थिंक बँक…

Subscribe

थिंक बँक ही अशी योजना आहे की, या माध्यमातून आपल्या संस्थेची उत्पादकता सुधारणांच्या कार्यक्रमात सर्व श्रेणीचे कर्मचारी सक्रीय सहभाग घेऊ शकतील. सुधारणा छोट्या छोट्या असल्या तरी त्यांच्या उपयुक्ततेमुळे संस्थांना प्रंचड लाभ होऊ शकतो. उत्तम तयार केलेली योजना आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी आपली कामाची जागा उत्पादक आणि उत्साहवर्धक होण्यासाठी साह्यभूत ठरतात आणि कामगाराचा विधायक आणि सक्रीय सहभाग मिळवू शकतात, याबाबत शंकेला जरासुध्दा जागा नाही. जो माणूस काम करतो तोच त्यातला तज्ज्ञ असतो आणि त्यावरील उपायही आपल्या कल्पकतेने तो सुचवू शकतो हे या मागचे तत्वज्ञान आहे. फक्त यासाठी त्याला प्रोत्साहनाची आणि आपलेपणाची योग्य पावती मिळणे आवश्यक असते.

तेच ते काम वर्षानुवर्षं करीत राहिल्याने कौशल्य आणि उत्पादकता यात प्रंचड वाढ होते; पण याचा विपरीत परिणाम कल्पकतेवर होतो. या साचेबंद कामाबरोबर कल्पकतेचा ताजेपणा आणला तर काम अधिक चांगले नाही का होणार. माणूस हा विचार करणारा प्राणी आहे; किंबहुना निसर्गानेच त्याला हे वरदान दिलेले आहे आणि त्यामुळेच तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला आहे. इतर प्राण्यांचे जीवन नैसर्गिक शक्तींवर चालते, तर माणसाला कल्पकतेचे वरदान मिळालेले आहे. कल्पकतेमुळेच त्याचे जीवन अर्थपूर्ण समृध्द आणि आनंददायी झाले आहे. कल्पकता ही प्रतिभा योजकता, सजर्नशीलता इत्यादी नावांनी ओळखली जाते.

असे म्हणतात, ‘जिला कल्पनांचे नित्य नवीन धुमारे फुटतात अशी बुध्दी म्हणजे कल्पकता.’ हे धुमारे अर्थातच नवीन विचार, नवीन कल्पना किंवा नवीन प्रतिभा याचे असतात . माणसाच्या या क्षमतेचा मूलभूत विचार केल्यास असे दिसते, की निसर्गाने माणसाला ही क्षमता देताना वय, शिक्षण किंवा अनुभव या बाबतीत कोणतेही भेदभाव केलेले नाहीत. अर्थात, त्याचे प्रयत्न आणि गुंतवणूक यावरून या क्षमतेचे प्रगटीकरण होण्यात फरक जरूर दिसतो, पण तो मानवनिर्मित आहे. बर्‍याच वेळा असे दिसते, की आपल्या काही चुकीच्या परंपरांमुळे, काही मर्यादांमुळे ही क्षमता मारली जाते.

- Advertisement -

एका कारखान्यात एका प्रक्रियेसाठी डांबर वापरले जात असे आणि ते पंप करून प्रक्रीयेत टाकले जात असे.डांबर जरा घट्ट असते त्यामुळे ते पंप करताना तो पंप नेहमी नादुरुस्त होत असे आणि काही वेळ ही प्रकिया थांबत असे. ही घटना वर्षानुवर्षं सतत घडत होती. एका कारखान्याचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पाहणी करत असताना नेहमीप्रमाणे पंप नादुरुस्त झाला. अधिकार्‍याने पंपावर काम करणार्‍या कामगाराला सहजच विचारले, ‘कारे तू इथे किती वर्षं काम करत आहेस?’ त्यांनेही विनम्रपणे उत्तर दिले, ‘साहेब साधारण २० वर्षं झालीत’, त्यावर प्रश्न केला गेला, ‘अरे मग हा पंप बंद पुडू नये.

यासाठी तुझ्याकडे एखादी चांगली कल्पना नाही का?’ आणि पटकन कामगार म्हणाला ‘हो साहेब आहे की हे डांबर पंपाने प्रक्रीयेत टाकण्यापेक्षा वर एक टाकी करून त्यातून प्रकियेत टाकले तर पंपाच्या बिघाडामुळे प्रक्रिया बंद पडणार नाही’ ही कल्पना मुख्य अधिकार्‍याला आवडली. कौतुकाबरोबरच त्यांच्या तोडून एक प्रश्न बाहेर पडला, ‘अरे मग ते इतकी वर्षं ही कल्पना का नाही सांगितलीस ?’ त्यावर तो कामगार तितक्याच सहजतेने म्हणाला, ‘साहेब इथे मला विचारतं कोण? आपण विचारलं म्हणून मी सांगितलं’, पुढे याच कारखान्यात आपल्या देशातली उत्तम थिंक बँक जन्माला आली. म्हणजेच कल्पकतेला प्रोत्साहन लागते, विचारणा करावी लागते आणि सहभागाचे कौतुकही व्हावे लागते. नेमके हेच काम कार्यालयातील किंवा कारखान्यातील थिंक बँक करू शकेल.

- Advertisement -

थिंक बँकेचे महत्व
जे लोक स्वत:मध्ये आणि आपल्या व्यवसायात सतत सुधारणा करण्यासाठी जोश निर्माण करतात आणि तो सातत्याने जागृत ठेवतात, त्यांचे वैयक्तिक आयुष्य तर समृद्ध होतेच, पण त्याचबरोबर त्यांचे कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यही अनेक स्थित्यंतरे घडवून उन्नत होते. सतत सुधारणा करण्याचा जोश आपल्या दृष्टिकोनात विधायक बदल घडवून आपले संपूर्ण जीवनच बदलवतो.

थिंक बँक:-
थिंक बँक ही अशी योजना आहे की, या माध्यमातून आपल्या संस्थेची उत्पादकता सुधारणांच्या कार्यक्रमात सर्व श्रेणीचे कर्मचारी सक्रीय सहभाग घेऊ शकतील. सुधारणा छोट्या छोट्या असल्या तरी त्यांच्या उपयुक्ततेमुळे संस्थांना प्रंचड लाभ होऊ शकतो. उत्तम तयार केलेली योजना आणि त्याची प्रामाणिक अंमलबजावणी आपली कामाची जागा उत्पादक आणि उत्साहवर्धक होण्यासाठी साह्यभूत ठरतात आणि कामगाराचा विधायक आणि सक्रीय सहभाग मिळवू शकतात, याबाबत शंकेला जरासुध्दा जागा नाही. जो माणूस काम करतो तोच त्यातला तज्ज्ञ असतो आणि त्यावरील उपायही आपल्या कल्पकतेने तो सुचवू शकतो हे या मागचे तत्वज्ञान आहे.

फक्त यासाठी त्याला प्रोत्साहनाची आणि आपलेपणाची योग्य पावती मिळणे आवश्यक असते. भारतातही अशा योजना यशस्वीपणे वापरल्या जातात आणि त्याची कामगिरी समाधानकारक आहे. गरज आहे त्याचा प्रसार होण्याची आणि प्रभाव वाढण्याची. महत्वाचा प्रश्न आहे या योजनांमध्ये सर्वांचा सहभाग, उत्साह आणि सातत्य कसे टिकवून ठेवायचे, यासाठी आपल्या संस्थांमध्ये व्यवस्थापकांनाही कामगारांची मानसिकता ओळखून वेगवेगळे कल्पक प्रयोग सातत्याने करायला पाहिजेत आणि आजूबाजूला होणार्‍या बदलांचे योग्य प्रतिबिंब आपआपल्या योजनांमध्ये आणायला हवे.

उत्तम योजना तयार करणे तसे अवघड नाही. भारतात इंडियन नॅशनल सजेशन स्कीम्स असोसिएशन(इनसान) (http://inssanindia.com) नावाची मुंबईला मुख्य कार्यालय असणारी एक सेवाभावी संस्था आहे ती या कामी मदत असते. अर्थात, प्रत्येक संस्थेने आपल्या लोकांच्या आणि संस्थेच्या गरजेप्रमाणे त्यात योग्य बदल करणे महत्वाचे आहे. आपल्या अनुभवाप्रमाणे त्यात वेळोवेळी काही महत्वपूर्ण बदलही करता येतील.

कामगारांना कल्पक बनण्यासाठी आणि योजनेत सहभागी होण्यासाठी आपण कसे प्रशिक्षित करता आणि त्याचा योजनेतील दीर्घकालीन सहभाग कसा निर्माण करता हे योजनेच्या यशासाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर उत्पादकता आणि दर्जा सुधारण्यासाठी आपल्या संस्थेत असणार्‍या इतर योजनांशी उदा. टीक्यूएम, उत्पादकता गट, गुणवत्ता मंडळे आणि सिक्स सिग्मा इत्यादी यांची सांगड या योजनेशी कशी घालता हेही महत्वाचे आहे. सर्व सहभागींशी ठेवावयाचा संपर्क आणि सुसंवाद, त्यांच्या तक्रारींचे योग्य निरसन हे पण उत्साह टिकविण्यासाठी पूरक आहे.

‘थिंक बँक’ या योजनेसाठी सध्याच्या कार्यपद्धतीत अथवा उत्पादनात सुधारणा करणार्‍या कोणत्याही कल्पना कामगार देऊ शकतात अथवा अशा कल्पना की ज्यांच्यामुळे नवीन उत्पादन, कार्यपद्धती निर्माण होऊ शकतील. कामगारांनीही आपण करीत असलेल्या कामाबाबत जास्त व्यवहार्य कल्पनांची निर्मिती केली तर अशा कल्पना व्यवहारात येण्याचे प्रमाण मोठे ठरेल. अर्थात व्यवस्थापनानेही कल्पकता स्वीकारताना जास्त लवचिकता दाखवायला हवी.

या योजनांचा फायदा दोघांनाही म्हणजे कल्पना लढविणारी व्यक्ती आणि संस्था या दोघांनाही होतो. संस्थेच्या दृष्टीने कल्पकतेच्या प्रांतात सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. त्यातून खर्चात कपात, उत्पादकतेत वाढ आणि सुरक्षिततेत सुधारणा होतात. कामगारांसाठी त्यांच्या कल्पकतेला मान्यता मिळते. ‘थिंक बँक’ परिणामकतेने वापरली तर कंपन्यांना सर्वच क्षेत्रात उत्पादक सुधारणा करण्यासाठी प्रंचड सुप्त शक्ति असणारे ते एक प्रभावी तंत्र सापडू शकते. कामगारांच्या उत्पादक कल्पना आणि जागरूकता प्रत्यक्ष व्यवहाररात, कृतीत उतरवण्याची क्षमता निर्माण करते.

योजनेचे कार्यक्षेत्र:
थिंक बँक म्हणजे आपल्या तक्रारी किंवा गार्‍हाणे मांडायचे एक व्यासपीठ हा समज कामगारांनी काढून टाकायला हवा आणि या योजनेचा विधायक उपयोग करायला हवा. कंपन्यांनीही कल्पना कशा प्रकारच्या असाव्यात याबद्दल स्पष्ट मार्गदर्शक तत्वे घालून द्यायला हवीत. कल्पनांची काही अशी उदाहरणे देता येतील.

-उत्पादनाच्या प्रक्रिया किंवा साधनांमध्ये सुधारणा.
-मार्केटिंगसाठी वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या साधनात बदल करणे
-उत्पादनाच्या दर्जात सुधारणा.
-कमी वेळेत जास्तीत जास्त काम कसे होईल आणि कामात अडचण येणार्‍या घटकांमध्ये योग्य तो बदल करणे.
अर्थात ही झाली काही उदाहरणे, परंतु जे काही काम आपल्या संस्थेत होत असते त्यावर सुधारणा करण्यासाठी थिंक बँकेचा उपयोग होत असतो.
कोणत्या विषयावर कल्पना स्वीकारता येणार नाही त्याबद्दलची मार्गदर्शक तत्त्वेसुद्धा अगोदर ठरली पाहिजेत, त्यामुळे पुढील संघर्ष अथवा गैरसमज टळू शकतात.

योजना राबविणारी यंत्रणा :-
कोणत्याही संस्थेत एखादी योजना उत्तम प्रकारे राबवायची असेल तर त्यासाठी योग्य यंत्रणेची आवश्यकता असते. कल्पकता आणि उत्पादकता वाढविणार्‍या योजना राबविण्यासाठी तर जास्तच कल्पक यंत्रणेची जरुरी आहे. या यंत्रणेद्वारेच या योजनेचे प्रभावी काम होऊ शकते. संस्थांच्या लहान मोठ्या या आकारावर, किती आणि कोठे, कशा शाखा आहेत यावर समित्यांचे संघटन कसे करायचे हे ठरविता येईल. संस्था आणि तिचा पसारा फार मोठा नसेल तर एकच समिती काम करू शकेल. नाही तर एक मुख्य समिती आणि इतर विभागांसाठी एक-एक उपसमिती असे काम केल्यास काम उत्तम होऊ शकते. मुख्य समिती या योजनांची सर्व साधारण धोरणे ठरविणे आणि योग्य उत्साह टिकवून सर्वसाधारण नियंत्रण ठेवण्याचे काम करतात. तर उपसमितीद्वारे दैनंदिन काम पाहिले जाते. त्यात कल्पना गोळा करणे, त्यांचे मूल्यांकन करणे, त्याची अंमलबजावणी आणि बक्षिसांचे वाटप करणे ही कामे येतात. या योजनांतून उत्पन्न होणार्‍या कल्पनांचा आवाका किती मोठा आहे हे लक्षात येते.

थिंक बँकेची संकल्पना आपण समजावून घेतली. आता त्यातील एक उदाहरण बघू.
एका साबण तयार करायच्या कारखान्यात साबण तयार झाल्यावर त्याला स्वयंचलित यंत्रावर रॅपर लावला जाई आणि असे रॅपर लावलेले साबण मोठ्या खोक्यात पॅक केले जात. काही वेळेला असे पॅकिंग करताना साबण नसणारे रिकामे रॅपर्स पॅक केले जात आणि त्यामुळे ग्रहकांच्या तक्रारी येत होत्या. पुष्कळ प्रयत्न करूनही यंत्रातला दोष सापडतच नव्हता. ग्राहकांचा हा असंतोष थांबवायचा कसा हा मोठाच प्रश्न कंपनीला सतावत होता. एका कामगाराने एक नामी युक्ती सुचवली. त्याने साबण रॅपिंग यंत्राजवळ हवेचा एक मोठा झोत सोडणारा पंखा बसवला त्यामुळे रिकामा रॅपर लगेच बाजूला होऊन साबणशिवाय पॅक होणार्‍या रॅपरची शक्यताच दूर केली. ग्राहकांची नाराजी अशा सहजपणे दूर झाली.

काही वेळा विशिष्ट परिस्थितीत संबंधित कामगारांनी जरा जागरुकता दाखविल्यास, नवीन आयडिया लढवल्यास परंपरा बदलून सहज खर्चाची बचत कशी होऊ शकते हे थिंक बँकेचे महत्व आहे. त्यामुळे संस्था कुठलीही असो त्यात थिंक बँक ही संकल्पना जरूर असावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -