घरफिचर्ससारांशफुटबॉल मैदानावरील चमत्कार!

फुटबॉल मैदानावरील चमत्कार!

Subscribe

खेळाडूला अनेक प्रतिस्पर्धी खेळाडूंचा अडथळा पार करून चेंडू गोलपोस्टपर्यंत न्यावा लागतो. त्याचप्रमाणे फुटबॉलच्या मैदानावर येण्यासाठी पेलेलादेखील अनेक अडथळे पार करावे लागले. पेले साओ पाउलो राज्यातील बौरू येथे गरिबीत वाढला. चहाच्या दुकानात नोकर म्हणून काम करून त्याने पैसे कमावले. फुटबॉल परवडत नाही म्हणून तो सहसा वर्तमानपत्राने भरलेल्या सॅकने आणि तार किंवा द्राक्षे बांधून तो खेळला. प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींचा अंदाज घेऊन, चेंडू दोन्ही पायांनी मारत गोलपोस्टवर मारण्यात हा पोरगा पटाईत होता. स्ट्रायकर असताना त्याची नजर आणि पासिंग क्षमतेने हा लहान मुलगा मैदानावर चमत्कार करायला लागला.

साल १९९९. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने ‘शतकातील फुटबॉल खेळाडू’चे नाव घोषित केले. खेळाडूचे नाव होते एड्सन अरांतेस दो नासिमेंतो म्हणजेच पेले. आपल्या भारत देशात फुटबॉल पाहणारे आणि खेळणारे यांची संख्या फार कमी आहे. तसेच फुटबॉलमधील खेळाडू आणि त्यांची माहिती असणारे त्यापेक्षाही कमी. त्यामुळे मेस्सी आणि रोनाल्डोच्या पलीकडे पेलेंबद्दल माहिती असणारे अगदीच फार थोडे भारतवासीय आहेत, परंतु पेलेसारख्या खेळाडूचा संघर्ष जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवणे फार गरजेचे असते. पेलेचा जीवनप्रवास तुम्हाला एका रंजक आणि अविश्वसनीय अशा दुनियेत घेऊन जातो. एखादा सामान्य मुलगा स्वत:ची आवड आणि कौशल्य याच्या जीवावर एखाद्या खेळातील जगविख्यात कसा होऊ शकतो हे पेले सांगतो.

पेले यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० चा. ब्राझीलच्या मिनास गेराइस, ट्रेस कोरासी येथून या खेळाडूचा प्रवास सुरू झाला. अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्या नावावरून नाव ठेवलेल्या या खेळाडूने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत संपूर्ण फुटबॉल विश्वाला दिपवून टाकले. त्याला त्याच्या शालेय दिवसात ‘पेले’ हे टोपणनाव मिळाले. असा दावा केला जातो की, त्याला हे टोपणनाव त्याच्या आवडत्या खेळाडूच्या स्थानिक वास्को द गामा गोलकीपर बिलेच्या नावाच्या उच्चारामुळे देण्यात आले. आपल्या आत्मचरित्रात पेले यांनी म्हटले आहे की, या नावाचा अर्थ काय आहे याची त्यांना कल्पना नव्हती किंवा त्यांच्या जुन्या मित्रांनाही नाही, परंतु या भन्नाट खेळाडूने आपल्या अलौकिक खेळाने हे नावच जगविख्यात केले.

- Advertisement -

खेळाडूला अनेक प्रतिस्पर्धी खेळाडूंचा अडथळा पार करून चेंडू गोलपोस्टपर्यंत न्यावा लागतो. त्याचप्रमाणे फुटबॉलच्या मैदानावर येण्यासाठी पेलेलादेखील अनेक अडथळे पार करावे लागले. पेले साओ पाउलो राज्यातील बौरू येथे गरिबीत वाढला. चहाच्या दुकानात नोकर म्हणून काम करून त्याने पैसे कमावले. फुटबॉल परवडत नाही म्हणून तो सहसा वर्तमानपत्राने भरलेल्या सॅकने आणि तार किंवा द्राक्षे बांधून तो खेळला. प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींचा अंदाज घेऊन, चेंडू दोन्ही पायांनी मारत गोलपोस्टवर मारण्यात हा पोरगा पटाईत होता. स्ट्रायकर असताना त्याची नजर आणि पासिंग क्षमतेने हा लहान मुलगा मैदानावर चमत्कार करायला लागला. प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकण्यासाठी त्याचे ड्रिब्लिंग कौशल्यदेखील अप्रतिम होते. पेलेने जेव्हा खेळायला सुरुवात केली तेव्हा बौरूमध्ये इनडोअर फुटबॉल लोकप्रिय झाला होता. तो प्रदेशातील पहिल्या फुटसल (इनडोअर फुटबॉल) स्पर्धेचा भाग होता. पेले आणि त्यांच्या टीमने पहिले विजेतेपद आणि इतर अनेक विजेतेपदे जिंकली. फुटसलने त्याला १४ वर्षांचा असताना प्रौढांसोबत खेळण्याची परवानगी दिली.

वयाच्या १६ व्या वर्षी पेलेच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात झाली. पेलेने वयाच्या १५ व्या वर्षी सँटोस आणि १६ व्या वर्षी ब्राझील राष्ट्रीय संघाकडून खेळण्यास सुरुवात केली. ब्राझील संघात समावेश झाल्यावर खर्‍या अर्थाने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर जो काही खेळ फुटबॉल चाहत्यांनी आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंनी बघितला त्यांच्यासाठी ते क्षण अविस्मरणीय ठरले. पेलेने तीन फिफा विश्वचषक जिंकले. १९५८, १९६२ आणि १९७०. असे करणारा तो एकमेव खेळाडू होता, जिथे तो पहिला कृष्णवर्णीय जागतिक स्पोर्टिंग स्टार बनला. पेले ब्राझीलसाठी ९२ सामन्यांमध्ये ७७ गोलांसह संयुक्त सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे. क्लब स्तरावर तो ६५९ गेममध्ये ६४३ गोलांसह सँटोसचा सर्वकालीन सर्वोच्च गोल करणारा खेळाडू होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याने प्रत्येक गेममध्ये जवळपास एक गोल सरासरी केला. पेले काही काळासाठी जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू होता.

- Advertisement -

पेले आणि भारताचा संबंध बर्‍याच वेळा आला. १९७७ मध्ये तो पहिल्यांदा कोलकातामध्ये आला. २४ सप्टेंबर १९७७ रोजी ईडन गार्डन्स मैदानात न्यूयॉर्क कॉसमॉस संघाकडून मोहन बागानविरुद्ध खेळणार्‍या पेलेकडे सर्वांचे लक्ष होते. या सामन्यात मोहन बागानने पेलेला गोल करू दिला नाही. मोहन बागानने संध्याकाळी पेले यांचा सत्कार समारंभ ठेवला होता. पेले ऑक्टोबर २०१५ मध्ये दिल्ली येथे आला. यावेळी फुटबॉलपटू म्हणून नाही तर खेळाचा दूत म्हणून. १७ ऑक्टोबर २०१५ रोजी आंबेडकर स्टेडियमवर सुब्रोतो चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता.

खडतर परिस्थितीतून वर आलेला हा खेळाडू फुटबॉलच्या पलीकडेदेखील आपले आयुष्य जगला. १९७७ मध्ये निवृत्त झाल्यानंतर पेले फुटबॉलचा जागतिक राजदूत होता. त्याला न्यूयॉर्क कॉसमॉसचे मानद अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पेले १९९४ मध्ये युनेस्कोचा शांतता राजदूत होता. त्यानंतर १९९५ ते १९९८ तो ब्राझीलमध्ये क्रीडामंत्री राहिला. ब्राझील फुटबॉल संघटनेतील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी त्याने एक कायदाच केला. तो ‘पेले लॉ’ म्हणून ओळखला गेला. पेले ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक होते, पण त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. तालबद्ध खेळ तसेच पेलेचे जीवनदेखील तालबद्ध होते. त्याने अनेक यशस्वी माहितीपटात आणि लघुपटात काम केले. त्याला संगीताचीही जाण होती. त्याने अनेक संगीतमय रचनाही केल्या. त्याने १९९७ मध्ये प्रसारित झालेल्या पेले या चरित्रपटाच्या संगीत नियोजनाचीही जबाबदारी सांभाळली होती. त्याने अनेक प्रसिद्ध आत्मचरित्रेही प्रकाशित केली.

इंग्लंडचा १९६६ फिफा विश्वचषक विजेता कर्णधार बॉबी मूर म्हणतो की, पेले हा मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात परिपूर्ण खेळाडू होता. त्याच्याकडे सर्व काही होते. दोन चांगले पाय, हवेतील जादू, चपळता, ताकद, कौशल्य. फक्त पाच फूट आठ इंच उंच, तरीही तो खेळपट्टीवर एखाद्या राक्षसासारखा दिसत होता. परिपूर्ण संतुलन आणि अद्भुत दृष्टी. तो महान होता. कारण तो फुटबॉल खेळपट्टीवर काहीही आणि सर्वकाही करू शकत होता. सर्वकाळातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेल्या पेलेचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. कॅन्सरशी झुंज देत असलेल्या पेलेने उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले होते. २०२२ च्या वर्ष अखेरीस पेलेने जगाचा निरोप घेतला. कोणतीही पार्श्वभूमी नसताना या खेळाडूने जी उंची गाठली ती खरोखरंच अतुलनीय आहे. ठरावीक मापाच्या गोलपोस्टला लक्ष करता करता हा खेळाडू असीमित होऊन गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -