घरफिचर्ससारांशप्रेम कैदी

प्रेम कैदी

Subscribe

प्रेम हा शब्द ऐकायला लोभस वाटत असला तरी त्यापुढील कैदी हा शब्द सामाजिक घृणा निर्माण करणारा आहे. सध्याच्या काळात प्रेमातून कैदी बनण्याचे प्रमाण वाढले आहे. तसा नॅशनल क्राईम रिपोर्टचा अहवाल समाजाचे डोळे उघडणारा आहे. प्रेमातून उद्भवलेले आजार, त्यातून वाढत चाललेली सामाजिक गुन्हेगारी ही समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. खरंतर प्रेम आणि प्रेमभंग ह्यातून समाजात बलात्कार, खून, आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात दरवर्षी हजारो तरुण-तरुणी भरडले जात आहेत. प्रेमातून निर्माण होणार्‍या बहुतेक गुन्ह्यांना जातीयवादाची मोठी किनार आहे.

अक्षय (नाव बदललेले) आदिवासी समाजातील, साधारणपणे वय १९ वर्षे, त्याचे आईवडील मोठ्या बागायतदाराकडे १० ते १२ वर्षांपासून शेतमजूर म्हणून काम करायचे. तो ८वीत गेल्यावर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण बंद झाले होते. मालकाच्या घरी गोठ्यावर शेण-कुराचे काम करू लागला. सातत्याने त्याचा मालकाच्या घराशी संपर्क येऊ लागला. मालकांच्या घरात सर्वात मोठी तरुण मुलगी ती साधारणपणे साडेसतरा वर्षांची. घास कापणी आणि इतर गोठ्यावरील कामात तिचा आणि त्याचा संपर्क वाढला. वयाचे अंतर फारशे जास्त नसल्याने प्रेम वाढत गेले. मुलगी लग्नासाठी जास्तच दबाव आणत होती.

सामाजिक दडपणामुळे त्याला ह्या सर्वांची भीती वाटत होती. दोघांत संबंध वाढल्याने मुलीने लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकी दिली होती. एकीकडे मुलीने दिलेली धमकी दुसरीकडून मुलीच्या घराच्यांकडून कायमचे संपवायची भीती असे असतानासुद्धा काळजावर दगड ठेवून नाईलाजाने मुलीसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघे १० ते १२ दिवस घरातून गायब झाले. मुलगी १७ वर्षे ६ महिन्यांची अज्ञान असल्याने तिच्या आईवडिलांनी पोक्सो कायद्यांतर्गत अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याची रवानगी जेलमध्ये झाली होती.

- Advertisement -

मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले. आरोपीची परिस्थिती गरिबीची तसेच पोक्सो कायद्याच्या जामीन मिळवण्यासाठी अत्यंत किचकट तरतुदीमुळे फुकट व्याप करून घेण्यास कुणीही वकील तयार होत नव्हता. सामाजिक संघटनांनी आरोपीचे वकीलपत्र देण्यावरून मी केसमध्ये हजर झालो. कोर्टाने पोलिसांनी चार्जेशीट (आरोपपत्र) दाखल केल्यानंतर त्याला जामीन मंजूर झाला होता, परंतु लायक जामीनदार मिळत नसल्याने तो जेलमध्येच अनेक दिवस जामीन मिळूनही खितपत पडून होता. इकडे १८ वर्षे पूर्ण झाल्याने मुलीच्या घरच्यांनी तिला स्थळ शोधून लग्न करून दिले. हा प्रेम कैदी म्हणून अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे अशा प्रेम प्रकरणात फसल्या जाणार्‍यांची संख्या हजारोंच्या पटीत आहे. त्यामुळे वरील उदाहरण जरी प्रातिनिधिक स्वरूपाचे असले तरी समाजात अशा प्रकारांची वाढ होत आहे. पीडित मुलीची मानसिकता, आरोपीची मानसिकता, त्यातून वाढलेली सामाजिक गुंतागुंत ह्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

खरंतर पोक्सो कायद्यामध्ये १८वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे, अगर कोणत्याही प्रकारचे लैंगिक गैरवर्तन करणे याबाबतचे गुन्हे मोडतात. १८ वर्षांखालील मुलगी ही कायद्याने अज्ञान समजली जात असल्याने तिची जरी पुरुषासोबत पळून जाण्यास संमती असली, अगर शारीरिक संबंध ठेवण्यास संमती असली तरी ती कायद्याने गृहित धरली जात नाही. त्यामुळे अज्ञानाच्या संमतीला अर्थ नाही. त्यामुळे हल्ली प्रियकर तरुण कायद्याच्या अज्ञानामुळे अज्ञान मुलींना पळवून नेऊन त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात आणि बलात्कार, अपहरणाच्या गुन्ह्यात अडकून बसतात. हल्ली दाखल होणार्‍या बलात्कार आणि अपहरणांच्या तक्रारींपैकी ९० टक्के गुन्हे मुलींच्या संमतीनेच घडलेले असतात, परंतु त्यामध्ये प्रियकराला जेलवारी चुकत नाही. अशा अनेक गुन्ह्यांमध्ये नातेवाईक व मित्रांनी पळून आलेल्या प्रियकर व अज्ञान मुलीला घरात आसरा दिल्याने त्यांनासुद्धा आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. नाहक जेलवारी त्यांच्या पदरात पडते.

- Advertisement -

प्रेम हा शब्द ऐकायला लोभस वाटत असला तरी त्यापुढील कैदी हा शब्द सामाजिक घृणा निर्माण करणारा आहे. सध्याच्या काळात प्रेमातून कैदी बनण्याचे प्रमाण वाढले आहे. तसा नॅशनल क्राईम रिपोर्टचा अहवाल समाजाचे डोळे उघडणारा आहे. प्रेमातून उद्भवलेले आजार, त्यातून वाढत चाललेली सामाजिक गुन्हेगारी ही समस्या दिवसेंदिवस जटिल बनत चालली आहे. खरंतर प्रेम आणि प्रेमभंग ह्यातून समाजात बलात्कार, खून, आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात दरवर्षी हजारो तरुण-तरुणी भरडले जात आहेत. प्रेमातून निर्माण होणार्‍या बहुतेक गुन्ह्यांना जातीयवादाची मोठी किनार आहे. त्यामुळे सामाजिक बहिष्काराच्या माध्यमातून होणार्‍या गुन्ह्याचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

प्रेमसंबंध, व्यावहारिक, व्यावसायिक संबंध, लग्नाचे खोटे आमिष दाखवून ठेवलेले संबंध, इतर वाद अशा अनेक वेगळ्या बाजूंची किनार असते. त्या बाजूंचीसुद्धा तपासणी न्यायाधीश, पोलीस यंत्रणा व वकिलावर असून प्रकरणातील सत्यशोधन करणे मोठे आव्हान होऊन बसते. खरे काय आणि खोटे काय हे फक्त अत्याचार करणारा आणि पीडितेलाच माहिती असते. अनेक वेळा सामान्य माणसे प्रेम म्हणता म्हणता त्यात भरकटत जाऊन नकळत मोठ्या गुन्ह्याची शिकार होऊन बसतात. कधी कधी स्वप्नात दिसणार्‍या बेड्या प्रत्यक्ष हातात पडतात आणि माणूस एका मोठ्या षड्यंत्राचा भाग बनून फसतो.

पण वर उल्लेख केलेल्या उदाहरणात सामान्य माणूस कसा प्रेमाची शिकार बनतो, अलगद प्रेमाच्या फाशात अडकतो, समाजात अशा अनेक प्रेमा आहेत, त्या पैशांसाठी, शारीरिक भुकेसाठी किंवा दोघांची गरज म्हणून, आकर्षण म्हणून संमतीने संधिसाधू प्रेमसंबंध कुणाशी ठेवतील. त्यानंतर समाजात एखादी गोष्ट पसरली तर ती झाकण्यासाठी बलात्काराच्या आरोपात निरपराध व्यक्तीला गुंतवत असतील तर अशा प्रेमापासून वेळीच सावध होऊन धडा घेणे गरजेचे आहे. नाहीतर ‘संमती’ या शब्दाच्या जागी पोलिसांना ‘बळजबरी’ लिहायला वेळ लागत नाही. वास्तविकपणे त्यात पोलिसांचा दोष नाही. त्यांच्यावर दडपण आणून फिर्याद घ्यायला भाग पाडणारे अनेक समाजसेवक बसले आहेत. एखादा श्रीमंत खरोखरंच बलात्काराच्या प्रकरणात अडकला असेल, तर ते गप्प राहतात आणि एखादा गरीब प्रेम प्रकरणात जरी अडकला तर ते मोर्चा काढून फाशीची मागणी करतात.

एकंदर सर्व गोष्टी बघितल्या तर कोर्टापुढे सत्य येण्यास बराच कालावधी लागतो. शब्दांच्या खेळामध्ये सामान्य माणूस अडकून जातो. खरंतर संमती आणि बळजबरी हे शब्द परस्परविरोधी आहेत, पण कायद्याचा चुकीचा अर्थ लावून त्यात संमतीने केलेले प्रेम बलात्कार ठरते आणि ठरवण्याचा प्रयत्न समाजघटकांकडून केला जातो. अनेक वेळा आंतरजातीय विवाह, प्रेमभंग, संमतीने ठेवलेल्या संबंधात वाद झाल्याने, नैराश्य तसेच आर्थिक वादातून पिळवणुकीतून इत्यादीसाठीसुद्धा बलात्काराचे खोटे खटले दाखल होतात. नकळत चांगली माणसे त्यात भरडली जातात. त्यामुळे प्रेम उघड्या डोळ्यांनी करावे, अन्यथा हेच प्रेम तुम्हाला कैदी बनवून तुरुंगाची हवा खायला लावेल इतकेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

–अ‍ॅड. गोरक्ष कापकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -