घरफिचर्ससारांशऑर्कांच्या भावनांचा उद्रेक आणि जहाजांचे अपघात!

ऑर्कांच्या भावनांचा उद्रेक आणि जहाजांचे अपघात!

Subscribe

ऑर्काने जहाजे बुडवल्याच्या घटना आता बर्‍याच ठिकाणी आढळत आहेत व त्या वारंवार होताना दिसत आहेत. या वर्तनाविषयी शास्त्रज्ञांना वाटते की आघात झालेल्या ऑर्काने वेदनांच्या गंभीर क्षणानंतर जहाजांवर हल्ला केला आणि हे वर्तन सामाजिक शिक्षणाद्वारे इतर ऑर्कांमध्ये पसरत आहे. ऑर्काने युरोपच्या इबेरियन किनार्‍यावर तिसरे जहाज हल्ला करून बुडवले आहे आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की उर्वरित ऑर्का या वर्तनाचा कित्ता गिरवत आहेत.

–सुजाता बाबर

ऑर्काने युरोपमध्ये ३ जहाजे बुडवल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. ऑर्का इतर ऑर्कांनाही हेच करायला शिकवताना दिसतात, परंतु असे का याविषयी शास्त्रज्ञांना उत्सुकता आहे. याविषयी एक अभ्यास नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

- Advertisement -

ऑर्का किंवा ऑर्कस म्हणजे किलर व्हेल. हे डॉल्फिन जमातीमधील सर्वात मोठे मासे आहेत. ऑर्का त्याच्या आकाराने आणि त्याच्या आकर्षक रंगावरून सहज ओळखता येतात. वरच्या बाजूला फवारल्यासारखा काळा आणि खाली शुद्ध पांढरा रंग, प्रत्येक डोळ्याच्या मागे पांढरा ठिपका असल्याने ते लवकर ओळखता येतात. हा एक शक्तिशाली मांसाहारी प्राणी असूनही त्याने जंगलात प्राण्यांना किंवा मानवांना मारल्याची नोंद नाही. याउलट मानवाने त्यांच्यावर हल्ले केल्याच्या घटना जास्त आहेत. इतरांना मारण्याच्या त्यांच्या वैशिष्ठ्यामुळे डझनभर किलर व्हेलला बंदिवासात ठेवले जात आहे आणि कलाकार म्हणून प्रशिक्षित केले जात आहे. हे अत्यंत हुशार मासे म्हणून ओळखले जातात. तसेच किलर व्हेल हे काही अमानव प्राण्यांपैकी आहेत जे स्वतःला आरशात ओळखू शकतात.

ऑर्काचा सामान्य दिवस म्हणजे खाणे, प्रवास करणे, विश्रांती घेणे आणि इतर ऑर्कांच्या सोबत खेळ खेळणे किंवा नवनवीन गोष्टी शिकणे. ऑर्का बरेचदा समुद्राच्या पृष्ठभागावर अधिक रमलेले असतात. पाण्यातून पूर्णपणे बुडून उडी मारणे आणि शेपटी मारणे अशा गमती ते करीत असतात. स्पायहॉपिंग हे त्यांच्या वर्तनामधील एक वैशिष्ठ्यपूर्ण वर्तन आहे. यामध्ये ऑर्का आपले डोके पाण्यावर धरून त्याचा परिसर पाहत असतो.

- Advertisement -

आकारानेदेखील हे अवाढव्य असतात. सर्वात मोठा नर १० मीटरपेक्षा (३२.८ फूट) जास्त लांब असून सुमारे ९८०० किलो वजनाचा आहे. मादी मात्र वजनाने आणि आकाराने लहान असते. इतर सामान्य ऑर्का ६ ते ८ मीटर लांबीचे असतात. त्यांचे तोंड बंद ठेवणारे स्नायू खूप मोठे असतात आणि जबड्यात ४० पेक्षा जास्त वक्र दातांचा संच असतो. बहुतेक दात मोठे असतात. सुमारे १० सेमी (४ इंच) लांब आणि ४ सेमी (१.६ इंच) रुंद असतात.

ऑर्काने जहाजे बुडवल्याच्या घटना आता बर्‍याच ठिकाणी आढळत आहेत व त्या वारंवार होताना दिसत आहेत. या वर्तनाविषयी शास्त्रज्ञांना वाटते की आघात झालेल्या ऑर्काने वेदनांच्या गंभीर क्षणानंतर जहाजांवर हल्ला केला आणि हे वर्तन सामाजिक शिक्षणाद्वारे इतर ऑर्कांमध्ये पसरत आहे. ऑर्काने युरोपच्या इबेरियन किनार्‍यावर तिसरे जहाज हल्ला करून बुडवले आहे आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की उर्वरित ऑर्का या वर्तनाचा कित्ता गिरवत आहेत.

स्पेनच्या किनार्‍यापासून जवळ असलेल्या जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीमध्ये ४ मे रोजी रात्री तीन ऑर्का नौकेला धडकले आणि रडारला छेद दिला. या नौकांचे कर्णधार वर्नर शॉफेलबर्गर यांनी दोन लहान आणि एक मोठे ऑर्का पाहिले होते. लहान ऑर्कांनी पाठीमागून रडार हलवला तर मोठ्या ऑर्कांनी पाठीशी उभे राहून बाजूने पूर्ण ताकदीने जहाजाला वारंवार धडका दिल्या. शॉफेलबर्गर यांनी लहान ऑर्कास मोठ्याचे अनुकरण करताना पाहिले. दोन लहान ऑर्कांनी मोठ्याचे तंत्र पाहिले आणि थोड्या धावपळीने तेही जहाजात घुसले.

स्पॅनिश तटरक्षकांनी क्रूची सुटका केली आणि जहाज बारबेटकडे नेले, परंतु ते बंदराच्या प्रवेशद्वारावर बुडाले. किलर व्हेल हे लहान गटांमध्ये राहतात आणि त्यांच्या गटांना पॉड म्हणतात. यात साधारण ४० ऑर्का असतात. दोन दिवसांपूर्वी सहा ऑर्कांच्या एका पॉडने सामुद्रधुनीतून जलपर्यटन करणार्‍या दुसर्‍या जहाजावर हल्ला केला. ग्रेग ब्लॅकबर्न नावाचे गृहस्थ जहाजावर होते. त्यांनी एक आई ऑर्काला तिच्या पिल्लाला रडारवर हल्ला कसा करावा हे शिकवताना पाहिले. त्यांच्या मते हे नक्कीच एक प्रकारचे शिक्षण होते.

मरीन मॅमल सायन्स या जर्नलमध्ये जून २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार इबेरियन किनार्‍याजवळील ऑर्काच्या आक्रमक चकमकींचे अहवाल मे २०२० मध्ये सुरू झाले. हल्ले मुख्यतः नौका चालविण्यावर निर्देशित केले जातात आणि स्पष्ट पॅटर्नचे अनुसरण होताना दिसते. ऑर्का जहाजाच्या मागील बाजूमधून रडारवर प्रहार करण्यासाठी येतात. नंतर त्यांनी यशस्वीरित्या जहाज थांबवल्यानंतर त्यातील त्यांचे स्वारस्य संपून जाते. गॅलिसिया किंवा सामुद्रधुनीमध्ये ज्या ठिकाणी ऑर्का आढळतात त्या ठिकाणी २०२० पासून अशा हल्ल्यांचे अहवाल सतत येत आहेत.

बहुतेक चकमकी निरुपद्रवी आहेत. २०२० पासून नोंदवलेल्या ५०० हून अधिक घटनांमध्ये तीन जहाजे बुडाली आहेत. असा अंदाज आहे की किलर व्हेल एका ठिकाणाहून प्रवास करणार्‍या प्रत्येक शंभर जहाजांपैकी फक्त एका जहाजावर हल्ला करतात. जहाजांच्या दिशेने आक्रमकता वाढणे ही अलीकडील घटना आहे. संशोधकांना वाटते की एखाद्या क्लेशकारक घटनेने ऑर्कांच्या वर्तनात बदल घडवून आणला असावा, ज्याचे अनुकरण बाकीचे ऑर्का करीत आहेत.

मादी ऑर्का ज्याला व्हाईट ग्लॅडिस म्हणतात ती अवैध मासेमारीच्या वेळेस आणि जहाजाशी टक्कर झाल्यास किंवा जहाजात अडकल्यावर वेदनांचे गंभीर क्षण अनुभवते. त्या आघातग्रस्त ऑर्कानेच जहाजावर आक्रमक हल्ला केला असावा अशी तज्ज्ञांना शंका आहे. २०२२च्या अभ्यासानुसार ऑर्का हे सामाजिक प्राणी आहेत जे सहजपणे शिकतात आणि इतरांद्वारे केलेले वर्तन पुन्हा उत्पन्न करू शकतात.

बहुतेक नोंदवलेल्या प्रकरणांमध्ये ऑर्काने जहाजाच्या रडारच्या तारा चावल्यात, वाकवल्यात किंवा तोडल्यात. मोठ्यांकडून वर्तन शिकणे हा ऑर्कांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ऑर्कांना हे वर्तन फायदेशीर असते. जोखीम असूनही ते चालत्या जहाजात घुसून धावतात. २०२० मध्ये या घटना सुरू झाल्यापासून इबेरियन पाण्यात राहणारे चार ऑर्का मरण पावले आहेत. अर्थात हे त्या जहाजाच्या आक्रमणामुळे घडले आहे असे नाही. ऑर्का जिज्ञासू आणि खेळकर प्राणी आहेत आणि त्यामुळे हे आक्रमक गोष्टीच्या विरूद्ध असणार्‍या खेळकर वर्तनाचेदेखील अनुकरण करतात.

घटनांची संख्या जसजशी वाढत जाते, तसतसे नाविकांसाठी आणि आयबेरियन ऑर्कांच्या घटत जाणार्‍या संख्येसाठी चिंता वाढली आहे. ही चिंता इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरच्या धोक्यांच्या यादीमध्ये येते. २०२२ च्या अभ्यासानुसार २०११ मध्ये झालेल्या शेवटच्या मोजणीत फक्त ३९ इबेरियन ऑर्का नोंदवले गेले. संशोधकांच्या मते जर ही परिस्थिती कायम राहिली किंवा तीव्र होत गेली, तर ती नाविकांच्या सुरक्षेसाठी आणि किलर व्हेलच्या धोक्यात असलेल्या संख्येच्या संवर्धनासाठी एक खरी चिंता बनू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -