घरफिचर्ससारांश‘गोधडी’ची उब !

‘गोधडी’ची उब !

Subscribe

‘गोधडी’ हा कवीचा पहिला वहिला काव्यसंग्रह अलीकडे माझ्या हाती आला. आता कवी डॉ. संजय खैरे नव्याने काव्याच्या प्रांतात उभा आहे. आमच्या लहानपणी आमच्या श्रीवर्धन तालुक्यात कोकणी मुसलमान मावश्या नऊवारी साड्या म्हणण्यापेक्षा धरुतांच्या गोधड्या छान शिवायच्या. त्यात धरुताचे काठ म्हणा, किनार म्हणा चौकोनी शिवून गोधडीला सुंदर आकार द्यायच्या, याची आठवण झाली. कितीही थंडी असली तरी बयच्या म्हणजे आयच्या धरूताची गोधडी अंगावर घेतली की उब जाणवायची.

डॉ. संजय याचा हा पहिला काव्यसंग्रह असला तरी त्याच्या लेखणीत जाणिवा आहेत. नव्हे, मी तर म्हणेन लिव्हिंग साँग आहे. कविता कितीही वाचनीय असल्या, संग्रह देखणा असला तरी तीन गोष्टींची विक्री होत नाही. १) ज्ञान २) विचार आणि संस्कार ३) कवीचे मानवी रसायन. हा सगळा रस मुरावा लागतो. आणि ‘गोधडी’ वाचताना संग्रहात उतरला आहे.

- Advertisement -

‘चिंध्या चिंध्या जमवीत
आई आयुष्य वेचते
खरखरीत हाताने
मऊ मऊ गोधडी शिवते

डॉ. संजयने दोन तप कविता रचल्या आणि डिसेंबर २०२१ ला ‘गोधडी’ काव्यसंग्रह प्रकाशित झाला. कवीचा गोल म्हणजे निश्चिती ठाम असायला हवी, मगच कलाकृती उदयाला येते. स्वत:ला ओळखणं आणि कविता समजणं ही महाकठीण गोष्ट आहे. ते कवीला या काव्याच्या प्रांगणात उतरल्यावर कळते. हे नेमकं जमलं की, कवी कविता व्यक्त करण्याच्या वाटेवर उभा आहे, असं मला वाटतं, हिच ती जमेची बाजू आहे.

- Advertisement -

सब्र कर बंदे…मुसीबत के दिन गुजर गये…
कल तक आपको देखकर हसते थे
और…आज-कल-परसू-नरसू देखते रह जायेंगे

कवी उगाच आक्राळ विक्राळ अथवा विद्रोही भाषा न वापरता कवी आपल्या परीने सहज लिहून जातो…

‘आपल्या देशातले पाणी, बाटलीत भरून
आपल्याच ते विकत आहेत’
पुढे कवी लिहितो…
‘आपणच दिले निवडून त्यांना
आता ते निवडून निवडून
आपल्याला मारणार आहेत ’

कवीच्या अनेक प्रेमकविता वाचकांशी संवाद करताना दिसतात.

‘हळूच तुला ग मी पाहिले
शब्दाविना…तुझे नयन बोलले,
वार्‍याने तुझे केस उडाले’

या संग्रहात व्यक्तिचित्रणात्मक कविता यात आहेत. कवीची कष्टकरी ‘चंद्रामावशी’ आणि महामानवासाठी सात वर्षे थांबलेला ‘सोनबा’वरील कविता वाचल्यावर कविता वयात आली,असे म्हणता येईल. ‘खंत’ या कवितेत तो आपली चळवळीची खंत

व्यक्त करतो.
बाबा किती दिवस
अजून आम्ही खायच्या बंदुकीच्या गोळ्या
तुम्ही शिस्त शिकवलीत
नाही तर आम्ही पेटविल्या
असत्या मुंबईच्या वस्ती वस्तीत होळ्या

कलाकृती ही अशीच असायला हवी, कारण शब्द रंगरुप, आकार-उकार यांनी नटलेल्य कविता वाचकांशी संवाद करतात. कवीच्या जगण्यावर कविता बोलते. शेवटी मातीचा गुण आहे.

=पुस्तकाचे नाव – गोधडी काव्यसंग्रह
=प्रकाशन – मृदुला
=मूल्य – २०० रुपये, पृष्ठे – १४४

=लेखक- रमाकांत जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -