घरफिचर्ससारांशभावनांचा सो कॉल्ड बाजार!

भावनांचा सो कॉल्ड बाजार!

Subscribe

दोन शब्द गोडाचे आणि प्रेमाचे असं काहीसं चित्र माणसांमध्ये दिसायला लागतं, पण काही गोष्टी न बोलता समजून घेतल्या तरी होतंच की बाँडिंग. अशा रोजच्या जगण्यात येणारी अशी काही-काही वाक्यं जी खरंतर सांगतात काही वेगळं आणि मनाच्या गाभार्‍यात ठेवतात काहीतरी वेगळं. गाभार्‍यातलं हे लक्षात आलं की कदाचित सोपं होऊ शकतं. दोन पावले तू आणि दोन पावले मी पुढे येणं. खासकरून आमच्यासारख्या इमोशनल फुल्सना तर असंच होतं. काहींना नाही आवडत भावनांचा सो कॉल्ड बाजार मांडायला किंवा व्यक्त व्हायला. तरी अपेक्षा असते की समोरच्याने आपण काही न बोलता आपल्या भावनांना तोलून न बघता समजून घ्यावं.

–प्रियंका खैरनार

जमा है दिल में वैसे तो बहोत कुछ
पर लब्ज़ कतराते हैं जुबां पर आने से
बिकी हुई इस दुनिया में
सब मोल भाव लेकर बैठे है
कौन इस मार्केट में कोई कीमत भावनाओं की न लगाए
फिरभी अनमोल करदे अपने विचारो को

- Advertisement -

या असल्या टिपिकल शायरी स्टेटसला एकतर नुसत्याच वाचायला चांगल्या वाटतात आणि वाचल्याचं तर दोन
सेकंदापुरतं काही झालंय का? ओ हो हो क्या बात क्या है? हे असं म्हणून आपण आपल्या माणसाला प्रश्न करीत असतो आणि हे चार शब्द पण जर टाईप करायला वेळ नसला तर मग मोबाईलच्या इमोजीज फार कामाला येतात. इन शॉर्ट काय तर आजकाल आखे भी होती है दिल की जुबान वगैरेसारखा विचार कुणी करावा असं म्हटलं तर खरंतर ‘वेळ कुणाला आहे?’ असं चटकन कुणाच्याही तोंडात येतं. या व्यावहारिक मार्केटमध्ये आपण इतके व्यावहारिक होत जात आहोत की कुणाच्या भावनांची इतर कुणाला काही पडली वगैरे नाही, की ‘काय झालं?’ वगैरे विचारून आणि मग खर्‍याखुर्‍या उत्तराची वाटसुद्धा कुणी बघावी किंवा मनापासून जाणून घ्यावं की काय प्रॉब्लेम असेल बरं याला/हिला?

स्वत:चा सोडा पण इतरांच्याही मनाचा आरसा स्वच्छ धुवून पुसून वगैरे बघावा इतका वेळ कुणीच कुणासाठी देत नाही. म्हणून थोडक्यात सांगितलेलंच प्रत्येकालाच पटतं आणि हवं तर नक्कीच असतं. तस नसलं की ये बहोत बोर हैं यार…(परवाच एका तरुणाच्या तोंडी हे वाक्य ऐकलं), किंवा आपलं वय काय, आपण वागतो काय, पोरबुद्धी असल्यासारखी अकरावी-बारावीच्या मुलीसारखं वागू नकोस, हे असलं काहीतरी ऐकवलं जातं, पण जे वयाच्या पाचवीलाच पुजलेलं आहे असा भावनिक स्वभाव घेऊन वागणं म्हणजे काय तुम्हाला तुमच्या व्यक्तीने मागे खेचण्यासारखं आहे का? का आपण असा स्वभाव, आपल्या चष्म्याची काच धरून का तोलून बघतो? व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. माझ्या शाळेतल्या मुलांना माझं एक वाक्य नेहमी असतं.

- Advertisement -

ओपिनियन्स व्हॅरी अक्वॉर्डींग टु हेड्स. एकदा गावकरीत काम करीत असताना पत्रकार सुरेश बच्छाव सर यांनी खूप छान गोष्ट सांगितलेल्याचं आठवतं. आपल्याला जन्माला घालण्याआधी देव आपल्याला आपली झोळी पुढे करायला लावतो आणि एकूण सर्वच भावना आणि सुख, दुःख, अडचणी, संकटं वगैरे वगैरे वाटत असतो. यावेळी आपण आपली झोळी मागे केली की त्यालाही आपली क्षमता कळत असते आणि मग हे सर्व आयुष्यभर वाट्याला येतं. कुणी मग खूपच भावनिक अनुभवायला येतो, तर कुणी खूप व्यावहारिक, पण बर्‍याच वेळा माणसांच्या शब्दांचा चेहरा आणि मनाचा मोहरा यात कधी कधी व्यस्त प्रमाणसुद्धा जाणवतं. स्री असो अथवा पुरुष पण बर्‍याच लोकांना बर्‍याच वेळा व्यक्त होणं अवघड जात असतं.

एखाद्याला भावनिकपण वाट्याला आलं की ते तसंच राहतं, पण मग यामुळे तुम्ही आपली व्यक्ती किंवा तिच्या मनाची घुसमट तशीच सोडणार का? तू सांगितलं नाहीस तर मला कळेल कसं? मी वेडा आहे का, पुन्हा पुन्हा विचारतो आहे? मोकळं बोलता येत नाही? नात्यांमध्ये हा असला प्रश्न तरी का यावा? आणि जर यायला लागलाच तर हा प्रश्न की मग भावना अबोल ठेवणारा स्वतःच्या हक्काचं बोलणं पण सोडत असतो आणि वरवर दोन शब्द गोडाचे आणि प्रेमाचे असं काहीसं चित्र दिसायला लागतं, पण काही गोष्टी न बोलता समजून घेतल्या तरी होतच की बाँडिंग.

अशा रोजच्या जगण्यात येणारी अशी काही काही वाक्ये जी खरंतर सांगतात काही वेगळं आणि मनाच्या गाभार्‍यात ठेवतात काहीतरी वेगळं. गाभार्‍यातलं हे लक्षात आलं की कदाचित सोपं होऊ शकतं. दोन पावले तू आणि दोन पावले मी पुढे येणं. खासकरून आमच्यासारख्या इमोशनल फुल्सना तर असंच होतं. काहींना नाही आवडत भावनांचा सो कॉल्ड बाजार मांडायला किंवा व्यक्त व्हायला. तरी अपेक्षा असते की समोरच्याने (फक्त आपल्या माणसाने असलं तरी चालतंय) आपण काही न बोलता आपल्या भावनांना तोलून न बघता समजून घ्यावं, कारण

बहोत कुछ कहना होता है
पर लब्ज़ कतराते हैं, कैसे कहे हम…?
ये दर्द जो सींच रहा है हर पल,
किससे कहे और कैसे सहे हम?

आपल्या रोजच्या जगण्यात येणारी आणि मनात गूढ धरून ठेवणारी अशी काहिशी वाक्ये…

१) मी ठीक आहे
रोजच सोबत असताना बर्‍याच वेळा आपल्याला ‘आपलं’ म्हणणारी माणसं, अगदी कधीतरी आपली जीवाभावाची मंडळीसुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात, कशी आहेस? उत्तरदेखील तितकंच पटकन येतं, जितका पटकन हा प्रश्न आलेला असतो. मी छानच. तू बोल? असलोच छान तर छानच, पण बाय चान्स नसलोच आणि समोरच्याला सांगितलंच तर…? पुढे काय…? हे आपले-आपले म्हणणारे आपलं सोल्युशन होणार आहेत का? हा मोठा प्रश्न मनात मधमाशांसारखा डसत असतो. शब्दो के पीछे छिपे है अर्थ कई… हा… आता त्या लोकांना उत्तर देऊन खरं न सांगण्यामागची कारणं अनेक असू शकतात, पण आजचे व्यवहार, शब्द नाही तर समजणं नाही, असं सांगतात. म्हणून ही शॉर्ट टीप. खोटं खोटं छदमी हसून मी ठीक आहे… याचा अर्थ हादेखील कधी कधी होतो की मी ठीक नाहीये. मी अस्वस्थ आहे यार… असा पण असतोच की.. पण सांगू कुणाला आणि मी ठीक नाही हे सांगावं अशी ती सोयीस्कर जागाही हवी ना… ये भावनाओ का मार्केट हैं….

२) मला फरक पडत नाही
आजकाल हेअर फॉलचा प्रॉब्लेम इतका नसेल, जितके प्रॉब्लेम करणारे आणि तुम्हाला हर्ट करणारे लोक तुमच्या आसपास असतात, पण प्रत्येकाचा आपल्या मनावर परिणाम करत गेलं, तर राहीलं सगळं…. पण आपलीच माणसं आपल्याला त्रास देऊ लागली की दुःख सांगणार कुणाला? ते म्हणतात ना, की कुंपणाने शेत खाल्लं की तक्रार कुणाकडे करणार? मग अशा वेळी उगीचच आपण खूप स्ट्राँग असल्याचा आव आणत असतो आणि मला फरक पडत नाही हे असं म्हणत असतो, पण अरे… माणूस म्हणून मन आपल्यालाही आहेच की. हे असं कुढत कुढत कधीपर्यंत म्हणणार, की मला फरक पडत नाही. मला फरक पडत नाही, याचा अर्थ हा की मला अ‍ॅक्च्युअली फरक पडतो. मांडायला वेव्ह लेंथची स्पेस फक्त हवी असते.

३) मी मस्तच आहे
भरत जाधवच्या ‘मस्त चाललंय आमचं’ या चित्रपटाचं टायटल आणि खरी स्टोरी जितकी कॉन्ट्रास्टिंग आहे, तितकंच कॉन्ट्रास्टिंग हे वाक्य असतं. रोज मरे त्याला कोण रडे हे सत्य स्वीकारणारी माणसंसुद्धा आता आजकाल बघायला मिळतात. अगदी त्या इमिली डीकिन्सनच्या आफ्टर अ ग्रेट पेन फॉर्मल फिलिंग कम्स, असं काही मनात जपणारी. वेदनांचा घाव पुन्हा पुन्हा होत राहिला की एक वेळ अशी येते की कोणत्याही वेदनेचा काही परिणाम होत नाही. म्हणून म्हटलाच एखादा की मस्त आहे, तर त्याच्या मागचा अर्थ… की नक्की काहीतरी मस्त नाहीच… असासुद्धा कधीतरी असू शकतो. कारण दुनिया मे कितना गम है मेरा गम कितना कम है, हे राजेश खन्नाचं गाणं अनेक वर्षांपूर्वी आलेलं असलं तरीसुद्धा ती भावना ठेवणारे लोक आहेतच की आज पण, जी विचार करतात की काय तेच तेच गार्‍हाणं पुन्हा पुन्हा मांडावं, पण तरी मनाच्या तळाशी एक किंचितशी अपेक्षा असते की इतर कुणी नाही, पण आपल्या व्यक्तीने हे आपण काहीही न बोलता जाणून घ्यावं.

तर अशी ही जपवणुकीसाठीची काही वाक्ये. ‘ये जिंदगी है भाई पता नही कल हो ना हो’ म्हणून ही अशी काहीशी वाक्य बोलणारी मंडळी तुमच्या इर्द गिर्द कुठेतरी तुमचीच अशी असणारी असतील तर एकदा नक्की ना, ठीक आहेस? हे दोन शब्द विचारायला विसरू नका. नाहीच झालं काही तर एक जादूची झप्पी आणि मी आहे ना किंवा मला कळतं तू नाही सांगितलंस तरी हे दोन शब्दसुद्धा कदाचित खूप काही सांगू शकतात. म्हणून नाही इतर काही, पण अपनो के लिये इतना तो बनता है…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -