घरफिचर्ससारांश‘ती’ ची कहाणी मांडणारे सिनेमे

‘ती’ ची कहाणी मांडणारे सिनेमे

Subscribe

स्त्रीने फक्त सिगारेट ओढली, दारू प्यायली म्हणजे ती मॉडर्न झालीय का? असे अनेक प्रश्न भोवताली असताना गेल्या काही दिवसात 2 सिनेमे पाहण्यात आले. दोन्ही सिनेमांच्या कथा एकमेकांपासून अतिशय वेगळ्या होत्या, पण त्या कथेत एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे स्त्री.. रेणुका शहाणे दिग्दर्शित त्रिभंग आणि रोहन गेरा दिग्दर्शित सर या दोनही सिनेमात समाजातील दोन प्रवाहाच्या स्त्रियांची कथा दाखवली आहे. ज्यांची स्वप्न वेगळी, ज्यांचं बॅकग्राऊंड वेगळं, ज्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा, पण मूळ मात्र एक स्त्री मन आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने याच ‘ती’च्या सिनेमाबद्दल आणि कथेबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न.

आपल्या देशात नायिका प्रधान सिनेमे कधी फार चर्चिले गेले नाहीत, ज्यांची चर्चा झाली त्या चर्चेचा अर्थही थोडा वेगळाच होता. प्रत्येकवेळी नायिका प्रधान सिनेमात स्त्रीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिकार करताना किंवा त्या विरुद्ध लढताना नायिका दाखवली गेली, पण हे सगळं होत असताना मूळ स्त्रीच्या भावना आणि तिच्यात दडलेली तिची कहाणी समोर येण्यास जागा उरली नाही. एरव्ही देखील आपल्या समाजात स्त्रीची कथा जाणून घेण्यास लोकांना फार रस नसतो, रस असतो तो तिच्यावर झालेले अन्याय आणि त्या अन्यायाच्या प्रतिकाराची कथा समजून घेण्यात. म्हणून निव्वळ स्त्रीची कथा, तिचा प्रवास सांगणारे सिनेमे आपल्याकडं फार कमी पाहायला मिळतात.

ती प्रेम करताना काय विचार करत असेल ? आपल्या छंदापायी परिवाराला दुर्लक्षित करणं तिला जमतं का ? आपल्या सर्व स्वप्नांचा समोर चुराडा होत चाललेला दिसताना ती गप्प कशी राहते? चार भिंतीच्या बाहेर आल्यानंतरही त्या भिंतीमधील जबाबदार्‍या तिची पाठ सोडतात का? स्त्रीने फक्त सिगारेट ओढली, दारू प्यायली म्हणजे ती मॉडर्न झालीय का? असे अनेक प्रश्न भोवताली असताना गेल्या काही दिवसात 2 सिनेमे पाहण्यात आले. दोन्ही सिनेमांच्या कथा एकमेकांपासून अतिशय वेगळ्या होत्या, पण त्या कथेत एक गोष्ट कॉमन होती ती म्हणजे स्त्री.. रेणुका शहाणे दिग्दर्शित ‘त्रिभंग’ आणि रोहन गेरा दिग्दर्शित ‘सर’ या दोनही सिनेमात समाजातील दोन प्रवाहाच्या स्त्रियांची कथा दाखवली आहे. ज्यांची स्वप्न वेगळी, ज्यांचं बॅकग्राऊंड वेगळं, ज्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा, पण मूळ मात्र एक स्त्री मन आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने याच ‘ती’च्या सिनेमाबद्दल आणि कथेबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.

- Advertisement -

त्रिभंग या शब्दाचा अर्थ ओडिसी नृत्यातील एक पोज आहे जिथे शरीर तीन ठिकाणी वाकवीलेले दिसते. सिनेमातसुद्धा अशाच तीन महिलांची कथा दाखविण्यात आली आहे, मुळात इथे तीन पिढ्यांतील महिलांची कथा आहे, नव्हे तर तीन पिढ्यांतील स्वतंत्र विचारसरणी असलेल्या, स्वतः कमाई करणार्‍या तीन पिढ्यांची ही कहाणी आहे. आपल्याकडे बर्‍याच वेळा नायिका प्रधान सिनेमात स्त्रीची मदत करतानादेखील एक पुरुष नायक दाखवला जातो किंवा स्त्रीला बिचारी दाखविली जाते. पण त्रिभंगमध्ये असला कुठलाही कृत्रिमपणा नाही हे या सिनेमाचं वैशिष्ठ्य, यातील पात्रांना लेखिकेने परिस्थिती नुरुप हवं तसं मोल्ड केलंय. 80 च्या दशकातील बंडखोर लेखिका नयनतारा आपटे, जिच्यासाठी तिची लेखणीच सर्व काही आहे. लिखाणापुढे कुटुंब विसरून गेलेली स्त्री आणि तिच्या मुलांवर त्याचा काय परिणाम झालाय? हे जाणून घेण्यास जराही उत्सुक नसलेली स्त्री नयनताराच्या माध्यमातून तन्वी आझमीने रेखाटली आहे. यातली दुसरी पिढी आहे नयनताराची मुलगी अनु उर्फ अनुराधा आपटे (काजोल) एक सिने अभिनेत्री आणि यशस्वी ओडिसी नृत्यांगना यापेक्षा ही आपल्या आईविरुद्ध मनात प्रचंड राग असलेली मुलगी अशी तिची भूमिका आहे.

लहान वयात लिव्ह इनमधून जन्माला आलेली तिची मुलगी माशा (मिथिला पालकर) हिच्या जीवनावरसुद्धा तिच्या आईचा प्रचंड प्रभाव आहे. तिसरी पिढी म्हणजे माशा, लहानपणापासून नॉर्मल कुटुंब काय असतं? हे शोधणार्‍या माशाचे विचार आपल्या आई आणि आजीपासून वेगळे आहेत, तिला भारतीय गृहिणी बनण्यात रस आहे. सासू सासरे, नवरा, मुलं हेच तिच्या आयुष्याचं ध्येय आहे. अशा तीन तर्‍हेच्या तीन महिलांची कथा म्हणजे त्रिभंग, पण फक्त यांचे विचार आणि बॅकग्राऊंड सिनेमाला वेगळं बनवत नाहीत. रेणुका शहाणे यांनी हे सगळं मांडत असताना कुठेही बनावटीपणा केलेला दिसला नाही, जो जसा आहे तो तसाच दाखवला, या तिघी व्यतिरिक्त सिनेमात असलेल्या वैभव आणि कुणाल रॉय कपूर यांनादेखील त्यांनी लिमिटेड फुटेज दिलंय. या सिनेमाची सर्वात जमेची बाजू म्हणजे या सिनेमात कुठलीच विचारधारा तुमच्यावर थोपविण्याचा आणि ज्ञान देण्याचा प्रयत्न दिग्दर्शिकेने केला नाही, हा केवळ स्त्रीवाद मांडणारा सिनेमा नाहीये एकाच वेळी या सिनेमातून अनेक गोष्टींवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. इथे प्रत्येक स्त्रीला स्वतची ओळख निर्माण करायची आहे किंवा टिकवायची आहे, ही ओळख टिकवताना किंवा निर्माण करताना त्यांच्या कुटुंबावर त्याचा काय परिणाम होतो? हे सिनेमातून दाखवून दिलंय.

- Advertisement -

‘त्रिभंग’ सिनेमानंतर मला आवडलेला दुसरा सिनेमा म्हणजे ‘सर’. आता या दोन्ही सिनेमांच्या कथा आणि नायिकांमध्ये जमीन आसमानचा फरक आहे, पण दोन्ही सिनेमांना जोडणारा पैलू आहे एक स्त्री मन. एका स्त्रीच्या मनात एकाचवेळी काय काय सुरू असतं ? किंवा छोट्यात छोटी गोष्टदेखील तिच्या जीवनावर काय प्रभाव टाकू शकते ? याचं सुंदर चित्रीकरण या सिनेमात करण्यात आलंय. सिनेमाची कथा आहे मालक आणि त्याच्या घरी काम करणार्‍या एका मोलकरणीची. मालकाचं म्हणजे अश्विन (विवेक गोंबर)च नुकतच लग्न मोडलंय म्हणून तो नैराश्यात जातोय आणि रत्ना (तीलोतमा शोम) ही त्याच्या घरी काम करणारी एक तरुण विधवा मोलकरीण आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच अतिशय सुंदर असा सीन दिग्दर्शकाने घेतलाय, ज्यात नायिका रत्ना गावाकडे जाताना बॅगमध्ये लपवून ठेवलेल्या आपल्या बांगड्या आणि दागिने मुंबई दिसू लागली की अंगावर घालते. गावातून शहरात आलं की किमान या सगळ्या गोष्टी तरी बाजूला पडतात. याच उत्तम चित्रीकरण दिग्दर्शकाने केलंय. तर सिनेमाची मूळ कथा घडते मुंबईच्या एका आलिशान घरात, जिथे अश्विन आणि रत्ना दोघेच राहतात, एका घरात राहत असताना त्या दोघांचं जीवन मात्र पूर्णतः वेगळं आहे.

मालक आणि नोकर यांच्यात असलेल्या सर्व भिंती जशास तशा दिग्दर्शकाने दाखविल्यात, नायिकेचे दोनच संवाद वेळोवेळी ऐकायला मिळतात, पण प्रत्येकवेळी आपल्या अभिनयाने तीलोतमा हिने त्यांना वेगळा आयाम प्राप्त करून दिलाय. सर चाय बनाऊ ? सर खाना लगा दू ? हे तिचे वाक्य प्रत्येक वेळी वेगळे ऐकायला येते. संपूर्ण सिनेमात एका स्त्रीचे स्वप्न आणि तिच्या स्वप्नांचा होणारा चुराडा त्यातून सावरत पुन्हा दुसरं स्वप्न साकार करण्यासाठी धडपडणारी स्त्री याचं चित्रण दिग्दर्शकाने केलंय, सिनेमाची सर्वात आवडणारी गोष्ट ही सिनेमाचा शेवट आहे. नितांत सुंदर असा शेवट या कथेला देऊन एक परिपूर्ण कथा आपल्या समोर रोहेना गेराने मांडलीय. ज्यावेळी स्त्री तिची कथा मांडते तेव्हा ती स्वत:चा पॉइंट ऑफ व्यू पात्रांवर लादण्याचा प्रयत्न करत असते की काय, असा प्रश्न मला नेहमी पडायचा, पण या दोन्ही सिनेमांच्या स्त्री दिग्दर्शकांनी हा भ्रम मोडून काढला. कथेत अडथळा बनणार्‍या सर्व गोष्टी टाळून पात्रांना हवं तसं वावरू दिल्यास तयार होणारी कलाकृती भन्नाट असते, हेच या दोन्ही सिनेमांच्या माध्यमातून दिसून आलं. येणार्‍या काळातही असेच सिनेमे पाहायला मिळो इतकी अपेक्षा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -