घरफिचर्ससारांशअन्नसाखळीचं महत्व उमगण्याचा काळ

अन्नसाखळीचं महत्व उमगण्याचा काळ

Subscribe

शेतीवर सतत वेगवेगळी जी संकटे येताहेत आणि शेतकर्‍यांभोवती संकटांची मालिका जी काही कायम राहते. त्यात एकटा माणूस काहीच करु शकत नाही. संकटे कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतात. कितीही प्रमाणात येऊ शकतात आणि ती किती दाहक असू शकतात. याचे आपल्यासमोरचे ज्वलंत आणि चालू उदाहरण म्हणजे कोरोनाचे देता येईल. या उदाहरणामुळे सगळ्या जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यात शेतकर्‍याची अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणं म्हणजे अधिक अरिष्टाच्या टप्प्याकडे नेणारं पहिलं पाऊल आहे. असंच म्हणावं लागेल.

कोरोनाच्या अवघड काळात एवढी गोष्ट ठळकपणे लक्षात आली आहे की, समाजाच्या हिताच्या दृष्टीने डॉक्टर, वैद्यकीय यंत्रणा, पोलीस, प्रशासनाची यंत्रणा महत्वाचं काम करणारी ठरली आहे. तेवढीच महत्वाची फुड सप्लाय यंत्रणाही महत्वाची आहे. यात उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यापासून ते ग्राहकाला पुरवठा करणार्‍या व्यक्तीपर्यंतचा घटक असो ही साखळी खूप आवश्यक आणि महत्वाची बनली आहे. साखळी तुटली तर कोणत्या संकटाला सामोरे जावे लागू शकते हे ही कोरोनाच्या काळात समोर येत आहे. अशा कठीण प्रसंगात शेतकर्‍यांची अनेक तरुण मुलं जीवाला धोका असतानाही जबाबदारी म्हणून पुढे आली आहेत. ‘सह्याद्री’ सारख्याच देशातील, राज्यातील शेतकर्‍यांच्या यंत्रणा तसेच शेतकरी गट पुढे येऊन जबाबदारीने काम करताहेत. समाजाला याची जाणीव होत आहे. हे प्रामाणिकपणे चांगलं काम होतंय. हे खूप आश्वासक आहे. या काळात जे अनुभव तयार होणार आहेत. जगात झपाट्याने बदल घडवण्यासाठी हे अनुभव मार्गदर्शक ठरतील.

शेतीवर सतत वेगवेगळी जी संकटे येताहेत आणि शेतकर्‍यांभोवती संकटांची मालिका जी काही कायम राहते. त्यात एकटा माणूस काहीच करु शकत नाही. संकटे कोणत्याही टप्प्यावर येऊ शकतात. कितीही प्रमाणात येऊ शकतात आणि ती किती दाहक असू शकतात. याचे आपल्यासमोरचे ज्वलंत आणि चालू उदाहरण म्हणजे कोरोनाचे देता येईल. या उदाहरणामुळे सगळ्या जगाचीच अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यात शेतकर्‍याची अर्थव्यवस्था खड्ड्यात जाणं म्हणजे अधिक अरिष्टाच्या टप्प्याकडे नेणारं पहिलं पाऊल आहे. असंच म्हणावं लागेल.

- Advertisement -

संकटात कसे तग धरणार?
जेव्हा जेव्हा अशी संकटे येतात. त्या वेळी जो सगळ्यात तळातला वर्ग आहे. जो कमकुवत आहे. तो जास्त अडचणीत येतो. आज कोरोनाच्या बाबतीतही पाहिलं तर आरोग्याच्या दृष्टीने तर, ज्यांची रोगप्रतिकारक्षमता कमजोर आहे. मुख्यत्वे वयस्कर वैगरे.. त्यांनाच मृत्यूच्या दारात अगोदर जावं लागलं आहे. ही जशी आरोग्याची लढाई आहे, तशीच ती आपल्या आर्थिक सक्षमतेचीही लढाई आहे. कोरोनाचं संकट कुठंतरी थांबणार आहे. मात्र आर्थिक संकट मात्र पुढील 4 ते 5 वर्ष पुरणार आहे. सगळं जगच आर्थिक मंदीच्या लाटेत राहणार आहे. याच्यामध्ये मग जो सामाजिक घटक आधीच कमजोर झाला आहे. तो जास्त अडचणीत येणार. शेतकरी वर्ग जो मागच्या 4-5 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या संकटांना तोंड देत आला आहे. जागतिकीकरणानंतर मागच्या 15-20 वर्षात शेती समोरील अडचणी आणि आव्हाने यांत सातत्याने वाढच होत गेली आहे. त्याला जोडून नैसर्गिक संकटांचीही मालिका आली. मागील 5 वर्षात तर शेतकरी वर्ग जास्त पिचलेला दिसतो. आधीच पिचलेला हा शेतकरी वर्ग या कोरोना संकटाच्या काळात किती तग धरणार? हा आताचा महत्वाचा प्रश्न आहे.

रोगप्रतिकारक्षमता वाढवावी लागेल
अशा संकटांचा सामना तयार करायला आपलीच ताकद तयार करणं. आपलीच इम्युनिटी सिस्टीम मजबूत करणं हाच पर्याय आपल्या हातात आहे. या स्थितीत प्रत्येकाने स्वत:ची इम्युनिटी चांगली ठेवणे हाच पर्याय अंती उरणार आहे. यातून वाचण्यासाठी सगळे मिळून प्रयत्न करा. कम्युनिटी (समुदाय) म्हणून आपण एकमेकांची काळजी घ्या. हा मुद्दा इथे महत्वाचा ठरणार आहे. शेतीला हे तंतोतंत लागू आहे. शेतीची अर्थव्यवस्था जर खरोखर सक्षम व ताकदवान करायची असेल तर आता आपल्या पातळीवर पुढाकार घेणं गरजेचं आहे. हे सगळे मुद्दे आता जास्त ठळकपणे पुढे येताहेत.

- Advertisement -

बदलाचा वेग वाढतोय..
स्वत:ची शेतकरी समुह म्हणून ताकद वाढवणं, ती ताकद वाढवण्यासाठी त्याकडे पूर्ण व्यावसायिकतेने विचार करणे. ताकद वाढवणं म्हणजे काय तर मूल्यसाखळ्या उभ्या करणं. या मूल्यसाखळ्यांच्या आधारानेच आपण संकटातून बाहेर पडत राहू. कोरोनाच्या निमित्ताने आपण आता अधिक समंजसपणे हा धडा परत एकदा गिरवणार आहोत. कोरोनाच्या या आपत्तीनंतर सगळं जग बदलणार हे आता अटळ आहे. हे आता आपणच विचार करतोय म्हणून नाही होणार, तर सरकारलाही यातून विचार करावाच लागेल. सगळ्या जगालाच यातून विचार करायला लागणार आहे. पुढील 20 वर्षात जे बदल होतील अशी अपेक्षा आपण केली होती. ते बदल पुढील 5 वर्षातच झालेले आपल्याला पहायला मिळतील.

पेटून काम करावे लागेल..
ग्रामीण अर्थव्यवस्था ताकदवान करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेत शहराकडे गेलेले जे लोंढे आहेत. ते गावातच कसे राहतील. हेही एक करोनाचं सांगणं आहे. सोशल डिस्टंन्सिग आपल्याला काय सांगतोय की जास्तीत जास्त लांब रहा. मागच्या 20-30 वर्षात जागतिकीकरणाच्या, शहरीकरणाच्या नादाने केले त्यात आता बदल करुन विकेंद्रीत अर्थव्यवस्था, विकेंद्रीत सामाजिक रचना याकडे जावे लागणार आहे. ज्या चुका आतापर्यंत केल्या आहेत, त्या दुरुस्त कराव्या लागतील. हाच कोरोनाचा संदेश आहे. संपूर्ण ग्रामस्वराज्याचे गांधीजींचे स्वप्न होते. त्या अर्थानेच त्यांनी ‘खेड्याकडे चला’ असे आवाहन केले होते. त्यांना अर्थव्यवस्था, व्यक्तिगत सामाजिक स्वास्थ्य, पर्यावरणाचे स्वास्थ्य हे सगळं अभिप्रेत होतं. हे सगळं सोडून जो उलट दिशेने विकास सुरू होता. त्याला कोरोनाने दिलेला हा मोठा धक्का आहे.

हे फक्त बोलून चालणार नाही, तर ते प्रत्यक्षात आणि कृतीत आणावं लागेल. या सगळ्याशी जोडून घेणे हा यापुढचा प्रत्येकाचा लढा असणार आहे. तो नुस्ता वैयक्तिक नाही तर सगळ्या समाजाचा लढा असणार आहे. गावातले, गावाचे प्रश्न सोडवणं हे सगळ्या समाजाला हे स्वीकारावं लागणार आहे. सर्व जगाची रचना त्यानुसार होणार आहे. जागतिकीकरणाकडून, शहरीकरणाकडून आपण पुन्हा एकदा गावाकडे, शेतीकडे जाणार आहोत. या परिस्थितीत आपण घेतलेली दिशा अजून भक्कमपणे कशी प्रत्यक्षात येईल. एकूणच येत्या काळात मूल्याधारीत साखळीचं महत्व आणि त्या शेतकर्‍यांच्या मालकीच्या असणं, याला येत्या काळात नक्कीच मोठा आधार असणार आहे. यासाठी पेटून काम करणे. ही या संकटाच्या काजळीला असलेली रुपेरी किनार असेल. नवीन जगाचं जे चित्र आहे, त्यात काम करायला आपल्याला खर्‍या अर्थाने संधी आहे.

इथून मागच्या काळात आपण भरपूर भोगलं आहे. आजही आपण भोगत आहोत. आपल्या संकटाच्या मालिकेतला कोरोना हा एक पिकपॉईंट आहे. आपण संकटाच्या शेवटच्या टप्प्याकडे चाललेलो आहोत. इथून पुढे एकतर जग बदललेलं असेल किंवा ते संपलेलं असेल.

दुसर्‍या महायुध्दाचा काळ हा सर्व जगातील मनुष्यजातीसाठी सर्वाधिक संकटाचा काळ होता. त्या काळात खूप नवीन शोधही लागलेत. नवीन तंत्रज्ञान पुढे आले. तसा हा काळ आहे. कोरोनाच्या संकटामुळे तयार झालेल्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी नव्या व्यवस्था उभ्या राहणं, नवे तंत्रज्ञान पुढे येणं या सगळ्याचा पुढच्या काळाला वळण देण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -