घरफिचर्ससारांशबैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट

बैलगाडीसाठी रोलिंग सपोर्ट

Subscribe

आर. आय. टी. महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणार्‍या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी बनवला रोलिंग सपोर्ट बनवला आहे. शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कॅपस्टन प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्याची संधी मिळते, त्यांनी चालू घडीला अवघड आव्हानाची निवड करत असताना, जवळच असलेल्या राजारामबापू सहकारी साखर कारखाना, राजारामनगरसाठी होत असलेल्या ऊस वाहतुकीत बैलगाड्यांना येणार्‍या समस्यांवर संशोधन करण्याचे या विद्यार्थ्यांनी ठरविले. त्यांनी सारथी या नावाने आपला प्रोजेक्ट पूर्ण केला. त्यामुळे गाडी ओढणार्‍या बैलांच्या मानेवरील भार कमी होणार आहे.

नावीन्य आणि कल्पनाशक्तीला चालना दिल्यास नवआविष्काराची निर्मिती होते, असेच इस्लामपूरमधील आर. आय. टीच्या विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण निर्मितीतून ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडीसाठी रोलिंग सर्पोट बनवत बैलांच्या मानेवर येणारा भार ८० टक्क्यांनी कमी करण्यात यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांच्या अफलातून प्रयोगाचे संपूर्ण राज्यातून कौतुक करण्यात येत आहे. भारत हा जुगाडू लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. शाळेत, कॉलेजमध्ये शिकत असताना काहीतरी नवीन करायचे त्यामुळेच भारतातील लोकांना अनेकदा गंमतीनं जुगाडू असं म्हटलं जातं. याचीच प्रचिती देणार्‍या बैलगाडी रोलिंग सर्पोट या नावीन्यपूर्ण प्रयोगाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

आर. आय. टी. महाविद्यालयाच्या ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षामध्ये शिक्षण घेणार्‍या सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर या विद्यार्थ्यांनी बनवला रोलिंग सपोर्ट बनवला आहे. शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कॅपस्टन प्रोजेक्टसाठी वेगवेगळ्या संकल्पनांवर काम करण्याची संधी मिळते, त्यांनी चालू घडीला अवघड आव्हानाची निवड करत असताना, जवळच असलेल्या राजारामबापू सहकारी साखर कारखाना, राजारामनगरसाठी होत असलेल्या ऊस वाहतुकीत बैलगाड्यांना येणार्‍या समस्यांवर संशोधन करण्याचे या विद्यार्थ्यांनी ठरविले. त्यांनी सारथी या नावाने आपला प्रोजेक्ट पूर्ण केला.

- Advertisement -

महाराष्ट्रात जवळपास सहकारी आणी खासगी मालकीचे एकूण २०० साखर कारखाने सुरू आहेत, त्यालील बहुतांश साखर कारखान्याच्या साधारणतः ३०० बैलगाड्या जवळच्या भागातून ऊस वाहतूक करत असतात. प्रामुख्याने शेतात ऊस भरताना लावण्यात आलेला लाकडी शिपाई जमिनीत धसणे व मोडणे, बैलांवर अतिभार, रस्त्यांवर स्पीडब्रेकर खड्यांमुळे पाय घसरने, पाय मुरगळणे व कधी कधी पाय मोडणे अशा वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे बैलाला दुखापत तसेच बैल मालकाचे आर्थिक नुकसान होते.

यावर त्यांनी अफलातून संकल्पना तयार करत कामाला सुरुवात केली. त्यांनी दोन्ही बैलांच्यामध्ये तिसरे चाक बसवले जे बैलांवरचा भार कमी करते आणि बैलगाडीसाठी पूर्ण संतुलन देते, हा रोलिंग सपोर्ट बैलांच्या उंचीनुसार कमी-जास्त वर खाली करू शकतो, तसेच याचा उपयोग ऊस भरताना खाली व शेतातून वाहतूक करताना वर अडकवू शकतो, अशाप्रकारे तयार करण्यात आलेल्या प्रोजेक्टचे टेस्टिंग हे ऊस भरताना व रस्त्यावरून वाहतूक करताना करण्यात आले आहे. या प्रोजेक्टचे प्रायोगिक तत्त्वावर येणार्‍या गळीत हंगामात अंमलबजावणी करण्यास प्रयत्नशील असतील. अशा अफलातून संकल्पनेचे वाहनचालक, शेतकरी, कारखानदार या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

- Advertisement -

रिसर्च निधी अंतर्गत लीड कॉलेज स्कीम, शिवाजी विद्यापीठातून या प्रोजेक्टसाठी १०,००० रुपये निधी मिळाला आहे. या रोलिंग सपोर्ट प्रोजेक्टचे पेटंट मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. प्रोजेक्टसाठी डॉ. सुप्रिया सावंत यांनी मार्गदर्शन केले आहे, त्याचबरोबर प्रा. पी. एस. घाटगे व ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. एस. आर. कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. ए.बी. काकडे, डॉ. एल. एम. जुगुलकर, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील यांनी अभिनंदन केले. कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव आर. डी. सावंत व गव्हर्निंग कौंसिलचे चेअरमन भगतसिंह पाटील यांनी या टीमचे कौतुक केले.

–राकेश बोरा 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -