घरफिचर्ससारांशपालक म्हणून जगताना...

पालक म्हणून जगताना…

Subscribe

बाहेरच्या जगात स्पर्धा वाढत आहेत. यामुळे मुलामुलींना त्या स्पर्धेत उतरवण्यासाठी आम्ही त्यांना कणखरतेचे धडे देतोय. त्यातही मुलगी असेल तर तिलाही आम्ही मुलाच्या बरोबरीनेच वाढवतोय. तयार करतोय. पण जेव्हा एखादी हाथरस व तत्सम एखादी घटना घडते. तेव्हा मात्र आम्हांला ती मुलगी असल्याचं तीव्रतेने जाणवायला लागतं. कितीही म्हटलं तर तिला मिळालेल्या बाईपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा विचार येतोच. ती वस्तूस्थितीही आहेच हे मान्यही करायला हवंच. यासाठी मग आतापर्यंत तिच्या पंखाना दिलेले बळ कसं कमी करायचं. तिला उंच उडायला आपणच शिकवायचं आणि नंतर तिचे बळकट पंख कापून तिला परत चूल आणि मूल यात अडकावयंच ...नाही पटत मनाला. हा प्रश्न आज प्रत्येक मुलीच्या आईवडिलांच्या मनात येतोय. पण बर्‍याच जणांना त्याच उत्तरच सापडत नाहीये.

सध्या देशात घडणार्‍या महिला अत्याचाराच्या घटनांनी सगळ्यांनाच अंतर्मुख करून टाकलं आहे. तर दुसरीकडे रोज या ना त्या कारणाने घडणार्‍या या घटनांनी पालकांची मात्र चिंता वाढवली आहे. एकीकडे आपण स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा मारत मुलींना मुलांच्या बरोबरीनेच वाढवतोय, शिकवतोय पण खरंच मुलींना मुलांप्रमाणे वाढवण त्यांचं तसंच संगोपण करणं एवढ्याने समाज सुधारेल का ? महिलांवरील अत्याचार थांबतील का असे अनेक प्रश्न आज पालकांच्या मनात घोंगावत आहेत. कारण मुलांमुलींमध्ये समानता ठेवल्याने जर हे प्रश्न सुटत असते तर आज समाजात स्त्रियांवर असा अत्याचार झालाच नसता. किंबहुना तसा कोणी विचारच केला नसता. पण काळाची पावलं उलटी पडताहेत का असे वाटू लागले आहे. कारण काही घटनांमुळे मुलींसाठी सातच्या आत घरात हाच नियम योग्य होता. अशा गप्पा आता पालकांमध्ये होऊ लागल्या आहेत. पण 21 व्या शतकात जगणार्‍या या पिढीला हे किती रुचेल हा प्रश्न असून येणारा काळ का मुलांबरोबरच पालकांसाठीही अधिक आव्हानात्मक असणार आहे.

बाहेरच्या जगात स्पर्धा वाढत आहेत. यामुळे मुलामुलींना त्या स्पर्धेत उतरवण्यासाठी आम्ही त्यांना कणखरतेचे धडे देतोय. त्यातही मुलगी असेल तर तिलाही आम्ही मुलाच्या बरोबरीनेच वाढवतोय. तयार करतोय. पण जेव्हा एखादी हाथरस व तत्सम एखादी घटना घडते. तेव्हा मात्र आम्हांला ती मुलगी असल्याचं तीव्रतेने जाणवायला लागतं. कितीही म्हटलं तर तिला मिळालेल्या बाईपणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा विचार येतोच. ती वस्तूस्थितीही आहेच हे मान्यही करायला हवंच. यासाठी मग आतापर्यंत तिच्या पंखाना दिलेले बळ कसं कमी करायचं. तिला उंच उडायला आपणच शिकवायचं आणि नंतर तिचे बळकट पंख कापून तिला परत चूल आणि मूल यात अडकावयंच …नाही पटत मनाला. हा प्रश्न आज प्रत्येक मुलीच्या आईवडिलांच्या मनात येतोय. पण बर्‍याच जणांना त्याच उत्तरच सापडत नाहीये.

- Advertisement -

कारण महिला अत्याचाराची घटना जगाच्या पाठीवर कुठेही घडली तरी सोशल मीडियावर काही मेसेज आर्वजून येतात. यात मुलींवर योग्य संस्कार करा यापासून मुलांना आधीपासूनच वळण लावा. त्यांना स्त्रीला कसं वागवावं ते शिकवा. या व अशा अनेक मेसेजेसचा समावेश असतो. पण ज्या समाजाची मानसिकताच ही पुरुषप्रधान असेल तिथे बदल घडवून आणणे हे आव्हानात्मक आहे. कारण समाजाचे जे प्रतिनिधित्व करतात त्यांच्याच लेखी जर स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे. मुलांना जन्माला घालणारी मशीन आहे. चूल आणि मूल हेच तिचे आयुष्य आहे ही मानसिकता असेल तर सर्वात आधी अशा व्यक्तींनाच नाही तर समाजालाच समुपदेशनाची गरज आहे. कारण हीच मानसिकता समाजाचे प्रतिनिधीत्व करतेय. जी धोकादायक आहे. त्यातही अशा घटना घडल्यानंतर काहीजणांना तात्पुरता बोध होतो. स्त्री पुरुष समानतेच्या ते गप्पाही मारतात. पण हा बदल घटनेच्या परिणामांपुरताच असतो. तो मुळात मनातून झालेलाच नसतो. मूळापासून झाला तरच तो रिझल्ट देतो. पण जर वरचेवर केवळ दाखवण्यासाठी होणारे बदल हे जखमेवरील तात्पुरत्या मलमपट्टी सारखेच असतात.

आतली जखम मात्र तशीच ओली व भळभळणारीच राहते. याच उत्तम उदाहरण म्हणजे हाथरस असो किंवा त्याआधी घडणार्‍या बलात्काराच्या किंवा तत्सम घटना त्यावर बोलणार्‍या प्रत्येकाने नेहमी पीडितेलाच लक्ष्य केलेलं आहे. जणू बलात्कारासाठी तिचं कारणीभूत आहे. पीडितेसारख्या मुली नेहमी शेतातच का सापडतात यापासून ती मुलगीच गावभवानी होती. यापर्यंत जर हे लोकप्रतिनिधी वक्तव्य करत असतील तर तुम्ही आम्ही अशी चार डोकी मिळून जर समाजाची मानसिकता बदलण्याची भाषा करत असू तर सर्वात आधी आपल्याला या लोकप्रतिनिधींना समज देणं गरजेचं आहे. कारण शहरी भागातील पालक शिक्षित असल्याने मुला मुलींना समानतेतूनच वाढवतात. त्यांच संगोपण करतात. पण ग्रामीण भागात मात्र चित्र उलट आहे. तेथे पुरुषप्रधान संस्कृतीचाच जास्त बोलबोला असून लोकप्रतिनिधींचे वेगळे महत्व आहे. यामुळे येथील घराघरात वाढणारी मुलंमुली ही ठराविक विचारांच्या सान्निध्यात वाढत आहे. यातूनच स्त्रियांना दुय्यम वागणूक ही तेथे सामान्य असून येथील महिलांनीही ती स्वीकारली आहे.

- Advertisement -

याच ताज उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये दलित तरुणीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपींच्या घरातील महिलांच्या प्रतिक्रिया या रक्त गोठवणार्‍या होत्या. एका तरुणीवर आपल्या मुलांनी अत्याचार केला हे कळल्यावर खरं तर कुठल्याही महिलेने पेटून उठणे अपेक्षित असत. पण हाथरसमध्ये मात्र आरोपीच्या कुटुंबातील स्त्रियांना त्या तरुणीवर झालेल्या अत्याचाराचं काडीचं सोयरसुतक नव्हतं. उलट दलित कुटुंबातील महिलाच काय पण त्यांच्या जनावरांनाही आम्ही पाणी पाजत नाही, असे धक्कादायक विधान त्या बायकांनी केले. तसेच पीडिताच चुकल्याचं सांगत त्यांनी तिच्याच नावाने खडे फोडले. ही मानसिकता जर एका महिलेची दुसर्‍या महिलेप्रती असेल तर समाज सुधारणार कसा. गेल्या काही महिन्यात घडलेल्या घटना पाहता महिलांवर अत्याचार करण्यात पुरुषांना महिलांचीही साथ मिळत असल्याचं समोर आलं आहे. यामुळे जोपर्यंत एका महिलेचं महत्व दुसर्‍या महिलेला समजणार नाही तोपर्यंत तरी हा समाज सुधारण्याची शक्यता नाही.

यासाठी सर्वात आधी महिलेने महिलेचा आदर राखणे गरजचे आहे. कारण घरातील मुलमुली त्याच पावलावर पाऊल टाकणार आहेत. हा नियम जसा स्त्रियांना लागू होतो तसाच तो घरातील पुरुषांनाही लागू होतो. घरातील पुरुष जर महिलेला तुच्छ समजत असेल तर त्याच अनुकरण त्याच घरात वाढणारा मुलगा करतो. तर मुलीला आपल्याबरोबर पुरुष असाच वागणार हे इतक मेंदूत घट्ट बसतं की ती लग्न करून दुसर्‍या घरी गेल्यावर स्वत:हून त्याची गुलामगिरी पत्करते. यात जर समोरील पुरूषाच्या मनात तिच्याबद्दल आदराची भावना असेल तर तो तिला गुलाम न करता मानसन्मानाने सांभाळतो. पण जर एखादा सनकी असेल तर तो तिचं जगणं मुश्किल करतो.

यामुळे जेव्हा समाजात महिलेवर अत्याचार होतो तेव्हा तो फक्त पुरुषांच्या मानसिकतेतूनच आलेला असतो असे नाही तर त्याला घडवणार्‍या सभोवतालातूनही आलेला असतो. यामुळे अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा आरोपी व्यक्ती व पीडित व्यक्ती या दोघांच्याही मानसिकतेचा विचार करणे गरजेचे आहे. यामुळेच पालक म्हणून जेव्हा आपण अशा घटनांकडे बघतो तेव्हा मुलांबरोबरच आपल्यावरील संस्कारांचा पालकांनी विचार करावा. हाथरस घटनेतील पीडिता दलित कुटुंबातील होती. तर आरोपी ठाकूर समाजातले. यात या दोन्ही घरांमध्ये 15 वर्षांहून अधिक काळापासूनचे पूर्वापार वैमनस्यही होतेच. शिवाय ज्या घरात व वातावरणात आरोपी वाढत होते. ते दलित विरोधी होते. यामुळे तो समाज व त्यासमाजातील व्यक्ती यांच्याबद्दल ठाकूर लोकांमध्ये घृणा ठासून भरलेली होती व आहे. यातूनच पीडितेवर अनन्वित अत्याचार केले गेले. असाच प्रकार खैरलांजीमध्येही घडला.

दोन्ही मायलेकींवर लैंगिक छळाच्या सर्व मर्यादा सोडून भयानक अत्याचार करण्यात आले होते. सगळा महाराष्ट्रचं नाही तर देश हादरला होता. कठुआ प्रकरणातही तीच क्रूरता बघायला मिळाली. चिमुरडीवर पराकोटीचे अत्याचार करण्यात आले. सगळं गणित जातीवर होतं. तो अत्याचार या पीडितांवर नाही तर त्या जातीवर असतो. त्या जातीचा राग असतो आणि सूड उगवण्यासाठी बाईमाणूस हे सॉफ्ट टार्गेट तर असतेच शिवाय खानदान की इज्जतही तिच्या इभ्रतीवर असते. यामुळे जर समाजातूनच ही मानसिकता संपवायची असेल तर आधी जातीभेदाच्या भिंती पाडाव्या लागतील. घराघरात मुलामुलींना केवळ समानतेचे धडेच नाही तर माणुसकीचेही पाठ द्यावे लागतील. तरच महिलांसाठी सुरक्षित समाज निर्माण होईल.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -