घरफिचर्ससारांशमुखवटे आणि चेहरे!

मुखवटे आणि चेहरे!

Subscribe

धोका, खंजीर, गनिमी कावा, इतिहास असा शब्दांचा खेळ करत फडणवीसांनी आपल्या चेहर्‍यावरचे अनेक मुखवटे दाखवून दिले. सोबत शरद पवार यांचा खंजीर मुखवटा असलेला चेहराही दाखवून दिला. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार बनवून मुख्यमंत्री झालेले शरद पवार आजही विसरता येत नाहीत. एकेकाळी आपले गुरू यशवंतराव चव्हाण यांचा हात सोडून इंदिरा गांधी यांना जाऊन मिळालेल्या पवार यांचा बेभरवशी राजकारणाचा चेहरा सर्वांना ओळखीचा आहे. उद्या शिवसेनेशी बिनसले तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपचे कमळ हाती घेणारे पाहिले शरद पवार असतील. सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस राहूच शकत नाही. कुठलीही ठोस विचारधारा आणि चेहरा नसलेल्या या पक्षाचे मुखवटे गळून पडायला वेळ लागत नाही...

राजकारण कधी कुठल्या थराला जाईल हे आपण कधीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. नीतीमूल्याचे राजकारण केव्हाच गंगेत वाहून गेले. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा एखादा नेता सत्तेवर पाणी सोडण्याची तयारी दाखवू शकतो. बाकी सारे शून्य. गेल्या दोन दशकात तर सत्तेला चिटकून राहण्यासाठी तर कमालीची सत्ता स्पर्धा असून काँग्रेसप्रमाणे आता त्याची भाजपलाही लागण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही त्याला अपवाद नाही. मात्र राष्ट्रवादी तसेच शिवसेना यांचा आवाका हा प्रादेशिक असल्याने त्यांना राष्ट्रीय स्तरावर खूप मोठी किंमत आहे, असे चित्र नाही. काँग्रेस आणि भाजप या मुख्य पक्षांत सामावून जाणारे हे दोन पक्ष आहेत, इतकेच त्यांचे महत्व. फक्त त्यांचे नेते मोठे. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार. या दोघांच्या सावलीत पक्ष उभे राहिले, पण ते विस्तारले नाहीत. संसदेत महाराष्ट्राची छाप पाडावी असे काही नेते त्यांच्या पक्षाने दिले नाही. मधू दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या आपल्या सातत्यपूर्ण अभ्यासूवृत्तीने सार्‍या देशाचा अवकाश आपली पंखांभोवती घेण्याची क्षमता असलेले किंवा त्यांच्या जवळपास जाणारे नेते त्यांनी उभे केले नाहीत.

नेते तयार केले जात नाहीत, ते व्हावे लागतात, असा युक्तिवाद केला जात असला तरी एक सक्षम फळी तयार करण्याचे नेतृत्वाचे, पक्षाचे कसब असते. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा आदर्श डोळ्यासमोर होता म्हणून सत्तरीच्या दशकात काँग्रेसला सक्षम पर्याय उभे करत समाजवादी परिवारातील नेत्यांची मोठी फळी उभी राहिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे याच परिवाराचा वारसा पुढे चालवणारे… पण, आपल्यापेक्षा कोणी मोठा होता कामा नये, तो डोईजड झाला तर तोटा होईल; या व्यवहारी वृत्तीने शिवसेना घ्या किंवा राष्ट्रवादी या पक्षाचे प्रमुख मोठे झाले, पक्ष मात्र छोटे राहिले. वाजपेयी यांच्या नंतरची भाजप ही ‘पार्टी विथ डिफरन्स’ नसली तरी आज दुसर्‍या फळीतील नेते त्यांच्याकडे आहेत. त्यांचे मुखवटे आणि चेहरे वेगळे असले तरी ते त्यांच्या कार्यकर्त्यांना आश्वासित करतात, हे काही कमी नाही.

- Advertisement -

सगळ्यात वाईट म्हणजे काँग्रेसने कमालीची निराशा केली आहे. गेली अनेक वर्षे सत्ताधीश असणारा हा पक्ष स्वतःचा अध्यक्ष निवडू शकत नाही, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? वर गोंधळ असेल तर खाली बजबजपुरी होणारच. भाजपचे आज फावत आहे ते काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे. आता पार्टटाइम राजकारणाचा मुखवटा फेकून देत काँग्रेसचा सच्चा चेहरा दाखवण्याची वेळ राहुल गांधी यांच्यावर आहे. सातत्य आणि संयम याला राजकारणात कमालीचे महत्व असून ते दाखवले तर राहुल यांना मोठी झेप घेता येईल. संसदेतील राहुल यांची भाषणे बघितली तर चमक तर आहे, हे सांगायची गरज भासत नाही. पण, हा चमकता चेहरा सतत दिसला पाहिजे. दुसर्‍या बाजूचा उजवा चेहरा बघितला म्हणजे डावा चेहरा कसा कमी पडतो हे आपल्या लक्षात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत वेगवेगळ्या टोप्या घालून आणि टोप्या लावून सत्यापेक्षा आभासी चित्र निर्माण करून देशावर 6 वर्षे राज्य करत आहेत. ते पाहता विरोधी पक्ष सत्ताधारी चेहर्‍याच्या आत लपलेला खोटा मुखवटा देशाला दाखवून देण्यात कमी पडत आहेत, हे वास्तव आहे.

गारुडी होऊन भारुड करणार्‍या लोकांची आपल्या देशात कमी नाही. कारण आपला मेंदू दुसर्‍याच्या ताब्यात देणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा आपला भारत देश आहे. भाजपचे गारुडी लोकांवर संमोहन तर करणारच, त्यात नवीन काही नाही. नाही तर विकासाचे खोटे आकडे लोकांच्या मेंदूत घुसवून आत्मनिर्भरतेचा खेळ कसा खेळता येईल? करोनाच्या काळात श्रमिक, मजूर, शोषितांच्या खिशात तातडीने पैसे जमा करू शकत नाही, गप्पा मात्र 20 लाख कोटींच्या. वाजवा टाळ्या! करोनाला रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करताना आधी कामगारांना, बाकी लोकांना त्यांच्या गावी पाठवण्याची गरज होती. पण, मोदी म्हणाले : ‘करोना जाणार, त्याला आपण पळवून लावू. चला टाळ्या वाजवू, ताटे बडवू, दिवे घालवू’. लोकांनी बडवले आणि आता स्वतःला बडवण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. मेंदू ताब्यात दिल्यावर हे होणारच होते. आजूबाजूला मोदी भक्त आरत्या ओवाळत उभे आहेत, पण हे लक्षात कोण घेतो? खेळ सुरू आहे. तो बंद करता येईल, पण विरोधी पक्ष सक्षम हवा. यासाठी राहुल गांधी यांचा कधीमधी लुकलूकणारा चेहरा लोकांना नको आहे. तो रोज तेजाने तळपायला हवा. लोकांना पर्याय दिला तर हवाच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हा बदल दिसला. तो सार्‍या देशभर दिसायला हवा…

- Advertisement -

आपल्या महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ. मी पुन्हा येणार सांगणारे देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षात आहेत आणि हासभास नसणारे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसलेत. ती आपलीच खुर्ची आहे, असे आजही वाटून फडणवीस यांचा चेहरा किती दुःखी कष्टी होत आहे, हे आपण पाहतच आहोत. यातूनच स्फोट बिट काही तरी होत असतात आणि मग शरद पवार आणि अजित पवार यांच्यापेक्षा फडणवीस यांचा चेहरा अधिक हताश दिसतो. ठाकरे सरकार सत्तेवर येऊन सहा महिने झाले. पण अजूनही फडणवीस यांचा आपण मुख्यमंत्री नाही, यावर विश्वास बसत नाही. शिवसेनाविना रात्रीच्या अंधारात राजकारण करून, पहाटे पहाटे स्वतःवर मुख्यमंत्रीपदाचा अभिषेक करून आणि अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करून त्यांनी फडणवीसी राजनीतीने गादी हाती घेण्याचा डाव रचला खरा, पण हाच डाव त्यांच्यावर उलटला. खोटा चेहरा उघडा पडला. लोकांना तोंड दाखवण्यासाठी जागा राहिली नाही.

Piegate le gambe all’altezza delle ginocchia in modo che i piedi tocchino completamente il pavimento. La compressa di Kamagra deve essere presa 1-3 ore con un bicchiere pieno d’acqua.

शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अजित पवार यांच्याशी संधान साधणार्‍या फडणवीस यांनी दुसर्‍यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी ‘मिरची हवन’ केले होते. ‘चेकमेट: हाऊ द बीजेपी वोन अँड लॉस्ट महाराष्ट्र’ या पुस्तकात तसा उल्लेख आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व असा राजकीय भूकंप झाला होता. विधानसभा निवडणूक एकत्र लढलेल्या शिवसेना भाजपमध्ये सत्ता वाटपावरून दुरावा आल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची समीकरणं जुळली. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच अचानक देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांनी 23 नोव्हेंबरच्या पहाटे राजभवनावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या राजकीय खेळात शरद पवारांची एन्ट्री होताच चक्रे फिरली आणि बंड फसले. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या या भूकंपाची पार्श्वभूमी नेमकी काय होती?, अजित पवार भाजपच्या जवळ का गेले? ते परत का फिरले? अजित पवारांसोबत राष्ट्रवादी सोडणार्‍या आमदारांना काय आमिषे दाखवण्यात आली होती? या खेळात पडद्यामागून कोण सहभागी होते? शरद पवारांना या सगळ्याची माहिती कधी मिळाली? या सर्व घडामोडींवर या पुस्तकात लेखक सुधीर सूर्यवंशी यांनी प्रकाश टाकला आहे.

फडणवीस यांनी शपथ घेण्याआधी केलेल्या ‘मिरची हवन’चाही उल्लेख पुस्तकात आहे. मध्य प्रदेशातील नालखेडा येथील बागलामुखी मंदिराच्या पुजार्‍यांकडून फडणवीसांनी हे हवन करून घेतले होते. उत्तराखंडमधील हरीश रावत सरकार या ‘मिरची हवन’मुळे वाचल्याचे फडणवीसांना सांगण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी हे हवन केले होते. मिरची हवन करणार्‍या तांत्रिकाच्या सांगण्यावरूनच शपथविधीच्या वेळी फडणवीसांनी त्यांच्या आवडत्या निळ्या रंगाच्या जॅकेटऐवजी काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते,’ असेही पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. हे सारे समोर आल्यावर फडणवीसांचे बदलते चेहरे दिसले आणि त्यांचे खोटे मुखवटे गळून पडले.

आता आणखी एक फडणवीस यांचा चेहरा समोर आलाय. ‘अजित पवार हा आमचा पहिला पर्याय नव्हताच मुळी. शरद पवारच आपला पक्ष घेऊन आमच्या बरोबर सत्तेत येणार होते. पण, शेवटच्या क्षणी त्यांनी पाठ फिरवली. मोदींना भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे सरकार हवे होते. त्यांना शिवसेनेला बाजूला ठेवायचे नव्हते आणि पवारांना ते मान्य नव्हते. याच दरम्यान अजित पवारांकडून आम्हाला ‘फिलर’ आला आणि अमित शहा यांना मध्यरात्री फोन करून पहाटे आम्ही सरकार बनवले.’

हा गौप्यस्फोट करून धोका, खंजीर, गनिमी कावा, इतिहास असा शब्दांचा खेळ करत फडणवीसांनी आपल्या चेहर्‍यावरचे अनेक मुखवटे दाखवून दिले. सोबत शरद पवार यांचा खंजीर मुखवटा असलेला चेहराही दाखवून दिला. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून पुलोद सरकार बनवून मुख्यमंत्री झालेले शरद पवार आजही विसरता येत नाहीत. एकेकाळी आपले गुरू यशवंतराव चव्हाण यांचा हात सोडून इंदिरा गांधी यांना जाऊन मिळालेल्या पवार यांचा बेभरवशी राजकारणाचा चेहरा सर्वांना ओळखीचा आहे. उद्या शिवसेनेशी बिनसले तर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपचे कमळ हाती घेणारे पाहिले शरद पवार असतील. सत्तेशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस राहूच शकत नाही. कुठलीही ठोस विचारधारा आणि चेहरा नसलेल्या या पक्षाचे मुखवटे गळून पडायला वेळ लागत नाही…

आता खरी कसोटी आहे ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची. त्यांचा संयमी चेहरा आधी लोकांना आवडला होता. करोनाच्या लढाईत त्यांचे प्रामाणिक प्रयत्न भावले होते. पण, प्रशासनावर नको तितके अवलंबून राहताना त्यांनी लॉक आणि अन लॉकचा खेळखंडोबा करून लोकांना जेरीस आणले आहे. नेत्याचा चेहरा खमका असावा लागतो. प्रशासन पळवता आले पाहिजे, पण तेच सनदी सचिवांच्या तालावर राज्य कारभार हाकत असतील तर काही खरे नाही. भाजप कधीही ठाकरे सरकार पाडू शकते. ते संधीची वाट पाहत आहेत. आता करोनाच्या काळात सरकार पाडले तर आधीच डागाळलेला चेहरा काळा व्हायचा, म्हणून करोना आटोक्यात यायची ते वाट पाहत आहेत. फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे राजकारणात मरून चालत नाही. भाजप पुन्हा जिवंत होणार हे निश्चित. अशा वेळी उद्धव यांचा खमका आक्रमक चेहरा समोर यायला हवा. चेहरे आणि मुखवट्यांच्या खेळात हाच चेहरा त्यांना तारून नेईल…

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -