मजकुरावर वापरकर्त्याने क्लिक करावे. भेट द्यावी आणि तिथे थांबून वेळ द्यावा. म्हणजेच क्लिकबेट हा मजकूर किंवा लघुप्रतिमेचा दुवा असतो. तो लक्ष वेधून घेताना वापरकर्त्यांना त्या दुव्याचे अनुसरण करण्यासोबतच पाहण्यास किंवा ऐकण्यासाठी मोहीत करतो. आणि तसे ते डिझाईन केले जाते. एका अर्थाने सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या क्लिकबेट या जास्तीत जास्त प्रमाणात फसव्या असतात.

बघा दीपिका आणि रणवीर यांची पहिली भेट कशी झाली..? पंतप्रधानांसोबत असणारी ती महिला नेमकी कोण..? कंगनाचा ट्रोलर्सना पुन्हा दणका.. धमाकेदार ऑफर आता आयफोन मिळणार स्वस्तात.. प्रियांका चोप्राचा नवा लूक होतोय व्हायरल… आपण तरुण आहात वाचा तुमच्या लैंगिक आयुष्याबद्दल.. सुंदर मुलींना करा मेसेज आणि बनवा आपली प्रेम कहानी… सध्या या आणि अशा मथळ्याखाली गुगल व तत्सम साईट्सवर अनेक बातम्या, आपल्याला वाचायला मिळतात. हे फक्त उदाहरण म्हणून काही मथळे दिले. पण यापेक्षाही वेगळ्या भाषेत विशिष्ट मथळ्याखाली काही बातम्या दिसतात. वाचकांना आकर्षित करणे या एकाच उद्देशाने बातम्या तयार केल्या जात नाहीत.तर स्वतःचे प्रॉडक्ट विकण्यासाठी व गल्लाभरू जाहिराती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्यांचा उपयोग केला जातो.

आपण कितीही नाही म्हणत असलो तरी या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला होताना दिसतात. आणि आपणसुद्धा कधीना कधी अशा आकर्षित (कॅची) टायटलच्या जाळ्यात अडकतो. वर्तमानपत्रांची सुरुवात झाली तेव्हापासूनच विशिष्ट बातमी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य ती हेडलाईन दिली जात असे.(तशी आजही दिली जाते..?! ) त्यातून वाचकांची उत्सुकता वाढवली जाई व बातमीचे योग्य मूल्यमापन होत असे. त्यात विश्वासार्हता होती. आजघडीला जवळपास सर्वच वर्तमानपत्रांच्या, मासिकांच्या, पाक्षिकाच्या ई-आवृत्त्या निघतात. त्याचा फायदा संपादक घेताना दिसतात. ई-आवृत्त्यांना मिळालेली जाहिरात लोकांनी बघावी यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरून बातम्यांची हेडलाइन अशी तयार केली जाते की त्यावर आपण क्लिक केलेच पाहिजे. त्यांचा दुवा झाले पाहिजे. हीच बाब इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पाहायला मिळते.

- Advertisement -

समाज माध्यमांच्या युगात अशा हेडलाईन किंवा कॅची टायटलला ‘क्लिकबेट’ असे म्हणतात. सामान्यपणे एखाद्या दुव्यावर म्हणजेच इंटरनेटवरील आकर्षक मथळा किंवा मजकुरावर वापरकर्त्याने क्लिक करावे. भेट द्यावी आणि तिथे थांबून वेळ द्यावा. म्हणजेच क्लिकबेट हा मजकूर किंवा लघुप्रतिमेचा दुवा असतो. तो लक्ष वेधून घेताना वापरकर्त्यांना त्या दुव्याचे अनुसरण करण्यासोबतच पाहण्यास किंवा ऐकण्यासाठी मोहीत करतो. आणि तसे ते डिझाईन केले जाते. एका अर्थाने सोशल मीडियावर व्हायरल होणार्‍या क्लिकबेट या जास्तीत जास्त प्रमाणात फसव्या असतात. असे बेन स्मिथ यांचे मत आहे. अशा क्लिकबेट या मोहक शब्दात तयार करून एक प्रकारची दिशाभूल करतात. जाणून बुजून खळबळ उडवून देण्याचा प्रयत्नसुद्धा याद्वारे होतो. अशा खळबळजनक कथांच्या मागे एक कारण आहे. ते म्हणजे चेकबुक जर्नालिझम. जेथे बातमीचे पत्रकार त्याच्या सत्यतेची पडताळणी न करता माहितीचा फक्त स्त्रोत देतात. इतर देशात त्याला अनैतिक समजले जाते.कारण बहुतेक वेळा क्लिकबेटद्वारे सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना अनुचित आरोपांवरून लक्ष केले जाते. त्यांच्या खासगी जीवन जगण्यावरसुद्धा टीकाटिप्पणी केली जाते.

पाठीमागच्या काही वर्षात क्लिकबेटचे वाढते प्रमाण लक्षात घेता फेसबुकने फसव्या क्लिकबेटवर बारीक लक्ष ठेवून कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पण तसे झाले नाही. ट्विटरसारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर क्लिकबेट फिल्टर करण्यासाठी अल्गोरिदम लागू केल्याचे दिसते. एवढेच नाही तर तज्ज्ञ लोक आणि अनुभवी कर्मचारी यासाठी नेमले जातात. सध्या व्हायरल मार्केटिंगचा काळ आहे. यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या आणि इतर समाज माध्यमांवर क्लिकबेटचे प्रमाण जास्तीत जास्त आहे. मनोरंजन म्हणून याचा वापर केला असेल तर हरकत नाही. पण जर मुद्दाम म्हणून लैंगिक भावना चाळवण्यासाठी जर या गोष्टींचा वापर होत असेल तर यावर निर्बंध आणणे योग्य.

- Advertisement -

आता सर्वच कामे ऑनलाइन करण्यावर सर्वांचा भर आहे. त्यात मग शाळा-महाविद्यालयातील ऑनलाईन लेक्चरसुद्धा आहेत. अशावेळी आपल्या घरातील लहान मुले त्यांना हवे असणारे पुस्तक अथवा शैक्षणिक माहितीचे साहित्य गुगलवर सर्च करतात. मधेच एखादी लिंक अथवा क्लिकबेट समोर येते. जी आकर्षित करते. कुतूहल म्हणून तो मुलगा त्यावर क्लिक करतो. आणि तेथे अश्लील भाषेमध्ये काहीतरी विचित्र पाहिले जाते. वाचले जाते. परिणामी तिथे वेळ तर जातोच पण फसवणूकसुद्धा होते. याचा फायदा फिशिंगसाठीसुद्धा होतो. एकूणच काय तर भारतात 54 टक्क्यांच्या वर युवक सोशल मीडियाचा वापर करतात. याचाच फायदा घेऊन वेगवेगळ्या प्रकारे युवकांना यात गुंतवून ठेवले जाते. प्रलोभन देणारी जाहिरात, लेख, व्हिडिओच्या माध्यमातून युवकांना हेतुपुरस्सर आकर्षित केले जाते. युवकांच्या आवडीनिवडीचा अभ्यास करून अशा क्लिकबेट तयार केल्या जातात. हॅशटॅग वापरून त्यावर जास्तीत जास्त क्लिक केले जावे यासाठी प्रयत्न होतात.

एक प्रकारे क्लिकबेटच्या माध्यमातून युवकांना आकर्षित केले जाते व त्यात त्यांचा वेळ वाया जातो. करमणुकीचे साधन म्हणून याकडे पाहिले तर ठीक, पण तसे होत नाही. लोकांपर्यंत लवकरात लवकर कसे पोचता येईल किंवा आपली जाहिरात पोहोचेल. यासाठी युट्युबवर किंवा फेसबुकवर थंबनील तयार केले जातात. विशिष्ट प्रकारची टॅगलाईन तयार करून व्हिडिओ व्हायरल केला जातो. मनोरंजन म्हणून सर्वच लोक याला पसंती देतात. शेअर करतात, प्रतिक्रिया देतात. इथपर्यंत ठीक आहे. पण जर का ब्लॉगर, वर्तमानपत्र ई-आवृत्त्या प्रकाशित करणारे संपादक युट्युबर क्लिकबेटचा वापर स्वतःचे उत्पादन वाढवण्यासाठी करत असतील आणि वापरकर्त्यांना त्याचा फायदा होत नसेल तर हे चुकीचे आहे. युवकांनी यापासून सावध राहणे कधीही चांगले. काही क्लिकबेट तर अशाप्रकारे तयार केल्या जातात की त्यामुळे एक प्रकारे मानसिक ताण तणाव वाढतो. इतर युवकांपेक्षा आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे.

असा काहींना भ्रम निर्माण होतो. यातून आत्मविश्वास कमी होऊन आत्महत्या केल्याची काही उदाहरणे समोर आहेत. त्यामुळे सरकारने अशा क्लिकबेट वर फसव्या मथळ्याखाली येणार्‍या गोष्टींवर निर्बंध आणून कठोर कारवाई करावी. आजकाल गुगल सर्च इंजिनवर सर्वकाही स्वस्तात आणि फुकट मिळत आहे. त्यामुळे आहारी न जाता फक्त मनोरंजन म्हणून त्याकडे पहावे. समाज माध्यमांचा वापर करत असताना या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले तर आपला फायदाच होईल. स्वतःचा फायदा करून घेत असताना, पत्रकारितेची किंवा इंटरनेटची मूल्ये हरवत चालली आहेत. नव्या पिढीचे बदलते विषय, माहिती मिळवण्याची धडपड यामध्ये सोशल मीडिया हा केंद्रस्थानी आहे. घडलेली गोष्ट तात्काळ कशा प्रकारे मांडली जाईल हे सांगता येत नाही. इथे नैतिकतेचा प्रश्न येतोच. इतर देशांमध्ये सोशल मीडियाच्या अनेक बाबींवर संशोधन होत आहे. दिशाभूल करणार्‍या तंत्राला बाजूला ठेवून योग्य ती काळजी घेतली जाते. जेणेकरून येणार्‍या पिढीचे भविष्य उज्ज्वल असेल. याच गोष्टी आपल्या देशात झाल्या तर आपल्याला खूप काही साध्य करता येईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -