घरफिचर्ससारांशगोल्ड बॉण्ड्स : गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय !

गोल्ड बॉण्ड्स : गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय !

Subscribe

सध्या सोने-चांदीचा दर हा सामान्यांच्या आवाक्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे सुवर्णप्रेमींना आपल्या इच्छेला मुरड घालावी लागते. पण आता ही चिंता मिटली आहे. सध्या सॉवरेन गोल्ड बॉण्ड हा सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉन्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो.

भारतीय संस्कृतीत राजधातू सोन्याला अनन्यसाधारण महत्व आहे. सोन्याची झळाळी कधीही कमी होत नाही. चीननंतर भारत हा सोने खरेदी करणार्‍या देशांमध्ये आघाडीचा देश आहे. दरवर्षी भारतात 800 ते 900 टन सोने खरेदी होते. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या तिमाहीत भारतात तब्बल 24 अब्ज डॉलरचे सोने आयात करण्यात आले. भारतीयांना सोन्याचे प्रचंड आकर्षण आहे. तुम्ही जर सोन्यामध्ये गुंतवणुकीचा विचार करत असाल तर सॉवरेन गोल्ड बॉण्ड हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. या माध्यमातून आपण सोन्यात व्हर्च्युअली गुंतवणूकही करू शकतो.

तसेही फिजिकल गोल्ड सांभाळणे हे जिकिरीचे काम आहे. चोरीची शक्यता आणि मग बँक लॉकरमध्ये ठेवण्याचा खर्च या बाबी विचारात घेता सॉवरेन गोल्ड बॉण्ड गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय ठरतो. सॉवरेन गोल्ड व्हर्चुअल म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात राहते, त्यामुळे त्याच्या शुद्धतेबद्दल शंका घेण्यास जागा नसते. सॉवरेन गोल्ड बॉण्ड्स सोन्यातील गुंतवणुकीचा अत्यंत सुरक्षित व स्वस्त पर्याय मानला जातो. अगदी एक ग्रॅमपासूनही या बॉण्ड्समध्ये गुंतवणूक करता येते. प्रत्यक्षात घरातील तिजोरी किंवा बँकेच्या लॉकरमध्ये सोने ठेवण्याची जोखीम पत्करण्यापेक्षा सॉवरेन गोल्ड बॉण्ड हा तुलनेत सुरक्षित पर्याय समजला जातो. रिझर्व्ह बँकेतर्फे या सिरीजसाठी प्रतिग्रॅम इश्यू प्राईस निश्चित केली जाते.

- Advertisement -

सोन्याचे दागिने बनवून घेणे आणि त्याला काही काळानंतर परत नवीन रूपात बदलवत राहणे हे गुंतवणुकीच्या दृष्टीतून योग्य आहे का याचाही विचार आता सजग गुंतवणूकदार करत आहेत. कारण त्यात नाही म्हटले तरी मेकिंग चार्जेस वगैरे नावाखाली ग्राहकाकडून पैसे वसूल केले जातात. त्यामुळे हौसेसाठी आवश्यक असलेले सोने ज्वेलर्सकडून खरेदी करणे व गुंतवणूक म्हणून बॉण्ड्सकडे वळणे उचित ठरेल.

गुंतवणूकदाराला खरेदी केलेल्या बॉन्डसवर 2.5 टक्के वार्षिक व्याज (दर सहामाहीला खात्यात जमा होणारे) मिळते. ह्याचा वापर कर्ज वगैरे घेताना तारण ठेवण्याप्रमाणेसुद्धा होतो. केवायसी नियमानुसार आवश्यक असते, पॅन कार्ड असणेसुद्धा आवश्यक आहे. गोल्ड बॉण्ड्सवरील व्याज करपात्र असेल, म्हणजेच तुमच्या सध्याचा टॅक्स स्लॅबनुसार तुम्हाला ह्या व्याजावर कर द्यावा लागेल. या योजनेत 8 वर्षाची परिपक्वता असते. या अवधीनंतर मिळालेल्या कॅपिटल गेनवर कर लागू होणार नाही. म्हणजेच पूर्ण अवधीसाठी गोल्ड बॉण्ड ठेवल्यास मिळालेल्या परताव्यावर कोणत्याही प्रकारचा कर लागू नाही. गुंतवणूकदार 5 वर्षानंतर हे सोने आरबीआयला परत करू शकतो. फिजिकल गोल्डऐवजी या बॉण्ड्समध्ये गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवावे ह्यासाठी ही एक आकर्षक बाब आहे. मुला-मुलींच्या लग्नासाठी अगोदर पेपर गोल्ड घेऊन परिपक्वता झाल्यानंतर पैसे घेऊन तुम्ही नंतर ज्वेलर्सकडून फिजिकल गोल्ड घेऊ शकता.

- Advertisement -

गुंतवणूक कोण करू शकेल ?
– भारतात राहणारे नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंबे, विश्वस्त, विद्यापीठे आणि सेवाभावी संस्था या गोल्ड बाँड योजनेत गुंतवणूक करु शकतात.

सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीममध्ये पैसे गुंतवण्याचे 14 प्रमुख फायदे –

1. पेपर गोल्डची शुद्धता 99.5 टक्के असते.
2.सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के व्याज मिळते. प्रत्येक सहा महिन्यांनी तुम्हाला व्याजाची रक्कम मिळते.
3.सॉवरेन गोल्ड बॉण्डमधील गुंतवणुकीवर तुम्हाला कॅपिटल गेन टॅक्स आकारला जात नाही.
4. हे सोने सुरक्षित साठवून ठेवण्याची चिंता नसते. त्यामुळे जोखीम कमी होते. त्यामुळे बँक लॉकरचा खर्च वाचतो.
5. कर्ज घेण्यासाठी सॉवरेन गोल्ड बॉण्डचा तारण म्हणून वापर करता येऊ शकतो.
6. प्रत्यक्ष सोन्याप्रमाणे जीएसटी किंवा मेकिंग चार्जेस लागत नाहीत.
7. वेळोवेळी योजनेत गुंतवणुकीची संधी उपलब्ध होते.
8. ही गुंतवणूक अमूर्त (डिमॅट) स्वरूपात म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्यामुळे ह्याला चोरीची भीती नसते.
9. बाजारभावापेक्षा स्वस्तात सोने मिळते.
10. सोन्याच्या शुद्धतेची खात्री असते, पारदर्शकता असते.
11. अगदी कमीतकमी एक ग्रॅम सोनेही विकत घेता येते.
12. रिझर्व्ह बँकेद्वारे ही योजना जाहीर होते, म्हणजेच सरकारकडून सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते.
13. आठ वर्षांचा परिपक्वता कालावधी असला तरी तुम्ही हे सोने 5 वर्षानंतर आरबीआयला परत करू शकता.
14.पेपर गोल्ड असल्याने ज्वेलर्सप्रमाणे मेकिंग चार्ज नसतो.

किती गुंतवणूक करता येते?

योजनेमध्ये किमान एक ग्रॅम सोने गुंतवले जाऊ शकते. कोणतीही व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब जास्तीत जास्त चार किलो मूल्याचे बॉन्ड खरेदी करू शकतात. तर ट्रस्ट आणि तत्सम घटकांसाठी कमाल गुंतवणूक मर्यादा 20 किलो आहे.
सोन्यात गुंतवणूक आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बॉण्डच्या सीरिज जाहीर करते. तसेच त्यामध्ये सरकारकडून सुरक्षिततेची पूर्ण हमी दिली जाते. सरकारची सॉवरेन गोल्ड बॉण्ड ही योजना नोव्हेंबर 2015 मध्ये सुरू झालेली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -