घरफिचर्ससारांशपॅरेटो नियम

पॅरेटो नियम

Subscribe

पॅरेटो ८०:२० हा नियम इटलीतील अर्थशास्त्रज्ञ वेल्फरडो पॅरेटो यांनी प्रथम मांडला, म्हणून तो पॅरेटो नियम या नावाने ओळखला जातो. या नियमाचा वापर करून एखाद्या परिणामाला जबाबदार असणार्‍या महत्त्वाच्या कारणांवर जर आपण लक्ष केंद्रित करून काम केले, तर होणारे परिणामही कमी वेळात आणि कमी श्रमात दूर करता येतात. या नियमांचे अजून एक वैशिष्ठ्य असे की आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीला हा नियम लागू पडतो. म्हणजेच हा नियम सार्वत्रिक आहे. थोडक्यात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक घटनांनाही हा नियम लागू पडतो आणि सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यात उपयोगी पडतो.

प्रत्येक उद्योजकाने किंवा व्यावसायिकाने सूक्ष्म निरीक्षण केले तर त्याच्या उत्पन्नापैकी ८० टक्के उत्पन्न हे त्याच्या २० टक्के ग्राहकांकडून येते. व्यवस्थापकीय क्षेत्रात पॅरेटो नियमाचा उपयोग करून २० टक्के गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करून ८० टक्के परिणाम पदरात पाडून घेता येतात. त्यामुळे महत्त्वाच्या २० टक्के गोष्टी निवडून त्यावर सर्व ताकदीने काम केल्यास उत्तम परिणाम मिळून आपली व्यवस्थापकीय कार्यक्षमता दाखविता येते. त्याचबरोबर याच नियमाचा वापर करून आपले वेळेचे व्यवस्थापनही पूर्ण नियंत्रणाखाली ठेवता येते. या नियमाप्रमाणे २० टक्के श्रम ८० टक्के परिणाम मिळवून देणारे असल्यामुळे त्यांची पारख करून त्यांच्यावर आपली ताकद परिणामकारकपणे लावता येते. आपल्या सर्वच कामांसाठी पॅरेटो नियम लावा; पण त्याचा वापर चलाखीने करा.

आपल्या दैनंदिन आयुष्यात घर असो, काम असो अथवा खेळ असो, महत्त्वाचे कमी आणि महत्त्वाचे जास्त हा पॅरेटोचा नियम सगळीकडेच लागू होतो आणि या नियमाचा उपयोग करून आपण आपल्या पुढील समस्या सोप्या करून सोडवू शकतो. सध्या माहिती आणि ज्ञान याचा पूर वाहत आहे, पण त्याच्याबरोबर आयुष्यातील समस्याही वाढताना दिसत आहेत. या समस्या अनेक कारणांनी उत्पन्न होतात. तशाच त्या सोडवण्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहेत. या समस्यांमागील मुख्य कारणे शोधायची कशी आणि त्यावरील उत्तम उपाययोजना निवडायच्या कशा यासाठीच ८०:२० या प्रभावी नियमाचा उपयोग कोणत्याही वेळी सहज आणि प्रभावीपणे करता येतो.

- Advertisement -

८०:२० हा नियम इटलीतील अर्थशास्त्राज्ञ वेल्फरडो पॅरेटो यांनी प्रथम मांडला, म्हणून तो पॅरेटो नियम या नावाने ओळखला जातो. या नियमाचा वापर करून एखाद्या परिणामाला जबाबदार असणार्‍या महत्त्वाच्या कारणांवर जर आपण लक्ष केंद्रित करून काम केले, तर होणारे परिणामही कमी वेळात आणि कमी श्रमात दूर करता येतात. या नियमांचे अजून एक वैशिष्ठ्य असे की आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीला हा नियम लागू पडतो. म्हणजेच हा नियम सार्वत्रिक आहे. थोडक्यात वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक घटनांनाही हा नियम लागू पडतो आणि सर्व प्रकारच्या समस्या सोडविण्यात उपयोगी पडतो.

८०:२०ची व्यवहारातील काही गमतीदार उदाहरणे
आयुष्यातील येणार्‍या काही अनुभवांच्या नोंदी गमतीदार वाटल्या तरी खर्‍या आहेत.
– आपल्या मिळकतीतील ८० टक्के भाग २० टक्के गोष्टींवरच खर्च होतो.
– घरातील ८० टक्के धूळ २० टक्के वस्तूंवरच जमा होते.
– आपल्या ८० टक्के समस्या संबंधातील २० टक्के लोकांमुळे निर्माण होतात.
-आपले २० टक्के आवडते कपडे आपण ८० टक्के वेळा वापरत असतो.
-आपण आपल्या परिचयातील २० टक्के लोकांबरोबरच आपला ८० टक्के वेळ घालवत असतो.

- Advertisement -

कामाच्या जागी
– ८० टक्के कामाचा भार केवळ २० टक्के लोकांवरच पडतो.
– ८० टक्के पगार २० टक्के वरिष्ठ अधिकारीच पटकावतात.
– ८० टक्के तक्रारी २० टक्के ग्राहकांकडूनच येतात.
– ८० टक्के जागा २० टक्के वस्तूंनी व्यापलेली असते.
– ऑफिसमधील आपला ८० टक्के वेळ हा अतिमहत्त्वाच्या कामावर खर्च होतो आणि फक्त २० टक्के वेळेत आपण चांगले व परिणामकारक काम करतो.

पॅरेटो नियमाचा उपयोग
व्यवस्थापकीय क्षेत्रात पॅरेटो नियमाचा उपयोग करून २० टक्के गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करून ८० टक्के परिणाम पदरात पाडून घेता येतात. त्यामुळे महत्त्वाच्या २० टक्के गोष्टी निवडून त्यावर सर्व ताकदीने काम केल्यास उत्तम परिणाम मिळून आपली व्यवस्थापकीय कार्यक्षमता दाखविता येते. त्याचबरोबर याच नियमाचा वापर करून आपले वेळेचे व्यवस्थापनही पूर्ण नियंत्रणाखाली ठेवता येते. या नियमाप्रमाणे २० टक्के श्रम ८० टक्के परिणाम मिळवून देणारे असल्यामुळे त्यांची पारख करून त्यांच्यावर आपली ताकद परिणामकारकपणे लावता येते, परंतु या नियमाचा वापर करताना नेहमी लक्षात ठेवायचे आहे की आपण फक्त आपले प्रयत्न २० टक्के केले तर ८० टक्के रिझल्ट मिळेल असा या नियमाचा मुळीच अर्थ नाही. प्रयत्न आपल्याला १०० टक्के करायचे आहेत. फक्त २० टक्के महत्त्वाचे जे आहे त्यावर आपले १०० टक्के प्रयत्न, वेळ, संशोधने वापरायची आहेत. वेळेचा वापर करताना आपल्या महत्त्वाच्या कामावर आपला ८० टक्के वेळ देऊन उरलेली कामे ही कर्मचार्‍यांकडून करून घ्यावयाची आहेत. चला तर मग आजपासून या नियमाचा वापर करून आपली उत्पादकता वाढवू या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -