घरफिचर्ससारांशमहिला सन्मानाचे दिशादर्शक राज्य

महिला सन्मानाचे दिशादर्शक राज्य

Subscribe

महाराष्ट्राला मोठी वैचारिक परंपरा असून येथील मातीप्रमाणे माणसेही कणखर आहे. मात्र, सध्या जे करोनाचे संकट उभे राहिले आहे, त्यामुळे घराबरोबरच देशाचीही आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे आज घराचे आर्थिक गणित सांभाळण्याची जबाबदारी महिला वर्गावर आली आहे, तर देशाची आर्थिक जबाबदारी महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन व्यवस्थित सांभाळतील हा विश्वासही जनमानसात आहे. आज महाराष्ट्रातील महिलांनी सर्वच स्तरावर स्वत:ला सिद्ध करून खरी मर्दानी असल्याचे जगाला दाखवून दिले आहे. आज करोना महामारीच्या संकटातही अनेक महिला पोलीस, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा न करता लोकसेवा करत आहेत. ही हिंमत व ताकद या महाराष्ट्राच्या मातीनेच दिलेली आहे.

1 मे 2020 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला 60 वर्षं पूर्ण झाली. भाषावार प्रांताची रचना व्हावी यासाठी करण्यात आलेल्या या राज्याच्या निर्मितीसाठी 105 वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्यात कमलाबाई मोहिते, ठमाबाई सूर्यभान या दोन महिलाही होत्या. आज महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने पुन्हा एकदा इतिहासाची पाने चाळली जात आहेत. त्यात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत महिलांचा असलेला सहभाग पाहता आणि त्यानंतरचे त्यांचे अस्तित्व पाहता त्या शेवटी उपेक्षितच राहिल्या, पण नंतर याच महाराष्ट्राने महिला धोरण राबवून मराठी महिलांना महत्त्वाचे स्थान देत माय मराठीला वेगळी ओळख देऊन नवीन अध्याय रचला.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पुरुषांच्या बरोबरीने त्यावेळी महिलाही रस्त्यावर उतरल्या होत्या. स्वतंत्र महाराष्ट्राचे महत्त्व घराघरात जाऊन सांगत. लोकांना त्याच व आपल्या मातृभाषेचं महत्त्व पटवून देत जनजागृती करण्याची महत्त्वाची जबाबदारी महिला पार पाडत होत्या. थोडक्यात त्या स्वतंत्र महाराष्ट्राचा पाया रचत होत्या. पुरुषांच्या बरोबरीने मोर्चात सहभागीही होत होत्या. ज्याकाळी बहुतेक घरात महिलांना चूल आणि मूल एवढेच महत्त्व होते त्याही काळात घरदार विसरून काही जणींनी घरातच बंड करत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची कास धरली होती. याच पार्श्वभूमीवर पहिल्या संयुक्त महाराष्ट्र महिला परिषदेचे आयोजन करत जवळपास दहा ते पंधरा हजार महिला एकत्र आल्या, पण नंतर मात्र इतिहासात या महिला लुप्त झाल्या. त्यानंतर मधला काळ हा स्त्रियांना इतिहासात नेणाराच होता. चळवळ, महिला परिषद यातून अनेक होतकरू महिला पुढे येऊ पाहत होत्या, पण त्यांना हवं तसं प्रोत्साहीत वातावरण मिळत नव्हतं. यामुळे सामाजिक सेवेची आवड व इच्छा असूनही अनेक प्रतिभावंत न निडर महिला समाजसेवेपासून वंचितच राहिल्या. त्यास काही अपवादही होत्या, पण गेल्या साठ वर्षात हळूहळू चित्र बदलले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने उद्योग, व्यवसाय, शिक्षण, सिनेमा, सांस्कृतिक, उद्योग, विज्ञान, पर्यटन व इतर अनेक क्षेत्र सर केली. यात महिलाचांही मोठा सहभाग होता व आहेच.

- Advertisement -

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांचे समाजकारणाबरोबरच राजकारणातील महत्त्व ओळखले. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदी असताना पवार यांनी 22 जून 1194 साली महाराष्ट्र सरकारचे महिला विषयक धोरण जाहीर केले. ज्यामुळे राज्याच्या नाही तर देशाच्या राजकारणातही महिलांना महत्त्वपूर्ण स्थान देण्यात आले.

या धोरणाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या लढाईला खर्‍या अर्थाने न्याय प्राप्त झाला. तसेच महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या धोरणामुळे शक्य झाले आहे. म्हणूनच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. या धोरणामुळे समाजात स्त्री-पुरुष समानताही घडवली. या धोरणांनी महिलांना आर्थिकच नाही तर त्यांचे मूलभूत अधिकारही दिले. ज्यामुळे समाजातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही महिला मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे आज पाहावयास मिळत आहे. गेल्या 60 वर्षात महाराष्ट्राने वेगवेगळी क्षेत्र सर केली आहेत. यात, शिक्षण, सिनेमा, सांस्कृतिक, उद्योग, विज्ञान, पर्यटन या क्षेत्रात महाराष्ट्राची वाटचाल वाखाणण्याजोगी आहे आणि या प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभागही लक्ष वेधणारा आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राला मोठी वैचारिक परंपरा असून येथील मातीप्रमाणे माणसेही कणखर आहेत. मात्र, सध्या जे करोनाचे संकट उभे राहिले आहे, त्यामुळे घराबरोबरच देशाचीही आर्थिक घडी विस्कटली आहे. यामुळे आज घराचे आर्थिक गणित सांभाळण्याची जबाबदारी महिला वर्गावर आली आहे, तर देशाची आर्थिक जबाबदारी महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन व्यवस्थित सांभाळतील हा विश्वासही जनमानसात आहे. आज महाराष्ट्रातील महिलांनी सर्वच स्तरावर स्वत:ला सिद्ध करून खरी मर्दानी असल्याचे जगाला दाखवून दिले आहे.

हॉटेल, कॉर्पोरेट ऑफिस, वैद्यकीय क्षेत्र, देशातील तीन महत्त्वाची संरक्षण दलं, राजकारण, खेळ या सगळ्यात मराठी महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. आज करोना महामारीच्या संकटातही अनेक महिला पोलीस, डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी जीवाची पर्वा न करता लोकसेवा करत आहेत. ही हिंमत व ताकद या मातीनेच दिली असून यात ज्येष्ठांचाही सहभाग वाखाणण्याजोगा आहे.

दरम्यान, सहा दशकातील महत्त्वाचे टप्पे जर ठरवायचे झाले तर महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य संग्रामापासून माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार ते आजचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदर्श धोरणे राबवल्याची आपल्याला वेळोवेळी प्रचिती आलीच असेल. यामुळे या करोना संकटावरही मात करून महाराष्ट्र पुढे जाईल हा विश्वास तमाम महाराष्ट्रातील जनतेला आहेच. मात्र, आजच्या करोनारूपी संकटात वेगवान निर्णय घेणारे पुढे जातील तर काहींना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. बर्‍याचजणांना चंगळवाद बाजूला ठेवावाही लागेल, पण महाराष्ट्र पुढे जाईल. या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी जसे तरुणांचे योगदान आहे. तसेच ज्येष्ठांचेही आहे. आज करोनाच्या संकटात अनेक सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक जनतेच्या सेवेसाठी पुढे सरसावले आहेत. यांचेही महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहेत हे विसरता कामा नयेत.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -