घरफिचर्ससारांशपैशांपेक्षा वेळ मूल्यवान !

पैशांपेक्षा वेळ मूल्यवान !

Subscribe

तुम्ही ठरविलेल्या नियोजनामध्ये बदल करायचा असेल, तर नि:संकोचपणे बदल करा. कारण, या बदलातून तुम्हाला हव्या त्या गोष्टी साध्य करणे शक्य होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, वेळ ही अशी गोष्ट आहे की, जी पैशापेक्षाही मूल्यवान आहे. त्यामुळे वेळ हाच खरा पैसा आहे, असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण आपण पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो. पण वेळ कधीच विकत घेऊ शकत नाही. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही हे वैश्विक सत्य आहे.

‘वेळ ही कोणासाठी थांबत नाही’ असे वाक्य या न त्या कारणाने वा उदारहणातून आपण वारंवार ऐकत असतो. वेळेच्या बाबतीत हे सार्वत्रिक सत्य आहे की, वेळेची परीक्रमा ही तिच्या नियोजनानुसारच होत असते. तुम्हाला हवी असलेली कोणतीही गोष्ट तुम्ही स्वतः मिळवू शकता हा आत्मविश्वास असणे हे फार महत्त्वाचे आहे. कोणतेही काम स्वतः कडून पूर्ण करून घेण्याचा आणि अपेक्षित परिणाम मिळवून देण्याचा आत्मविश्वास बाळगा. त्यामुळे अशा बहुमूल्य वेळेचा सदुपयोग करून घेतला, तर निघून जात असलेल्या वेळेबद्दल कधीच वाईट वाटणार नाही.

उलट आपल्याला हवे ते आपण वेळेत साध्य करत असल्याचा आनंद मात्र मिळत राहतो. थॉमस एडिसनने म्हंटल आहे, विचार करणं ही सर्वात कठीण प्रक्रिया आहे. म्हणून जास्तीत-जास्त लोक विचार करण्यापेक्षा मरण स्वीकारतात. जर तुम्हाला वेळेचा सदुपयोग करण्याचे आणखी चांगले मार्ग सापडवायचे असतील तर तुमच्या वेळेबद्दल जास्तीत जास्त विचार करा आणि ते केवळ योग्य अशा नियोजनाच्या आधारेच शक्य होते. अशा प्रकारे वेळेच्या सदुपयोगामुळे मिळणारा आनंद उपभोगायचा असेल, तर चांगल्या प्रकारे वेळेचे नियोजन करण्यासाठी खालील गोष्टींचा नक्कीच अवलंब करा.

- Advertisement -

सर्वप्रथम परीक्षेच्या दृष्टीने आणि वैयक्तिक नियोजनासाठी ढोबळमानाने वेळापत्रक आखून घ्या.

या वेळापत्रकात येणार्‍या महिन्यांची तारीख आणि वर त्यानुसार नोंद करून घ्या. शक्य असेल तर प्रिंट काढून घेतली तरी चालेल.

- Advertisement -

या वेळापत्रकात त्या त्या महिन्यातील परीक्षेच्या तारखा, फी भरण्याच्या तारखा, कॉलेजच्या सुट्ट्या आणि इतर उपयुक्त आणि महत्वाच्या अशा बाबींची नोंद करा. वेळोवेळी कळत जाणार्‍या माहितीनुसार, हे वेळापत्रक त्या – त्या वेळी अपडेट करत राहा. नुसता अभ्यास, परीक्षा यांचाच नव्हे, तर मित्र – मैत्रिणींचे वाढदिवस, डॉक्टरांची अपॉइंटमेंट, कोणाला भेटण्याचे वा कुठे जाण्याचे केलेले प्रॉमिस ; तसेच कुटुंबातील, नातेवाईकांच्या महत्वाच्या कार्यक्रमांच्या नोंदी त्यात आवश्य करा. यानुसार तुमचे महिन्याचे वेळापत्रक तयार होईल. या महिन्याच्या वेळापत्रकानुसार, दर आठवड्याला येणार्‍या शनिवारी- रविवारचे एक वेगळे वेळापत्रक तयार करा. महिन्याच्या वेळापत्रकामध्ये नोंद केलेल्या बाबी पुन्हा या आठवड्याच्या वेळापत्रकात नोंदवून घ्या. मग महिन्याच्या या ढोबळ वेळापत्रकावरून तुमचे आठवड्याचे पक्के वेळापत्रक तयार होईल. त्यामुळे महत्वाच्या कोणत्याही गोष्टी आपण विसरण्याच्या धोका असणार नाही.

तुमचे आजच्या दिवसाचे वेळापत्रक हे तुम्ही बनवलेल्या आठवड्याच्या वेळापत्रकानुसार आपोआपच तुमच्यासमोर असेल. त्यानुसार झोपण्याची वेळ, झोपेतून उठण्याची वेळ, क्लासची वेळ, अभ्यासाची वेळ आणि या व्यतिरिक्त आज आपण कोणत्या गोष्टी ठरविल्या आहेत त्यांचा आणि झोपताना आज केलेल्या कामांचा आणि उद्या करावयाच्या कामांचा रिव्ह्यू घ्या जेणेकरून सर्व कामे नियोजनपूर्वक व्यवस्थित होतील.

तुम्ही ठरविलेल्या या नियोजनामध्ये बदल करायचा असेल, तर नि:संकोचपणे बदल करा. कारण, या बदलातून तुम्हाला हवी ती गोष्ट साध्य करता येईल. पण वेळ ही अशी गोष्ट आहे की, जी पैशापेक्षाही मूल्यवान आहे. त्यामुळे वेळ हाच खरा पैसा आहे, असं म्हणतात ते काही खोटं नाही. कारण आपण पैशाने सर्व काही विकत घेऊ शकतो. पण वेळ कधीच विकत घेऊ शकत नाही. एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येत नाही हे वैश्विक सत्य आहे. वेळ म्हणजे त्याला सहजसोपी मिळालेली संपत्ती आहे असे वाटते. माणूस त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो, पण वेळेचा हिशोब कधीच ठेवत नाही, परंतु तो हिशोब या अचूक वेळेच्या नियोजनाद्वारे करता येऊ शकते.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका सेकंदाने हरलेल्या खेळाडूला विचारा की, वेळेचे महत्त्व काय असते. एका सेकंदाचे-एका क्षणाचे महत्व काय असते हे तीच व्यक्ती जाणू शकते की, जिने स्वतः त्या क्षणाचे महत्व जाणले आहे. यासाठी पुढील उदारहणे देखील देता येतील. एका मिनिटासाठी ट्रेन मिस केलेल्या ऑफिस कर्मचार्‍याला विचारा, तसेच एका सेकंदासाठी अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा, वेळेचे महत्त्व काय असते ते.

यश मिळवणे सोपे करायचे असेल तर माणसाने प्रत्येक काम वेळेवर करायला हवे असते. माणूस त्याच्या आयुष्यात जेवढ्या सहजपणे पैसा मिळवू शकतो तेवढ्या सहजतेने निघून गेलेली वेळ कदापि मिळवू शकत नाही. गरज पडल्यावर तुम्ही एखाद्याकडून पैसा उसना घेऊ शकता आणि तुमच्याकडे पैसा आल्यावर तुम्ही त्याला परत देऊ शकता पण गरज पडली म्हणून तुम्ही त्याच्याकडून वेळ उसनी घेऊ शकत नाही.

भविष्याची तरतूद म्हणून तुम्ही पैशाची साठवण करू शकता, धन धान्य साठवू शकता, घराची बांधणी करू शकता, पण वेळ साठवू शकत नाही म्हणूनच म्हणल जात की, गेलेली वेळ परत आणू शकत नाही. हे आपल्या आयुष्यातील वेळेचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच समाजातील तरुण वर्गाने आपल्या आयुष्यातील वेळेचे योग्य नियोजन केले पाहिजे, थोडासुद्धा वेळ वाया घालवला नाही पाहिजे. स्वावलंबी होऊन आपली काम वेळेवर केले पाहिजे. सकाळी उठल्यावर व्यायाम करणे, वेळेवर जेवण करणे, वेळेवर शाळा – कॉलेजात जाणे इत्यादी कामे वेळेवर केली पाहिजेत.

घटका गेली पळे गेली तास वाजे झणाना
आयुष्याचा नाश होतो राम कां रे म्हणाना

वरील समर्थ रामदासांच्या काव्यरचनेतून त्यांनी सर्वांना आपल्या वैयक्तिक जीवनात वेळेचे महत्त्व जाणले पाहिजे हे सांगितले. तरुणांनी नोकरी, उद्योग-धंदा करत असताना आपले कार्यालयीन काम वेळेवर पार पाडले पाहिजे, वेळेबाबत जागरूक राहणारा माणूस त्याच्या आयुष्यात कधीही अपयशी ठरत नाही, त्याला त्यात यश मिळवणे खूप सोपे जाते. आळशी वृत्तीच्या लोकांना वेळेचे महत्त्व अजिबात कळत नाही त्यामुळे अशी मंडळी थोड्याच काळात रस्त्यावर येतात. घड्याळाचे पुढे गेलेले काटे तुम्ही परत हाताने मागे घेऊ शकता पण तीच गेलेली वेळ तुम्ही परत घेऊ शकत नाही.

यशाच्या पाठीमागचे खरे कारण हे वेळ आहे. जगातील यशस्वी लोकांनी वेळेचे महत्व जाणले आहे ते त्यांचे प्रत्येक काम ठरलेल्या वेळी करतात म्हणून ती मंडळी आज यशाच्या शिखरावर आहेत. बॉलीवुडमधील हीरो अक्षय कुमार यांचेही उदाहरण यासाठी देता येईल. ते सकाळी पहाटे चार वाजता उठतात आणि व्यायाम करतात आणि दिवसाच्या कामाचे नियोजन सकाळी पहाटे करतात, त्यामुळेच ते आज एक यशस्वी हीरो बनले आहेत.

तुम्ही करत असलेली सर्वात महत्वाची आणि मौल्यवान गोष्ट म्हणजे तुमचे विचार करणे हे असते. आणि ज्याप्रकारे तुम्ही तुमच्या वेळेचा विचार करता, त्यावरून तुमच्या कामाची आणि तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरत असते.

–निकिता गांगुर्डे 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -