घरफिचर्ससारांशहमको मन की शक्ती देना...

हमको मन की शक्ती देना…

Subscribe

हार्मनीची सुरुवात त्यांच्यापासूनच करावी असं वाटतं, ज्यांनी लिहिलेले शब्द वृद्धांपासून ते नवीनच वयात आलेल्या तरुणांपर्यंत प्रत्येकाला भिडतात. एक गीतकार म्हणून ज्यांना ग्लॅमर मिळालं, अशी व्यक्ती म्हणजे गुलजार उर्फ संपूर्णसिंह कालरा. मुंबईच्या एका गॅरेजमधून थेट बिमल रॉयच्या सिनेमात एण्ट्री मिळालेला गीतकार म्हणून हे नाव अनेकांना माहिती आहे, पण याच गीतकाराच्या गाण्यांच्यादेखील अनेक कथा आणि किस्से आहेत, ज्यापासून सामान्य सिनेमाप्रेमी अनभिज्ञ आहेत. गाण्याच्या मागे दडलेले हेच किस्से आणि अजरामर गाण्याच्या जन्माची कथा हार्मनीच्या माध्यमातून लिहिण्याचा हा प्रयत्न.

केदारनाथ सिंह नावाचे हिंदीतले एक लोकप्रिय कवी होते. ते म्हणतात की, आम्ही सगळे फेमस होण्यासाठी लिहितो, लोकांनी आम्हाला गंभीरपणे घ्यावं यासाठी आम्ही लिहितो, पण कधी कधी लेखक मागे राहतो आणि त्याने लिहिलेलं त्याच्या खूप पुढं निघून जातं. उदाहरणार्थ सांगायचं झाल्यास एका शाळेत मी गुलजार साहेबांचं ‘हमको मन की शक्ती देना’ हे गाणं ऐकलं. त्या मुलांना मी विचारलं की तुम्ही जे हे गाणं गाताय, ते कुणी लिहिलंय हे तुम्हाला माहितीये का? तेव्हा ती मुलं उत्तरली की, हे गाणं नाहीये, ही तर आमची प्रार्थना आहे जी आम्ही दररोज म्हणतो. त्या लहान मुलांना हे माहितीदेखील नव्हतं की रोज जे गाणं प्रार्थना म्हणून गाताय, ते ‘गुड्डी’ सिनेमासाठी गुलजार यांनी लिहिलं होतं. गुलजार यांच्या कामाला त्यांच्यानंतरही जीवन आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अशी अनेक गाणी आहेत, जी त्यातील शब्दांमुळे अजरामर झाली, पण ते शब्द लिहिणारे गीतकार तितके प्रसिद्ध झाले नाहीत.

काही जणांना नंतर ओळख मिळाली खरी, पण त्यांच्या कामाच्या आणि योगदानाच्या हिशोबाने तीदेखील पुरेशी नाही. आज ज्या गीतकाराबद्दल लिहितोय, ते नाव हिंदी सिनेमांच्या बहुतेक प्रेक्षकांना ओळखीचे आहे. म्हणूनच हार्मनीची सुरुवात त्यांच्यापासूनच करावी असं वाटतं. ज्यांनी लिहिलेले शब्द वृद्धांपासून ते नवीनच वयात आलेल्या तरुणांपर्यंत प्रत्येकाला भिडतात, एक गीतकार म्हणून ज्यांना ग्लॅमर मिळालं, अशी व्यक्ती म्हणजे गुलजार उर्फ संपूर्णसिंह कालरा. मुंबईच्या एका गॅरेजमधून थेट बिमल रॉयच्या सिनेमात एण्ट्री मिळालेला गीतकार म्हणून हे नाव अनेकांना माहिती आहे, पण याच गीतकाराच्या गाण्यांच्यादेखील अनेक कथा आणि किस्से आहेत, ज्यापासून सामान्य सिनेमाप्रेमी अनभिज्ञ आहेत. गाण्याच्या मागे दडलेले हेच किस्से आणि अजरामर गाण्याच्या जन्माची कथा हार्मनीच्या माध्यमातून लिहिण्याचा हा प्रयत्न.

- Advertisement -

हमको मन की शक्ती देना, या गाण्याचा उल्लेख मी आधीही केला होता. त्याच गाण्याचे अनेक किस्से बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. एकदा शाद अलीच्या ‘ओके जानू’ सिनेमाचं काम सुरू होतं. जिथं शंकर महादेवनने गुलजार साहेबांना विचारलं की, गुलजार साहेब हे हमको मन की शक्ती देना गाणं तुम्हीच लिहिलंय ना? त्यावर गुलजार काही बोलण्याआधीच शाद अली म्हंटला, नाही नाही ती तर प्रार्थना आहे जी आम्ही शाळेत म्हणायचो. त्यातच राकेश ओमप्रकाश मेहरा म्हणाले की, हो हो, मी पण ही प्रार्थना शाळेत ऐकली होती. बहुतेक तिथूनच गुलजार साहेबांना आवडली असेल आणि त्यांनी गुड्डी सिनेमात ती वापरली. शेवटी गुलजार साहेबांनी स्वतः सांगितलं की, ही प्रार्थना नाही तर गाणं आहे, जे मीच लिहिलंय. या गाण्याबद्दलचा हा किस्सा स्वत: गुलजार साहेबांनी नसरीन मुन्नी कबीर यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.

ज्या गाण्यासाठी गुलजार साहेबांना ऑस्कर मिळाला होता, त्या गाण्याची आणि ऑस्करचीसुद्धा एक वेगळी कथा आहे. म्हणजे फक्त ब्लॅक जॅकेट मिळालं नाही म्हणून गुलजार साहेबांना ऑस्करच्या सोहळ्यात सहभागी होता आलं नव्हतं. त्यांच्या ‘जय हो’ गाण्याला पुरस्कार मिळाला होता, ज्यात त्यांनी तरुण-तरुणीची गोष्ट सांगितलीय. जे अनेक अडचणींचा सामना करत प्रेमात पडतात. त्यांची कथा नूरजहाँ आणि जहाँगीरची कथा नव्हती, ती या जनरेशनची कथा होती आणि तीच कथा त्यांनी त्या गाण्यातून मांडली. रत्ती रत्ती सच्ची मैने जान गवाई है, नच नच कोयलों पे रात बितायी है, अँखियो की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने ऊँगली जलाई है, या दोन ओळीत त्या गाण्याचं आणि त्यांच्या कथेचं संपूर्ण सार लक्षात येतं आणि म्हणूनच आजही हे गाणं तितकंच पसंत केलं जातं. गुलजार यांनी आपल्या मुलीच्या सिनेमासाठीदेखील अनेक गाणी लिहिलीत.

- Advertisement -

ज्यातील दिलबरो, राझी, ए वतन ही गाणी तर सगळ्यांना परिचित असतील, पण मला त्यांचं छपाकच टायटल साँग खूप जास्त आवडलं होतं. एखादा गीतकार अ‍ॅसिडसारख्या गोष्टीवर इतकं भन्नाट कसं लिहू शकतो, हाच प्रश्न त्या गाण्याचे शब्द वाचल्यावर पडला होता. अ‍ॅसिड अ‍ॅटॅक झालेल्या तरुणीची कथा म्हणजे तो सिनेमा होता. त्या सिनेमाच्या गाण्यात ती कथा यायलाच हवी होती. अशा संवेदनशील विषयावर लिहिणं आव्हानात्मक होतं, पण गुलजारांनी जे लिहिलं ते त्या कथेला आणि संपूर्ण सिनेमाला न्याय देणारं होतं. गाण्यातले कोई चेहरा मिटा के और आंख से हटा के, चंद छींटें उड़ा के जो गया.. छपाक से पहचान ले गया… एक चेहरा गिरा, जैसे मोहरा गिरा, जैसे धूप को ग्रहण लग गया, छपाक से पहचान ले गया… हे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हाच आपल्याला संपूर्ण कथेचं सार लक्षात येतं. एक गीतकार आपल्या शब्दातून कथेला आकार देत असतो. त्यातूनच कथा पुढे सरकते आणि प्रेक्षकाला तो अनुभव मिळतो. आपल्या एका गाण्यातून संपूर्ण चित्रपटाचं सार कसं सांगावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे गुलजार यांचं छपाक गाणं.

रोमँटिक गाणं लिहिणं म्हणजे सोपं काम असं अनेकदा वाटतं. कारण प्रेयसीला निसर्गाच्या उपमा दिल्या आणि काही विशेषणं लावली की गाणं तयार होतं. गुलजार यांनीदेखील अशी अनेक रोमँटिक गाणी लिहिली, पण त्यांचं सर्वात हटके आणि मला आवडलेलं गाणं म्हणजे दिल तो बच्चा है जी… कारण या गाण्यामागची कथा वेगळी आणि आव्हानात्मक होती. इथं एका वृद्धाला तरुण मुलीवर प्रेम होतं म्हणून त्याच्या ओठावर तुझे केस, तुझे डोळे, तुझे ओठ खूप सुंदर आहेत, अशा टाईपचे शब्द येणं शक्य नव्हतं. त्यात सिनेमात ती मुलगी त्याला चाचाजान म्हणते. म्हणून त्याला शब्ददेखील तसेच हवे होते. मग गुलजार यांनी अशी गोष्ट हेरली जी म्हातारी होत नाही, जी कायम तरुण असते, मग त्याच हृदयाला लहान मुलगा केलं आणि लिहिलं… ऐसी उलझी नज़र उनसे हटती नहीं, दाँत से रेशमी डोर कटती नहीं, उम्र कब की बरस के सुफेद हो गयी, कारी बदरी जवानी की छटती नहीं, वल्ला ये धड़कन बढ़ने लगी है, चेहरे की रंगत उड़ने लगी है, डर लगता है तनहा सोने में जी, दिल तो बच्चा है जी, थोडा कच्चा है जी हे आणि अशी असंख्य अजरामर गाणी त्यांनी लिहिली म्हणा किंवा लिहिली म्हणून अजरामर झाली म्हणा, पण गुलजार हे असं नाव आहे जे कुणीही लवकर विसरू शकणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -