Homeफिचर्ससारांशTorres Scam : वेड्यांचा बाजार...

Torres Scam : वेड्यांचा बाजार…

Subscribe

जगातील २८ देशांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या आकडेवारीत भारत २३ व्या स्थानावर आहे, यावरून देशातील आर्थिक साक्षरतेची गरज लक्षात येते. एका रिपोर्टनुसार, भारतात, अजूनही ७० टक्क्यांहून अधिक नागरिक हे आर्थिक साक्षर नाहीत. त्यामुुळे भारतात टोरेससारख्या पाँझी स्किम मोठ्या प्रमाणात वाढतात. तसेच अशा घोटाळेबाजांवर कडक कारवाई आतापर्यंत झालेली नाही हे वास्तव आहे. असे घोटाळे झाल्यावर गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यावर सरकारी यंत्रणांनासुद्धा मर्यादा पडतात. अशा घटना पुन्हा पुन्हा घडूनही लोक शहाणे होत नाहीत. त्यामुळे याला वेड्यांचा बाजार असेच म्हणावे लागेल.

-रोशन चिंचवलकर

साल १९२०. अमेरिकेतील बोस्टनच्या ‘बोस्टन पोस्ट’ या वर्तमानपत्रात नागरिकांना कशा प्रकारे अवास्तव परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले जात आहे,आणि त्यांची फसवणूक होत आहे, याबाबत वृत्त छापून येते. याबाबत पुढे आठवड्याला या फसव्या गुंतवणूक स्कीमबाबत लेखांची मालिकादेखील चालवली जाते. Thousands of people money trapped in Torres Ponzi scheme crores of rupees

- Advertisement -

या सर्व वृत्ताच्या केंद्रस्थानी असते,ती अमेरिका आणि इतर काही देशांत गुंतवणूकदारांना आमिष दाखवून फसवणूक करणारी योजना(स्कीम) आणि या सर्वाचा कर्ताधर्ता, या स्कीमचा सर्वेसर्वा चार्ल्स पाँझी. ज्याच्या नावाने जगभरात अशा फसव्या गुंतवणूक स्कीमना पाँझी स्कीम असे नाव पडले. या चार्ल्स पाँझीचा जन्म १८८२ सालचा इटलीतला. पाँझीला पहिल्यापासूनच मौजमजा आणि जुगाराची हौस होती.त्यात त्याने कित्येक पैसे गमावले देखील होते. साल १९०३ मध्ये कामाच्या आणि आयुष्याला एक नवी दिशा देण्याच्या उद्देशाने पाँझीने अमेरिकेची वाट धरली.

१९०६ साली युनीवर्सल पोस्टल युनियन (जी एक संयुक्त राष्ट्रांची संस्था सदस्य राष्ट्रांसाठी स्टॅम्पसंबंधी नियम ठरवते) या संस्थेने आयआरसी म्हणजेच इंटरनॅशनल रिप्लाय कुपन सुरू केले.या कुपनची सोय ही की एखाद्याला इटलीतून अमेरिकेत डाक पाठवायचे आहे तर तो आपल्या पार्सलसोबत एक आयआर कुपन जोडायचा.ज्याने अमेरिकेत जो माणूस डाक स्वीकारणार आहे,त्याला पुन्हा त्या पत्राचे उत्तर देताना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नसायची.

- Advertisement -

दोन देशांतील डाक सेवेदरम्यान या कुपनचा वापर केला जात होता. दोन देशात या कुपनची किंमत वर खाली होत असायची. परंतु, पहिल्या महायुद्धानंतर इटलीतील या कुपनची किंमत कमी झाली.त्याचाच फायदा घेत पाँझीने या आयआर कुपनचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी लागणार्‍या गुंतवणुकीसाठी पाँझी बँकाकडे गेला. परंतु,त्याला तिथे गुंतवणूक मिळाली नाही.त्यानंतर त्याने सिक्युरिटी एक्सचेंज कंपनी स्थापन करून सामान्य गुंतवणूकदारांना या व्यवसायात दलालांच्या माध्यमांतून गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

या गुंतवणूकदारांध्ये अमेरिका,इंग्लंड यांसारख्या देशातील काही मोठ्या व्यक्तींचा देखील समावेश होता.ज्या काळात अमेरिकेत बँका वार्षिक ५ टक्के परतावा देत होत्या,त्या काळात पाँझीने गुंतवणूकदारांना ४५ दिवसांत दीड पट आणि ९० दिवसांत दुप्पट पैसे त्यांच्या गुंतवणुकीवर देण्याचे आमिष दाखवले. जे व्यावहारिकदृष्ठ्या शक्य देखील नव्हते. परंतु,बरेच जण यात फसले.अखेर तपासात बर्‍याच बाबी समोर आल्या. त्यातील महत्वाची बाब म्हणजे पाँझी ज्या आयआर कुपनचा व्यवसाय दाखवत होता.

ते कुपन २७ हजारांपेक्षा जास्त उपलब्धच नव्हते, शिवाय कुपन व्यवसायाची ही यंत्रणा सांभाळायला एवढा खर्च होता,की पाँझी जे ४०० टक्के परतावा आपल्याला या व्यवसायातून मिळतो असे सांगत होता, तोदेखील शक्य नव्हता. परंतु,तरी देखील जवळपास २६०० कोटींचा हा घोटाळा झाला. पाँझीला शिक्षा जरूर मिळाली, परंतु बर्‍याच गुंतवणूकदारांनी आपले सर्वस्व गमावले. चार्ल्स पाँझीच्या नावाने पुढे आलेल्या या स्कीम १०० वर्षांनंतरही चालूच आहेत.त्याआधीही त्या चालूच होत्या.परंतु,कुपन हे एक प्रोडक्ट दाखवून दुप्पट, तिप्पट परताव्याला लोक त्यावेळी भुलत होती,आजही भुलत आहेत.

याचे मूर्तीमंत उदाहरण, म्हणजे मुंबई आणि आजुबाजूंच्या शहरांत गाजत असलेला टोरेस घोटाळा. टोरेस पाँझी स्कीममध्ये मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांतील हजारो जणांचे करोडो रूपये अडकले आहेत. पाँझीच्या कुपनप्रमाणे या टोरेस स्कीममध्ये मोझोनाईट स्टोन हे प्रोडक्ट दाखवून गुंतवणूक दारांना आठवड्याला ४ टक्के, ६ टक्के आणि ११ टक्के परताव्याचे आमिष दाखवण्यात आले.

या मागे एक योजना आखून गुंतवूकदारांना गाड्या,घरे यांचे प्रलोभन समोर करण्यात आले. जे एजेन्ट बनून जास्तीत जास्त गुंतवणूकदार आणतील त्यांना ५० गुंतवणूकदारांमागे महिन्याला २५ हजार रूपयांचा पगार देण्याचे आश्वासन पण या कंपनीने दिले.यात बरेच गुंतवणूकदार आणि त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडणारे दलाल गुरफटले आहेत, जेव्हापासून मुंबईसह या टोरेस कंपनीच्या इतर शाखांना टाळे लागले आहे.

मुळात टोरेस कंपनीने दिलेल्या मोझोनाईट स्टोन या हिर्‍याची किंमत बाजारात विशेष काही नाही, हे बर्‍याच गुंतवणूक दारांना माहीत देखील होतं. परंतु, ४ टक्के, ६ टक्के आणि नवीन वर्षाच्या सुरूवातीला जे ११ टक्के परताव्याचे आमिष दाखवण्यात आले, या आमिषाला बरेच जण फसले आहेत. जेवढी जास्त गुंतवणूक तेवढा परतावा जास्त हा डाव टाकून कंपनीने बर्‍याच जणांचे पैसे घेतले आहेत.

आपल्या देशात नेटवर्क मार्केटिंग, स्टॉक मार्केटमध्ये अवाजवी परताव्याचे आमिष, चिटफंड, कृषी उत्पादने, डीजिटल कॉईन यांच्या नावाने अनेकांची आतापर्यंत मोठ्या प्रमाणात फसवणूक झालेली आहे. शारदा चिटफंड घोटाळा, कडकनाथ असे गुंतवणुकीच्या नावाने अनेक आर्थिक घोटाळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत. तरीही लोक टोरेसला फसले. विशेष म्हणजे यात अनेक शिकले सवरलेले लोक आहेत.

फक्त भारतच नव्हे तर जगभरात अशा पाँझी स्किमच्या आमिषांना अनेकजण बळी ठरले आहेत. अगदी चार्ल्स पाँझीच्या आधी देखील अशा प्रकारचे घोटाळे झाले असतील. त्यातील बर्‍याच जणांना त्यांनी गुंतवलेली रक्कम पुन्हा मिळाल्याची उदाहरणे बरीच कमी आहेत. तरी देखील दिवसेंदिवस अशा आमिषांनी भरलेल्या स्कीमना लाखो लोक बळी पडत आहेत. कष्ट न करता अल्पावधीत जास्त फायदा मिळवण्याची मानवी वृत्ती याला कारणीभूत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -