घरफिचर्ससारांशयंदा मुंबईची थंडी गंडलेय

यंदा मुंबईची थंडी गंडलेय

Subscribe

माथेरानपेक्षा मुंबई थंड असेच काहीसे वातावरण मुंबईकरांनी काही दिवसांपूर्वी अनुभवले. मुंबईतल्या वातावरणात सातत्याने होणारे बदल गेल्या वर्षभरात मुंबईकरांनी अनुभवला आहे. त्यामध्ये एन थंडीच्या वातावरणात पावसाचा अनुभवही यंदा मुंबईकरांनी घेतला. स्वेटर घालण्याच्या दिवसात मुंबईकर हातात छत्री घेऊ बाहेर पडले. पण अशा सगळ्या वातावरणात कोरोनाची दुसरी लाट, नव्या कोरोनाच्या स्ट्रेनने वाढवलेली चिंता आणि सातत्याने बदलणारे वातावरण याचे सावट मुंबईकरांवर कायम होते. आतापर्यंतच्या थंडीच्या मौसमातला निच्चांक मुंबईने गाठला आहे. गेल्या काही दिवसात थंडी जाणवू लागलेली असतानाच पुन्हा एकदा शनिवारच्या ढगाळ वातावरणामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे.

यंदाच्या मौसमातला थंडीचा निच्चांक म्हणजे १५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पारा खाली घसरला होता. पण उत्तर आणि पश्चिम भारतात थंडीचा पारा घसरण्यामागचे खरे कारण हे थंडीची लाट हे होते. त्यामुळेच दिल्लीकरांसह मुंबईकरांनाही यंदाच्या मौसमातील सर्वात गारव्याचा अनुभव देणारी सकाळ अनुभवायला मिळाली. मुंबईतल्या दोन हवामान मापक ऑब्झर्व्हेटीव्हजमध्ये म्हणजे सांताक्रुझमध्ये किमान तापमान म्हणजे १५ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली होती. तर कुलाब्यात १७ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. एकीकडे माथेरानमध्ये १७ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली असतानाच महाबळेश्वरमध्ये १४.९ डिग्री सेल्सिअसची नोंद झाली. मुंबईत पवई आणि गोरेगावमध्ये तर थंडीचा पारा हा १३ डिग्री सेल्सिअस म्हणजे महाबळेश्वरपेक्षाही घसरला होता. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतल्या थंडीचा कमाल पारा खाली घसरण्याचा हा विक्रम आहे. याआधी २०१९ मध्ये १६.४ इतक्या किमान तापमानाची नोंद झाली होती. तर त्याआधीच्या वर्षात १४.४ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.

- Advertisement -

मुंबईचा थंडीचा पारा एकीकडे खाली घसरत असतानाच दुसरीकडे मुंबईची हवा खराब होत असल्याची माहिती समोर आली. मुंबईत वाढत्या थंडीमुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवरही परिणाम झाल्याचे समोर आले. हवामान विभागाच्या माहितीनुसार जसजसा थंडीचा प्रभाव वाढेल, तसतशी हवेची गुणवत्ता ढासळेल असे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. थंडीचा परिणाम हा मुंबई शहरासह उपनगरामध्ये दिसला खरा, पण यंदाच्या थंडीत आलेला पाऊस सगळच मुंबईच वातावरण ढवळून काढणारा होता. यंदाच्या मौसमात मुंबईत सप्टेंबरमध्ये थंडीचा प्रभाव जाणवायला सुरूवात झाली होती. पण मुंबईत डिसेंबरमध्ये थंडीचे आगमन होईल असे हवामान हे आधीच स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार थंडीचा सर्वात जास्त कडाका हा डिसेंबरमध्ये मुंबईकरांनी अनुभवला. थंडीच्या वातावरणात पावसाच्या हजेरीने मात्र एकच तारांबळ उडवली.

मुंबईत दरवर्षी उत्तर पूर्व भागातून स्वेटर्सची विक्री करणारे छोटे आणि किरकोळ व्यापारी मुंबईच्या अनेक भागात दिसतात. मात्र यंदाच्या थंडीत यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. मुंबई महापालिका कोरोनाच्या संकटामुळे धंद्यासाठी बसू देत नाही, दुसरीकडे रूसलेली थंडी, अवेळीचा पाऊस यासारख्या सगळ्या प्रतिकुल वातावरणाचा फटका हा स्वेटर विक्रेत्यांनाही बसलेला आहे. मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता पाहता मुंबईतली थंडी यामध्ये भर घालणार की काय असे तर्क वितर्क सुरूवातीच्या टप्प्यात वाटत होते. त्यामुळे यंदाच्या थंडीच्या मौसमाने मुंबईकरांना धडकी भरवली. पण सुदैवाने मुंबईत थंडीचा प्रभाव वाढलेला असला तरीही दुसरीकडे कोरोनाच्या केसेस तितक्या प्रमाणात वाढलेल्या नाहीत. तर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे मुंबईकरांचे टेन्शन वाढवले. पण मुंबईकरांचे दैव बलवत्तर म्हणूनच यंदाचा थंडीचा प्रभाव वाढलेला असतानाही मुंबईकरांवरचा कोरोनाचा धोका टळला.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -