आपण नेमके कुठे आहोत….?

खतपाणी घालणारे अनेक लोक असतात. जे चोवीस तास फक्त आणि फक्त राजकारण करतात. जनतेला मुर्खात काढून पोळी भाजू पाहणारे कमी नाहीत. महाराष्ट्रातील राजकारण अशाच तकलादू गोष्टींवर सुरू आहे. मागच्याच आठवड्यात एक अत्यंत निषेधार्ह घटना म्हणजे एमआयएम पक्षातील खाजदार,आमदार आणि औरंगाबाद शहरातील काही पक्ष प्रतिनिधींनी औरंगजेबाच्या कबरी चे दर्शन घेऊ त्यावर चादर अंथरली. इथे प्रश्न हा पडतो की खरच औरंगजेब आपली अस्मिता होऊ शकतो का..? किंवा औरंगजेब महाराष्ट्रातील लोकांसाठी मग ते कोणत्याही धर्माचे व जातीचे असो कधीपासून वंदनीय झाला? महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभुराजे यांची असताना जर असे सूडबुद्धीचे राजकारण होत असेल तर जनता उत्तर देण्यास तयार आहे.

वर्तमानात मिथकांचा पाठीमागे धावणारा समाज स्वतःचे आणि भविष्यात अनेक पिढ्यांचे नुकसान करत असतो. एखाद्या गोष्टीची सत्यता तपासून न पाहता डोळे झाकून विश्वास ठेवणे हे सार्वकालिक नुकसानकारक ठरते. विज्ञानवादी जगात राहताना सुद्धा आम्ही शास्त्राप्रमाणे जीवन जगत असू तर आपली अधोगती होत आहे असे म्हणायला वाव आहे. मुळात इतिहासात डोकावून पाहिले असता स्पष्टपणे दिसून येते की, ’आपण शास्त्राप्रमाणे वागलो म्हणून जिवंत नाही तर शत्रूंनी मारले नाही म्हणून जिवंत आहोत.” तरीसुद्धा आम्हाला ऐतिहासिक कालखंडांचा मोठेपणा वाटतो. खोटी प्रतिष्ठा, राजकरण, आणि दिखाऊ अस्मितांच्या पाठीमागे धावता-धावता आम्ही माणूस म्हणून काही गोष्टी विसरत चाललो आहोत. इतके दिखाऊपण राजकीय पक्ष दाखवत असतील तर आपण काय शिकलो आहोत हे तपासणे गरजेचे आहे.

सध्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अव्वाच्या सव्वा झाल्या आहेत. महागाईने उच्चांक गाठला आहे, पेट्रोलच्या भावात रोज वेगवेगळे बदल आपण पाहतो. भारतातील आयात-निर्यातीच्या धोरणाबद्दल बोलावे तर अर्थशास्त्रज्ञ सुद्धा गप्प आहेत. बेरोजगारी वर तर बोलू नये हीच अवस्था, आफ्टर कोरोना ची परिस्थिती काही वेगळी नाही. जगण्याची आणि श्वास घेण्याची धडपड सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचे अलीकडच्या काळात कटपिस निर्माण झालेले पहावयास मिळतात. वस्तुस्थितीला वळसा घालून प्रत्येकजण जगतो आहे. वास्तव डोळ्यासमोर उभे असताना वेगळ्याच धुंदीत राजकारण होत आहे. युवकांना हनुमान चालीसा ऐकून आणि वदवून घेऊन त्यांच्या समस्या मिटणार का..? की अयोध्या ला जाऊन आपले प्रश्न मिटणार आहेत..? याचे देखील उत्तर कुणाकडेच नाही.

मागच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र दुय्यम अराजपत्रित अधिकारी पदाची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दुसरी उत्तरपत्रिका प्राप्त करून दिली. त्या उत्तरपत्रिकेमध्ये एकूण दहा प्रश्न बाद ठरवण्यात आले. तीन ते चार वर्ष विद्यार्थी एका जाहिराती ची वाट पाहतात. या सर्व प्रक्रियेमध्ये पाच वर्ष निघून जातात. परीक्षा दिली जाते त्यानंतर हातात उत्तर पत्रिका येते त्यावेळी आपण दिलेले उत्तर आणि आयोगाचे उत्तर यामध्ये तफावत आढळून येते. आयोग जर एका प्रश्नपत्रिकेत दहा टक्के प्रश्न रद्द करत असेल तर आयोगाच्या तार्किक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. आपल्याकडे हे सर्रास सुरू आहे. विद्यार्थी ते दहा प्रश्न सोडवून समोर जाण्याचा प्रयत्न करतात परीक्षेमध्ये त्यांचा त्या प्रश्नांसाठी वेळ जातो. परिणामी असे जर होत असेल तर विद्यार्थ्यांनी न्याय मागायचा कुठे. यावर जर तक्रार दाखल केली तर विद्यार्थ्यांना भीती वाटते की, आपण लोकसेवा आयोगाच्या काळ्या यादीत जाऊ शकतो. त्यानंतर अशी तक्रार दाखल केली तर न्यायालयामध्ये सुद्धा वर्षानुवर्ष असे प्रकरण प्रलंबित राहते.

दुसर्‍या परीक्षेची तयारी करता येत नाही आणि आहे त्या परीक्षेचा निकाल लावला जात नाही या सर्व प्रक्रियेत होरपळतो तो विद्यार्थी.. इथे आणखी एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे, आम्ही युवक किंवा विद्यार्थी जात, धर्म, पंथ, पक्ष, भाषा अशा अनेक मुद्द्यांवर एकत्र येतो. आंदोलन करतो, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अन्याय होत असेल तर एकत्र येत नाही ही शोकांतिका. आजूबाजूचे वातावरण एवढे भ्रमिष्ट झाले आहे की युवक त्यात अडकत जातो. आणि मूळ समस्येकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष होऊन जाते. शासनाने वेळीच लक्ष घातले नाहीत तर हजारो विद्यार्थी आहेत जे वय वाढल्यानंतर या सगळ्यापासून दुरावतात. यापूर्वी आपण पाहिले देखील आहे की अनेक विद्यार्थी आत्महत्येचा मार्ग निवडतात. याला जबाबदार कोण..? या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा शोधावे लागणार आहे.. किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर प्रक्रिया राबवली तर मार्ग मिळू शकेल का याचे उत्तर शोधावे लागणार आहे.

खतपाणी घालणारे अनेक लोक असतात. जे चोवीस तास फक्त आणि फक्त राजकारण करतात. जनतेला मुर्खात काढून पोळी भाजू पाहणारे कमी नाहीत. महाराष्ट्रातील राजकारण अशाच तकलादू गोष्टींवर सुरू आहे. मागच्याच आठवड्यात एक अत्यंत निषेधार्ह घटना म्हणजे एमआयएम पक्षातील खाजदार,आमदार आणि औरंगाबाद शहरातील काही पक्ष प्रतिनिधींनी औरंगजेबाच्या कबरी चे दर्शन घेऊ त्यावर चादर अंथरली. इथे प्रश्न हा पडतो की खरच औरंगजेब आपली अस्मिता होऊ शकतो का..? किंवा औरंगजेब महाराष्ट्रातील लोकांसाठी मग ते कोणत्याही धर्माचे व जातीचे असो कधीपासून वंदनीय झाला? महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभुराजे यांची असताना जर असे सूडबुद्धीचे राजकारण होत असेल तर जनता उत्तर देण्यास तयार आहे. लोकप्रतिनिधी असे वागत असतील तर विश्वासाहर्ता गमावली आहे असे म्हणावे लागेल. धर्मनिरपेक्षतेचा अर्थ असा स्वैरपणे घेतला जात असेल तर आपसुक दोन गट पडतात ज्यात समाजाची हानी होत असते. असे होऊ नये यासाठी एक शांत सुव्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. अशी विश्वासार्हता गमावलेले लोक पुन्हा जनतेच्या मनात कधीच बसू शकत नाहीत. याच अनुषंगाने गोडसेला जवळ करणे हे देखील हिताचे नाही. अशा विचारांमधून समाजाची पायाभरणी कधीच होत नसते. एखादा शांतीचा समाजसुधारक विचार पेरून आपल्याला समाजरचनेची उभारणी करायची असते. ती जबाबदारी आपली आहे.

तळाला गेलेला रुपया एक वेळा वर अनाता येईल. पण सर्वसामन्या लोक तळाला गेलेत त्यांना वर आणण्याचे काम सध्यातरी केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे आहे. पक्ष आणि पक्षपातीपणा बाजूला ठेवून एकत्र येऊन राज्य आणि केंद्राचे संबंध सुरळीत झाले तर आर्थिक, सामाजिक विकास होऊ शकतो. एखाद-दुसरा राजकीय पक्ष विकास आणि संवाद घडवून आणत असेल तर हा ट्रेंड राबवणे गरजेचे आहे इतकेच. सध्या बॉलिवूड वेगवेगळ्या फाइल्सच्या चित्रपटांमध्ये व्यस्त आहेत. मिळालेली स्पॉन्सरशिप याकामी येत असेल आणि जर चित्रपटांमधून सत्यता लपवून दिग्दर्शनाचे हक्क वापरून निर्मिती होत असेल तर ती एकांगी झाल्याशिवाय राहत नाही. हा एकांगीपणा एखाद्या धर्माला जर टार्गेट करत असेल तर ते योग्य नाही. आपण धर्मनिरपेक्ष राष्ट्रात राहात आहोत एकात्मता आणि शांतता हीच आपली जमेची बाजू समजून पावले उचलावी लागणार आहेत.

विकासाची फळे चाखता येतील पण एकावरच आणि एखाद्या गोष्टीवर खापर फडणीस देखील योग्य नाही. परदेशी संबंध आपण सुधारत आहोत अंतर्गत संबंधात तुही पडू नये याची काळजी देखील घ्यावी लागणार. घरामध्येच भांडणे असते तर आपण बाहेर लोकांना शांततेचे आवाहन करू शकत नाही. आपण नेमके कुठे आहोत..? यावरूनच आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत असतो.