Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश गरीब बिच्चारे पुरुष...

गरीब बिच्चारे पुरुष…

गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडील कॉर्पोरेट क्षेत्रात पुरुष दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर हळूहळू पुरुषदिनाबद्दल सामान्यांना कळाले. पण तरीही ज्या जोशात आपल्याकडे वुमन्स डे, एल्डर्स डे, चिल्ड्रन्स डे साजरे केले जातात. तो जोश पुरुषदिनी दिसून येत नाही. याबद्दल सहज म्हणून एका मित्राला विचारले त्यावर तो जे काही बोलला ते अंतर्मुख करणारेच होते. त्याच्या मते, ‘आपल्याकडे काय किंवा इतर देशांमध्ये काय पुरुषांना फार कोणी सिरियसली घेत नाही. पुरुष म्हणजे निर्लज्ज, निर्ढावलेला प्राणी. जगातील कुठल्याही कोपर्‍यात जेव्हा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो तेव्हा सगळ्या पुरुषजातीला त्यासाठी दोषी मानले जाते.’ गुरुवारी झालेल्या पुरुष दिनानिमित्त पुरुषांचीही बाजू समजून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.

Related Story

- Advertisement -

जगभरात नुकताच 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे कोरोनामुळे यावर्षी इतर दिनांप्रमाणेच पुरुषदिनही काहीजणांनी ऑनलाईन साजरा केला. तर गंमत म्हणजे हा पुरुषदिन अनेक देशांत बर्‍यापैकी महिलांनीच पुढाकार घेऊन साजरा केला. कारणही तसंच आहे. कारण बर्‍याच पुरुषांना असाही दिवस असतो याबद्दल काहीच माहीत नाही. तर काहीजणांना यात इंटरेस्टच नाही. आपल्याकडे तर पुरुषांनाही अशा कुठल्या तरी दिवसाची गरज असते हेच पचनी पडत नाहीये. पुरुषसत्ताक संस्कृती असल्याने असेही सगळे दिवस पुरुषांचेच. त्यामुळे त्यांना मन मोकळं करण्याची काय गरज असा प्रश्नही काहीजण उपस्थित करतात. पुरुष म्हणून जन्माला आल्याचा उत्सव साजरा करण्याची त्यांनाही इच्छा होऊ शकते हे पुरुषांचीच मक्तेदारी असलेल्या आपल्या समाजाला पटत नाही. हीच खरी पुरुष असण्याची शोकांतिका आहे.

पण गेल्या काही वर्षांपासून आपल्याकडील कॉर्पोरेट क्षेत्रात पुरुष दिन साजरा होऊ लागला. त्यानंतर हळूहळू पुरुषदिनाबद्दल सामान्यांना कळाले. पण तरीही ज्या जोशात आपल्याकडे वुमन्स डे, एल्डर्स डे, चिल्ड्रन्स डे साजरे केले जातात. तो जोश पुरुषदिनी दिसून येत नाही. याबद्दल सहज म्हणून एका मित्राला विचारले त्यावर तो जे काही बोलला ते अंतर्मुख करणारेच होते. त्याच्या मते आपल्याकडे काय किंवा इतर देशांमध्ये काय पुरुषांना फार कोणी सिरियसली घेत नाही. पुरुष म्हणजे निर्लज्ज, निर्ढावलेला प्राणी. जगातील कुठल्याही कोपर्‍यात जेव्हा एखाद्या महिलेवर अत्याचार होतो तेव्हा सर्वच पुरुषजातीला त्यासाठी दोषी मानले जाते. त्याची दुसरी बाजू कधीच बघितली जात नाही किंवा ती देखील तपासून बघावी असा साधा विचारही कोणाच्या मनात येत नाही. त्याच खापर सगळ्याच पुरुषांवर फोडले जाते. यामुळे आपल्या देशात पुरुषदिनाला काही महत्व नाही. male is like a punching bag in our country. मित्राच हे बोलणं ऐकल्यावर पुढे काही विचारावं असं वाटलं नाही. पण त्याच्या मनात कुठलीशी सल होती. ती माझ्या प्रश्नाने पुन्हा त्याला बोचली. यामुळे मी फक्त हसले कारण माझ्याकडे त्याचं सत्य पचवण्यासाठी शब्दच नव्हते. पण पुरुष म्हणून ही त्या एकट्याची व्यथा मात्र नक्की नाही. त्याने फक्त मन मोकळं करून समस्त पुरुष जातीचं प्रतिनिधीत्वचं केलं.

- Advertisement -

आपल्या घरात, आजूबाजूला कधी वडिल्यांच्या रुपात, कधी भावाच्या, कधी मुलाच्या तर कधी मित्राच्या व नातेवाईकांच्या रुपात वेगवेगळ्या स्वभावाच्या पुरुषांचा वावर असतोच. त्यामुळे त्यांच्याबरोबर वाढताना आणि जगताना पुरुषीवृत्तीचे कंगोरे प्रत्येक स्त्रीने अनुभवलेले असतात. यात पुरुष हळवाही असतो आणि कणखरही हे देखील तिला पुरते माहीत असते. पण तरीही जर तिच्यापुढे हळवा पुरुष आवडतो की कणखर तर तिचा चॉईस हा कणखर पुरुषचं असल्याचं पाहायला मिळतं. कारण पुरुषाचं मुळुमुळु रडत बसणं हे बायकीपणाचं लक्षण असं आपला समाज आजही समजतो. तर जो पुरुष परिस्थितीचा कणखरपणे सामना करतो तो खरा मर्द. असं आपल्याला बालपणापासूनच शिकवले जाते. त्यामुळेच पुरुषांना रडण्यासाठी मन मोकळं करण्यासाठी आपल्या समाजात अलिखित बंदीच आहे. यामुळे पुरुषांच दुखं व व्यथा कधीही बाहेर येतच नाहीत त्या आतच धगधगत राहतात. त्यातूनच मनाचा कोंडमारा होऊन आज अनेक पुरुष मानसिक व्याधीने ग्रस्त झाले आहेत. नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांमध्ये, व्यसनाधीन होणार्‍यांमध्ये, आत्महत्या करणार्‍यांमध्ये पुरुषांचं प्रमाण महिलांच्या तुलनेत म्हणूनच जास्त आहे.

यामागच्या कारणांचा मागोवा घेतला की लक्षात येतं की मुलगा व मुलगी जन्माला येतानाच लिंगभेद घेऊन येतात. त्यानंतर त्यांच्या लैंगिकतेवरच त्यांची घरात जडणघडण होते. त्यातूनच मुलगी म्हणजे मुलाच्या तुलनेत नाजूक शरीरयष्टीची व हळव्या मनाची असे त्यांच्या मनावर बिंबवले जाते. त्यानुसारच मुलं घडत असतात. खेळताना मुलगी पडली तर ती रडते वेदना सहन न झाल्याने ती आकांडतांडवही करते. सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते. पण हेच मुलाच्या बाबतीत झाले तर त्याच्या रडण्याला बायकीपणाचे लक्षणं म्हणून अवहेलना करण्यात येते. त्यामुळे त्याच क्षणापासून तो अश्रू गोठवण्यास तयार होऊ लागतो. तसाच मोठा होतो. रडलो, मन मोकळं केलं कोणासमोर व्यथा मांडली तर बायकीपणाचा स्टॅम्प लागेल या भीतीने पुरुष रडणंच विसरलेत. तर काहींनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्यासाठी एकच प्याला जवळ करत स्वत: बरोबरच सगळ्या प्रॉब्लेमसला ग्लासात बुडवून घेतल्याच आपण बघतोय. काहीजणं मनात कुढताहेत. तर काहीजणांनी स्वत:ला सगळ्यांपासून अलिप्त करून एकटेपणाची वाट धरल्याचंही आजूबाजूला दिसतंय.

- Advertisement -

याबद्दल सहज म्हणून पेशाने वकील असलेली मैत्रीण भारती फाटक हिला विचारले त्यावर तिनेही बरंच उहापोह केला. भारतीकडे अनेक पुरुष कौटुंबिक समस्या घेऊन येतात. यात पत्नी पीडितांची संख्या वाढत असल्याचे तिने सांगितले. त्यातही हल्लीच्या केसेसमध्ये पती नपुंसक असल्याची, हुंडा मागत असल्याच्या खोट्या केसेस महिला करतात. ज्याचा दूरपर्यंत पुरुषांच्या आयुष्यावर परिणाम होत असल्याचं तिने सांगितले. यात पुरुषाची बाजू ऐकण्यात फारसं कोणाला स्वारस्य नसतं. यामुळे पुरुषाची मानसिक कुचंबणा होते. यातूनच तो टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत पोहचतो. परिणामी शेवटी कायद्याच्या कचाट्यात तोच सापडतो. कारण त्यालाही कोणी त्रास देऊ शकतो हेच आपण मान्य करत नाही. यामुळे पुरुष समस्येबरोबरच जगतो व त्याच समस्येचा अंत करण्यासाठी तो स्वत:ला संपवतो. यामुळे पुरुषांसाठी समुपदेशन करणे गरजेचे आहे. त्याने जवळच्या व्यक्तीकडे व्यक्त होणं गरजेचे आहे. मुख्य म्हणजे देशात ज्यापद्धतीने महिलांसाठी कायद्यांची तरतुद करण्यात आली आहे. तशीच तरतुद पुरुषांसाठीही होणे आवश्यक आहे.

आज आपल्या देशात कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा 498 चा महिला मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेत आहेत. हे न्यायालयालाही माहीत आहे. पण 498 अंतर्गत पत्नीने पती व त्याच्या कुटुंबाविरोधात तक्रार केली. तर तो पुरुष तर आयु्ष्यातून उठतोच पण त्याचे कुटुंबही उद्ध्वस्त होते. त्याच्या आईवडील व बहिणीपासून लांबच्या नातेवाईकांनाही महिला सुडापोटी या प्रकरणात गोवतात. यासाठीच भारतात पुरुषांच्या हक्कांसाठी सेव्ह इडियन फॅमिली, मावा, MASVAW, FEM सारख्या पुरुष संघटना गेली अनेक वर्षे झगडत आहेत. पण त्यांना अजूनही अपेक्षित यश आलेले नाही. महिलांकडूनही पुरुषांचा छळ केला जातो. हेच आपल्याकडे हास्यास्पद मानले जाते. यामुळे जर पत्नीविरोधात किंवा एखाद्या अन्य महिलेविरोधात पुरुष पोलिसांकडे तक्रारीस गेला तर पोलीस त्याची गणती मूर्खात करतात. कारण महिला कशी काय पुरुषांचा छळ करु शकते. या प्रश्नाकडे आजही आपल्याकडे गमतीने बघितले जाते. यामुळे पुरुष न्यायासाठी कितीही बेंबीच्या देठापासून ओरडत असला तरी त्याची ती हाक कायदा बदलण्यासाठी कामी येत नाही.

यामुळे गेली अनेक वर्षे आपल्याकडे पुरुषांसाठी असलेले कायदे जैसे थे वैसेच आहेत. यामुळे पुरुषांनी कितीही संघटना उभारल्या, पत्नीपडितांनी पत्नीचे श्राद्ध घालून निषेध केला तरी स्वत:च्या लढ्यासाठी त्यांना स्वत:लाच तयार करावे लागणार आहे. यासाठी पुरुषांमध्ये एकजूट असणे आवश्यक आहे. सेव्हीचे कुमार यांनीही हेच सांगितले आहे. की जेव्हा एखाद्या पुरुषावर त्याच्या आईवडिलांवर पत्नीकडून अत्याचार केला जातो. त्यांच्याविऱोधात खोटी तक्रार नोंदवली जाते. तेव्हा त्याच्या संपूर्ण कुटुंबाने त्याच्या बाजूने उभे राहणे आवश्यक असते. पण तसे होते नाही. पुरुषाच्या मागे कायद्याचे लोढणं लागलं की जवळची लोक आधी गायब होतात. त्याची बायको आपल्याला या प्रकरणात गोवेल ही त्यामागची भीती असते. पण हेच जेव्हा महिलेच्या बाबतीत होते. तेव्हा परिस्थिती बदललेली असते. सत्यपरिस्थिती न जाणता सगळा समाज तिच्यामागे उभा राहतो. हे थांबवणे व बदलणे गरजेचे असल्याचे मत पुरुष संघटना व्यक्त करत आहेत. मीटूच्या केसेस मध्येही अनेक महिलांनी सूडापोटी काहीजणांना गोवले पण त्यांची बाजू कोणीच ऐकली नाही. यामुळे ज्यावेळी पुरुषांसाठी कायद्याची तरतूद होईल तेव्हाच खर्‍या अर्थाने पुरुषदिन साजरा केला जाईल. अन्यथा पुरुषांप्रती पक्षपातीपणा होत असेल तर त्या देशात पुरुष दिनाला काहीच महत्व नाही.

- Advertisement -