घरफिचर्ससारांशभरभराटीचा सुंदर चेहरा : फुल स्टॅक डेव्हलपमेंट!

भरभराटीचा सुंदर चेहरा : फुल स्टॅक डेव्हलपमेंट!

Subscribe

‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ हे एक तंत्रज्ञान आहे. याची उत्पत्ती ३ जून २००८ रोजी झाली. बर्न्स अँड मॅकडोनेल टर्मिनल्स आणि पाइपलाइन्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रँडी श्मिट यांनी जेसन ट्रेम्बले, जेफ्री ग्रोसेनबॅच आणि टॉम प्रेस्टन-वर्नर यांनी केलेल्या कामाचे वर्णन करण्यासाठी ‘फुल स्टॅक वेब डेव्हलपर’ हा शब्द सर्वप्रथम वापरला होता. १९७० आणि ८० च्या दशकात वेब आणि मोबाईलसाठी डिझाईन हे शब्द नियमितपणे वापरले जात होते. पुढे त्याला डेटाबेसची आणि विविध आर्थिक आदानप्रदान आणि इतर विश्लेषणात्मक गोष्टींची जोड मिळत गेली. कंपनीचा आर्थिक रेव्हेन्यू मिळवण्यासाठी मग एक नवीन गरज भासू लागली आणि त्यातून उदयास आले ते म्हणजे - ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट.’

जागतिक पटलावर उद्योग भरभराटीच्या सर्व व्यवहाराचा कणा म्हणजे ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ आहे. खरंतर कॉम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक सायन्स हे दोन्ही विषय सारखेच महत्त्वाचे आहेत. इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना एम्बेडेड टेक्नोलॉजी म्हणजे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर यांच्या एकत्रित काम करणारे तंत्रज्ञान अगदी सहजपणे समजते, मात्र कॉम्प्युटर सायन्स अभ्यासक्रमातून हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक यांची मात्रा कमी कमी होत गेली आणि त्याचा थेट जागतिक स्तरावर आर्थिक फटका आता या शाखेतील विद्यार्थ्यांना रोजगारात बसू लागला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), डेटा सायन्स (डीएस), स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगसाठी उपयोगी ठरणारे हायपर अ‍ॅटोमेशन, रेकॉर्ड आणि मनी ट्रान्झॅक्शन सुरक्षित नोंदी ठेवणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञान यांच्या जोरावर ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ तंत्रज्ञानात करिअर घडवत काम करणारे राजेशाही थाटात आहेत यावर कदाचित चटकन विश्वास बसणार नाही असे हे सत्य आहे.

गरज काय?

- Advertisement -

जर तुमच्यात कलात्मकता आहे, वेबसाईट्स कसे कार्य करते हे समजून त्यात सुधार आणि व्हॅल्यू एडिशन करण्यात इंटरेस्ट आहे, एखादा प्रॉब्लेम नेमका काय निर्माण झाला आणि तो कसा सॉल्व्ह करायचा हे एखाद्या लढाऊ योद्ध्याप्रमाणे तुम्हाला जर चॅलेंजिंग वाटून तुम्ही विजयी वीराप्रमाणे आनंदी होऊ इच्छित असाल, वेबसाईट तुम्ही क्रिएटिव्ह बनत छान आणि आकर्षकपणे सजवू शकत असाल, टीमवर्कमध्ये काम करणे तुम्हाला आवडत असेल, नवनवीन गोष्टी लोकांपर्यंत पोहचविण्यात तुम्हाला जॉब सॅटिस्फॅक्शन मिळत असेल तर तुमच्यासाठी खोर्‍याने पैसा ओढता येईल असे तंत्रज्ञान क्षेत्र म्हणजे-‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’! जगभर अमाप संधी आणि सृजनशीलतेचे आत्मसमाधान देणारे तंत्रज्ञान तुमची याच क्षेत्रात वाट पाहत आहे. कंपन्यांना प्रतिभावान व्यावसायिकांची आणि त्यांच्या प्रॉडक्ट्स व सर्व्हिसेसची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची नितांत आवश्यकता हेच ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ क्षेत्राच्या अमाप पैसा देणार्‍या नोकर्‍यांमागचे खरेखुरे मूळ कारण होय.

अशी झाली सुरुवात!

- Advertisement -

‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ हे एक तंत्रज्ञान आहे. याची उत्पत्ती ३ जून २००८ रोजी झाली. बर्न्स अँड मॅकडोनेल टर्मिनल्स आणि पाइपलाइन्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रँडी श्मिट यांनी जेसन ट्रेम्बले, जेफ्री ग्रोसेनबॅच आणि टॉम प्रेस्टन-वर्नर यांनी केलेल्या कामाचे वर्णन करण्यासाठी ‘फुल स्टॅक वेब डेव्हलपर’ हा शब्द सर्वप्रथम वापरला होता.
१९७० आणि ८० च्या दशकात वेब आणि मोबाईलसाठी डिझाईन हे शब्द नियमितपणे वापरले जात होते. पुढे त्याला डेटाबेसची आणि विविध आर्थिक आदानप्रदान आणि इतर विश्लेषणात्मक गोष्टींची जोड मिळत गेली. कंपनीचा आर्थिक रेव्हेन्यू मिळवण्यासाठी मग एक नवीन गरज भासू लागली आणि त्यातून उदयास आले ते म्हणजे – ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट.’

काय आहे ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’?

स्टॅक म्हणजे गंजी किंवा रास होय. ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ हे तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचा वापर करणार्‍या व्यक्तीला ‘फुल स्टॅक डेव्हलपर’ असे ओळखले जाते. ‘फुल स्टॅक डेव्हलपर’ हा खर्‍या अर्थाने नफा कमविण्यासाठी कंपनीची प्रतिमा किंवा ब्रांड बिल्ट करण्याचे काम करतात. प्रचंड मागणी, उत्तम वेतन, क्रिएटिव्ह लवचिकता, उत्तम उत्पादनक्षमता ही ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ची वैशिष्ठ्ये आहेत.

‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ अष्टौप्रहर कसे काम करते?

‘फ्रंट-एंड किंवा क्लाइंट साईड डेव्हलपर’ आणि ‘बॅक-एंड किंवा सर्व्हर साईड डेव्हलपर’ या दोघांचा मिलाफ घडविणारे आणि डेटाबेसचे सखोल ज्ञान असलेले अजब जादूगर म्हणजे ‘फुल स्टॅक डेव्हलपर’! ‘फुल स्टॅक डेव्हलपर’ ही अशी व्यक्ती आहे जी क्लायंट आणि सर्व्हर सॉफ्टवेअर दोन्ही डेव्हलप (विकसित) करू शकते. फ्रंट एंड डेव्हलपर वेबसाईटचे स्वरूप किंवा लेआऊट तयार करण्यात लक्ष केंद्रित करणारी व्यक्ती असते, तर बॅक एंड डेव्हलपर ही व्यक्ती वेबसाईट सर्व्हरशी कसा सुयोग्य, सुरक्षित आणि वेगवान संवाद साधते यावर लक्ष केंद्रित करतो आणि एक फूल स्टॅक विकासक किंवा डेव्हलपर या दोन्ही बाबींच्या संतुलनासाठी काळजी वाहत धोरणात्मक कृती करणारी व्यक्ती असते. या तिन्ही व्यक्तींच्या एकंदरीत कामकाजातून तयार होणारी आणि अष्टौप्रहर काम करणारी प्रणाली किंवा यंत्रणा म्हणजे ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट.’

किती स्कोप?

आज भारतात ४८ लक्ष कर्मचारी आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या १० वर्षांपासून इतर व्यवसायांच्या तुलनेत सर्वात वेगवान अशी इनफॉर्मेशन टेक्नोलॉजी (आयटी) क्षेत्रात रोजगारात १२ टक्के वाढ झाली आहे. २०३० पर्यंत ५०० अब्जाहून अधिक गॅझेट्स ऑनलाईन असतील आणि सर्व तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. तंत्रज्ञानाने आयटी व्यावसायिकांना जन्म दिला आहे. फोर्ब्सच्या मते गेल्या २ वर्षांत इंटरनेट वापरामध्ये ७० टक्के वाढ झाली आहे. परिणामी ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’मध्येही नोकर्‍यांमध्ये जागतिक स्तरावर सर्वाधिक वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे.

रोजगार संधी आणि आव्हाने

अमेरिकेतील व्हाईट हाऊस असो किंवा भारताचे संसद भवन, जगभरातील जॉब पोर्टलवर फुल स्टॅक डेव्हलपमेंटसाठी २८ हजारांपेक्षा जास्त नोकर्‍या रोज उपलब्ध आहेत. भारतातील फुल स्टॅक डेव्हलपरचा सरासरी पगार ८ लाख प्रतिवर्ष आहे आणि युनायटेड स्टेट्समध्ये प्रतिवर्ष १ लाख १० हजार डॉलर म्हणजे सुमारे ९० लाख रुपये प्रतिवर्ष इतका आहे.
केवळ वेबसाईट्सच नव्हे तर ‘वेब अ‍ॅप्लिकेशन्स’ तयार करण्यासाठीदेखील ‘फुल स्टॅक डेव्हलपर’ची डिमांड ही भारतात आणि परदेशातदेखील प्रचंड वाढली आहे.

‘फुल स्टॅक डेव्हलपर’ मागणीत भारतात २० टक्के वाढ झाली आहे. पारंगत वेबसाईट्सच्या देखभालीवर काम करतानाच सुरक्षिततेच्या आव्हानांसह ई-कॉमर्सच्या जागतिक पातळीवर आर्थिक व्यवहार करणार्‍या वेबसाईट तयार करणे मोठे थ्रिलिंग व रंजक काम आहे. स्टार्टअपने स्वत: उत्पादने तयार करणे तसेच दोन अ‍ॅप्लिकेशन्समध्ये संवाद साधण्यासाठी API म्हणजे अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस हा मध्य दुवा तयार करतात. अशा तंत्रज्ञांना जास्त पगाराची नोकरी देण्याची जणू जगभरात चढाओढ किंवा रस्सीखेच सुरू आहे. यापासून आजची तरुणाई अनभिज्ञ आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

करियरकडे वाटचाल

भारतातील बॅक एंड, फ्रंट एंड आणि फुल स्टॅक डेव्हलपरचे भविष्य उज्ज्वल आहे. आपल्याकडे तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान वापराचा दुष्काळ पडला आहे. ओरॅकलसारख्या विविध डेटाबेसवर कार्य करण्यास सक्षम असणे ही या क्षेत्रातील महत्त्वाची गरज आहे. सीएसएस ५, जावा स्क्रिप्ट, डीओएम (Document Object Model), सी. सी. प्लस प्लस, सी हॅश प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर एस. ए. सर्व्हिस (SaaS) आदींची प्राथमिक माहिती या क्षेत्रात आवश्यक ठरते. दिवसेंदिवस एचटीएमएल (HTML) आणि पीएचपी (PHP) या दोहोंसह समन्वय साधून काम करणार्‍या व्यक्ती म्हणजे ‘फुल स्टॅक डेव्हलपर’ची गरज आणि पगार वाढत आहे हे विशेष. नेटवर्किंग मूलभूत तत्त्वे, समस्या सोडवण्याचे कौशल्य तसेच वेबसाईट तयार करण्यासाठी खूप ट्रेंडी असलेले (MERN (MongoDB, Express, React, Node) किंवा MEAN (MongoDB, Express.js, AngularJS and Node.js) हे नवीनतम तंत्रज्ञान यामुळे ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ची क्षमता खूप पटीने वाढली आहे. प्रोग्राम ब्राऊजरमध्ये Javascript, jQuery, Angular, Vue आणि प्रोग्राम सर्व्हरमध्ये PHP, ASP, Python, Node या तंत्रज्ञानाचा वापर शिकणे ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’साठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ म्हणून लोकप्रिय स्टॅक कोणते?

मिंग स्टॅक, मोंगोडीबी, एक्स्प्रेस, एंग्युलर जेएस आणि नोड. जे. एस., लिनक्स, अपाचे, मायएसक्यूएल आणि पीएचपीसह एलएएमपी स्टॅक तसेच रुबीवरील रुबी, रुबी एसक्यूलाईट आणि पीएचपी यांचा समावेश लोकप्रिय स्टॅकमध्ये होतो.

कॉम्प्युटरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे महत्त्व

‘क्लाउड’वर डेटा स्टोअर करण्यासाठी उपलब्ध पर्याय आणि विविध तंत्रज्ञान यांची माहिती असणे तसेच सायबर सिक्युरिटीने कंपनी वेबसाईट आणि अ‍ॅप हॅक होणार नाही याबाबतचे ज्ञान या गोष्टी पगार आणि प्रमोशनसाठी ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मोठे वार्षिक सॅलरी पॅकेज यामुळे मिळू लागले आहे हे विशेष. परिणामी इलेक्ट्रॉनिक सायन्सपेक्षा जवळपास दहापट अधिक फी भरून कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेत कॉम्प्युटर सायन्समध्ये केवळ मुख्यत: प्रोग्राम आणि कोडिंगवर भर दिला जातो. फक्त प्रोग्रामिंग आणि कोडिंग येते मात्र त्याचा हार्डवेअरशी काय व कसा संबंध आहे हे न कळालेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनादेखील आता पस्तावा करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ क्षेत्रात हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्सची फारशी माहिती नसलेल्या कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांपेक्षा इलेक्ट्रॉनिक सायन्स आणि टेलिकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना जगभरातील कंपन्या प्राधान्य देऊ लागल्या आहेत.

प्रोटोकॉलचे महत्त्व

सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर या दोन्ही गोष्टींचा समावेश असलेल्या इलेक्ट्रॉनिक सायन्स शाखेत जगभरातील विविध युनिव्हर्सिटीज व कॉलेजेसमध्ये सातत्याने कल वाढायला वेगाने सुरुवात झाली आहे. परिणामी ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ क्षेत्रात हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्सची फारशी माहिती नसलेल्या कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांपेक्षा इलेक्ट्रॉनिक सायन्सचे विद्यार्थी उजवे ठरत आहेत. डेटा ट्रान्स्फर प्रोटोकॉलमध्ये माहिती अशी एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी पाठविली जाते याचे नियम आणि कायदे (रूल्स अँड रेग्युलेशन्स) शिकविणारे वायरलेस टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान अवगत असणार्‍या विद्यार्थ्यांना जगभरातील कंपन्या प्राधान्य देऊ लागल्या आहेत.

असे बदलतेय जीवन

मार्केटिंगचे ज्ञान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), मशीन लर्निंग (एमएल), डेटा सायन्स (डीएस), स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगसाठी उपयोगी ठरणारे हायपर अ‍ॅटोमेशन, रेकॉर्ड आणि मनी ट्रांझेक्शन सुरक्षित नोंदी ठेवणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञान यांच्या जोरावर ‘फुल स्टॅक डेव्हलपमेंट’ तंत्रज्ञानात करियर घडवत काम करणारे राजेशाही जीवन जगत आहेत यावर कदाचित लगेचच कुणी विश्वास ठेवणार नाही, परंतु हे सत्य आहे.

–(लेखक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -