कोरोना एक गूढ सत्य ..उत्परिवर्तन आणि प्रकार…आजची स्थिती..

विषाणू कोणत्या प्रकारचा आहे हे कळायला आपल्याला वेळ मिळायला हवा हे सत्य नाकारता येत नाही. आज मितीस साधारण २-१४ दिवस लक्षणे दिसायला लागतात म्हणजे बाधा झाल्यापासून लक्षणे नसल्यास तो प्रसार करणारा दूत असतो असे म्हटल्यास वागवे ठरत नाही. लक्षणे तशी सर्दी ताप, घशात सूज, डोके दुखणे, नाक चोंदणे किंवा वाहणे, अंगदुखी, खोकला, अशक्तपणा, उलट्या जुलाब ह्याच आहेत म्हणून फसगत होईल. परंतु काळजी हे उत्तर मात्र सर्व प्रकारामध्ये एकच आहे. आज विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. नुकताच पश्चिम बंगालमध्ये विषाणूचा एक वेगळा प्रकार आढळला. कोरोना विषाणूचे गूढ सत्य काय आहे, त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याचा प्रसार कशा प्रकारे होतो, याचा उहापोह करणारा हा लेख.

कॉविड १९ ने आपले भारतात आगमन करण्याचा वाढदिवस नुकताच साजरा केला. धुमधडाक्याने केला. गेला गेला म्हणताना महाराष्ट्रामध्ये आपले बस्तान बसवले, बरे तेही आपल्या परिवारासह, विविध प्रजातीसह. आपले उत्परिवर्तन करून ते प्रकार सबंध जगाला दाखवतोय आणि त्याचे गूढ कायम ठेऊन कॉविड एक सत्य आहे हे आपल्या कर्माने सिद्ध करतोय. ह्याचे गूढ आज ही विश्वातील शास्त्रज्ञांना उकलले नाही म्हणूनच सर्वच त्याला गूढ सत्य म्हणायला लागले.

आज सामन्यता कोविड१९ ह्या विषाणूची माहिती असताना त्याच्या बदलत्या रुपाची बातमी सप्टेंबर २०२० मध्ये पहिल्यांदा आली. त्या वेळी हा त्याच्या प्रजातीचे उत्परिवर्तन (mutation) करत आहे हे प्रथम लक्षात आले. साधारण पणे ही गोष्ट तशी नवीन नाही कारण विषाणू आपल्या जीवनक्रमामध्ये आपले उत्परिवर्तन करतोच. फ्लूचा विषाणू प्रतिवर्षी उत्परिवर्तन करतो म्हणून फ्लूची लस प्रतिवर्षी घेण्याचा आग्रह असतो. विषाणू नेहमी बदलत राहतो ज्यामुळे नवीन उत्परिवर्तन निर्माण होतात, प्रकार निर्माण होतात त्या मुळे हे सर्व विषाणूमध्ये घडतअसते आणि कोरोना विषाणू हा त्याला अपवाद नाही असे घडते म्हणून SARS Co V -2 मध्ये प्रकार येणार हे आश्चर्य नव्हे.

L प्रकार हा मुळातील जन्माला आलेला कॉविड १९ चा वुहानमध्ये डिसेंबर१९ ला आढलेला प्रकार. हा प्रकार सद्य:स्थितीत विश्वात दिसणार्‍या कोरोना रुग्णांमध्ये केवळ ७ टक्के आढळतो आणि अधिकतम आशिया खंडात आढळत आहे. त्यानंतर S प्रकार हे पहिले उत्परिवर्तन म्हणता येईल. तद्नंतर V आला व तसाच कमी होत गेला आणि आज युरोपमधील केवळ ७ टक्के बाधित रुग्णांचे कारण दिसत आहे. त्यानंतर G, GR GH हे प्रकार फेब्रुवारी २०२१ मध्ये अधिक दिसले. विश्वातील सगळे शास्त्रत्र विषाणूमधील बदल अभ्यास करीत आहेत. ह्या मध्ये हे उत्परिवर्तन कसे वेगाने पसरत आहे, ते कोणते बदल करीत आहे आणि सर्वात महत्वाचे शोधलेल्या लसी त्यावर परिणाम कारक ठरतात की, नाही हे प्रश्न सर्वांच्या मनात आहेत. ह्या प्रश्नांची शास्त्रीय माहिती समजल्यावर सगळ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल हे नक्की.

कोरोना विषाणू किती आहेत ? त्याचा प्रवास थोडक्यात समजून घेऊ…

कोरोना विषाणू हा मध्येच आलेला नाही, अचानक जन्मलेला नाही. हा एक परिवार आहे आणि तो खूप काळापासून कार्यरत आहे. त्यामध्ये त्याचे अधिष्ठान फुफ्फुस असल्याने साध्या खोकल्यापासून ते तीव्र फुफ्फुसांच्या अवस्थेपर्यंत त्याचे मार्गक्रमण आहे. नवीन corona virus ज्यामुळे Covid 19 होतो हा मनुष्याला बाधित करणारा आहे. हा विषाणू प्राण्यामध्ये काही काळ होता त्याच्याकडून तो मनुष्यामध्ये प्रवेशित झाला असे शास्त्रत्र म्हणतात. वटवगळापासून प्रसारित झाला म्हणून हा जगाला नवीन नाही. Human Corona Virus चे सात प्रकार दिसून येतात. 229E ( alpha) NL63 (alpha) OC$# ( beta) HKUI ( beta), MERS -Co V MERS, (beta) middle east respiratory syndrome, Sars-cov Severe Acute respiratory syndrome आणि मग आला तो आत्ता हाहाकार उडवणारा SARS Co V -2 ज्या मुळे COVID 19 ह्या आजाराचा शिक्का बाधित झाल्यावर लागतो. जसजशी ह्या विषाणूने बाधित करणार्‍यांची संख्या वाढली तसतसे त्याचे नाव नवीन उत्परिवर्तन विश्वामध्ये झालेले दिसले.

प्रथम UK मध्ये B.1.1.7 हा दिसला तो मागील वर्षी, नंतर B..1.351 ही प्रजाती दक्षिण आफ्रिकेमध्ये दिसली व तिसरी P.1 हा प्रकार ब्राझीलमध्ये आढळला तो जानेवारी २०२१ मध्ये, त्या महिन्याच्या अंती तो अमरिकेमध्ये पोहोचलेलाही होता. विषाणूचे हे उत्परिवर्तन तसे तर नैसर्गिक म्हणता येईल.
ह्याचे उत्परिवर्तन कसे होते

विषाणू स्वत:ची वाढ करीत असतो तो त्यासारखे प्रकार निर्माण करीत असतोच. सगळ्या विषाणूमध्ये जनुकीय घटक RNA किंवा DNA असतो. उत्परिवर्तन हे जनुकीय मध्यम विषाणूच्या प्रकारामुळे बदलते, पण उत्परिवर्तानाची प्रक्रिया RNA विषाणू प्रकारामध्ये अधिक असते. ह्याची उद्धरणे द्यायची म्हटली तर HIV आणि FLU .SARS COV -2 RNA विषाणू असल्याने त्याचे उत्परिवर्तन आलेच. विषाणू त्यामध्ये टाकून त्याद्वारे पेशींना बाधित करण्याची प्रक्रिया करतो ह्यासाठी विषाणू POLYMERASE हा कारणीभूत ठरतो.

ज्या वेळी विषाणू पेशींना बाधित करतो त्या वेळी जनुकीय पदार्थाची कॉपी करून आपल्या ह्या enzyme मुळे घडते. तसे हे द्रव्य नेमके( perfect) नसते त्यामुळे चुका करून उत्परिवर्तन घडते. हे घडताना बरेच वेळा विषाणू मरतो, प्रक्रिया घडताना विषाणूची शक्ती निकामी होते आणि त्यामुळे ते शक्तिहीन होवून मारून जातात. पण काही वेळा हे उत्परिवर्तन घडताना नवीन विषाणू प्रकार निर्माण होतो आणि तो पेशींना घट्ट चिकटून प्रतिकार क्षमतेला चुकवून कार्य सिद्धीस नेण्यास तयार होतो. जसे संस्कार देताना काही व्यक्ती विकृत संस्काराने प्रेरित होतात तसेच आणि ज्या वेळी हे घडते त्या वेळी तो लोकसंख्येमध्ये पसरून जनमानसात पसरतो. जानुपध्वंसक ठरतो.

हेच आपण सध्या काळात नवीन उत्परिवर्तन झालेल्या SARS CoV 2 च्या प्रकारात पाहत आहोत. ह्या परिवर्तीत प्रकारामध्ये उत्क्रांती घडल्यामुळे पसरण्याची क्षमता अधिक दिसून येते, जे आपल्याला UK मधील प्रकारात दिसून आले, येत आहे. पूर्व प्रकारापेक्षा अधिक जलद गतीने पसरण्याची क्षमता ! पहिल्या प्रकारापेक्षा शास्त्रज्ञाच्या मतानुसार ५० टक्के अधिक बाधित करण्याची क्षमता हे ह्यातील टोकदार प्रथिन पेशींना अधिक घट्ट पकडून होते असे दिसून आले आहे. ह्यामध्ये तपसण्या वरून असे लक्षात आले की, ह्या नवीन उत्परिवर्तीत विषाणूने बाधित व्यक्तीचा विषाणू लोड( viral load) खूप अधिक आहे. साहजिकच गती अधिक असल्यामुळे पसरण्याची क्षमता अधिक आणि हानी अधिक. UK मधील पाहणीत त्यांच्या जीवाला ह्यापासून अधिक धोका दिसून आला.

दुसरा उत्प्रेरणेचा प्रकार म्हणजे दक्षिण आफ्रिकेमधील B.1.351. हा साधारणपणे ऑक्टोबर २०२० ला प्रथम आढळला. आजपर्यंत ४१ देशांमध्ये अमेरिकेसह हा आज आपले अस्तित्व देत आहे. हा प्रकार UK B.1.1.7 सारख्या प्रथिनांचा आहे, पण ह्यामध्ये काही वेगळेही आहेत. मात्र हा प्रकार आरोग्याला पहिल्या प्रकारापेक्षा अधिक घातक आहे असा ठोस पुरावा नाही. मात्र शरीरामध्ये तयार होणार्‍या कोविडविरोधी मारक ठरणार्‍या द्रव्याला मारक ठरणारा आहे असे प्राथमिकता दिसून येत आहे म्हणूनच ज्या व्यक्तीमध्ये अगोदर कोविडचा आजार झाला आहे त्यामध्ये हा, प्रतिकारक्षमता असूनही पुन्हा कोविड निर्माण करतो. म्हणून सध्या उपलब्ध असलेल्या लसी ह्यावर त्या प्रमाणात कार्य करतात असे दिसते. ह्याची पसरण्याची क्षमता जलद आहे.

तिसरा सध्या गजणारा म्हणजे ब्राझीलचा P 1 हा उत्परिवर्तन प्रकार. जानेवारी २०२१ मध्ये हा प्रथम सापडला तोही अमेरिकेत. खरं तर अत्यंत नवीन असल्याने ह्या प्रकाराबाबत जास्त माहिती अजून मिळू शकलेली नाही पण ह्यामध्ये पहिल्या दोन म्हणजे UK आणि दक्षिण आफ्रिकेमधील प्रथिने तर आहेतच, त्या शिवाय स्वत:चे वेगळ्या आहेत हे प्रथम संशोधनात दिसते. हा प्रकार पहिल्या दोनपेक्षा अधिक वेगाने पसरणारा असेल असा अंदाज हाही पहिले प्रतिकारक्षमता असताना पुन्हा बाधित करण्याची क्षमता ठेवतो, म्हणजे तो प्रतिकारक्षमता आणि कोविडविरुध्द लढणार्‍या पेशींवर आघात करतो.

अगदी नुकताच आलेला एक उत्प्रनीत प्रकार म्हणजे CAL_20C , अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामधील ५० टक्के व्यक्ती ह्या प्रकरणे बाधित असून सध्या अमेरिकेमधील १९ राज्यात आणि इतर ६ पाश्चात्य देशात हा पोहचला, हे प्राथमिक अहवालानुसार सर्वात अधिक जलद गती असलेला हा उत्प्रनीत प्रकार आहे. अधिक बाधा करणारा ठरू शकेल. अमेरिकेत हा धुमशान करत असल्याने अनेक संशोधक ह्याच्या मागे लागले आहेत. ह्या प्रकाराने फक्त तीन आठवड्यात मोठा प्रवास केला.

नवीन उत्प्रनीत प्रकार किती घटक ठरू शकतात ?
नवीन कोविड १९ प्रकार किती घातक ठरू शकतात हे प्रत्येक व्यक्ती प्रकृतीवर अवलंबून आहे. म्हणजे व्यक्ती भिन्नता, व्यक्ती प्रतिकारक्षमता आणि त्याचा आहार, विहार ह्यावर असे पाश्चात्य संशोधक अभ्यासकांचे मत आहे. चारही प्रकार तसे नवीन असल्याने त्यांच्या कार्यपद्धती त्यांची विविधता अजून स्पष्ट नसली तरी व्यक्ती परत्वे वेगळा परिणाम होतो हे त्याचे उत्तर आहे.

ह्या बाबतचा अभ्यास करताना एक लक्षात आले की प्राथमिक काळजी ही महत्वाची आहे. विषाणू अधिक व्यक्तीमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार कारण त्याला त्याचे अस्तित्व टिकवायचे आहे. अधिक व्यक्ती बाधित होणार म्हणजे अधिक विषाणू आणि समाजाला अधिक धोका. जितका प्रसार अधिक तितके उत्प्रनन अधिक हे समजून घ्यायला हवे. प्रजाती प्रकार वाढतच राहणार. पण कमी बाधित झाले म्हणजे विषाणूचे प्रजनन कमी, ह्यामध्ये शास्त्रज्ञ असे ही म्हणतात की, विषाणूला प्रसार करायचा आहे म्हणून तो जीवितहानी कमी करणार, तसे घडले तरच तो वाढेल पण हेही व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून आहे

म्हणजे विषाणूला थांबवणे हे प्रथम, त्यासाठी काळजी ही प्रथम मग पुढे सुरू होतो प्रवास विषाणूबरोबर लढण्याचं,

भारतात हे प्रकार येऊ शकतात का ?

विषाणू कोणत्या प्रकारचा आहे हे कळायला आपल्याला वेळ मिळायला हवा हे सत्य नाकारता येत नाही. आज मितीस साधारण २-१४ दिवस लक्षणे दिसायला लागतात म्हणजे बाधा झाल्यापासून लक्षणे नसल्यास तो प्रसार करणारा दूत असतो असे म्हटल्यास वागवे ठरत नाही. लक्षणे तशी सर्दी ताप, घशात सूज, डोके दुखणे, नाक चोंदणे किंवा वाहणे, अंगदुखी, खोकला, अशक्तपणा, उलट्या जुलाब ह्याच आहेत म्हणून फसगत होईल. परंतु काळजी हे उत्तर मात्र सर्व प्रकारामध्ये एकच आहे. आज विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत. नुकताच पश्चिम बंगालमध्ये विषाणूचा एक वेगळा प्रकार आढळला.

नैसर्गिक प्रतिकारक्षमता निर्माण होईल का ? HERD IMMUNITY

ह्याची वेळ येऊ नये. कारण हा वैश्विक असून ह्या विषाणूने कोणतेही रेष ठेवलेली नाही, त्याने सगळ्या सीमा पार केल्या आहेत. ७० टक्के अधिक लोकसंख्या बाधित झाल्यास ही प्रतिकारक्षमता येईल तोपर्यंत अनेक उत्प्रनन होऊन अधिक नुकसान होईल. आज उपलब्ध असलेल्या लसी( vaccines) नवीन प्रकाराविरोधात लढण्याचे सामर्थ्य देतील का? कार्य करतील का ?

लस ही शरीराची लढण्याची प्रतिकार क्षमता वाढवते, ही क्षमता पुन्हा व्यक्तीच्या प्रकृतीवर असते हे सर्वांना व्यक्तीपरत्वे निर्माण झालेल्या किंवा लसीकरणानंतर न झाल्यावरून लक्षात आले असेलच. सर्व लसी तरतमभावाने सर्व उत्प्रनांवर कार्य करणार्‍या आहेत असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

लसीकरण जर वेगाने झाले, विविध अधिक कार्यकारी लसी उपलब्ध झाल्या, तर समाजाचा आत्मविश्वास वाढेल आणि नियम पथ्य अधिक चांगले पाळले जाऊ शकते जेणेकरून उत्प्रनन विषाणू कमी निर्माण होऊन प्राथमिक लसी त्यावर निर्बंध उत्तम करू शकतील.

आज आणखी ४ लसी येऊ घातल्या आहेत. कदाचित १-२ महिन्यात त्या भारतात सर्वत्र उपलब्ध होतील आणि एक चांगले कवच देतील. पण तोपर्यंत काळजी घेणे, अफवांचा प्रसार होऊ न देणे, आहार, विहार, वैद्यकीय सल्ल्याने करणे, आजारी पडू न देणे, सर्व सामान्य काळजी घेणे, जमल्यास दोन मास्क परिधान करणे, गर्दी टाळणे, अंतर ठेवणे, अतित्रास टाळणे, विज्ञान शास्त्राच्या सांगण्यावरून पालन करणे आणि लसीकरणासाठी समाजाला प्रोत्साहित करणे. एवढे केल्यास आपण कोविडमुक्त होवो आणि त्याच्या कोविडच्या परिवाराला वेशीबाहेर ठेवण्यात यशस्वी होवो हे नक्की.

मतितार्थ ..bottom line. सर्व विषाणू उत्प्रनीत होतात तसा कोरोना विषाणू ही, अजून अनेक प्रकार दिसले आहेत, हे पहिल्यापेक्षा वेगळे आहेत व ते अधिक तीव्रतेने प्रसारित होणारे आहेत. काही प्रतिकारक्षमतावर आक्रमण करून लसीची तीव्रताही कमी करतील. हा विषाणू देश काळ परत्वे आपली कार्यशक्ती बदलेलही. लस आणि नवीन प्रजाती ह्याचा विचार न केलेला बरा ..विषाणू प्रसार थांबवायला प्राथमिकता द्यायला हवी. आपली जबाबदारी आपण ओळखायला हवी.

–डॉ. विक्रांत जाधव