घरफिचर्ससारांशया पिढीचा परफेक्ट गीतकार : इर्शाद कामिल

या पिढीचा परफेक्ट गीतकार : इर्शाद कामिल

Subscribe

इर्शाद नावाची कथा आणि त्याचा एक परिपूर्ण गीतकार म्हणून एकूण प्रवासदेखील तितकाच रंजक आहे. लहानपणी मुलं आपल्याला या नावावरून चिडवतात म्हणून नाव बदलण्याचा हट्ट करणारा इर्शाद ते कविता विषयात पीएचडी करून डॉक्टरेट मिळवणारा इर्शाद, हा एकूण प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी तर आहेच, पण इर्शाद गीत लेखनाच्या बाबतीत इतर समकालीन गीतकारांपेक्षा का खास आहे हेदेखील दर्शवणारा आहे. सिनेमाचं गीत लिहिताना त्यात मीटर किती महत्त्वाचा, त्यात येणारे शब्द कसे असावेत, ज्यावेळी गाण्याच्या माध्यमातून एखादी कथा सांगायची आहे, तेव्हा शब्द किती आणि कसे वापरावे या सर्व गोष्टींचं ज्ञान असल्यानं त्याची गाणी श्रवणीय बनतात.

कला ही काहींच्या अंगी जन्मताच असते तर काही जण ती कला अथक प्रयत्नातून आत्मसात करतात. जो कुणी कलेचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतो, जो कुणी अंगात कला असतानाही तिला धार देण्यासाठी अधिकचे प्रयत्न करतो, त्याच्या कलेतून ती मेहनत झळकत असते. सिनेमात गीतं लिहिण्याचं काम याआधीही अनेकांनी केलंय आणि यानंतरही अनेक लोक करतील, पण आपल्या स्मरणात काही मोजकेच लोक असतात. त्याला कारण म्हणजे त्यांनी लिहिलेले शब्द. या पिढीत लिहिणारा एक उत्तम गीतकार म्हणून इर्शाद कामिल अनेकांना माहितीये, पण इर्शादला इतर गीतकारांपेक्षा वेगळं बनवतात ते त्याचे शब्द आणि गाण्यात त्या शब्दांना मिळालेली जागा.

रॉकस्टारपासून जब हॅरी मेट सेजलपर्यंत अनेक सुपरहिट अल्बम देणार्‍या इर्शादची सर्वात जमेची बाजू म्हणजे त्याला असलेलं भाषेचं ज्ञान, मीटरची जाण आणि कालसुसंगत असणं. इर्शाद कामिल हा त्या मोजक्या गीतकारांपैकी आहे, ज्याला प्रत्येक पिढीच्या भावना कळतात आणि त्या भावनांना अनुरूप शब्द देता येतात. हा असा गीतकार आहे ज्याने लिहिलेल्या शब्दात कधी गर्भित अर्थ दडलेला असतो तर कधी अगदीच कट्ट्यावर बसलेल्या पोरांची भाषा त्याच्या शब्दांत असते. हा तो गीतकार आहे ज्याचा एक अल्बम तरुणाईचं अँथम बनला, ज्याच्या शब्दाची ताकद तो वेळोवेळी दाखवून देतो.

- Advertisement -

चमेलीपासून ते अतरंगी रेपर्यंत आजवर इर्शादने केलेल्या प्रत्येक सिनेमाची एक खासियत आहे. त्याच्या गाण्यात एक कथा असते आणि तीच कथा तो शब्दांच्या रूपात मांडत असतो. इर्शाद नावाची कथा आणि त्याचा एक परिपूर्ण गीतकार म्हणून एकूण प्रवासदेखील तितकाच रंजक आहे. लहानपणी मुलं आपल्याला या नावावरून चिडवतात म्हणून नाव बदलण्याचा हट्ट करणारा इर्शाद ते कविता विषयात पीएचडी करून डॉक्टरेट मिळवणारा इर्शाद, हा एकूण प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी तर आहेच, पण इर्शाद गीत लेखनाच्या बाबतीत इतर समकालीन गीतकारांपेक्षा का खास आहे हेदेखील दर्शवणारा आहे. सिनेमाचं गीत लिहिताना त्यात मीटर किती महत्त्वाचा, त्यात येणारे शब्द कसे असावेत, ज्यावेळी गाण्याच्या माध्यमातून एखादी कथा सांगायची आहे, तेव्हा शब्द किती आणि कसे वापरावे या सर्व गोष्टींचं ज्ञान असल्यानं त्याची गाणी श्रवणीय बनतात.

हिंदीत गाणी लिहिताना भाषा हादेखील अनेकांसाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. हिंदीचं गुणगान गाणार्‍यांचादेखील एक आग्रह असतो, तो म्हणजे गाण्यात शुद्ध भाषेचा वापर असावा. त्यात इंग्रजी किंवा इतर भाषेतील शब्द नसावेत, पण आपल्या पिढीचे गीत लिहिणार्‍या इर्शादने याला फार महत्त्व कधीच दिले नाही. जी सामान्यांची भाषा आहे, तीच याच्या गाण्याची भाषा आहे. म्हणून तर इर्शाद लिहितो, कैसा ये इस्क है, अजब सा रिस्क है, त्याच्या गाण्यात इंग्रजी शब्दांचा वापरदेखील हिंदीसारखाच केलेला असतो. ज्यामुळे ती गाणी तितकी भावतात. गीतकाराला त्याने लिहिलेलं एक गाणं प्रसिद्धी मिळवून देते, मात्र इर्शाद हा असा गीतकार आहे, ज्याच्या एका अल्बमने त्याला प्रसिद्धीच्या अशा शिखरावर नेऊन पोहोचवलं, जिथून खाली उतरणं आता त्यालाही शक्य नाही.

- Advertisement -

इर्शाद कामिल इमोशनल गाणी उत्तम लिहितो, असं नेहमीच म्हटलं जातं. त्याचे शब्द कान देऊन ऐकले तर कधी कधी डोळ्यांत पाणीदेखील येतं. रॉकस्टारचा संपूर्ण अल्बम त्याने लिहिलाय. त्यातली सगळीच गाणी आजही तितक्याच आवडीने ऐकली जातात, पण याच सिनेमातील त्याचं कून फाया कून आणि नादान परिंदेसारखं गाणं त्याच्या शब्दातील ताकद दाखवतात. हा तो गीतकार आहे जो आपल्या शब्दांतून अनेकदा आपल्याला भावूक करतो. जे त्याने अगर तुम साथ हो, तु जाने ना, चाहू मै या ना, आज दिन चढेया, तुम से ही, भागे रे मन यांसारख्या विविध गाण्यांच्या माध्यमातून दाखवून दिलंय.

अगर तुम साथ हो हे गाणं त्याने लिहिलेल्या काही सर्वोत्तम गाण्यांपैकी एक गाणं आहे, ज्याच्या जन्माची कहाणीसुद्धा त्याने एका मुलाखतीत सांगितली होती. हे गाणं एक दोन वेळा नव्हे, तर तब्बल चार वेळा वेगवेगळ्या रूपात लिहिण्यात आलं होतं, पण इम्तियाज आणि इर्शाद दोघांनाही ते तितकं उत्तम वाटतं नव्हतं, म्हणून इर्शादने वेळ घेतला आणि त्याला ओळी सुचल्या, अगर तुम साथ हो तेरी नज़रों में है तेरे सपने, तेरे सपनों में है नाराज़ी, मुझे लगता है के बातें दिल की, होती लफ़्ज़ों की धोखेबाज़ी, तुम साथ हो, या ना हो, क्या फर्क है, बेदर्द थी ज़िन्दगी बेदर्द है, गर तुम साथ हो, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचं सार केवळ या चार ओळीत हा गीतकार लिहितो, पण हे तर होतं फायनल प्रोडक्ट, जे याआधी लिहिलं होतं, तेही खराब वगैरे मुळीच नव्हतं.

म्हणजे याआधी या गाण्याच्या ओळी होत्या अब तेरे प्यार की कुछ जरूरत नहीं मुझे, ये भी नहीं की तुझसे मोहब्बत नहीं मुझे, म्हणजे या एका गाण्यासाठी या गीतकाराने किती मेहनत घेतलीय ते यावरून लक्षात येतं. याशिवाय अजून एक गाणं ज्याच्या जन्माचीदेखील अशीच रंजक कथा आहे, ते म्हणजे जब वी मेट सिनेमातील नगाडा बजा. आता हे गाणं ना दिग्दर्शकाला आवडलं होतं, ना संगीत दिग्दर्शकाला, पण इर्शादला या गाण्यावर विशेष प्रेम होतं. या गाण्याचे शब्द नीट ऐकले तर यातली कथा लक्षात येईल. या गाण्याच्या कथेवर आधी इर्शादने काम केलं. कथा लिहिली आणि त्याच कथेचं रूपांतर पुढे गाण्यात झालं. हे असं गाणं होतं जे केवळ गीतकाराला आवडलं. केवळ गीतकाराला विश्वास होता म्हणून सिनेमात आलं आणि तुफान गाजलं.

इर्शाद कामिलची भाषा ही केवळ प्रेमाची भाषा नव्हती. त्याने वेळोवेळी आपल्या शब्दांतून व्यवस्थेविरुद्ध आवाजदेखील बुलंद केलाय. यात विशेष म्हणजे त्याची बंडाची भाषा ही पुस्तकी नव्हती. त्याची भाषा ही विशीतल्या पोरांची भाषा होती. तोच लिहितो, ओ इको फ्रेंडली नेचर के रक्षक मैं भी ही नेचर, रिवाजो से समाँझो से क्यों, तू काटे मुझे क्यों बांटे मुझसे इस तरह, क्यों सच का सबक सिखाए जब सच सुन भी ना पाया, सच कोई बोले तो तू नियम कानून बताये, तेरा डर, तेरा प्यार, तेरी वाह, तू ही रख रख साले, ही त्याची भाषा आजच्या तरुणाईची भाषा आहे. याच इर्शादने कधी रांझना लिहिलंय, तर कधी लव्ह आज कल. कधी तो माही वे लिहितो, तर कधी आशिकीमधलं मिलने है मुझसे आयी, कधी तो जब तक जहाँ मे सुबह शाम है लिहितो, तर कधी कबीर सिंगमधील बेखयाली. त्याची रेंज, त्याची भाषा, त्याला कळालेली प्रेक्षकांची नस या सगळ्याच गोष्टींमुळे इर्शाद कामिल हा एक परिपूर्ण गीतकार बनतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -