घरफिचर्ससारांशकोरकुंची कैफियत...

कोरकुंची कैफियत…

Subscribe

आदिवासी जमातीतील कोरकुंचे स्थान, त्यांचे प्रश्न, त्यांची धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय व्यवस्था, त्यांचे सण-उत्सव, नृत्यपरंपरा, लोकसंगीत, विधी, दैवते, बोलीभाषा यांचा सखोल अभ्यास करून ‘मेळघाटातील कोरकुंची लोकसंस्कृती’ या नावाने डॉ. विलास तायडे यांनी शोध निबंध लिहून विद्यापीठाला सादर करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे. ही लोकसंस्कृती जाणून घेण्यासाठी डॉ. विलास तायडे मेळघाटातील अत्यंत दुर्गम भागात जाऊन राहिले. प्रत्यक्ष जीवन अनुभवलं. दयनीय अवस्थेत जगणार्‍या कोरकू समाजाची ओळख सर्वांपर्यंत पोहचवली. दुर्लक्षिलेल्या वंचित समाज घटकाकडे फारसं कुणी पाहत नाही. राजकारण्यांना निवडणुकीशिवाय वेळ नसतो. काही मोजके समाजसुधारक सोडल्यास इतरांना फोटो (सेल्फी)पलीकडे सामाजिक संवेदना नाही.

भारत हा विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, संस्कृतीने समृद्ध असलेला खंडप्राय देश आहे. भारत ही संत-महात्मे, समाजसुधारक आणि महापुरुषांची भूमी आहे. आपल्याला सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभला आहे. विभिन्न जात-जमातीचे लोक इथे गुण्यागोविंदाने राहतात. धर्म निरपेक्षपता आणि सहिष्णुता हा आपला कणा आहे. श्रीमंत-गरीब दरी आहेच, शिक्षित-अशिक्षित, संस्कृत-असंस्कृत, उच्च-नीच असाही भेद आहे. काही लोक टोळीने राहतात. ते भारतात राहत असले तरी विकास प्रक्रियेपासून कोसो मैल दूर आहेत. भारतातील आदिवासी ही एक मूळ जमात. आपण त्यांना मूलनिवासी असेही संबोधतो. संपूर्ण देशभर असलेली ही जमात वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळी संस्कृती जपत असते. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात असणारी मुख्य जमात म्हणजे आदिवासी ‘कोरकू’.

आदिवासी जमातीतील कोरकुंचे स्थान त्यांचे प्रश्न, त्यांचे धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय व्यवस्था त्यांचे सण-उत्सव, नृत्यपरंपरा, लोकसंगीत, विधि, दैवते, बोलीभाषा यांचा सखोल अभ्यास करून ‘मेळघाटातील कोरकुंची लोकसंस्कृती’ या नावाने डॉ. विलास तायडे यांनी शोध निबंध लिहून विद्यापीठाला सादर करून पुस्तकरूपाने प्रसिध्द केला आहे. ‘मेळघाटातील कोरकुंची लोकसंस्कृती’ जाणून घेण्यासाठी डॉ. विलास तायडे मेळघाटातील अत्यंत दुर्गम भागात जाऊन राहिले. प्रत्यक्ष जीवन अनुभवलं. दयनीय अवस्थेत जगणार्‍या कोरकू समाजाची ओळख सर्वापर्यंत पोहचवली. डॉ. विलास तायडे यांचं अभिनंदन. दुर्लक्षिलेल्या वंचित समाज घटकाकडे फारसं कुणी पाहत नाही.

- Advertisement -

राजकारण्यांना निवडणुकीशिवाय वेळ नसतो. काही मोजके समाजसुधारक सोडल्यास इतरांना फोटो (सेल्फी)पलिकडे, सामाजिक संवेदना नाही. डॉ. विलास तायडे आकोट येथील श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आचार्य पदवीचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक संशोधनात्मक प्रबंध लिहिले असून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. नामदेव ढसाळांची कविता : स्वरूप आणि आकलन, बाबुराव बागुल यांची दीर्घ कथा -सूड एक आकलन, नारायण सुर्वेची कविता स्वरूप आणि समीक्षा. हे त्यांचे गाजलेले प्रबंध आणि ग्रंथ.

झारखंड राज्यातील काही कोरकू कुटुंबांनी स्थलांतर करून अमरावतीच्या मेळघाटात स्थायिक झाले. ते स्वतःला कौरव वंशीय समजतात. रावण आणि रावणपुत्र मेघनाथाचे भक्त मानतात. त्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे जंगल संपत्तीवर अवलंबून आहे. उदरनिर्वाहासाठी त्यांना कठोर परिश्रम करावे लागतात. त्यांचे आर्थिक जीवन संघर्षमय आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून अतिदूर असलेल्या दुर्गम भागात अरण्यात राहणारा सुधारणांचा वाराही न लागलेली कोरकू ही आदिवासी जमात हजारो वर्षे विकसित समूहापासून वंचित उपेक्षित राहिली. कोरकू जंगलात राहत असल्यामुळे त्यांचे आयुष्य वनसंपदेशी निगडित आहे. पशुपालन, शिकार , मोलमजुरी, शेती, शेतमजुरी ते करतात.
या पुस्तकात प्रस्तुत लेखकाने चार भागात मांडणी केली आहे.

- Advertisement -

1. मेळघाटातील कोरकुंची जीवनशैली व संस्कृती.
2. मेळघाटातील कोरकुंच्या कलापरंपरा.
3. मेळघाटातील कोरकुंचे लोकसाहित्य.
4. मेळघाटातील कोरकुंची भाषा.

आधुनिक भारताच्या जडणघडणीत अनेक जातीजमातींचा कमी अधिक सहभाग आहे. तसाच आदीम आदिवासी जमातींचा आहे. देशाच्या जडणघडणीत या जमातींचा केवळ सहभागच नाही तर मातृभूमीच्या रक्षणार्थ त्यांचा सर्वस्वत्यागही आहे. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात प्रचंड बंड उभारून मातृभूमीला दास्यमुक्त करण्यात बाबुराव सदेमाडे, बिरसा मुंडा, उमेड वसावा, तंट्या भिल्ल, सिद्धू-कान्हू संथाल हे सर्व वीर आदिवासी होते. एकेकाळी नेत्रदीपक राजकीय तथा सांस्कृतिक वैभवात जगणारा माणूस, परंतु आज वर्तमानात लाचार अन्यायग्रस्त पशुपातळीवरचे जीवन जगत आहे.

कोरकू जमातीतील शैक्षणिक व्यवस्था या प्रकरणात विलास तायडे लिहितात, भारत हा ग्रामीण स्वरूपाचा देश असून बहुतांशी जमाती निरक्षर असून ही निरक्षरता प्रामुख्याने ग्रामीण भागात आहे. या देशातील 80 टक्क्यांहून जास्त जनता ही अनुसुचित जातीजमाती किंवा आदिवासी असून आदिवासी प्रामुख्याने जंगली किंवा दुर्गम क्षेत्रात निवास करतात. 26 जून 1995 च्या हिंदुस्थान टाइम्सच्या अहवालानुसार 10 पैकी 8 निरक्षर आहेत. या 10 पैकी आठ आदिवासी आहेत, जे लिहू वाचू शकत नाहीत. एकूण आदिवासींच्या लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकसंख्या निरक्षर आहे. निरक्षरतेमागील मुख्य कारण म्हणजे मूलभूत सुविधांचा अभाव, योग्य नियोजनाचा अभाव, शिक्षणाच्या प्रचार प्रसाराकडे दुर्लक्ष. जातीयता त्यामुळे हा वर्ग आर्थिक विकासापासून वंचित आहे, आर्थिक विवंचनेमुळे तो शारीरिकदृष्ठ्या कुपोषित आहे.

कोरकूचे सण उत्सव विधी व कला या प्रकरणात प्रस्तुत लेखकाने अतिशय जवळून सण-उत्सव पाहून वर्णन केले आहे. कोरकू लोकांचा सर्वात मुख्य सण म्हणजे होळी. हा सण ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात. कोरकुंची होळी पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवसापासून सुरू होते आणि ती पंचमीपर्यंत चालते. होळी त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मुख्य सण असल्याने त्याची तयारी ते महिना आधीपासूनच करतात. सर्व स्त्रिया पुरुष ढोलांच्या तालावर फेर धरून एकत्र नाचतात.

नाच-गाणे हा कोरकूच्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. नाच-गाण्यासाठी वाद्य आवश्यक असतात. निसर्गाने प्रदान केलेल्या वस्तूपासून स्वत: आपली वाद्ये तयार करतात, ढोलकी, बासरी, घुंगरू ही कोरकुंची मुख्य वाद्ये आहेत. या शिवाय मृदंग, डफडी, खंजीरी, घोडकं, किंगरी, टिमकी, चटकोरी, दसिमा, सिधी वगैरेदेखील वाद्ये त्यांच्या नाचगाण्याच्या वेळी आढळतात. गाणी आणि नाच हे त्यांचे वैशिष्ठ्य आहे. नाचगाण्याचे त्यांचे वर्षभराचे वेळापत्रक ठरलेले असते. वर्षा ऋतूमध्ये ‘झुला नचो’ आणि ‘डंडा नाचो’ तर. शरद ऋतूमध्ये जळते लाकूड हातात घेऊन ‘होरियार नचो.’ स्त्रिया एकमेकींच्या हातात हात देऊन गोलाकार असे ‘गोल नाचो’ सादर करतात. हेमंत ऋतूमध्ये स्त्रिया ऊभ्याने खडा नाचो सादर करतात. फाल्गुनात लग्न प्रसंगी ढोल बासरीच्या तालावर ‘गदली नाचो’ केला जाते. ग्रीष्म ऋतूमध्ये स्त्रिया आणि पुरुष मिळून फगनाई नाचो करतात. स्त्रिया आणि पुरुष त्यांच्या नृत्याची अभिव्यक्ती सहज, सुंदर आणि स्वाभाविक असते.

आदिवासींची लोप पावत चाललेली लोकसंस्कृती पुढील पिढीस दस्तऐवज स्वरूपात सहज उपलब्ध व्हावी यासाठी डॉ.विलास तायडे यांनी घेतलेले परिश्रम त्यातून झालेली पुस्तकाची निर्मिती ही संग्रही ठेवण्यासारखी आहे, त्याअर्थाने डॉ. तायडे कौतुकास नक्कीच पात्र आहेत. भाषा सहज सोपी आहे. बळी खैरे यांचे मुखपृष्ठावरील चित्र बोलकं आहे. डॉ. विलास तायडे यांच्या संशोधनीय लेखनास शुभेच्छा!.

–प्रदीप जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -