बिया नसलेले टरबूज !

निसर्गाचा लहरीपणा तर कधी अस्मानी आणि सुलतानी संकटे नेहमीच शेतकर्‍यांच्या वाट्याला येतात. पण या संकटांवर मात करुन वेगवेगळे आणि नावीन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतात करुन शेतकरी पुन्हा उभा राहत असतो. असाच एक अनोखा प्रयोग नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावातील प्रयोगशील शेतकरी महेंद्र निकम यांनी केला आहे. या प्रयोगामुळे सगळीकडे यांची जोरदार चर्चा होत आहे. शेती व्यवसायात अलीकडे आमूलाग्र बदल केले जात आहेत. यामध्ये प्रमुख बदल पीक पद्धतीचा आहे. त्याचाच भाग म्हणून मालेगावमध्यो बिया नसलेल्या टरबूज पिकाची अन पिवळ्या खरबूज पिकाची लागवड केली आहे.

भारत हा जुगाडू लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. एखाद्या गोष्टीची टंचाई जाणवू लागली की लोक अनोख्या प्रकारे त्यावर मग पर्याय शोधून काढतात. त्यामुळेच भारतातील लोकांना अनेकदा गंमतीनं जुगाडू असं म्हटलं जातं. हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवुड प्रमाणेच मालेगावची मॉलिवूड म्हणून ओळख देशभरात आहे. याचीच प्रचिती देणारा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील शेतकरी महेंद्र निकम यांची यशोगाथा. रंगबिरंगी फ्लॉवरचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर दाभाडीचे शेतकरी महेंद्र निकम यांना यावर्षी बियाविरहित टरबूज आणि पिवळा खरबूज लागवड केली आहे. साधारण एक एकरमध्ये घेतलेल्या या पिकातून त्यांना तीन लाख रुपयांपर्यंत उत्पन्न अपेक्षित असून, फक्त ६० दिवसांत माल विक्रीसाठी तयार झाला आहे. हा प्लॉट पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकर्‍यांबरोबरच विदेशी अभ्यास गटही भेटी देत आहेत.

निकम यांची १० एकर शेतजमीन आहे. प्रारंभीपासूनच त्यांनी प्रयोगशीलता जपली. प्रथम लाल व पिवळ्या रंगाच्या शिमला मिरचीचे उत्पादन घेतले. त्यातून तब्बल ३० लाख रुपयांचे उत्पन्न पदरात पडल्यानंतर गतवर्षी कोरोना लॉकडाऊन काळात बहुगुणी रंगीत फ्लॉवरचे पीक घेतले. ३० गुंठे क्षेत्रातूनच पाच लाखांवर उत्पन्न मिळाल्याने त्यांनी यंदा बियाविरहित टरबूज आणि पिवळ्या खरबुजाची लागवड केली. एक एकर क्षेत्रात सहा हजार टरबुजांची, तर पंधराशे खरबुजांची वेल बहरली आहे. साधारण ५० हजार रुपयांच्या खर्चात अवघ्या ६० दिवसांत माल काढणीला आला आहे. उन्हाचा प्रकोप सुरू असताना थंडावा देणार्‍या टरबुजांना चांगलीच मागणी वाढली आहे. सुमारे २५ ते ३० टन माल निघून त्यास कमीत कमी १० किलोप्रमाणे दर मिळाला तरी तीन लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा ते बाळगून आहेत.

शेतकरी म्हणजे नेहमीच संकटांचा सामना करणारा घटक. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी अस्मानी आणि सुलतानी संकटे नेहमीच शेतकर्‍यांच्या वाट्याला येतात. पण या संकटांवर मात करुन वेगवेगळे आणि नावीन्यपूर्ण प्रयोग आपल्या शेतात करुन शेतकरी पुन्हा उभा राहत असतो. असाच एक अनोखा प्रयोग नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावातील प्रयोगशील शेतकरी महेंद्र निकम यांनी केला आहे. या प्रयोगामुळे सगळीकडे यांची जोरदार चर्चा होत आहे. शेती व्यवसायात अलीकडे आमूलाग्र बदल केले जात आहेत. यामध्ये प्रमुख बदल पीक पद्धतीचा आहे. त्याचाच भाग म्हणून मालेगावमध्यो बिया नसलेल्या टरबूज पिकाची अन पिवळ्या खरबूज पिकाची लागवड केली आहे.

या अवलिया शेतकर्‍याने शेतीमध्ये केलेला हा बदल पंचक्रोशीत मोठा चर्चेचा विषय आहे एवढेच नाही तर त्याचा हा नावीन्यपूर्ण प्रयोग बघण्यासाठी विदेशी संशोधकांनीदेखील बांधावर हजेरी लावली आहे. ही निश्चितच मालेगावकरांसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. एवढेच नाही तर यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला असल्याच्या भावना आता पंचक्रोशीत व्यक्त होऊ लागल्या आहेत. खरं पाहता कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थात कसमादे हा भाग डाळिंब शेतीसाठी विशेष ओळखला जातो. मालेगाव तालुक्यातील दाभाडी, सातमाने, कोठरे इत्यादी गावांमध्ये डाळिंबाची शेती मोठ्या प्रमाणात होत असून या गावातील डाळिंब उत्पादक शेतकर्‍यांनी पंचक्रोशीत आपले एक नवीन नाव कोरले आहे. असे असले तरी पंचक्रोशीतील शेतकरी डाळिंब शेतीबरोबरच शेती व्यवसायात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत आले आहेत.

यामुळे येथील शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्तादेखील प्राप्त होत आहे. दाभाडी येथील महेंद्र निकम यांनीदेखील आधुनिकतेची कास धरत आणि शेतीव्यवसायात जरा हटके विचार करीत बिया नसलेल्या कलिंगड वाणाची अर्थात सीडलेस हॅम्पि होम या कलिंगड वाणाची लागवड केली आहे. या शेतकर्‍याने लागवड केलेल्या या कलिंगडच्या वाणापासून त्यांना चांगले उत्पादन मिळण्याची आशा आहे. याशिवाय त्यांनी पिवळ्या रंगाच्या खरबुजाचीदेखील यशस्वी लागवड केली आहे. निकम यांनी सांगितले की, कलिंगड व खरबूज पिकाला चांगला बाजार मिळाला तर निश्चितच यातून त्यांना लाखों रुपयांच्या उत्पन्नाची आशा आहे.

विशेष म्हणजे महेंद्र यांनी शेतीमध्ये आत्मसात केलेला हा बदल बघण्यासाठी कृषी संशोधकांनी त्यांच्या बांधावर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महेंद्र यांच्याकडून लागवडीपासून ते काढणीपर्यंत कशा पद्धतीने नियोजन आखले याविषयी सविस्तर जाणून घेतले. यामुळे निश्चितच डाळिंब नगरी म्हणून विख्यात असलेल्या कसमादे पट्ट्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त होणार आहे. महेंद्र निकम यांनी सांगितले की, वाढत्या तापमानामुळे कलिंगड पिकाला आता चांगला बाजार मिळणार असून सीडलेस कलिंगड लोकांसाठी विशेष आकर्षण सिद्ध होऊ शकते तसेच पिवळ्या रंगाचे खरबूज देखील पंचक्रोशीत विशेष पसंत केले जाईल.

शेती व्यवसायात नवनवीन प्रयोग राबवून उत्पादनवाढीचे प्रयत्न केले जात आहेत. याला आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड मिळत आहे. शिवाय शेतकर्‍यांचे वेगवेगळे प्रयोगही तेवढेच कामी येत आहेत. मध्यंतरी बारामतीच्या शेतकर्‍याने केलेल्या पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची मोठी चर्चा राज्यात झाली होती. एवढेच नाही तर या शेतकर्‍याने मुंबई वारी करुन हे कलिंगड जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिले होते. आता नाशिकमध्येही अशीच चर्चा रंगली आहे ती बिया नसलेल्या टरबूजाची आणि पिवळ्या खरबूजाची.

परदेशी कृषी संशोधकांकडून पाहणी

हंगामी फळातील हे वेगळेपण पाहण्यासाठी कृषी संशोधक दाखल झाले होते. त्यांनी कलिंगड आणि खरबुजाबद्दल सर्व माहिती घेतली. शिवाय लागवडीपासून काढणीपर्यंत कसे नियोजन केले जाते. त्याची माहिती या संशोधकांनी घेतली. शिवाय उत्पादनवाढीसाठी कोणते विशेष प्रयत्न केले जातात हेदेखील शेतकर्‍यांनी जाणून घेतले. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील एक नवा ब्रँण्ड समोर येत आहे. केवळ या हंगामी पिकांचे वेगळेपण जाणून घेण्यासाठीच कृषी संशोधक हे शेतामध्ये दाखल झाले होते.

उत्पादन वाढीची शेतकर्‍याला अपेक्षा

गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हंगामी पिकांची उत्पादकता तर कमी झालीच, पण दरावरही मोठा परिणाम झाला होता. पण यंदा शेतकर्‍यांचे वेगवेगळे प्रयोग आणि वाढत्या तापमानामुळे कलिंगडला मिळत असलेला दर शेतकर्‍यांना सुखवणारा आहे. शिवाय सीडलेस कलिंगडचे विशेष आकर्षण आता ग्राहकांना राहणार आहे. तर दुसरीकडे पिवळ्या खरबूजालाही अपेक्षेपेक्षा चांगली मागणी आणि उत्पादनही असल्याचे शेतकरी निकम यांनी सांगितले आहे.

–राकेश बोरा