घरफिचर्ससारांशमजबूत मूल्यसाखळी हाच पर्याय!

मजबूत मूल्यसाखळी हाच पर्याय!

Subscribe

सध्या बाजारात काय घडतंय? शेतकरी ते ग्राहक यांच्या दरम्यान जे घटक आहेत ते एकमेकांशी कुठेच कनेक्ट नाहीत. जे आहेत ते तुटक तुटक आहेत. हे ठिपके एकमेकांशी जोडले जाणे. असे जोडले गेल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर जे मूल्यवर्धन (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) होतंय. हे मूल्यवर्धनाचे टप्पे जसे नियंत्रणात येतील तशी मूल्यसाखळी अधिक सक्रियपणे कार्यरत होईल. जागतिक स्पर्धेत पुरुन उरतील अशा ताकदीच्या पिकनिहाय मूल्यसाखळ्या शेतकर्‍यांच्या मालकीच्या शेतकर्‍यांच्या पुढाकारातून उभ्या करणं ही आपली सर्वांची दिशा असायला हवी.

जागतिकीकरणानंतर आपली स्पर्धा जगातील इतर प्रगत देशांतील ताकदवान शेतकर्‍यांबरोबरच झाली. आपल्या छोट्या व कमजोर शेतकर्‍यांना त्यांच्याबरोबर टिकायचे असेल तर आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकतील अशा ताकदीच्या पिकनिहाय मूल्यसाखळ्या व त्याही शेतकर्‍यांच्या मालकीच्या उभ्या कराव्या लागतील. जागतिक स्पर्धेत टिकायचं तर त्या साखळ्या तितक्या इफिशियंट (सक्षम) असणं गरजेचं आहे.

धावण्याच्या स्पर्धेत जर शंभर जण पळत असतील. तर काही मागे पडतात. काही पुढे जातात. या मागे पुढे जाण्याच्या प्रक्रियेत आपल्या इच्छाशक्ती तसेच सक्षमता (इफिशियन्सी) हे महत्वाचे इंधन असते. अशावेळी आपल्या ताकदीचा आपण चौफेर विचार केला पाहिजे.

- Advertisement -

ठिपके जोडू या..
आपल्याला शेतीतला चक्रव्यूह भेदायचा आहे. म्हणजे जो गुंता झालाय तो सोडवायचा आहे. गुंता कशामुळे तर शेतीतल्या तोट्यामुळे झालाय. तोटा होतोय तो शेतीतल्या सततच्या शोषणामुळे होतोय. शोषण का होतंय, तर शेतकरी म्हणून माझ्यात ताकद नाहीय. हा एक भाग. दुसरा भाग असा की मी जे उत्पादन घेतोय, ते साखळीतील जो शेवटचा घटक असलेला ग्राहक आहे, त्याच्यापर्यंत जोडलेली व्यवस्था नाहीय. सगळं विस्कळीत आणि तुकड्या तुकड्याच्या स्वरुपात आहे. एकसंध अशी व्यवस्था नाहीय. हा असा चक्रव्यूह आहे. शेतकरी आणि ग्राहक या दोन टोकांच्या मध्ये जवळच्या बाजार समितीतील दलाल, घाऊक व्यापारी, पुन्हा शहरातील बाजार समितीतील दलाल, व्यापारी, किरकोळ विक्रेते आणि मग शेवटी ग्राहक यांच्यामध्ये असे 6 ते 7 घटक येतात. या घटकांची संख्या कमी होणे तसेच यातून शेतकरी व ग्राहक या दोन्हींचे शोषण थांबणे. या व्यवहारात पूर्ण पारदर्शकता येणे ही आताच्या काळाची गरज आहे.

सध्या बाजारात काय घडतंय? शेतकरी ते ग्राहक यांच्या दरम्यान जे घटक आहेत ते एकमेकांशी कुठेच कनेक्ट नाहीत. जे आहेत ते तुटक तुटक आहेत. हे ठिपके एकमेकांशी जोडले जाणे. असे जोडले गेल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर जे मूल्यवर्धन (व्हॅल्यू अ‍ॅडिशन) होतंय. हे मूल्यवर्धनाचे टप्पे जसे नियंत्रणात येतील तशी मूल्यसाखळी अधिक सक्रियपणे कार्यरत होईल.

- Advertisement -

जागतिक स्पर्धेत पुरुन उरतील अशा ताकदीच्या पिकनिहाय मूल्यसाखळ्या शेतकर्‍यांच्या मालकीच्या शेतकर्‍यांच्या पुढाकारातून उभ्या करणं ही आपली सर्वांची दिशा असायला हवी. अशा जागतिक दर्जाच्या मजबूत 700 पिकनिहाय मूल्यसाखळ्या हेच आपलं ध्येय असायला हवे. तेच आपलं साध्य आहे. यातून आपल्याला महाराष्ट्रातील शेती शाश्वत व फायदेशीर करणे शक्य आहे. पुढील दहा वर्षात महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सहा कोटी लोकांच्या जीवनात समृध्दी आणायची असेल तर हे ध्येय प्रत्यक्षात आणावेच लागेल. ही भूमिका ठेवून आपण महाराष्ट्राचं चित्र पाहणं महत्वाचं आहे.

मूल्यसाखळी म्हणजे काय?..
शेतकर्‍याने उत्पादन केले. म्हणून सगळं काही होत नाही. त्याचा ग्राहक तर जगभर पसरलेला आहे. त्याच्यापर्यंत जे उत्पादन पोहोचते. ते पोहोचेपर्यंत मध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी येतात. उत्पादन करणं, त्यानंतर त्या उत्पादनाची हाताळणी करणं. त्याचं पॅकींग, ग्रेडींग त्याच्यावर प्रक्रिया, त्याची साठवणूक, त्याचं वितरण सगळे भाग येतात. या सगळ्या टप्प्यातून शेवटी ते ग्राहकापर्यंत जाते. यातील वितरणाची प्रक्रियाही नीट समजून घ्यायला हवी. मी व्यापार्‍याला माल दिला. म्हणजेच वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाली का? व्यापारी हा एंड यूजर (शेवटचा ग्राहक) नाही. तो पुन्हा दुसर्‍या व्यापार्‍याला देतो. तिथून पुन्हा माल पुढे जातो. शेवटी माल ग्राहकापर्यंत जातो. त्याला आपण ‘सीड टू प्लेट’ असे म्हणू शकतो. शेतीतील उत्पादन ते प्रक्रिया, साठवणूक, मार्केटींग ते विक्रीपर्यंतच्या एकत्रित व्यवस्थेला मूल्यसाखळी म्हणता येईल.

मूल्यसाखळीचे तीन महत्वाचे घटक जसे की उत्पादन, काढणीनंतरची हाताळणी आणि मार्केटींग व विक्री या तिन्हींचे जे टप्पे आहेत ते शेतकर्‍यांनीच सांभाळले. त्यांनीच जर नियंत्रित केले तर हे चित्र पूर्णपणे बदलेल.

सक्षम यंत्रणाच हवी
जागतिकीकरणानंतर आपली स्पर्धा जगातील इतर प्रगत देशांतील ताकदवान शेतकर्‍यांबरोबरच झाली. आपल्या छोट्या व कमजोर शेतकर्‍यांना त्यांच्याबरोबर टिकायचे असेल तर आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकतील अशा ताकदीच्या पिकनिहाय मूल्यसाखळ्या व त्याही शेतकर्‍यांच्या मालकीच्या उभ्या कराव्या लागतील. जागतिक स्पर्धेत टिकायचं तर त्या साखळ्या तितक्या इफिशियंट (सक्षम) असणं गरजेचं आहे.

धावण्याच्या स्पर्धेत जर शंभरजण पळत असतील. तर काही मागे पडतात. काही पुढे जातात. या मागे पुढे जाण्याच्या प्रक्रियेत आपल्या इच्छाशक्ती तसेच सक्षमता (इफिशियन्सी) हे महत्वाचे इंधन असते. अशावेळी आपल्या ताकदीचा आपण चौफेर विचार केला पाहिजे. यातील पहिला मुद्दा हा की, आपली स्ट्रेन्थ (ताकद) कशात आहे ते समजून घेतले पाहिजे. दुसरा मुद्दा-आपल्या कमजोर बाजू काय आहेत, ज्यामुळे आपण मागे पडू शकतो किंवा ज्यामुळे आपण अडचणीत येऊ शकतो. त्याच बरोबर तिसरा मुद्दा म्हणजे आपल्याला यात संधी कुठे आणि किती प्रमाणात आहेत? आपल्याकडे काय पिकतं? मी काय पिकवतो? ते मी का पिकवतो? हा विचार करतानाच या सगळ्यात माझ्यासाठी कुठे संधी आहेत? या संधी आपण समजून घेतच नाहीत. मग आजूबाजूला संधी असूनही आपण बर्‍याचदा चाचपडत राहतो. चौथा मुद्दा म्हणजे यातील धोके ओळखता आले पाहिजेत? काय काय कारणांनी आपण फसू शकतो. फसण्याची कारणे ही नेहमीच सामाजिकच असतात असं नाही. बर्‍याचवेळा तुम्ही नीट विचार केला नाही तरी तुम्ही स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. तुमच्या नियंत्रणाच्या बाहेर असलेले इतरही धोके काय आहेत? अशा चारही अर्थाने आपल्याला मूल्यसाखळीच्या बाबतीत विचार केला पाहिजे.

याला व्यवस्थापन तज्ज्ञ ‘स्वॉट अ‍ॅनॅलिसीस’ असं म्हणतात. आपल्या मूल्यसाखळीचं अत्यंत वस्तुनिष्ठ ‘स्वॉट अ‍ॅनॅलिसीस’ आपल्याला करावं लागेल. स्ट्राँगनेस(सक्षम बाजू)+विकनेस (कमजोर बाजू)+अपॉर्च्युनिटी(संधी) +थ्रेट्स (धोके) या शब्दांच्या आद्याक्षरांवरुन SWOT हा शब्द तयार झाला आहे. महाराष्ट्राची शेती आणि त्या अनुषंगाने मूल्यसाखळी याबाबत विचार झाला तर एकूणच शेतीचे चित्र बदलेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -