Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश चार दुर्गुणांचा आरसा : रे

चार दुर्गुणांचा आरसा : रे

सत्यजित रे यांच्या 4 लघुकथा स्मृतीभ्रम, बहुरूपी, बरिन भौमिक एल्मेंट आणि स्पॉटलाईट यांवर आधारित 4 वेगवेगळ्या फिल्मची अँथोलोजी प्रकारातील ही वेबसिरीज आहे. याला अँथोलोजी म्हणत असू तर चारही कथांमध्ये एक अशी गोष्ट असायला हवी जी सर्वात कॉमन आहे, यात ती गोष्ट आहे. प्रत्येक मुख्य पात्राचं आरशासोबत असलेलं नातं. चारही कथांमध्ये किमान एक असा सीन आहे ज्यात पात्रं स्वतःला आरशात पाहून काही तरी ठरवते. अजून एक घटक जो या चार कथांना आपसात जोडतो, तो म्हणजे मनुष्याच्या स्वभावातील 4 असे दुर्गुण जे अधोगतीचं कारण बनतात तेच या चार कथांचं मूळ आहे.

Related Story

- Advertisement -

सत्यजित रे या नावाशिवाय भारतीय सिनेमांचा प्रवास पूर्ण होऊच शकत नाही, ज्यांनी रे यांचे सिनेमे पाहिले नाहीत त्या पिढीसाठी रे म्हणजे कोण? हे कळायला जुन्या सिनेमांशिवाय आणि पुस्तकांशिवाय पर्याय नव्हता. त्यातही अशी पिढी जी पुस्तकांपासून दूर गेलीये आणि जुने सिनेमे जिला कंटाळवाणे वाटतात, अशा पिढीसाठी सत्यजित रे हे नाव माहिती होणं आवश्यक होतं. नेटफ्लिक्ससारखं माध्यम जे नेहमीच वेगळा कंटेन्ट देण्याचा प्रयत्न करत आलंय. त्याने जेव्हा रेंची अनांउन्समेंट केली तेव्हा नक्कीच अपेक्षा वाढल्या होत्या. एका अजरामर लेखकाच्या लेखणीतून अवतरलेल्या कहाण्यांना पडद्यावर बघण्याचं भाग्य लाभणार होतं. लेखकही असा ज्याला सिनेमा म्हणजे काय? तो कसा असावा आणि कसा नसावा हे ठाऊक होतं. सत्यजित रे यांच्या 4 लघुकथांवर आधारित ही सिरीज प्रदर्शित झाली. त्याला चांगला प्रतिसादसुद्धा मिळाला. पण सत्यजित रे म्हणजे कोण? या प्रश्नाचं उत्तर आजच्या पिढीला मिळालं का? 50 वर्षांपूर्वी पुढच्या पिढीच लिखाण करणार्‍या या लेखकाला या कथांमधून ओळखता येईल काय? याच बद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न, आज सिरीज रिलीज होऊन महिना उलटून गेलाय, त्यावर अनेकांनी समीक्षण लिहिलंय चर्चाही झाल्यात, पण जी अपेक्षा नवीन पिढीला होती. त्या अपेक्षांचं काय झालं? याचही उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहे.

सत्यजित रे यांच्या 4 लघुकथा स्मृतीभ्रम, बहुरूपी, बरिन भौमिक एल्मेंट आणि स्पॉटलाईट यांवर आधारित 4 वेगवेगळ्या फिल्मची अँथोलोजी प्रकारातील ही वेबसिरीज आहे. याला अँथोलोजी म्हणत असू तर चारही कथांमध्ये एक अशी गोष्ट असायला हवी जी सर्वात कॉमन आहे, यात ती गोष्ट आहे. प्रत्येक मुख्य पात्राचं आरशासोबत असलेलं नातं. चारही कथांमध्ये किमान एक असा सीन आहे ज्यात पात्रं स्वतःला आरशात पाहून काही तरी ठरवते. अजून एक घटक जो या चार कथांना आपसात जोडतो, तो म्हणजे मनुष्याच्या स्वभावातील 4 असे दुर्गुण जे अधोगतीचं कारण बनतात तेच या चार कथांचं मूळ आहे. मत्सर, सूड, अहंकार आणि विश्वासघात यावर 4 कथा आधारलेल्या आहेत, आता हे 4 दुर्गुण पाहिले की असं वाटेल की सीरिजमध्ये काहीतरी ज्ञान बाजी होईल, पण असं काहीच घडत नाही आणि हीच आहे सत्यजित रे यांच्या लेखणीची खरी ताकद.

- Advertisement -

या कथांना ज्या प्रकारे लिहिलं गेलंय, ज्या प्रकारे पात्रांची निर्मिती करून संपूर्ण विश्व तयार केलं गेलं आहे, ते पाहून क्षणभर देखील कुणाला वाटणार नाही की या कथा 50 वर्षांपूर्वी लिहिल्या गेल्या असतील. जे चार विषय आता सांगितले ते कथेनुरुप समजून घेऊयात, पहिली कथा म्हणजे अँथोलोजी मधला पहिला एपिसोड ज्याच नाव आहे फॉर्गेट मी नॉट (स्मृती भ्रम) ही कथा आहे सूड किंवा बदला घेण्याच्या भावनेबद्दल. एक व्यक्ती ज्याला संगणकाची बुद्धी लाभली आहे, इस्पित अय्यर (अली फझल) जो आकडे लक्षात ठेवण्यात तरबेज आहे, जो कुठलीच घटना विसरत नाही, अचानक एक दिवस त्याला कळतं की त्याला जीवनातला एक दिवस आठवत नाहीये, आपल्या बुद्धीच्या जोरावर त्याने उभा केलेलं साम्राज्य जेव्हा त्याच्या विसरण्याच्या सवयीने हातातून निसटत, तेव्हा त्याला काय वाटत असेल ? त्याच आणि सोबतच एका सुडाची ही कहाणी आहे, जी पूर्णवेळ तुम्हाला खिळवून ठेवते.

रे सिरिजचा दुसरा भाग आहे बहुरूपिया (बहुरूपी) ज्यात मुख्य भूमिकेत आहे के के मेनन. ही कथा घडते कोलकातामध्ये ज्यात अहंकार या दुर्गुणाला अधोरेखित केलं आहे. आयुष्यात कोणीच मान देत नसलेल्या एका मेकअप आर्टिस्टकडे आजीच्या कृपेने अचानक 75 लाख रुपये आणि मेकअपवर आधारित बहुरूपिया नावाचं पुस्तक येतं आणि त्याचा स्वभाव बदलतो. त्या व्यक्तीमध्ये अहंकार जागतो आणि सरळ स्वतः ला देवापेक्षा श्रेष्ठ मानून तो काम करायला लागतो, पुढे काय होतं हे कथा पाहिल्यावर लक्षात येईल. सिरिजचे पहिले दोन्ही भाग दिग्दर्शित केले आहेत श्रिजीत मुखर्जी या उमद्या दिग्दर्शकाने, सस्पेन्स थ्रिल भरपूर असलेल्या दोन भागानंतर येतो तिसरा भाग, जो थोडा हलका फुलका पचायला सोपा आहे.

- Advertisement -

अभिषेक चौबे दिग्दर्शित हंगामा है क्यो बरपा (बरिन भौमिक एल्मेंट) या कथेचं मूळ आहे विश्वासघात, ही कथा घडते एका ट्रेनच्या डब्यात जिथे दोन प्रवासी प्रवास करताय, पहिला प्रवासी आहे प्रसिद्ध गझलकार मुसाफिर अली (मनोज वाजपेयी) आणि दुसरा प्रवासी आहे बेग उर्फ झेंगा पहलवान (गजराज राव) तर कथा आहे या दोन प्रवाशांची जे तब्बल 10 वर्षांनी पुन्हा त्याच ट्रेनच्या डब्यात भेटलेत, कथा आहे एका घड्याळाची जी वेळ दाखवत नाही तर बदलतेसुद्धा, ही कथा आहे एका विश्वासघाताची ज्याचा साक्षीदार ट्रेन आहे. चारही कथांच्या मालिकेतील ही एकमेव कथा आहे जिला अतिशय परिपूर्ण असा शेवट लाभलाय. चौथी आणि शेवटची कथा आहे स्पॉटलाईट नावाची जी आधारलेली आहे मत्सर, ईर्ष्या या दुर्गुणांवर. विक्रम अरोरा (हर्षवर्धन कपूर) हा एक्स फॅक्टर असलेला प्रचंड फॅन फोलोविंग असलेला अभिनेता आहे, ज्याची एक स्माईल, ज्याचा एक लुक फिल्म हिट करण्यासाठी पुरेसा असतो. पण हीच त्याची समस्या आहे की त्याला स्वतःला सिद्ध करता येत नाही, एक दिवस शूटिंगसाठी दुसर्‍या शहरात जातो तेव्हा हॉटेलमध्ये त्याचा सामना होतो दीदी (राधिका मदन) सोबत. जी एक धार्मिक गुरु आहे. कायम स्पॉटलाईटमध्ये राहणार्‍या या हिरोवरचा फोकस जेव्हा दिदींवर जातो, तेव्हा त्याच्या मनात दिदींविषयी मत्सर तयार होतो, बाकी पुढे काय होते हे कथा पाहिली की लक्षात येईल.

सत्यजित रे यांच्या कथांची खासियत असते ड्रामा, युनिक स्पॉट आणि अतिशय सूक्ष्म निरीक्षण चारही कथांच्या बाबतीत हे दिसून येतं. जे सांगायचं आहे, जे दाखवायचं आहे त्यात कुठेच कमतरता वाटतं नाही. याच श्रेय दिग्दर्शकांनादेखील द्यायला हवं. विशेषतः श्रीजित मुखर्जी ज्याने पहिल्या दोन कथांचं दिग्दर्शन केलंय, सायकोलोजिकल थ्रिलर बनवताना जेव्हा पहिल्या कथेत दृश्यमचा संबंध दिला जातो, तेव्हा ती कथा अधिक आपलीशी वाटते. बहूरूपियामध्ये तर जे कलकत्त्याच्या सुंदरतेचे आणि संस्कृतीचे दर्शन श्रिजीतेने घडवले आहे ते काबिल ए तारिफच म्हणावे लागेल, अभिषेक चौबेच देखील कौतुक की त्याने केवळ एका ट्रेनच्या डब्यात राहूनसुद्धा वेगळा सफर प्रेक्षकांना घडवला,स्पेशली घड्याळं सोबतच दृश्य अतिशय उत्तम दाखवल आहे. वासन बालाने देखील चांगलं काम केलं आहे. बाकी राहिला प्रश्न कास्टिंगचा तर त्यातही 10/10 द्यावे लागतील, अली फझलपासून ते हर्षवर्धन कपूरपर्यंत प्रत्येकाने आपलं पात्र जगलं आणि पडद्यावर आणलंय. पण सर्वाधिक उत्तम अभिनय जर कुणाचा वाटला असेल तर तो म्हणजे के. क.े मेनन, केवळ या व्यक्तीसाठी तुम्ही ती कथा वारंवार पाहू शकतात असा अभिनय त्याने केलाय. बाकी यात कमतरता नाहीत असं नाही, उलट काही ठिकाणी जो गोंधळ घातलाय( उदा. वेरुळला अजिंठा म्हणण्याचा ) तो लगेच लक्षात येतो, पण तरीही एक वेगळा अनुभव आणि सत्यजित रे या नावासाठी ही सिरीज एकदा बघण्यासाठी मुळीच हरकत नाही.

- Advertisement -