घरफिचर्ससारांशसोशल मीडियाचा ऑक्टोपस!

सोशल मीडियाचा ऑक्टोपस!

Subscribe

सत्तेचा गैरवापर झाल्यानंतर किंवा इतर कोणीही अन्यायकारक वर्तन केले, तर त्याला विरोध हा होतच असतो. वर उल्लेख केला त्याप्रमाणे त्या-त्या काळातील साधने आणि माध्यमे बदललेली असतात. आज युवकांच्या हातात सोशल मीडिया नावाचे एक प्रभावी माध्यम आहे, ते योग्य रीतीने वापरले गेले पाहिजे किंवा वापर होत आहे का..? याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. जे युवक या देशाचे भविष्य आहेत, त्यांचे चोवीस तासांपैकी १६ ते १७ तास जर सोशल मीडियाचा वापर करण्यामध्ये जात असतील तर इतर अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यातून वजा होत आहेत.

प्रत्येकांना तिळगुळची छायाचित्र पाठवून आम्ही गोड-गोड बोललो आहोत. आता प्रत्यक्षात भेटून एकमेकांना तिळगूळ देणे होवो अथवा न होवो …आणि कुणी काही बोललेच तर मी तुला व्हॉट्सअ‍ॅपवर तिळगूळ पाठवला होता… असे म्हणायला आम्ही मोकळे…. एवढी आमची गट्टी सोशल मीडियाशी झाली आहे. तर सांगायचा मुद्दा हा की, एकविसाव्या शतकात आपण सर्वजण तंत्रज्ञानाशी जोडले गेलो आहोत. अशा काळात इंटरनेट शिवाय राहणे अशक्यच. म्हणूनच १० जानेवारी २०२० ला सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय अनुच्छेद १९(२) अंतर्गत दिला की, ‘इंटरनेट वापर हा मूलभूत अधिकार आहे, व बोलण्याच्या स्वातंत्र्यावर कोणतेही सरकार दबाव आणू शकत नाही. तसेच अनिश्चित काळापर्यंत इंटरनेट सेवा बंद करणे म्हणजेच मूलभूत अधिकारावर गदा आणणे होय.’

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे भारतभरातील सर्व युवकांनी स्वागत केले. पुन्हा यावर मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. त्यानंतर मोबाईलच्या वापराबरोबरच इंटरनेटद्वारे आमच्या हातात सोशल मीडिया आला. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आम्ही या नव समाजमाध्यमांचा वापर केला नाही, तर आम्ही जुनाट विचारांचे वगैरे जगाला दिसतो. किंवा कुणी प्रश्न केला की, तुम्ही सोशल मीडियाचा वापर करता का…? यावर आमचे उत्तर ‘नाही’ असे आले. तर आमच्याकडे प्रश्न करणारा आम्ही गुन्हेगार असल्यासारखे बघतो. यावरूनच लक्षात येते की सोशल मीडिया किती जवळचा झाला आहे.

- Advertisement -

भारतात सोशल मीडिया मूलभूत अधिकार आहे. असे ज्यावेळी सर्वोच्च न्यायालय सांगते, त्यावेळी त्याचा खोलवर अभ्यास होणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या सोशल मीडियाचे वापर करणारे युवक हे ७५ टक्क्यांच्या जवळपास पोहोचले आहेत. एका स्टॅटिस्टिकल अहवालानुसार फेसबुक वापराची संख्या ८२ टक्के, यूट्युब ६.७ टक्के, इन्स्टाग्राम ५.३ टक्के, ट्विटर १.५७, टिक टॉक ५. ६७ टक्के असे विविध सोशल मीडियाचे वापरकर्ते पाहायला मिळतात. साहजिकच यामध्ये तरुणांची संख्या सर्वात जास्त आहे. नुकताच आम्ही राष्ट्रीय युवक दिन साजरा केला. त्यानिमित्ताने सोशल मीडियाचा प्रभाव आणि युवक यावर अनेकांनी आपली मते मांडली. प्रत्येकांनी हे मान्य केले की, आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होतो, आम्हाला ज्या ठिकाणी बोलता येत नाही. किंवा एखाद्या विषयावर आमचं मत मागून घेतलं जात नाही. त्यावेळी आम्ही सोशल मीडियाद्वारे आमची मते मांडत आहोत. भारतामध्ये हे स्वातंत्र्य आम्हाला आहे, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे भारतातील युवकांचे म्हणणे आहे. २०१९ वर्षअखेर आपण देशातली परिस्थिती अनुभवत आहोत. कलम ३७०, एन .आर. सी. आणि सी.ए.बी. च्या विरोधात आजही आंदोलन पेटले आहे. या विरोधात जामिया विद्यापीठात विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन निषेध व्यक्त केला. त्यानंतर जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला, मारहाण या सर्वांचे पडसाद सगळीकडे उमटले. या सर्वांच्या विरोधामध्ये हे प्रत्यक्ष आंदोलन देशभरात पोहोचवण्याचे काम युवकांच्या हातातील सोशल मीडियाने केले.

भारतभरातील महाविद्यालयांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सला, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम इतर समाज माध्यमांवर विरोध करण्यासंबंधीच्या पोस्ट पाहायला मिळाल्या. सेव्ह कंट्री, सेव्ह जेएनयू, सेव्ह एज्युकेशन, सेव्ह डेमोक्रसी अशा प्रकारचे हॅशटॅग चालविले गेले. औरंगाबादमध्ये युवकांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात फ्रॉम शाडो टू द स्टार्स, कल्चरल प्रोटेस्ट अगेन्स्ट हेट ….हे सात दिवसांचे कॅम्पेन चालविले. सोशल मीडियाद्वारे याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी आणि प्रतिसादही मिळाला. मुळात कोणत्याही काळात व्यक्त होण्याची माध्यमं ज्यावेळी बदलतात त्यावेळी अभिव्यक्ती अधिकाधिक सशक्त होत असते. यातूनच नव्या संस्कृतीचा, नव्या विचारांचा जन्म होत असतो. उदारीकरणाचा हा एक टप्पा आजच्या काळात महत्त्वाचा मानला पाहिजे. एखादे माध्यम किती प्रभावी आहे, हे त्याच वेळी समजते ज्यावेळी त्याच्या दोन्ही बाजू प्रभावीपणे मांडल्या जातात किंवा वापरल्या जातात. सोशल मीडिया आणि युवक आता एकमेकांना जसे काही पूरक आहेत असे वाटत आहे.

- Advertisement -

वर दिलेल्या उदाहरणाच्या आणखी काही गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर आपण बघितले आहे की, काही सेलिब्रिटींनी येऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जेएनयूमध्ये पाठिंबा दर्शविला. लागलीच सोशल मीडियावर या मुद्याला घेऊन सेलिब्रिटींना ट्रोल करण्यात आले. चित्रपट प्रदर्शित होतोय म्हणून सेलिब्रटी त्या युवकांमध्ये येत आहेत व प्रमोशन करत आहेत. तसेच आजपर्यंत का आले नाही? यावरही चर्चा झाली. तर दुसर्‍या बाजूने अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी याठिकाणी येऊन आम्हाला पाठिंबा दिला हे सर्वात महत्त्वाचे आहे. या गोष्टींवरही चर्चा झाली. प्रत्येकाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून ट्रोल केलं, चर्चा केली, पोस्ट व्हायरल केल्या, व्हिडीओज अपलोड केले. या सर्व गोष्टी युवकांना नवी दिशा देत आहेत. असे एकीकडे बोलले जाते पण याचे भविष्य काय ? हा एक प्रश्नच आहे.

आपल्या आजूबाजूच्या परिसरापासून ते जागतिक पातळीवर घडत असलेल्या सर्व घडामोडी सोशल मीडियाद्वारे काही क्षणात सगळीकडे पसरतात. त्याच वेळी दुसर्‍या दिवशी काहीतरी वेगळे घडते. मग पाठीमागचा मुद्दा फक्त लाईक पुरताच मर्यादित राहतो. काही नव्याच्या शोधात मात्र आम्ही स्वतःला विसरत चाललो आहोत. व्यक्त तर होतोय पण आभासी जगात. हेच आभासी जग आम्हाला एका गर्दीचा भाग बनवत आहे. सोशल मीडियावर एक वेगळीच गर्दी पाहायला मिळते. ती म्हणजे नवीन काहीतरी घडते का..? किंवा घडले असेल आणि मी वापरत असलेल्या सोशल मीडियातील अ‍ॅपवर जास्तीत जास्त ती गोष्ट व्हायरल होत असेल, तर वापरकर्ता म्हणून मीसुद्धा त्याला फॉरवर्ड केले पाहिजे. (ते माझे आद्यकर्तव्य समजून…) हाच अलिखित नियम सोशल मीडिया वापरणार्‍या युवकांच्या मनात भिनलेला आहे.

एक इतिहास असाही आहे की, सत्तेचा गैरवापर झाल्यानंतर किंवा इतर कोणीही अन्यायकारक वर्तन केले, तर त्याला विरोध हा होतच असतो. वर उल्लेख केला त्याप्रमाणे त्या-त्या काळातील साधने आणि माध्यमे बदललेली असतात. आज युवकांच्या हातात सोशल मीडिया नावाचे एक प्रभावी माध्यम आहे, ते योग्य रीतीने वापरले गेले पाहिजे किंवा वापर होत आहे का..? याकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा घातक आहे. जे युवक या देशाचे भविष्य आहेत, त्यांचे चोवीस तासांपैकी १६ ते १७ तास जर सोशल मीडियाचा वापर करण्यामध्ये जात असतील तर इतर अनेक गोष्टी त्यांच्या आयुष्यातून वजा होत आहेत. अपडेट राहण्याच्या प्रक्रियेत आयुष्य आउटडेटेड व्हायला वेळ लागत नाही. भोवतालच्या जगाकडे डोळस नजरेने पाहता यावे. एका वेळेनंतर यंत्र आपल्याला वापरायला लागले की, आपली अधोगती ठरलेली असते. त्यासाठी वेळ ठरवून वापर व्हावा. माध्यमे समाजाशी जोडली गेली व त्यांच्याद्वारे राष्ट्रउभारणीसाठी दिशा मिळाली तर हिताचे आहे. सोशल मीडियाच्या सहवासात युवकांना खूप काही मिळत आहे. पण यातून खूप काही हातातून सुटत आहे. हे मान्य करावे लागेल. योग्य वेळी-योग्य वापर. ही पोस्ट लाईक, कमेंट, फॉरवर्ड आणि शेअर झाली तर प्रत्येकाच्या वेगळ्या स्टेटसचा दिवस जवळ असेल जो यशाच्या पाऊलखुणा दाखवेल.

धम्मपाल जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -