घरफिचर्ससारांशकशी असेल हिरामंडी?

कशी असेल हिरामंडी?

Subscribe

बर्‍याच काळापासून चर्चेत असलेली ‘हिरामंडी’ ही एक वेबसीरिज आहे, जी आपण नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत. जेव्हापासून ‘हिरामंडी’चा पोस्टर आऊट झाला तेव्हापासून त्याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं आहे.

-संतोष खामगांवकर

संजय लीला भन्साळींची कलाकृती म्हटलं की पडद्यावर तुम्हाला ग्रेस, ग्लॅमरसोबत लार्जर दॅन लाईफ अनुभूती मिळायलाच हवी. आजपर्यंतच्या त्यांच्या अनेक चित्रपटांतून ती भवदिव्यता आपण सगळ्यांनीच अनुभवली आहे. मग तो हम दिल दे चुके सनम असो, ब्लॅक असो, पद्मावती असो किंवा बाजीराव मस्तानी असो. संजय लीला भन्साळी पुन्हा एकदा तीच सौंदर्यानुभूती घेऊन येत आहेत त्यांच्या ‘हिरामंडी’मधून.

- Advertisement -

बर्‍याच काळापासून चर्चेत असलेली ‘हिरामंडी’ ही एक वेबसीरिज आहे, जी आपण नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहणार आहोत. जेव्हापासून ‘हिरामंडी’चा पोस्टर आऊट झाला तेव्हापासून त्याबद्दलच्या चर्चेला उधाण आलं आहे. सोशल मीडियावर आजपर्यंत फक्त ऐकिवातच असलेल्या लाहोरमधल्या हिरामंडीच्या माहितीचे व्हिडीओ बनू लागले. ही हिरामंडी लाहोरमध्ये नक्की आहे कुठे? त्याचा इतिहास काय? आता हिरामंडी दिसते कशी? वगैरे माहितीचा सडाच सोशल मीडियावर पडला आहे.

असो, पण संजय लीला भन्साळींची ‘हिरामंडी’ लाहोरच्या एका कोठ्यावर घडणारी गोष्ट आहे, ज्यात भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचेही संदर्भ जोडले गेले आहेत. मनीषा कोईराला, रिचा चड्ढा, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, शर्मिन सेगल, संजिदा शेख मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या मल्टीस्टारर वेबसीरिजचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यातली भन्साळींची छाप असलेली तीच सुंदर सिनेमॅटोग्राफी, भव्यदिव्य सेट्सची रेलचेल निश्चितच प्रेक्षकांना आकर्षित करणारी आहे. त्यामुळे संजय लीला भन्साळींची ही कलाकृती नजर खिळवून ठेवेल यात शंकाच नाही, पण फर्स्ट लूक आला असला तरी वेबसीरिजच्या प्रदर्शित होण्याची तारीख मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.

- Advertisement -

त्यावेळच्या लाहोरमधील कोठ्यातली जीवनशैली कशी होती याचा अंदाज आपल्याला या फर्स्ट लूकमधून येतो. एक असाही जमाना होता जेव्हा तवायफांच्या या कोठ्यावर सुकून होता, शांती होती. त्यांच्या हसत्या-खेळत्या जीवनशैलीत कलेचा आविष्कार होता. अशातच त्या काळात स्वातंत्र्य संग्रामाचं बिगुल वाजू लागतं. हळूहळू लोकांच्या मनातील स्वातंत्र्य संग्रामाची आग पसरू लागते आणि त्याचा लोट या कोठ्यावरही येऊन पोहचतो.

मग या कोठ्यात राहणार्‍या लोकांना कशा प्रकारे बदलांना सामोरं जावं लागतं, यासोबतच फर्स्ट लूकमध्ये आपल्याला आणखीही काही गोष्टींचे संकेत मिळतात. त्यानुसार तुम्हाला शह-काटशह, कुटील कारस्थानं, षड्यंत्र पाहायला मिळेल. त्यातून घडणारे दगलबाजीचे किस्से पाहायला मिळतील. या सगळ्यासोबतच आर्ट आणि ग्लॅमरची सौंदर्यानुभूती हा संजय लीला भन्साळींचा मुख्य यूएसपी आहेच. त्यामुळे प्रेक्षकांची ‘हिरामंडी’बद्दलची उत्कंठा निश्चितच शिगेला पोहचली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -