घरफिचर्ससारांशविचारांच्या गतीने व्यवसायवृद्धी !

विचारांच्या गतीने व्यवसायवृद्धी !

Subscribe

गेल्या दोन दशकात मोठी डिजिटल क्रांती झाली आहे. तुमचा व्यवसायसुद्धा डिजिटल नसेल व त्यात माहिती व तंत्रज्ञान याचा वापर नसेल तर तो फार काही मोठा होणार नाही असे बिल गेट्स यांचे ठाम मत आहे. म्हणूनच आजच्या आपल्या रोजच्या जीवनात मायक्रोसॉफ्ट ही अगदी श्वासासारखी काम करत आहे. जर तुम्हाला विचारांच्या गतीने व्यवसाय करायचा असेल तर तुमचा व्यवसाय हा डिजिटल हवाच व ग्राहकाला अगदी सहज उपलब्ध होईल, अशी तुमच्या व्यवसायाची माहिती त्या डिजिटल पद्धतीत उपलब्ध असायला हवी.

माणसाच्या मनात दिवसभरात 6200 विचार येतात, असा एक नवीन सर्व्हे आहे. इतका विचारांचा स्पीड आहे, त्याच स्पीडने व्यवसाय कसा करायचा. मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. ह्या कंपनीचे संस्थापक बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. ते श्रीमतांच्या यादीत गेली अनेक दशके अगदी वरच्या स्थानावर आहेत. त्यांचे एक प्रसिद्ध पुस्तक वाचण्यात आले. विचारांच्या वेगाने व्यवसाय कसा करायचा (business at the speed of thought) यासाठी ते सांगतात की, तुमच्या व्यवसायाची एक डिजिटल मज्जासंस्था (नर्व्हस सिस्टीम)असायला हवी. जशी मानवी शरीराची एक मज्जासंस्था आहे व ती मेंदूकडून कार्य करत असते व मानवाच्या सर्व अवयवांना योग्य ती माहिती पुरविते. त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायाचीसुद्धा एक डिजिटल मज्जासंस्था हवी. ह्या व्यावसायिक मज्जासंस्थेचेसुद्धा अनेक अवयव आहेत.

यात स्वतः मालक, भागीदार, संचालक, कर्मचारी, ग्राहक, गुंतवणूकदार, बँकिंग पार्टनर, सरकारी एजन्सी हे व असे अनेक अवयव आहेत. ह्या सर्वांना तुमच्या व्यवसायाच्या डिजिटल नर्व्हस सिस्टीमकडून अखंड व अद्ययावत माहितीचा पुरवठा केला गेला पाहिजे. गेल्या दोन दशकात मोठी डिजिटल क्रांती झाली आहे. तुमचा व्यवसायसुद्धा डिजिटल नसेल व त्यात माहिती व तंत्रज्ञान याचा वापर नसेल तर तो फार काही मोठा होणार नाही असे बिल गेट्स यांचे ठाम मत आहे. म्हणूनच आजच्या आपल्या रोजच्या जीवनात मायक्रोसॉफ्ट ही अगदी श्वासासारखी काम करत आहे. जर तुम्हाला विचारांच्या स्पीडने व्यवसाय करायचा असेल तर तुमचा व्यवसाय हा डिजिटल हवाच व ग्राहकाला अगदी सहज उपलब्ध होईल, अशी तुमच्या व्यवसायाची माहिती त्या डिजिटल पद्धतीत उपलब्ध असायला हवी.

- Advertisement -

इंटरनेट हा माहितीचा खजिना आहे. गेल्या वीस वर्षात जेवढी माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे तेवढी माहिती लोकांना गेल्या 2000 वर्षांत उपलब्ध नव्हती, असा एक सर्व्हे आहे. आज इंधन किंवा तेल किती महाग आहे कारण ते आपण आयात करतो तसेच माहितीलासुद्धा आता तेल असे समजले जाते ( data is new oil ). आज तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न पडले असतील आणि ते तुम्ही गुगलवर टाकले की, तुम्हाला त्या प्रश्नांची माहिती एका मिनिटात उपलब्ध होतात आणि ती माहितीसुद्धा अगदी उपयुक्त अशी. मग सर्व जर इंटरनेटवर उपलब्ध आहे तर मग आपले व्यवसाय कसे चालतील. आपल्याला ग्राहक कसे मिळतील हाही एक मोठा प्रश्न आहे. ह्याच प्रश्नाचे उत्तर बिल गेट्सच्या पुस्तकात आहे.

अंतर्दृष्टीसाठी माहिती (information to insight) :
माहिती प्रवाह हे तुमचे व्यवसायाचे जीवन आहे. तुमच्या सेवेतून किंवा व्यवसायातून उपलब्ध माहितीच्याद्वारे जर ग्राहकाला अंतर्दृष्टी (insight) प्राप्त होत असेल तरच ती माहिती ही उपयुक्त माहिती आहे असे समजावे आणि तरच तो ग्राहक तुमच्या व्यवसायासाठी जोडला जाईल व तो कायमसुद्धा राहील. आणि म्हणून इंटरनेटवर खूप सारी माहिती जरी उपलब्ध असेल तर त्यातून ग्राहकाला निर्णय घेता येईल असे नाही, याला बिल गेट्स माहितीचा महापूर असे म्हणतो. तुमची उत्पादने आणि सेवांबद्दल तुमचे ग्राहक आणि भागीदार काय विचार करतात, तुम्ही कोणती बाजारपेठ मिळवत आहे वा गमावत आहे आणि का ? आणि तुमची खरी स्पर्धात्मक धार काय आहे या कठीण प्रश्नांची उत्तरे देण्यास तुम्हाला सक्षम करणारी माहिती तुमच्याकडे आहे का? तुम्ही माहिती कशी गोळा करता, व्यवस्थापित करता आणि वापरता ते तुम्ही जिंकता की हरता हे ठरवेल.

- Advertisement -

उत्पादक त्यांची उत्पादने किती चांगल्या प्रकारे डिझाइन करतात, त्यांची उत्पादने आणि सेवा सुधारण्यासाठी ते ग्राहकांच्या फीडबॅकचा किती हुशारीने वापर करतात, ते त्यांच्या उत्पादन प्रक्रियेत किती लवकर सुधारणा करू शकतात, किती हुशारीने ते त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करतात आणि कसे ते वितरण आणि त्यांची यादी कार्यक्षमतेने व्यवस्थापित करतात. या सर्व माहिती-समृद्ध प्रक्रियांना डिजिटल प्रक्रियेचा फायदा होतो. अशा पद्धतीने तुमच्या व्यवसायाची डिजिटल नर्व्हस सिस्टीम असायला हवी. योग्य लोकांसह योग्य माहिती एकत्र आणल्याने कंपनीची धोरणात्मक व्यवसाय संधी विकसित करण्याची आणि त्यावर कार्य करण्याची क्षमता नाटकीयरित्या सुधारते.

बहुतेक व्यवहार स्वयं-सेवा डिजिटल व्यवहार होत चालले आहेत :

आजची बँकिंग व्यवस्थेची डिजिटल सिस्टीम बघा, त्यात स्वयंसेवा प्रणालीचा परिणामकारक वापर केलेला दिसत आहे. इंटरनेट बँकिंग असो किंवा कस्टमर सेवा असो व कॉल मॅनेजमेंट सिस्टीम असो यात सर्व ठिकाणी एक सिस्टीम आहे. तुमचे कॉलसुद्धा क्वालिटीसाठी रेकॉर्ड केले जातात व बँकेच्या कर्मचार्‍याने ग्राहकाच्या प्रश्नांना कशी उत्तरे दिली, कसे समाधान केले याचेसुद्धा नंतर अवलोकन केले जाते. स्वयंसेवेमुळे तुमच्या वेळेची बचत होते. ग्राहकांच्या वेळेची बचत होते व ग्राहकाला वेळेत विनासायास माहिती उपलब्ध होते. अशीच सिस्टीम सर्व मोबाईल कंपन्यांची आहे. यातील बँक किंवा मोबाईल कंपनी, तिचे ग्राहक, वितरक हे सर्व एका डिजिटल सिस्टिममध्ये गुंफले गेले आहेत, त्यामुळे लाखो करोडो व्यवहार रोज होत असतात, यालाच व्यवसाय विचारांच्या स्पीडने करणे असे बिल गेट्सला म्हणायचे आहे.

तुमचा व्यवसाय का वाढत नाही ?
तुमचा व्यवसाय वाढत आहे की नाही याची साधी टेस्ट म्हणजे तुमच्या मागील पाच वर्षाच्या व्यवसायाची विक्रीमध्ये झालेली वाढ (अर्थातच कोरोनाची दोन वर्षे सोडून). तुमची विक्री ही त्याच ठिकाणी आहे. व्यवसाय स्केलेबल होत नाही तर त्याचे महत्वाचे कारण आहे तुमची डिजिटल नर्वस सिस्टीम. प्रत्येक व्यवसायासाठी बाजारासाठी वेळ कमी होत आहे, मग तो भौतिक किंवा माहिती उत्पादनांची विक्री असो. बाजारात प्रथम येण्यासाठी डिजिटल माहितीचा वापर केल्याने तुमची स्पर्धात्मक स्थिती आमूलाग्र सुधारू शकते. सर्वात महत्त्वाचा वेग हा मुद्दा तांत्रिक नसून व्यवसायासाठी फार महत्वाचा आहे. हे सर्वांना पटणारे आहे की व्यवसायाचे अस्तित्व हे प्रत्येकजण शक्य तितक्या वेगाने पुढे जाण्यावर अवलंबून आहे.

यशस्वी होणारे व्यावसायिक नेत्यांना व्यवसाय करण्याच्या नवीन मार्गाचा अवलंब करावा लागेल की, जो माहितीच्या वाढत्या वेगावर आधारित आहे. हा नवीन मार्ग म्हणजे तंत्रज्ञान स्वतःच्या फायद्यासाठी लागू करणे नाही, तर कंपन्या कशा प्रकारे कार्य करतात ते बदलण्यासाठी त्याचा वापर करणे. तंत्रज्ञानाचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी, व्यावसायिक नेत्यांना त्यांच्या प्रक्रिया आणि त्यांची संस्था सुव्यवस्थित आणि त्याचे आधुनिकीकरण करणे अनिवार्य आहे.

व्यवसायाच्या डिजिटल नर्व्हस सिस्टीमचे अंदाजपत्रक (बजेट):
डिजिटल सिस्टीमसाठी काही तरी बजेट ठरविणे महत्वाचे आहे. अगदी नवीनच व्यवसाय असेल तरीही विनामूल्य सिस्टीम विकसित करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्राम ह्या कमी खर्चिक साधनांचा वापर आपण टाईमपाससाठी करतो की, आपल्या व्यवसायवृद्धीसाठी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. डिजिटल सिस्टीम जरी खर्चिक असेल तरीही तिला पर्याय नाही. नवीन व्यावसायिकांनी हळूहळू त्याच्या बजेटमध्ये वाढ करणे आवश्यक आहे.

माहिती हा डिजिटल नर्व्हस सिस्टीम व व्यवसायाचा मुख्य गाभा :
तुमचा व्यवसाय यशस्वी व्हायला काय आवश्यक आहे. तुमचे कर्मचारी, चांगले प्रॉडक्ट किंवा सेवा, चांगली कस्टमर सर्व्हिस. हे सर्व असले तरी व्यवसायवृद्धी का होत नाही तर तुमची माहिती प्रणाली. जसे वर आपण बघितले की, इंटरनेटवर माहितीचा महापूर आलेला आहे. योग्य ती माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, तो योग्य पद्धतीने मांडणे व तिचा वापर तुमच्या व्यवसायाच्या डिजिटल सिस्टीममध्ये करणे हीच व्यवसाय यशस्वी होण्याची, त्यात वाढ होण्याची व स्पर्धेत टिकण्याची गुरुकिल्ली आहे.

का ला महत्व : स्वामी विवेकानंद तरुणांना सांगतात की, तुमच्या आयुष्यातील दोन दिवस फार म्हत्वाचे आहेत. पहिला दिवस तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलो तो दिवस आणि दुसरा तुम्हाला ज्या दिवशी तुम्हाला कळेल की, मी कशासाठी जन्माला आलेलो आहे. व्यवसायातसुद्धा हे महत्वाचे आहे, तुम्ही व्यवसाय का सुरू करत आहात, का चालवत आहात, हा प्रश्न नेहमी तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. ह्या प्रश्नाचे उत्तर व्यवसाय हा पैसे मिळविण्यासाठी सुरु केला आहे व चालवत आहे हे नक्कीच आहे. पण तुमच्या सेवेला किंवा मालाला ग्राहक पैसे देतील का? ह्या का ला अतिशय महत्व आहे. थिंक अँड रिच ग्रो ह्या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक नेपोलियन हिल याचे एक महत्वाचे वाक्य आहे. तुम्ही जेव्हा इतरांना पैसे मिळविण्यासाठी मदत करतात तेव्हाच तुम्हाला पैसे मिळतात. विषय डिजिटल माहिती प्रणालीचा आहे तर त्यातून तुम्ही तुमच्या ग्राहकांना पैसे मिळविण्यासाठी मदत करत आहात का, ह्या का ला महत्व आहे.

थोडक्यात माहितीचा इनेटरनेटवर महापूर आला आहे. योग्य माहिती शोधणे, तिचे विश्लेषण करणे, ती तुमच्या ग्राहकांना उपयुक्त होईल अशी मांडणे, तिचा वापर तुमच्या डिजिटल नर्व्हस सिस्टीममध्ये करणे, त्यात बदल करणे, त्या माहितीला अद्ययावत ठेवणे हा थोडक्यात बिल गेट्स यांच्या ह्या पुस्तकाचा मतितार्थ. ज्यांना पूर्ण पुस्तक वाचायचे आहे त्यांना ते इंटरनेटवर मोफत उपलब्ध आहे. विषय हाच आहे, ते वाचून त्याचा उपयोग तुमच्या व्यवसायात कसा करायचा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -