काय ते ५ जी, काय ते १६ जी, समदं ओके हाय ना ‘जी’?

अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल डेटा ही मूलभूत गरज बनलेली असेल. मनी ट्राझॅक्शनपासून सर्व बुकिंग सेवा ही मोबाईल आधारित असेल. थोडक्यात, आज ३ जी आणि ४ जी सेवा सपोर्ट करणारा आपल्या हातातला मोबाईल तेव्हा आपण फेकून देणे व मग ५ जी सेवेसाठी सपोर्ट करणारा नवीन मोबाईल घेणे अपरिहार्य आहे. परिणामी पुढच्या प्रत्येक मोबाईल जनरेशन नुसार मोबाईल हँडसेंट बदलावा लागणे आणि आपल्या खिशातून पैसा काढणे हे व्यावसायिक धोरण असेल हे सांगण्यासाठी ब्रम्हज्ञान असण्याची गरज नाही. सध्या अमेरिकेच्या नासामध्ये १६ जी स्पीडचा इंटरनेट वापरला जातो. अर्थात येत्या काळात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात रोजगार संधींची त्सुनामी मार्केट डिमांडनुसार येणार आहे हे निश्चित!

आज भारतात आपण ‘फाईव्ह जी’च्या गप्पा मारत आहोत. ५ जी म्हणजे मोबाइल नेटवर्कची ५ वी पिढी (फिफ्त जनरेशन होय. ३ एप्रिल १९७३ रोजी मोटोरोला कंपनीचे संशोधक मार्टिन कूपर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेल लॅब्सचे डॉ. जोएल एस. एंजेल यांना पृथ्वीवरील पहिला मोबाईल कॉल केला आणि वसुंधरेचे रुपडे बदलून गेले. येत्या काळात ५ जी हा अल्लाउद्दीनचा चिराग ठरणार आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. इंडस्ट्री ४.० ला बुस्टरडोस मिळेल याशिवाय शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडून येतील. कौशल्य विकासासाठी व्हर्च्युअल रियालिटी (व्हीआर) तसेच ऑग्यमेंटेड रियालिटी (एआर) यांच्याशी हात मिळवणी करीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रोबोटिक्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आदी तंत्रज्ञान हे येत्या काळात अद्यावत प्राध्यापक आणि शिक्षकांसाठी संधींची त्सुनामी आणि कामचुकार व्यक्तीसाठी बेरोजगारीची कुर्‍हाड ठरणार आहे हे निश्चित!

५ जी मध्ये काय फायदे आहेत ‘जी’?

वेगवान नेटवर्क स्पीड, अखंडित एचडी सर्फिंग, उत्कृष्ट सेवा आणि बरेच काही यामुळे भारतीय जनतेला आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. ५ जी तंत्रज्ञान ही सेल्युलर सेवेतील लेटेस्ट टेक्नोलॉजी होय. ४ जी नेटवर्कची पुढील आवृत्ती! यात ग्राहकाला अधिक इंटरनेट स्पीड, कमी लेटेंसी आणि अधिक फ्लेक्सिबिलिटी पहायला मिळेल. व्यावसायिक स्वरुपात ५ जी नेटवर्क सेवा ही ३.५ गिगा हर्टझ श्रेणीतील म्हणजे ३.३ गिगा हर्टझ ते ४.२ गिगा हर्टझ या फ्रिक्वेन्सी रेंजच्या स्पेक्ट्रमवर अवलंबून असणार आहे. आतापर्यंत सेल्युलर तंत्रज्ञान कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंद्रित करत असे, परंतु ५ जी सेल्युलर तंत्रज्ञान एक पाऊल पुढे जाईल आणि क्लायंटला थेट क्लाऊडशी कनेक्ट करेल त्यामुळे मोबाईलमध्ये डेटा स्टोअर करुन ठेवल्याने मोबाईल हँग होण्याच्या समस्येवर मात शक्य होऊ शकेल.

१ जी ते ५ जी

१ जी २.४ किलोबाइटस प्रति सेकंद (kbps) स्पिड ऑफर करते, २ जी ६४ kbps ऑफर करते आणि जीएसएम म्हणजे मोबाइल संप्रेषणासाठी जागतिक प्रणालीवर आधारित आहे, ३ जी हे १४४ kbps ते २ मेगाबाइटस प्रति सेकंद (mbps) ऑफर करते तर ४ जी १०० Mbps ते १ गिगाबाइटस प्रति सेकंद (Gbps) ऑफर करते आणि एलटीई (Lte) म्हणजे दीर्घकालीन विकासावर आधारित तंत्रज्ञानावर काम करते. ५ जी १ ते १० Gbps म्हणजे ४ जीच्या दहा पटवेगाने काम करते.

१६ जी च्या दिशेने!

नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) मध्ये इंटरनेट स्पीड ९१ गिगाबाईटस पर सेकंद इतका वापरला जातो. याचा अर्थ आपण सध्या जे इंटरनेट वापरतो त्या इंटरनेट स्पीडपेक्षा तेरा हजार पट जास्त वेगवान नेटवर्क नासा वापरते. या नेटवर्कला आपण कदाचित १६ जी (सिक्सटिन्थ जनरेशन) नेटवर्क म्हणू शकतो. मात्र नेटवर्क स्पिड आणि मोबाईल जनरेशन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे इंटरनेट वेग हा मोबाईल जनरेशन मोजमाप करण्याची मोजपट्टी होईलच असे नाही. थोडक्यात मोबाईल जनरेशन आणि इंटरनेटचा स्पीड साठीची टेक्नॉलॉजी ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. असे असले ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की २०२० साली ५४ टक्के असलेले उपभोक्ता किंवा ग्राहक हे २०४० पर्यंत भारतात ९६ टक्के अत्याधुनिक स्मार्टफोन हातात बाळगणारे असतील.

काय घडते आहे ‘जी’?

गुगलसारख्या मोठ्या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), मशीन टू मशीन (एमटूएम) कम्युनिकेशन आदी अ‍ॅप्लीकेशनसाठी थेट स्पेक्ट्रम वाटप करण्याची भारतात मागणी केली आहे. अशावेळी केंद्र सरकारने १४ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ५ जी २६ जुलै २०२२ रोजी स्पेक्ट्रम लिलावास मान्यता दिली आहे.

कुबेराचा खजाना : ५ जी!

मार्च २०२१ मध्ये झालेल्या स्पेक्ट्रम लिलावाच्या शेवटच्या फेरीत ८५५.५ मेगाहर्ट्जसाठी ७७ हजार ८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली आल्या होत्या. यावरून टेलिकॉम इंडस्ट्री ही कुबेराची तिजोरी आहे हे सर्वसामान्यांच्या लक्षात आले असेल. एवढे होऊनदेखील एकूण स्पेक्ट्रम पैकी जवळपास ६३ टक्के स्पेक्ट्रमची विक्री झाली नव्हती. त्यामुळे खासगी दूरसंचार कंपन्यांनी सरकारवर दबाव आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परिणामी टेलिकॉम रेग्युलेटरी अ‍ॅथॉरटी ऑफ इंडिया (ट्राय)ने निर्धारित केलेल्या आधारभूत किमतीतील ३९ टक्के कपातीच्या प्रस्तावालादेखील मंजुरी दिली आहे, ज्याचा थेट फायदा खासगी टेलिकॉम कंपन्यांना होणार आहे.

२० वर्षाच्या वैधतेसह एकूण ७२ गिगाहर्ट्ज स्पेक्ट्रम असा विविध कमी, मध्यम आणि उच्च फ्रिक्वेन्सी बँडचा लिलाव होणार आहे. रिकक्ट्रमचा लिलाव होणार आहे. गंमत म्हणजे पहिल्यांदा यशस्वी बोली लावणार्‍याना आगाऊ पैसे भरण्याची गरज नसेल आणि स्पेक्ट्रमची रक्कम २० समान वार्षिक हप्त्यात देता येईल. तसेच स्पेक्ट्रम वापर शुल्क (एसयूसी) देखील आकारले जाणार नाही हे विशेष! भारती एअरटेल व रिलायन्स जिओ यासारख्या दूरसंचार कंपन्या फाईव्ह जीच्या नऊ फ्रिक्वेन्सी बँड मिळविण्यासाठी एकमेकांना भिडणार आहे.

पुढे काय होईल?

टेस्टिंग स्पेक्ट्रम वेगवेगळ्या बँडमध्ये ऑफर केली जाते, ज्यामध्ये मिड-बँड (३.२ गिगाहर्ट्ज ते ३.६७ गिगाहर्ट्ज), मिलीमीटर वेव्ह बँड (२४.२५ गिगाहर्ट्ज ते २८.५ गिगाहर्ट्ज) आणि सब-गिगाहर्ट्ज बँड (७०० गिगाहर्ट्झ) आहेत. टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या ५ जी ट्रायल्स घेण्यासाठी सध्याचे स्पेक्ट्रम बँड अथवा रेंजमध्ये (८०० मेगाहर्ट्ज, ९०० मेगाहर्ट्ज, १८०० मेगाहर्ट्ज आणि २५०० मेगाहर्ट्ज) वापरण्याची परवानगी दिली गेली आहे. जिओ, एअरटेल अशा विविध कंपन्यांनी ५ जी नेटवर्कची यशस्वी चाचणी केली आहे. २०२३ मध्ये भारतात ५ जी वापरास सुरुवात होईल आणि २०२६ सालापर्यंत डोमेस्टिक टेलिकॉम मार्केट हे ५ जी सेवांसाठी तयार झालेले असेल.

हे सर्व कशासाठी ‘जी’?

अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल डेटा ही मूलभूत गरज बनलेली असेल. मनी ट्राझॅक्शनपासून सर्व बुकिंग सेवा ही मोबाईल आधारित असेल. थोडक्यात, आज ३ जी आणि ४ जी सेवा सपोर्ट करणारा आपल्या हातातला मोबाईल तेव्हा आपण फेकून देणे व मग ५ जी सेवेसाठी सपोर्ट करणारा नवीन मोबाईल घेणे अपरिहार्य आहे. परिणामी पुढच्या प्रत्येक मोबाईल जनरेशन नुसार मोबाईल हँडसेंट बदलावा लागणे आणि आपल्या खिशातून पैसा काढणे हे व्यावसायिक धोरण असेल हे सांगण्यासाठी ब्रम्हज्ञान असण्याची गरज नाही. अर्थात येत्या काळात इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात रोजगार संधींची त्सुनामी मार्केट डिमांडनुसार येणार आहे हे निश्चित!

माझा खिसा कसा व का कापला जाईल ‘जी’?

२००७ साली भारतात केवळ चार टक्के लोकांकडे इंटरनेट सेवा उपलब्ध होती जी २०२१ साली ४७ टक्के इतकी झाली. २०१६ साली भारतात अवघे २३ टक्के जनता स्मार्टफोन वापरायची जी अवघ्या चार वर्षात २०२० साली जवळपास दुप्पट होत ५४ टक्के झाली आणि २०४० पर्यंत भारतीत ९६ टक्के लोकांच्या हातात अत्याधुनिक स्मार्टफोन असेल.

भारताची लोकसंख्या तेव्हा जवळपास दीड अब्ज झालेली असेल. अन्न वस्त्र आणि निवारा याबरोबरच मोबाईल डेटा ही मूलभूत गरज बनलेली असेल. मनी ट्रान्झॅक्शनपासून सर्व बुकिंग सेवा ही मोबाईल आधारित असेल. थोडक्यात, आज ३ जी आणि ४ जी सेवा सपोर्ट करणारा आपल्या हातातला मोबाईल तेव्हा आपण फेकून देत साधारणतः तीस ते पन्नास हजार रुपये खर्चून नवीन मोबाईल घेतलेला असेल. एका घरात चार व्यक्ती असतील तर पुढील चार वर्षात केवळ मोबाईल खरेदीसाठी दीड लाख बजेट प्रत्येक घरातून झालेले असेल.

समदं ओके आहे ना जी?

घरातील व्यक्तींपासून दूरावत आभासी दुनियेत प्रेमाचा ओलावा शोधताना कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत आहे. घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. लैंगिक स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील सीमारेषा दिसेनाशी झाल्याने लग्नाची आवश्यकताच संपुष्टात आली आहे. विविध देशात ‘सेक्स शॉप’, लिव्ह इन रिलेशनशीप, व्यभिचाराला अधिकृत व कायदेशीर मान्यता यात नैतिकता आणि अनैतिकता ठरवायची कुणी आणि कुणासाठी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे तर मानसिक संतुलन ढासळल्याने मनोरुग्णांची संख्या वाढते आहे. हातपाय न हलवता बेरोजगारीवर शॉर्टकट उपाय म्हणून सायबर गुन्हेगारीसह थेट दिवसा खुलेआम हल्ले करणे यातही गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटेनाशी झाली आहे. अशात संस्कार आणि मायेचा ओलावा देणारे कुठलेच मोबाईल अ‍ॅप अजूनतरी टेक्नॉलॉजीने उपलब्ध करुन दिलेले नाही ही मानवी सभ्यतेची शोकांतिका आहे.

आज दिवसातील पाच टक्क्यांपेक्षा कमी वेळ मोबाईल वापरासाठी पुरेसा असताना लोक तासनतास मोबाईल वापरात आपले आयुष्य वाया घालत आहेत. सोशल मीडीयावर तसेच मैदानी खेळ सोडून मोबाईल गेममध्ये बिझी आहेत. एवढेच नव्हे तर इंटरनेट वरील पॉर्न साईट्सच्या आहारी जाऊन जगभरातील विविध देशांची युवापिढी बरबाद होत आहे. देशांची क्रयशक्ती घटल्याने आणि शरीराची हालचाल बंद झाल्याने लोक आजारी पडत आहेत हे आजचे वास्तव आहे.

मोबाईलची दुनिया अद्भुत आहे तितकीच आभासी देखील. माणसाला माणसांच्या संपर्कात ठेवण्यासाठी तयार झालेले हे उपकरण! पण माणसापासून माणूस आज याच मोबाईलमुळे दूर चालला आहे. नो मोबाईल डे आज विविध गावांमध्ये आणि शाळांमध्ये आयोजित करावा लागतो आहे इतकी ही मोबाईलची अमृतमय विषवल्ली फोफावली आहे.

१९७० साली मोटारोला कंपनीच्या सेलफोन संबंधीत प्रोजेक्टचे मुख्य निरीक्षक अभियंता व १९७३ साली जगातील पहिला व्यावसायिक सेलफोनचा वापरणारे मोबाईलचे जनक मार्टिन कूपर यांचे वयाच्या ८९ वर्षी निधन झाले. पण मोबाईलचा वापर लोक गरजेपेक्षा जास्त करत ‘मोबाईल अ‍ॅडीक्ट’ बनतात हे शल्य तसेच आपल्या संशोधनाचा पश्चात्तापाचा अग्नी मृत्यूसमयी मार्टिन कूपर यांना ‘जाळत’ होता. अशावेळी प्रश्न पडतो की सुयोग्य वापराणे मोबाईल संधींची त्सुनामी आणतो की ही ओटीटी प्लॅटफॉर्मला गतिमान करीत ‘अमृतमय विषवल्ली’ आपल्या घराघरात कलहाचे ज्वालामुखी पेटवणार नाही याची काळजी आपण घेणार ना ‘जी’?