घरफिचर्ससारांशतरसांच्या अस्तित्वाला धोका!

तरसांच्या अस्तित्वाला धोका!

Subscribe

तरसांची संख्या मागील दशकात कमी झाल्याचे आढळल्यामुळे त्यांना आययुसीएन (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सर्व्हेशन ऑफ नेचर)द्वारे धोक्याच्या श्रेणीत नमूद करण्यात आले आहे. संख्या कमी होण्याची मुख्य कारणे ही तरसांची वाढती शिकार व बिबटे आणि वाघांसारख्या मोठ्या जनावरांमुळे ढासळते अन्न स्रोत असे दर्शविले जाते. मुद्दा इतकाच की, इतर प्राण्यांसोबतच्या सह-अधिवासाविषयी माहिती, अन्नस्रोत विभाजनाच्या अभ्यासातूनच समजून घेतली जाऊ शकते.

भारतात काही ओलसर व सदाहरित जंगले आणि उत्तर पूर्व भाग सोडल्यास इतर वैविध्यपूर्ण क्षेत्रामध्ये तरस आढळून येतो. शक्तिशाली जबडा, मोठे डोळे, कान ही त्याची वैशिष्ठ्ये. निशाचर व दुर्लक्षित असल्याने त्याच्या संख्येचा विश्वसनीय अंदाज व त्या संबंधी निष्कर्ष काढणे अतिशय अवघड आहे. हा प्राणी कुरूप असल्याची समज, समाजात सामान्य जरी असली तरी हा एक हुशार प्राणी. कोल्ह्यासारख्या धूर्त जनावरांना सक्रियपणे शिकार करण्यास भाग पाडून त्यावर स्वतःचा उदरनिर्वाह कसा साधायचा यात तरसाशी स्पर्धा मोजकी जनावरेच करू शकतात. मनुष्यासोबत सह अस्तित्वात जरी राहत असला तरी त्याचे आहार वैविध्यपूर्ण. शेळ्या, गुरे, कोंबड्या व इतर पक्षी, ससे व उंदीर हे त्याचे मुख्य शिकार. इतकेच नव्हे तर हा प्राणी गंध ग्रंथीच्या सहाय्याने वाळलेली हाडे, किडे, सरपटणारे प्राणी व क्षय शोधून कुजणार्‍या मांसावर उपजीविकादेखील करतो. २०१२ मध्ये सारिस्का व्याघ्र प्रकल्पामध्ये झालेल्या अभ्यासात तरसाच्या विष्टेत वनस्पती आढळल्या. तसेच आंबा, बोरं, तेंदू व पाचोण्डसारख्या झाडाची फळे देखील समाविष्ट असल्याचे गीरमध्ये झालेल्या २०११ च्या संशोधनात आढळते. एखाद्या मांसभक्षी प्राण्याला शिकार करण्यासाठी किती संघर्ष करावा लागत असावा हे यातूनच दिसून येते.

मागील दशकात तरसांची संख्या कमी झाल्याचे आढळल्यामुळे त्यांना आय यु सी एन (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्सर्व्हेशन ऑफ नेचर) द्वारे धोक्याच्या श्रेणीत नमूद करण्यात आले आहे. संख्या कमी होण्याची मुख्य कारणे ही तरसांची वाढती शिकार व बिबटे आणि वाघांसारख्या मोठ्या जनावरांमुळे ढासळते. अन्न स्रोत असे दर्शविले जाते. मुद्दा इतकाच की, इतर प्राण्यांसोबतच्या सह-अधिवासाविषयी माहिती, अन्नस्रोत विभाजनाच्या अभ्यासातूनच समजून घेतली जाऊ शकते. म्हणूनच तरसाच्या प्राणी शास्त्रातील पातळीचा व वर्तनाचा अभ्यास फारच कमी झाला असावा. परंतु इंधन लाकूड व जंगलतोडीमुळे तरसाच्या अधिवासात झालेली कमतरता हा सुद्धा तितकाच मोठा व शास्त्रीयदृष्ठ्या समांतर चालणारा प्रश्न. हिच निवासाची कमतरता त्यास मनुष्य वस्तीच्या आणखी जवळ आणते. यामुळेच मनुष्य व प्राण्यांमधील संघर्ष अधिक तीव्र जाणवतो. या संघर्षामुळेच भारतासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या देशात संवर्धनाच्या बलाढ्य आव्हानाचा प्रश्न निर्माण झाला.

- Advertisement -

यातून मार्ग काढणे सोप्पे नसले तरी अशक्यदेखील नाही

१) ग्रामीण पातळीवर ऊर्जा संदर्भात नवे धोरण तयार करणे.
ग्रामीण भागात हल्ली इंधन लाकडाचा कार्यक्षम/कमी वापर आणि एलपीजी, रॉकेल व विद्युत उपकरणांचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी ४० ते ६० टक्के लोकसंख्या ही विविध कामासाठी इंधन लाकडावर अवलंबून आहेतच. सोलारसारख्या अक्षय ऊर्जा स्रोत व नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून ग्रामीण भागामध्ये लाकडावरील अवलंबित्व हळूहळू संपुष्टात येऊ शकते.

- Advertisement -

२) पडीक जमिनीचा विकास
भारतात पडीक जमिनीचे प्रमाण फार आहे व काही क्षुल्लक घटकांमुळे त्या जमिनीचा विकास अडखळला आहे. पर्यावरण व वन मंडळाच्या, द नॅशनल फॉरेस्टरी अ‍ॅक्शन प्रोग्रॅम ऑफ इंडियाच्या सर्वेनुसार देशात जवळपास ६ कोटी हेक्टर पडीक जमीन आहे ज्यातील ५० टक्के जमीन ही जंगलांनी व्यापलेली आहे. याच जागेवर वृक्ष लागवड व नैसर्गिक पुनर्निर्माणाचा प्रयत्न केल्यास राहिलेल्या शुद्ध व दूषित न झालेल्या जंगलांवरील इंधन लाकडांमुळे वाढलेला ताण कमी होऊ शकेल.

३) अक्षय ऊर्जा स्रोतासंबंधी जागरूकता
ऊर्जा स्रोताविषयी समस्येसहित कार्बनच्या वाढत्या उत्सर्जनावरही आळा घालता येईल. बायोगॅस हाही तितकाच कार्यक्षम उपाय.

४) सरपण लाकडाचा उपभोग व उत्पादनाची नियतकालिक मोजमाप
शासकीय व अशासकीय संस्था मिळून याबाबत बरेच प्रोत्साहन देत असतात. अभ्यास करणार्‍यांची संख्या अगदी बोटांवर मोजण्याइतकी दिसून येते व कित्येकदा या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. नियमित वेळेत जंगलतोडीचे माप ओळखून त्यावर उपाय काढून कार्य राबवणार्‍या संस्थेची निर्मिती एक वरदान ठरू शकेल.

५) इंधन लाकडाविषयी तांत्रिक अभ्यासक्रम
देवेंद्र पांडेंच्या ‘फ्युएलऊड स्टडीस इन इंडिया’ या पुस्तकात याविषयी आदर्श मार्ग सुचवला आहे. अभ्यासक्रमाचा एक उत्तम प्रवाह याच पुस्तकाच्या ८व्या विभागात नमूद आहे. इंधन लाकडाचा वापर संख्येचा स्वरूपात मांडण्याचे सूत्र व संवर्धनाचा उत्तम मार्ग याबाबत स्पष्ट माहिती यातून मिळते.

तरसासारख्या प्रजातीला स्थानिक पातळीवर नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी या पद्धती अतिशय प्रभावी ठरू शकतात. अधिवासासाठी वापरलेले मोठे प्रांत, मृत्यूचे उच्च प्रमाण आणि पशुधनावरील अवलंबनामुळे रानाचे विखंडन व वाढत्या लोकवस्तीला तरस फारच संवेदनशील आहेत. तसेच सरपणाच्या लाकडासाठी झालेल्या जंगलतोडीमुळे व शिकारीमुळे शिल्लक असलेल्या निकृष्ट दर्जाच्या अधिवासाचे प्रमाण व त्याचे तोटे मनुष्यालाही पूर्णपणे ठाऊक आहेत. परंतु मनुष्याची भूक ही तरसाच्या अस्तित्वापेक्षा अधिक महत्तक्षवाची आहे की, काय अशी शंका उद्भवते. या घटकांमधून तरसांवरील होणार्‍या प्रभावाचा दर्जा व त्या तीव्र प्रभावाचे नेमके प्रमाण ओळखून संवर्धनाचे विशिष्ट प्रकल्प आखण्याची व एक मजबूत पाया रचण्याची गरज आहे.

तुषार परब

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -