घरफिचर्ससारांशरंगकर्मीची चैतन्यमय अभ्यास प्रक्रिया

रंगकर्मीची चैतन्यमय अभ्यास प्रक्रिया

Subscribe

मी एक कलाकार म्हणून मी निसर्गाला कोणत्या दृष्टीने पाहते हे महत्वाचं. आम्ही चैतन्य अभ्यासात सूर्य उगवताना पाहतो आणि स्वतःच्या आत नव्या विचारांचा उदय करत असतो. आत्मशोधाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. निसर्गामध्ये राहून माणूस कसा समृद्ध होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चैतन्य अभ्यास. जसा दगड ज्यावर आम्ही बसतो तो आम्हाला ठोस होण्याची जाणीव करून देतो. गवतांचा स्पर्श, दवबिंदूंचा स्पर्श आमच्यातली संवेदना जागृत करतो. मावळता सूर्य आम्हाला संदेश देतो की पुन्हा त्याच उर्जेने त्याच सकारात्मकतेने पुन्हा उगवणार आहे.

चैतन्य अभ्यास हा शब्द मी पहिल्यांदा ऐकला ते थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या नाट्य कार्यशाळेत. हळूहळू या शब्दांनी माझा जीवन प्रवास चैतन्यमय होण्याचा अनुभव मी घेऊ लागले. थिएटर ऑफ रेलेवन्स ह्या तत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याचा चैतन्य अभ्यास !

चैतन्य अभ्यास म्हणजे काय? तर चैतन्य अभ्यास हा स्वतःतल्या ‘स्व’ला शोधण्याचा, आत्मशुद्धीकरणाचा अभ्यास आहे. आपला निसर्ग ज्याला आपण प्रकृती म्हणतो आणि तसेच आपल्या आतील प्रकृती या दोघांचा समन्वय साधण्यासाठी चैतन्य अभ्यास प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आपले शरीर, मन, भावना आणि अध्यात्म ह्या चारी दृष्टिकोनातून स्वतःला जागृत करत असते. आपण निसर्गाचा अविभाज्य भाग आहोत आणि म्हणूनच जसा निसर्ग शुद्ध आणि सगळ्यांना सामावून घेणारा आहे तसेच आपण मनुष्य का नाही? हा विचार करण्यास प्रेरित करते. जसे निसर्गात टेकडी चढताना आलेला अनुभवाला आयुष्याशी जोडला. आयुष्याची वाट चढत असताना-चालताना एक दमछाक होते, परंतु थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य प्रक्रियेतील चैतन्य अभ्यास आपल्या प्रवासाचे ध्येय स्पष्ट करतो आणि म्हणून नवी दिशा, नवी ऊर्जा घेऊन आपण आयुष्याच्या शिखरावर पोहोचतो. ध्येय माझं, वाट निसर्गाची, दृष्टी थिएटर ऑफ रेलेवन्सची. प्रत्येक ऋतूमध्ये जशी पर्यावरणाची, निसर्गाची पाऊलवाट बदलत राहते, तसेच माझ्या आयुष्यात येणारी आव्हानं ही बदलत राहणार. त्यासाठी चैतन्य अभ्यास प्रक्रिया मला तयार करते.

- Advertisement -

पाऊलवाटांमध्ये येणारे दगड म्हणजे माझ्या आयुष्यात येणारी आव्हाने, त्या आव्हानांना मी कशी सामोरे जाते, माझी चालण्याची पद्धत, श्वास, शरीराचा आकार कसा बदलत राहतो यावर मी लक्ष देते. तसेच आव्हानांना सामोरे जाण्याच्या निरनिराळ्या पद्धतींचा मी शोध घेते. विविधता हा शब्द ऐकणं आणि अर्थ समजणं या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. विविधता याचा अर्थ उलगडतो जेव्हा आम्ही निसर्गाशी हितगुज करतो, संवाद साधतो. प्रत्येक झाड, वेल, गवत, माती, फूल किती वेगवेगळे आहेत. विविध आहेत आणि विविध असूनही सहअस्तित्व आहे. आपण निसर्गाच्या कोणत्याच तत्वाला कमी लेखत नाही किंवा कधी नावं ही ठेवत नाही. मग आपण स्वतः निसर्गाचे अविभाज्य तत्व असूनसुद्धा, या निर्मळ दृष्टीने एकमेकांना का पाहत नाही. एक माणूस म्हणून का स्वीकारत नाही ! ही दृष्टी मिळते या चैतन्य अभ्यासातून. निसर्ग प्रत्येकासाठी समान असतो, तो कधीच फरक करत नाही आणि आपण मानव या निसर्गाचे अविभाज्य घटक आहोत.

आपला एक स्वभाव देखील आहे. आपल्याला या बाह्य निसर्गाला आपल्या आंतरिक स्वरूपाशी जोडावे लागेल तरच समता आणि समानता जोपासली जाईल. कुंभार आपल्या घड्याला भट्टीत तापवतो आणि त्यावर थाप देतो, कारण तो घडा मजबूत करत असतो. तसेच ही चैतन्य अभ्यास प्रक्रिया माणसाला मजबूत करण्यासाठी वैचारिकतेच्या भट्टीत तापवते आणि मग वैचारिक साधनेची सुरुवात होते. ज्यातून एक नवीन व्यक्तित्व सृजित होतं. निसर्ग म्हणजे उन्मुक्तता, मोकळेपणा, ज्याला काहीही सीमा नाही. आपण आपले आयुष्य चौकटीबद्ध जगत असतो, पण या चैतन्य अभ्यासाच्या माध्यमातून या चौकटींना मोडत नवीन सृजन होत असते, जेणेकरून कलाकार आपल्या स्वतःच्या चौकटींना भेदतो आणि समाजाला उन्मुक्त करतो. आपण शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी शारीरिक अभ्यास व्यायाम करतो, शरीरासाठी योग्य तो आहार घेतो, पण बौद्धिक व्यायाम किती करतो ? विचारांना दिशा देऊन विचारांचे सृजन करून आपण बौद्धिक व्यायाम करू शकतो आणि विचार म्हणजे सकारात्मक, नीतीगत आणि समाजाला दिशा देणारे माणुसकीचे विचार, आम्ही रंगकर्मी चैतन्य अभ्यासातून असे विचार साधत असतो.

- Advertisement -

मी एक कलाकार म्हणून मी निसर्गाला कोणत्या दृष्टीने पाहते हे महत्वाचं. आम्ही चैतन्य अभ्यासात सूर्य उगवताना पाहतो आणि स्वतःच्या आत नव्या विचारांचा उदय करत असतो. आत्मशोधाच्या प्रक्रियेला सुरुवात होते. निसर्गामध्ये राहून माणूस कसा समृद्ध होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे चैतन्य अभ्यास. जसा दगड ज्यावर आम्ही बसतो तो आम्हाला ठोस होण्याची जाणीव करून देतो. गवतांचा स्पर्श, दवबिंदूंचा स्पर्श आमच्यातली संवेदना जागृत करतो. मावळता सूर्य आम्हाला संदेश देतो की पुन्हा त्याच उर्जेने त्याच सकारात्मकतेने पुन्हा उगवणार आहे. मातीवर झोपल्यावर स्वतःच्या धरातलाशी जोडले जातो, नदीच्या पाण्यातून परावर्तित झालेल्या बाष्पामधून परिवर्तन, बदल हा एका क्षणात होतो याची जाणीव होते. नदीच्या पात्रात चालत असताना आम्हाला जाणीव होते की आपण स्वतःच्या आत कसे उतरायचे .

नदीचा प्रवाह, तिची ओळख, तिची दिशा याने समजतं की आपल्याला आपल्या आयुष्यात किती प्रवाही राहायचे आहे, दिशा ठरवायची आहे आणि जिथून जिथून मी प्रवास करेन तिथे माझ्या कलेने मी नंदनवन फुलवेन. चैतन्य अभ्यास म्हणजे स्वतःला समजण्याची प्रक्रिया स्व मंथनाची एक जागा या चैतन्य अभ्यासात स्व अभ्यासाची नवनवीन प्रक्रिया उलगडत जाते जी एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून स्वतःला स्वतःकडे घेऊन जाते. खरी कलासाधना करायची आहे तर निसर्गाशी एक अतूट नातं कलाकाराला जोडावे लागणारच आणि आम्ही रंगकर्मी सातत्याने हे अतूट नातं टिकवत आहोत. निसर्ग म्हणजे न्याय संगत आणि एक व्यक्ती व कलाकार म्हणून जगण्यासाठी या न्यायसंगत तत्वाची जाणीव असणे खूप आवश्यक आहे आणि हेच न्यायसंगत तत्व आम्ही या चैतन्य अभ्यासात अनुभवतो अंगीकारतो. या चैतन्य अभ्यासाची जी दृष्टी आहे ती मला एक कलाकार म्हणून एक माणूस म्हणून समृद्ध करत असते.

चैतन्य अभ्यास ही एक पोलिटिकल प्रोसेस आहे. इथे सर्वात पहिले सगळे निर्णय हे सर्व सहभागी मिळून घेतात की चैतन्य अभ्यासात करायचे काय? काय अपेक्षा आहेत? त्यानंतर शारीरिक, बौद्धिक, भावनिक आणि आध्यात्मिक आयमांनुसार रूपरेषा आखली जाते आणि अभ्यास केला जातो. चैतन्य अभ्यासात दरवेळी वेगळे प्रयोग होतात.. जसे पळता पळता आलाप करणे, आपल्या आवाजाला मुक्त करणे, आवाजाचे अभ्यास करणे. बघायला नॉर्मल वाटणारा हा अभ्यास दरवेळी शारीरिक आणि मानसिक न्यूनगंडातून बाहेर काढणार्‍या प्रक्रियेची सुरवात करतो.. निसर्गाशी हितगुज, पानं, फुलं, झाडं, दगड, माती यामध्ये स्वतःला शोधतो आणि हे माध्यम बनतात आपल्या आत्मसंवादासाठी. समूह असू दे, समाज असू दे, देश असू दे प्रत्येकाचे मूळ आहे व्यक्ती .. या व्यक्तीची व्यक्तिगत आणि व्यक्तित्वाची प्रक्रिया या चैतन्य अभ्यासात होते आणि ती सातत्याने होणे ही कलाकारांची नितांत गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -