घरफिचर्ससारांशइलेक्ट्रॉनिक्स रोजगार संधींच्या ‘त्सुनामीचे बूम’!

इलेक्ट्रॉनिक्स रोजगार संधींच्या ‘त्सुनामीचे बूम’!

Subscribe

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला एक लाख कोटी रुपयांहून अधिक अनुदान मिळेल. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत, नाही तर फाईव्ह जी मोठी त्सुनामी घेऊन येईल. सरकारने अनुदान द्यायचे ठरविल्याने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात चार अब्ज कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक होणार आहे. यामुळे आगामी दशकात या क्षेत्रात दोन कोटी लोकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण होतील. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्या कल्पना व विचार यावेत यासाठी सरकारने १० ते २० हजार कोटी रुपयांचा एक व्हेंचर फंड बनविण्याची योजना बनवली आहे. या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकार एक खास पॅकेज बनवीत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स रोजगार संधींच्या ’त्सुनामीचे बूम’ आले आहे जे पुढील काळात वाढेल व टिकेल. जगभर व भारतात महाराष्ट्रातदेखील संधींची त्सुनामी इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहे. या संथीचे सोने करणे आता विद्यार्थ्यांच्या हातात आहे.
शिक्षण क्षेत्रात मोठ्या बदलांचे भूकंप इलेक्ट्रॉनिक्समध्ये विशषत: आर्टिफिशल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), बायोइन्फॉमटीक, डाटा सायन्स आदी विषयांची डिमांड वाढली आहे. महाविद्यालये यासाठी सुसज्ज होत आहेत. शिक्षण क्षेत्रात मोठे बदल घडून येत आहेत. फ्लिप क्लासरूम आणि इंटेलिजन्ट रोबोट हे सक्षम प्राध्यापकांची निर्मिती व गरज भरून काढत आहेत. महाविद्यालये तयारीला लागली आहेत. अ‍ॅटानॉमस म्हणजे स्वायत्त महाविद्यालयांच्या स्पर्धेत लायकच टिकेतील हे ओघाने आलेच. परिणामी बदलांचे भूकंप सुरू झाले आहेत. परदेशी विद्यापीठांशी हातमिळवणी करीत ‘महागुरू’ ठरण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रात ‘गुरूं’ची पळवापळवी सुरू झाली आहे हे कुणी मान्य करो वा ना करो पण हे सत्य आहे.

पुढे काय?

- Advertisement -

फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथस, स्टॅट आदी ए ग्रुपमधील सर्व विषय महत्वाचे व समाजासाठी व मानवी सभ्यतेच्या अस्तित्वासाठी मोलाचेच आहेत. कुठल्याही विषयाला कमी लेखण्याचा या लेखाचा व लेखकाचा उद्देश मुळीच नाही. मात्र पुढे काय हा विचार करीत जेव्हा विषय निवडीचा आयुष्यातला ‘स्कोप’ व प्राधान्यक्रम ठरतो तेव्हा आपले अस्तित्व टिकविणे विद्यार्थ्यांना जास्त महत्वाचे वाटते आहे. विद्यान-तंत्रद्यानाची निवड करताना इलेक्ट्रॉनिक्सला आवडीनुसार प्राधान्यक्रम सध्याच्या काळात नक्कीच सुमधूर फळे देईल. गव्हर्मेंट पॉलिसी, डिमांड सप्लाय रेशिओ आणि गरज या तीन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत, ज्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रॉनिक्स विषय प्राधान्याने स्वीकारणार्‍या व्यक्ती जीवनात यशस्वी ठरतील.

नाशिकमध्ये संधीचा पूर
नाशिक शहराजवळ आडगाव येधे सुमारे ७००० कोटी रूपये केंद्र सरकारने मंजूर करीत ३५० एकर जमिनीवर पुण्यापेक्षा अद्यावत आयटी उभारणीला परवानगी नुकतीच दिली आहे. परिणामी सुरू झाली आहे. आपली कंपनी नाशिकमध्ये उभारावी यासाठी परदेशातील कंपन्या व भारतातील कंपनयांमध्ये चढाओढ असणार आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा नाशिकमथील ग्रामीण भागातील युवकयुवतीच नाही तर महाराष्ट्रातील व देशातील विद्यार्थी आता मल्टिनॅशनल कंपन्यांत दिमाख्याने काम करतील. गुगल, टेस्ला, अ‍ॅपल, मेटा-फेसबुक, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, रिलायंस, एअरटेल आदी अनेक कंपन्या नाशकात असतील.

- Advertisement -

पुढिल तीन कारणांमुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात जगभर त्सुनामी आली आहे.

१. गव्हर्मेंट पॉलिसी

गेले एक दशकापासून केंद्र सरकार देशातील इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राचा विकास करण्याची योजना राबविण्यासाठी गांभीर्याने लक्ष देत टप्प्याटप्प्याने पावले उचलत आहे.

२. डिमांड सप्लाय रेशिओ

शिक्षणात सर्व विषय हे महत्वाचेच आहेत. आवड असली तर टोकाचा संघर्ष करीत बिकट परीस्थितीवर व्यक्ती मात करते. आपला नवा मार्ग बनवित वेगळा ठसा उमटवला अशी शेकडो उदाहरणे इतिहासात होती आणि शोधली तर वर्तमानातदेखील सापडतील. प्रश्न हा आहे की आपल्या मर्यादांवर मात करीत आपल्या क्षमता व कुवतीनुसार उपलबध रिसोर्सेस म्हणजे साधनसामुग्रीनुसार आपण किती काळ संघर्ष करू शकतो.

इलेक्ट्रॉनिक्ससारखा प्रशस्त राजमार्ग म्हणजे हायवे उपलब्ध असताना उगीच काट्याकुट्याच्या जंगलात घुसत वेळ, पैसा आणि आपल्यासोबतचे मित्र-मैत्रिणी आर्थिक स्वातंत्र्य व सुबत्ता चाखत असताना आपण उपाशी का व किती काय रहावे? अर्थात चॉईस इज अवर सो हौसेला मोल नसते! त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इग्नोर करताना वस्तुस्थिती एकदा समजून मग निर्णय घेतला तर त्याला दाद द्यायला हवी. कारण सर्वांनी इलेक्ट्रॉनिक्सच घेत आपले जीवन सुखी करावे असे सांगणे सुयोग्य ठरणार नाही. तसेच डिमांड सपलाय रेशिओदेखील यामुळे गडबडेल.

विषय निवड करत असताना आजबाजूची परीस्थिती खूप महत्वाची ठरते. तसेच सरकारचे धोरण व गरज तसेच उपलब्ध मागणीचा पुरवठा समजून घेणे गरजेचे ठरते.

३. गरज

एक सुयोग्य अल्गोरीदम लिहिला तरी तो आकडेमोड करणार्‍या लाखो गणित व सांख्यिकीय म्हणजे स्टॅटीस्टीक्सच्या माणसांची एका फटक्यात गरज संपवून टाकतो. केमिकल कंपन्यांचा कितीही प्रचंड दबाव असला तरी कॅन्सरने होणारे मृत्यू आणि क्रयशक्ती घटत वाढणारा आरोग्यखर्च याबाबत केंद्र सरकार गांभीर्याने दूरगामी परिणामांचा विचार करून धोरणे राबवित आहे. सेंद्रीय शेतीला व इतर अनेक क्षेत्रातदेखील रोजगार निर्मिती होताना घातक रसायनांवर कडक निर्बंध हे ओघाने आलेच. सो केमिस्ट्री म्हणजे ही हिस्ट्री बनणार नसली तरी आपल्या जीवनाची मिस्ट्री करेल की, कसे हे ज्याने त्याने चेक करीत सत्य पहावे. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र व मॅथेमॅटिक्स गणित आणि स्टॅटेस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र (सांख्यिकी) या विषयांची अपरिहार्यता आता इंजिनियरींग म्हणजे अभियांत्रिकीत आता संपुष्टातच आली आहे. नवीन एज्युकेशन पॉलिसीत याबाबत स्पष्ट बदल अधोरेखित होत आहेत. यामुऴे संशोधन करणार्‍या व्यक्तिंसाठी हे विषय पर्यायी म्हणजे एक ऑप्शन ठरत अस्तित्वाच्या लढाईत संघर्ष करीत नक्कीच टिकेल.

इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला एक लाख कोटी रुपयांहून अधिक अनुदान मिळेल. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहेत, नाही तर फाईव्ह जी मोठी त्सुनामी घेऊन येईल. सरकारने अनुदान द्यायचे ठरविल्याने इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात चार अब्ज कोटी रुपयांहून जास्त गुंतवणूक होणार आहे. यामुळे आगामी दशकात या क्षेत्रात दोन कोटी लोकांसाठी नोकरीच्या संधी निर्माण होतील. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नव्या कल्पना व विचार यावेत यासाठी सरकारने १० ते २० हजार कोटी रुपयांचा एक व्हेंचर फंड बनविण्याची योजना बनवली आहे. या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकार एक खास पॅकेज बनवीत आहे. या पॅकेजअंतर्गत कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादनापर्यंत प्रोत्साहन व्हॅल्यू चेन उपलब्ध होणार आहे. अनुदान पात्रतेसाठीच्या अटीही शिथिल झाल्या आहेत. आता कंपन्यांसाठी १०० कोटींऐवजी १ कोटी रुपये अशी मर्यादा करण्यात आली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील कंपन्या अधिक वेगाने प्रगती साधू शकतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -