घरफिचर्ससारांशपैसा, देव आणि दलाल

पैसा, देव आणि दलाल

Subscribe

सध्या काहीही करून पैसे कमवा, असा धंदा जोरात सुरू आहे. कोरोना ह्या महामारीच्या आडून ज्याला जशी संधी मिळेल, तसे हात धुवून घेतले जात आहेत. ह्यात केंद्रातील भाजपा सरकार सर्वात जास्त आघाडीवर आहे. त्यांनी तर कमरेचं सोडून फेकूनच दिलं आहे. पण राज्य सरकारंसुद्धा मागं नाहीत. केंद्रानं मागं जाहीर केलेलं पॅकेज नेमकं कुठं जिरलं माहीत नाही. मूठभर वाटायचं अन् पोतंभर सांगायचं हीच बहुतेक सरकारांची पद्धत आहे.

मागे भाजपच्या एका केंद्रीय मंत्र्याला लाच घेताना पकडलं होतं. पैसा न खाणारा मंत्री भारतात सापडणं तसं कठीणच म्हणायला हवं. पण भाजपचं कल्चर जगावेगळं आहे. त्यांचा प्रामाणिकपणा जरा उच्च कोटीचा असतो. ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली’ ही त्यांची अफलातून संस्कृती आहे. स्वतः दारू पिणार नाहीत. दारू बंदीवर भाषण ठोकतील. पण फुकटात कुणी पाजणारा असेल तर मात्र सोडणार नाहीत. मग दारू त्यांच्यासाठी गंगाजल होऊन जाते. किंवा गोमांस खाऊ नये म्हणून गरिबांचे जीव घेतील, आंदोलन करतील, पण यांचे स्वतःचे मंत्री मात्र बीफ खाणार. एवढंच नव्हे तर लोकांना हवं तेवढं बिफ पुरविण्याची खात्रीदेखील यांचा मुख्यमंत्री स्वतः देणार !

पण हा पैसे खाणारा मंत्री वेगळा होता. पैसे घेताना मिशिवर ताव मारत म्हणाला होता, ‘पैसा खुदा तो नही, लेकीन खुदासे कम भी नही’ ! त्यावेळेला त्याच्या ह्या वाक्यावर देशभर गदारोळ उठला होता.

- Advertisement -

हा प्रसंग आठवण्याचं कारण असं की, सध्या काहीही करून पैसे कमवा, असा धंदा जोरात सुरू आहे. कोरोना ह्या महामारीच्या आडून ज्याला जशी संधी मिळेल, तसे हात धुवून घेतले जात आहेत. ह्यात केंद्रातील भाजपा सरकार सर्वात जास्त आघाडीवर आहे. त्यांनी तर कमरेचं सोडून फेकूनच दिलं आहे. पण राज्य सरकारंसुद्धा मागं नाहीत. केंद्रानं मागं जाहीर केलेलं पॅकेज नेमकं कुठं जिरलं माहीत नाही. मूठभर वाटायचं अन् पोतंभर सांगायचं हीच बहुतेक सरकारांची पद्धत आहे.

एवढा सारा भ्रष्टाचार करून हे लोक काय साध्य करत असतील ? शेवटी जायचं तर खाली हातांनीच आहे. एक मात्र खरं खुदापेक्षा पैसा जास्त कामात येतो, हे सर्वांच्याच आता लक्षात आलेलं आहे. मंदिर असो, मस्जिद असो, चर्च असो, गुरुद्वारा असो तुम्हाला जीव वाचवायचा असेल, तर ही ठिकाणं काहीही कामाची नाहीत. त्यासाठी हॉस्पिटलमध्येच जावं लागते. कोणताही साधू, संन्याशी, स्वामी, योगी.. तुमचा आमचा तर सोडाच पण स्वत:चाही जीव वाचवू शकत नाही. कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली की लगेच यांची पातळ व्हायला लागते. त्यातही भाजपा आणि सर्कस तर गाय, गोमूत्र, गायीचं शेण असल्या भंकसबाजित जास्त रमणारे लोक. मात्र तेही शेवटी विज्ञानालाच शरण जाताना दिसले !

- Advertisement -

मुद्दा असा की देव, धर्म यापेक्षा विज्ञान हे निश्चित भारी पडले आहेत. त्याप्रमाणे पैसा सुद्धा खुदा किंवा देवापेक्षा भारी पडला आहे, पडतो आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. तसं पाहिलं तर, देव, गॉड किंवा अल्ला ह्यांना प्रत्यक्षात कुणी पाहिलं नाही. संकटाच्या काळात ते कधी धावून आल्याचाही पुरावा नाही. ज्या काही आहेत, त्या पुराणातल्या थापा आहेत. मात्र पैशाचं तसं नाही. पैसा कितीतरी पटींनी सहज कामी येताना दिसतो. पैसा असेल तर तुम्हाला हव्या त्या सोयी उपलब्ध होऊ शकतात. पैसा असेल तर तुम्हाला हवं ते भौतिक सुख तुमच्या पायाशी लोळण घेताना दिसेल. हे जरी खरं असलं तरी पैशाच्या भरवशावर प्रत्येक सुख विकत घेता येईलच असं नाही. मुळात खरं सुख पैशावर अवलंबून नसते. पैशामुळे सोयी मिळू शकतात, सुख मिळेलच याची शाश्वती नाही. अर्थात ही देखील व्यक्तीसापेक्ष कल्पना आहे.

हे सारं माहीत असूनही माणसं पैशासाठी एवढी खालच्या पातळीवर का जात असतील ? भाजपा असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो की अन्य कोणताही पक्ष असो ( कम्युनिस्ट पार्टी वगळून ) 20/25 वर्षापूर्वी जी माणसं पैदल फिरत होती. एकवेळच्या जेवणाची सोय नव्हती त्यांची आज प्रॉपर्टी किती आहे? किंवा मंत्री असताना ‘माझं टिनाचं असल्यामुळे पावसाळ्यात गळते’ असं अभिमानानं सांगणार्‍या लोकांच्या प्रॉपर्टीचा हिशेब तरी आहे का ? एवढा पैसा कुठून आला? कसा आला? कुणी दिला? असे प्रश्न लोकांना का पडू नयेत ? पत्रकारांना का पडू नयेत? हे आश्चर्य आहे !

हे खरंच किळसवाणं आहे ! उलट काही विशिष्ट पत्रकार मंडळी तर संधी मिळेल तेव्हा साधं नव्हे, तर जिभेनं लोणी लावण्यात धन्यता मानतात ! मागून, पुढून, खालून, वरून, इथं तिथं, जिथं मिळेल तिथं यांची जीभ लोणी लावण्यासाठी जागा शोधते. अशावेळी या लोकांनी गायिलेल्या वाढदिवसाच्या आरत्या वाचताना मोठी मजा येते.

अशा पत्रकारांची, लेखकांची किंमत राजकारण्यांच्या लेखी भाटापेक्षा जास्त नसते. ते यांना मनातल्या मनात हसत असतात! बरं यांना त्याचा काही फारसा मोबदला तरी मिळतो का? मुळीच नाही! एखाद दुसरं बारकं पाकीट हातात पडलं तरी यांची शांताबाई होऊन नाचायला लागते. किंवा नेत्यानं यांच्याकडे नुसतं हसून पाहिलं तरी ह्या पुरुष पत्रकारांना उभ्या उभ्या नेत्याच्या नावानं गर्भधारणा होते !

समाजाचं हे अध:पतन सध्या सर्व बाजूंनी सुरू आहे. त्याला केवळ नेते, एखादा पक्ष किंवा एखादा समूह जबाबदार आहे, असं नाही. नीतिमत्ता ही आपापल्या सोयीनं ठरविली जाते. हवी तेव्हा गुंडाळून ठेवली जाते. हवी तेव्हा इतरांना बदनाम करण्यासाठी वापरली जाते. नीती-अनीती किंवा खर्‍या खोट्याचं सोयरसुतक हल्ली कुणालाही राहिलं नाही. विशेषतः सत्तेच्या सर्वोच्च स्थानावर बसलेली माणसं जर अशी नितीभ्रष्ट असतील, निर्लज्ज असतील, तर सामान्य माणसाला तरी कसा दोष देणार ? मात्र तरीही सामान्य माणूस एवढा नीच कधीच होऊ शकत नाही. तो अडाणी असेल, अशिक्षित असेल, गरीब असेल, पण इतका बेईमान असू शकत नाही. कारण त्याच्या जीवननिष्ठा पैशाशी नव्हे तर माणुसकी सोबत जुळलेल्या आहेत. त्याच्या जीवनावर संत साहित्याचा पगडा आहे. काही प्रमाणात का होईना.. पण महापुरुषांची शिकवण आजही त्याच्या नसानसातून खेळताना दिसते. बाकी काही खरं नाही !

कोरोनामुळे जे संकट उभं राहिलं आहे, ते भयंकर आहे. लॉकडाऊनमुळे कोरोडो लोकांना काम नाही. खायचं काय, जगायचं कसं, असा सर्वांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. लाखो लोक अवती भवती मरताना दिसत आहेत. पुढील काळात भुकेमुळे मरणारांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती आहे. अशावेळी तरी सरकार किंवा राजकीय पक्षाचे नेते यांनी देवाधर्माच्या नावाखाली प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा धंदा करू नये. खुदा तर मदतीला येणार नाहीच, पण पैशासाठी आपल्यातल्याच कुणी सैतान बनू नये, ही किमान अपेक्षा आहे !

भुके एवढे पीठ असू दे
चवी एवढे मीठ असू दे
लाचारीच्या मोसमातही
जगणे, मरणे धीट असू दे !

–ज्ञानेश वाकुडकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -