घरफिचर्ससारांशनातं तीर्थरूपी वडिलांचं !

नातं तीर्थरूपी वडिलांचं !

Subscribe

आईकडे अश्रूंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते आणि रडणार्‍या पेक्षा सांत्वन करणार्‍यावर जास्त ताण पडत असतो. कारण आई जर दिव्याची ज्योत असेल जी पूर्ण घराला प्रकाश देते तर वडील म्हणजे समई त्याची जबाबदारी ज्योतीला आधार देण्याची. समईचे स्वतःला चटके बसवून घेण्याचे दुःख आपल्याला कधीच कळत नाही. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वासमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात.

माझ्या एकदम डोळ्यात पाणी आलं आणि कितीतरी दिवस ही गोष्ट मनात घोळत राहिली. तेव्हा कळलं की वडील हे रोजच्या रोज समजून घेण्याची गोष्ट आहे. दिवसागणिक ते अधिकाधिक समजत जातात.

तीर्थरूप या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाते म्हणजेच वडील, तीर्थरूप म्हणजे जे तीर्थासमान आहेत ते ! हिंदू धर्मात तीर्थ हे सर्वात पवित्र आणि अनेक जन्माचा उद्धार करणारे मानले जाते, त्याचप्रमाणे वडील हे आपल्या मुलांचा त्या जन्माचा उद्धार करतात म्हणून वडिलांना तीर्थरूप हा शब्द !

- Advertisement -

मी ज्या पिढीत जन्माला आलो त्या पिढीमध्ये वडिलांना घाबरण्याची आणि त्यांना अहो जाहो करून हाक मारण्याची पद्धत आहे. वडिलांनी एक आवाज चढवला तरी अंग थरथरायचं. आपण काही बरं वाईट केलं तर बाबा काय म्हणतील ही भीती सतत असायची. (अजुनही आहे). त्यामुळे काहीही फाल्तुपणा करताना दहा वेळा विचार व्हायचा. चांगले मार्क मिळाले तर कॉलर ताठ करून सही घ्यायला जायचं आणि कमी मार्क मिळाले की खोटी सही जमतेय का याचा सराव व्हायचा.

आपल्या नावाच्या मागे बापाचं नाव लागत असल्यामुळे आपल्या चांगल्या वाईट कृत्यांना बाप जबाबदार असण्याचा तो काळ होता. म्हणजे आई नेहमी म्हणते की मुलगा कर्तृत्ववान निघाला तर त्याचं श्रेय बापाला जातं आणि वाईट झालं तरी आईच्या संस्काराच्या नावाने बिल फाटतं.जसं वय वाढतं तशी बापाची महती कळते. विशेषत: कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांचा राग येण्याचं प्रमाण वाढतं. दुनियेतला सगळ्यात वाईट बाप आपल्याला मिळाला की काय असंसुद्धा वाटतं. पण एकदा घराबाहेर पडलं की मग बाप खूपच समजू लागतो. मर्यादित पैशात खर्च भागवावे लागले की मग बापाने आपल्याला कसं वाढवलं असेल ते कळतं.

- Advertisement -

आईकडे अश्रूंचे पाठ असतात ती रडून मोकळी होते, पण सांत्वन वडिलांनाच करावे लागते आणि रडणार्‍या पेक्षा सांत्वन करणार्‍यावर जास्त ताण पडत असतो. कारण आई जर दिव्याची ज्योत असेल जी पूर्ण घराला प्रकाश देते तर वडील म्हणजे समई त्याची जबाबदारी ज्योतीला आधार देण्याची. समईचे स्वतःला चटके बसवून घेण्याचे दुःख आपल्याला कधीच कळत नाही. रोजच्या जेवणाची सोय करणारी आई आपल्या लक्षात राहते, पण आयुष्याच्या शिदोरीची सोय करणारा बाप आपण किती सहज विसरून जातो. आई सर्वासमोर मोकळेपणाने रडून दुःख व्यक्त करते पण रात्री उशीत तोंड खुपसून मुसमुसतात ते आपले वडीलच असतात.

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कित्येक नवीन नाती निर्माण होतात, पण आयुष्यभर सोबत रहाणारं आणि टप्प्या-टप्प्यावर नव्याने उलगडणारं केवळ एकच नातं असतं आणि ते म्हणजे आई-वडिलांसोबत असणारं आपलं! माझे आई-बाबा म्हणजे माझ्या जीवनाचे ते दोन खांब, जे माझ्या अडखळत्या रस्त्यावर माझ्या मदतीसाठी खंबीर उभे असतात. मार्ग तोच, खड्डे तेच पण किस्से वेगळे, मदत वेगळी. अशाच काही आठवणींनी आज पुन्हा एकदा मला भेट दिली.

घराला जसे आईमुळे घरपण असते तसे आई नसेल तर घराला काही अर्थ नसतो. त्याचप्रमाणे घरामध्ये वडिलांचे असणेसुध्दा गरजेचे असते. प्रत्येकाला आई ही जवळची असते कारण आई ही प्रेमळ असते. ती जेवढी रागावते त्याच्या कितीतरी जास्त ती आपल्यावर प्रेम करते. बाबा पण प्रेम करतात पण फक्त बाबांचे प्रेम हे अबोल असते, त्यांना त्यांचे प्रेम व्यक्त करता येत नाही, मग सगळ्यांना असे का वाटते की बाबा हे वाइट असतात ते ओरडतात, चिडतात, रागवतात याचे खरे कारण आई ही ओरडली तरी चांगली असते कारण त्यात तीची प्रेमळ माया असते, परंतु बाबांना थोडा वाईटपणा हा घ्यावाच लागतो आणि आपण बाबांना गृहीत धरतो. बाबा बोलायला, ऐकायला, बघायला, रागवायलाचं असतात का? खरंच आपल्याला बाबा काय हे कळले आहे का? तेव्हा उत्तर नाही असे आले. मग मी विचार केला की माझे बाबा कसे आहे यावर लिहावे. बाबा हा विषय मुळात माझ्यासाठी खूपच भावूक आहे. आईवरती तर सगळेचं लिहितात, बोलतात, प्रेम करतात पण तरी बाबांशी असलेल नातं खूपच वेगळे आहे. त्याच बाबांवरच्या प्रेमाने एक गोष्ट कळली की बाबा हेसुध्दा प्रेमळ असतात.

बालपण हे खेळण्याचं वय. एवढ्याशा हाताने बाबांचं बोट धरून चालता-खेळताना मी बर्‍याचदा धडपडायचो, लगेच रडायला लागायचो. तेव्हा बाबांनी कडेवर घेतल्याशिवाय व आईने मायेचा हात फिरवल्याशिवाय माझे शांत होणे असंभव असायचे. मला पाडल्यामुळे त्या बिचार्‍या जमिनीला बाबांनी रागावल्याचा आनंद काही वेगळाच असायचा. असं म्हटलं जातं की वडील हे फक्त रागावण्यासाठी आणि शिस्त लावण्यासाठी असतात. माया करण्याचा मक्ता फक्त आईकडेच असतो. वरवर पाहता हे बरोबर वाटते.

रूप आईकडून मिळालं असलं तरी अंगी बाबांचे गुण आहेत हे आईकडून कायम ऐकायला मिळतच. मी तुमचा मुलगा आहे हे माझ्यासाठी अभिमानाने सांगण्याची गोष्ट आहे, पण अजून खूप काही शिकायचं बाकी आहे तुमच्याकडून बाबा. बाबाच आमच्यासाठी सर्वस्व आहेत. ठेच लागली की, ‘अगं आई’ असे शब्द बाहेर पडतात पण संकट आले की आपोआपच ‘अरे बापरे’ असे तोंडातून शब्द येतात. माझ्या वडिलांचे कुटुंबावर खूप प्रेम आहे. वडिलांचे मन कुटुंबाशिवाय कुठे रमत नाही. आम्ही कुठे बाहेर गेलो की, घरात येईपर्यंत त्यांना खूप काळजी लागून राहते. जन्मापासून करिअर घडविण्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईच आपल्या सोबत असते. मात्र, आपल्याला आयुष्यात काय हवे आणि काय नको, याची पूर्तता करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट उपसणारे बाबाच असतात. बाबाच माझे भक्कम आधार आहेत.

बाबांनी माझ्यासाठी लहानपणी जेवढे केले तेवढे जगातील कुठलेच बाबा करत नसतील. असे बाबा मला मिळाल्यामुळे माझे जीवन धन्य झाले. दुसर्‍या जन्मातही हेच बाबा मिळावेत, असे मी देवाकडे मागणे करीन. आईच्या पायाखाली स्वर्ग असतो, तर बाबा स्वर्गाचे दार असतात. अजून खूप मोठा होऊन मला बरीच कामे करायची आहेत. काही पैशासाठी तर त्यापेक्षा जास्त नाव लौकिक करण्यासाठी, काही संस्कारात्मक तर काही कौटुंबिक अशा प्रत्येक कामात माझ्या बाबांचा आशीर्वाद मोलाचा असतो.

– संकेत शिंदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -