घरफिचर्ससारांशथिंक पॉझिटिव्ह!

थिंक पॉझिटिव्ह!

Subscribe

काहीही असो पण चित्रपटातून समाजाला काहीतरी सांगण्याचा काळ गेला आहे. आता काही आशयघन चित्रपट येतात, पण ते चालतीलच याची काही शाश्वती नसते. अनेकदा उथळ चित्रपट बेफाम चालतात. ते एवढे कसे काय चालले याचे उत्तर बहुधा त्याच्या निर्माता-दिग्दर्शकांसह कोणाकडेच नसेल. चित्रपट चालण्यासाठी काही वेळा वाद कारणीभूत ठरतात. आता हे वाद होतात की निर्माण केले जातात, हाही प्रश्नच आहे. काहींची पब्लिसिटी केली जाते, तर काहींना सहजगत्या पब्लिसिटी मिळते. सकारात्मक चित्रपटांना चोखंदळ प्रेक्षक उचलून धरतात एवढे मात्र नक्की. याचे उदाहरण म्हणून थ्री इडियट्स आणि जब वुई मेट या दोन चित्रपटांची नावे घेता येतील.

-मनोज जोशी

‘कोंबडी आधी की अंडं आधी?’ या प्रश्नाप्रमाणेच ‘चित्रपटाचा जनमानसावर परिणाम होतो की समाजात घडणार्‍या घटना पडद्यावर दाखविल्या जातात?’ हादेखील ठोस उत्तर नसलेला प्रश्न आहे. अभिनेते विजू खोटे यांच्याबरोबर चर्चा करताना याबद्दल त्यांचे मत विचारले होते. ते म्हणाले की, चित्रपटाचा जनमानसावर निश्चितच परिणाम होतो, पण हेही सत्य आहे की वास्तवात घडणार्‍या घटनाही चित्रपटात प्रतिबिंबित होतात, पण त्यातील अनेक घटना या पंचक्रोशी किंवा त्या राज्यापर्यंत मर्यादित असतात, पण त्या चित्रपटांद्वारे देशभरच नव्हे तर जगभरात पोहचतात.

- Advertisement -

काहीही असो पण चित्रपटातून समाजाला काहीतरी सांगण्याचा काळ गेला आहे. आता काही आशयघन चित्रपट येतात, पण ते चालतीलच याची काही शाश्वती नसते. अनेकदा उथळ चित्रपट बेफाम चालतात. ते एवढे कसे काय चालले याचे उत्तर बहुधा त्याच्या निर्माता-दिग्दर्शकांसह कोणाकडेच नसेल. चित्रपट चालण्यासाठी काही वेळा वाद कारणीभूत ठरतात. आता हे वाद होतात की निर्माण केले जातात, हाही प्रश्नच आहे. काहींची पब्लिसिटी केली जाते, तर काहींना सहजगत्या पब्लिसिटी मिळते. सकारात्मक चित्रपटांना चोखंदळ प्रेक्षक उचलून धरतात एवढे मात्र नक्की. याचे उदाहरण म्हणून थ्री इडियट्स आणि जब वुई मेट या दोन चित्रपटांची नावे घेता येतील.

काही चित्रपटांच्या बाबतीत सादरीकरण आणि नावीन्याचा प्रयोग कामी येतो, तर काही चित्रपट अतिभडक असल्याने तिकीटबारीवर ते यशस्वी ठरतात. आता १९८६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कर्मा’, त्याआधी १९७५ मधील सुपरडुपर हिट ‘शोले’ आणि १९५७चा ‘दो आँखे बारह हाथ’ या तिन्ही चित्रपटांबाबत म्हणता येईल. या तिघांचे कथानक जवळपास सारखेच आहे. एका वाक्यात सांगायचे झाले तर समाजाने ज्यांना नाकारले आहे, अशा गुन्हेगारांच्या मदतीनं एक विधायक कार्य करायचे.

- Advertisement -

त्यापैकी ‘कर्मा’ आणि ‘शोले’मध्ये गुन्हेगारांचा वापर कुख्यात गुन्हेगाराला जेरबंद करण्यासाठी केल्याचे पाहायला मिळते. अगदी फिल्मी भाषेत सांगायचं झालं तर ‘लोहा लोहे को काटता है’! (‘शोले’तलाच डायलॉग). ‘कर्मा’मध्ये फाशीची शिक्षा ठोठावलेले बैजू ठाकूर (जॅकी श्रॉफ), जॉनी (अनिल कपूर) आणि खैरुद्दीन चिश्ती (नसिरुद्दीन शाह) हे तिघे कुख्यात अतिरेकी डॉ. डँग (अनुपम खेर) याचा खात्मा करतात. ‘शोले’तही गब्बर सिंग (अमजद खान) याला पकडण्यासाठी जय (अमिताभ बच्चन) आणि वीरू (धर्मेंद्र) या दोन भुरट्या चोरांची मदत घेतली जाते.

एखाद्या अतिरेक्याला किंवा डाकूला जेरबंद करण्यासाठी गुन्हेगारांची मदत घ्यावी लागणे हे तर्कसंगत नाही. तरी ते बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. मुळात अशा गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी आपले सुरक्षा दल किंवा पोलीस दल कमकुवत तर निश्चितच नाही. नावीन्यपूर्ण सादरीकरण (शोले, ७० एमएम आणि साऊंड इफेक्ट) आणि अतिरंजकता (कर्मा) यामुळे दोन्ही चित्रपट चालले.

‘दो आँखे बारह हाथ’ चित्रपटात सहा सराईत गुन्हेगारांना सोबत घेऊन जेलर आदिनाथ (व्ही. शांताराम) एका पडीक जमिनीचे सोने करतो. त्यावर पिकणार्‍या भाजीपाल्याला बाजारात चांगली मागणी असते. इथेच हा सिनेमा इतर दोन चित्रपटांच्या तुलनेत वेगळा ठरतो. गुन्हेगारांना पुन्हा गुन्ह्याच्या मार्गावर नेण्यापेक्षा कैद्यांना श्रमाचे महत्त्व पटवून देत स्वत:च्या पायावर उभे करणे महत्त्वाचे आहे. हाच सकारात्मक विचार चित्रपटाला स्मरणीय करतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -