घरफिचर्ससारांशरंगकर्म मानवतेचे उन्मुक्त दर्शन

रंगकर्म मानवतेचे उन्मुक्त दर्शन

Subscribe

रंगकर्म हे जडत्व विरुद्ध चेतनेचे बंड आहे. जड म्हणजे व्यवस्था! व्यवस्था मग ती राजकीय असो, आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक असो! रंगकर्माच्या या विद्रोही प्रकृतीला सत्ता आणि व्यवस्था जाणून आहे, म्हणूनच त्याच्या नुमाईशी प्रदर्शन स्वरूपाला म्हणजेच दिखावा करणे याला प्रोत्साहित करून त्याच्या विचाराला कुंद केले जाते. त्यासाठी रंगकर्मींना खरेदी करून दरबारी बनविले जाते आणि आपला रंग न विकणारा रंगकर्मी मारला जातो. पण विचार कधीच मरत नाही, शरीर मरते.

आज जग यांत्रिकीकरण, वस्तूकरण आणि तंत्रज्ञान बाजारवादाच्या विनाशकारी काळातून जात आहे. मानवाची नैसर्गिक सहज प्रवृत्ती नष्ट होऊन प्लास्टिक बनली आहे. नफेखोरी, महासत्तेच्या वर्चस्ववादात विचार-विकाराच्या द्वंद्वात अडकलेल्या जगात मानवतेवरील संकट शिगेला पोहोचले आहे.

डिजिटल हुकूमशाहीच्या टार्गेटेड, ट्रोल आणि टेरेराईज्ड युगात मानवी संवेदनशीलता बोथट बनवली गेली आहे. मानवतेला वाचविण्यासाठी, सिलिकॉन चिप्स लागलेल्या मानवी शरीरात नैसर्गिक सहज भाव जागृत करणे आवश्यक आहे. ही मानवीय संवेदनांची जाणीव होण्यासाठी आणि अभिव्यक्त करण्यासाठीचे जनस्त्रोत आहे रंगकर्म ! परंतु, आज रंगकर्माला केवळ एक माध्यम म्हणून पाहिले जाते, मानवतेचे उन्मुक्त पूर्ण दर्शन स्वरूपात पाहिले जात नाही. हेच कारण आहे की आज जगात रंगकर्म मानवतेचा पक्षधर आवाज नाही तर फक्त प्रदर्शना पुरते मर्यादित राहिले आहे. रंगकर्माला केवळ माध्यम मर्यादित समजणे किंवा मानणे ही रंगकर्माबद्दल अर्धवट समज आहे. या अर्धवट समजेने जे रंगकर्माला शोध विषय म्हणून वाचतात किंवा अजेंडा म्हणून त्याचा वापर करतात, ते ना रंगकर्माला समजतात नाही त्याला जगतात !!

- Advertisement -

विशेषत: ‘रंगकर्म माणुसकीचे तत्वज्ञान’ याला जाणणारे राजकारणी किंवा नफेखोर भांडवलदार जे केवळ माध्यम मर्यादित रंगकर्माच्या ताकदीचा फायदा घेतात, त्याला तत्वज्ञान म्हणून स्वीकारत नाहीत किंवा षङ्यंत्रपूर्वक त्याला ‘नाचणे-गाणे’ किंवा आजच्या तुच्छ शब्दात ‘मनोरंजन’ पुुरताच पाहू किंवा दर्शवू इच्छितात. रंगकर्माचे कलात्मक ‘सौंदर्य’ अद्भुत आहे. जर ही सौंदर्यात्मक बाजू दृष्टिगत चेतनेने संपन्न नसेल तर ती रंगकर्माला भोगाच्या गर्तेत घेऊन जाते आणि रंगकर्म सत्तेचा जयजयकार करण्यापर्यंत किंवा भांडवलदारांच्या ‘रंगमहालात’ सजावट, शोभा करण्यापर्यंत सीमित राहते.

वास्तविक रंग म्हणजे विचार आणि कर्म म्हणजे कृती यांचे संयोजन आहे. दृष्टीने आणि तत्वाने विचाराचा जन्म होतो आणि रुजतो. तर कर्म कौशल्याने निखरते. नृत्य, गाणे किंवा अभिनय, दिग्दर्शन इत्यादी कौशल्ये साध्य केली जाऊ शकतात, जसे सरकारी नाट्य प्रशिक्षण संस्था करतात, परंतु दृष्टी साधणे अवघड आहे. म्हणूनच कर्म म्हणजे ‘दृष्टीविहीन’ केलेले कर्म केवळ ‘रंग-प्रदर्शन’ असते, रंगकर्म नाही. आज देशात, जगात रंगकर्माच्या नावावर ‘रंग-नुमाईश’ केली जाते. जसा सत्तेवर बसलेला खोटा व्यक्ती, सत्यमेव जयते बोलतो.

- Advertisement -

रंगकर्म हे जडत्व विरुद्ध चेतनेचे बंड आहे. जड म्हणजे व्यवस्था! व्यवस्था मग ती राजकीय असो, आर्थिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक असो! रंगकर्माच्या या विद्रोही प्रकृतीला सत्ता आणि व्यवस्था जाणून आहे, म्हणूनच त्याच्या नुमाईशी प्रदर्शन स्वरूपाला म्हणजेच दिखावा करणे याला प्रोत्साहित करून त्याच्या विचाराला कुंद केले जाते. त्यासाठी रंगकर्मींना खरेदी करून दरबारी बनविले जाते आणि आपला रंग न विकणारा रंगकर्मी मारला जातो. पण विचार कधीच मरत नाही, शरीर मरते.

बरेच जण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जीवन जगण्याच्या पक्षात आहेत. असायला ही हवं, कारण निसर्गाची प्रत्येक कृती ही वैज्ञानिक आहे. परंतु विज्ञानाचे सूत्रं वापरून कुठली तरी सत्ता ‘नागासाकी-हिरोशिमा’मध्ये अणुबॉम्ब टाकून माणुसकीचा विध्वंस करते. त्याला आपण विज्ञान म्हणणार का? जे माणुसकीला संपवते ते खरे विज्ञान असते का? विज्ञानाच्या संचालनाला मानवीय विवेकसंपन्न दृष्टीची गरज आहे आणि विवेक संपन्न दृष्टीने विज्ञान आणि टेक्निकचा वापर केला तर मानवतेचा विध्वंस होत नाही तर मानवता समृद्ध होते. अशाच प्रकारे रंग-नुमाईश’ करणे म्हणजे रंगकर्म नसते. रंगनुमाईशने प्रभाव पडतो परंतु केवळ रंग नुमाईश मानवतेचा विध्वंस करते.

’रंगकर्म’ ही एक संपूर्ण मानवी कला आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. एक कलाकार आणि एक प्रेक्षक यांच्या संयोजनातून जन्माला आली आहे. कोणत्याही प्रकारचे तंत्र त्यास मदत करू शकते, परंतु केवळ ’तंत्र’ हेच रंगकर्म नाही. प्रत्येक मानवामध्ये दोन महत्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महिनता. आत्महीनतेमुळे जगात वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही जन्माला येते. ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात. विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला ‘कला’ म्हणतात.

मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ प्रदर्शन आहे.

आज जगातील सर्व रंगकर्मींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की सत्ता व्यवस्था बनवू शकते, परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. ‘कला’ मनुष्याला मनुष्य बनवते. ‘रंगकर्म’ सर्व कलांची जननी आहे. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे. कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सार्वभौमिक आहे. रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -