घरफिचर्ससारांशगुणवत्ता आहे, पाठिंबा हवा...

गुणवत्ता आहे, पाठिंबा हवा…

Subscribe

इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या जास्त आहे. भारतातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे. ते प्रत्येक खेळात अव्वल येतील ही क्षमता ठेवतात. तरीसुद्धा क्रिकेट व इतर दोन ते चार महत्वाचे खेळ सोडता आपण इतर खेळांमध्ये हवे तसे प्रावीण्य मिळवू शकलो नाही. त्याची कारणे मला वाटतं अशीही असू शकतील की व्यासपीठ मिळाल्यानंतर आपण त्या खेळाडूंना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. तुमच्या आणि आमच्या वाचनामध्ये वर्तमानपत्रात किंवा मीडियातून बातम्या येत असतात, त्या अशा की, असा एक खेळाडू पैशांअभावी खेळू शकला नाही, किंवा त्याला सुविधा मिळू शकल्या नाहीत. राष्ट्रीय पातळीवर खेळूनसुद्धा आज मोलमजुरी करतो.

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आलेल्या ऑलिम्पिक-2020चा उद्घाटनाचा सोहळा 23 जुलै 2021 रोजी टोकियो या ठिकाणी पार पडला. एकूण 206 देशातील 33 क्रीडा प्रकारासाठी वेगवेगळ्या खेळाडूंनी यात सहभाग नोंदवला आहे. यात आजपर्यंतच्या ऑलिम्पिक स्पर्धांमधील सहभागापेक्षा भारताने सर्वाधिक म्हणजेच 119 खेळाडू पाठवले. विविध खेळ प्रकारात यापैकी 52 महिला खेळाडू आणि 67 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. भारताने आजपर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण 28 पदके जिंकली आहेत. त्यापैकी 9 सुवर्ण, 7 रौप्य आणि 12 कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक पदके हॉकी या खेळ प्रकारात जिंकलेली.

बाकी मात्र पदकांचा दुष्काळ पाहायला मिळतो. युवकांचा असणारा देश म्हणून आपण गौरवाने बोलतो. पण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये मात्र आपला गौरव हरवून जातो. याची कारणं आपल्याला शोधावी लागणार आहेत. किंबहुना खेळांमधील भारताचा प्रगतीचा आलेख क्रिकेट सोडता इतर खेळांमध्ये खुजा आहे. दर चार वर्षांनी होणार्‍या ऑलिम्पिकसाठी भारतभरातून हजारो खेळाडू तयारी करतात. पण पात्रता फेरीसाठी काहीच निवडले जातात. त्यातील बोटावर मोजण्याइतके खेळाडू पात्र ठरतात. पण त्यांना यश मिळत नाही.

- Advertisement -

ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या आणि त्या संदर्भाने युट्युब तसेच फेसबुकवर काही खेळाडूंचे मुलाखतींचे व्हिडिओ पाहत होतो. त्यावेळी दोन ते तीन मिनिटांचे काही व्हिडिओ समोर आले. त्यामध्ये काठी वरून उंच उडीचा रशियाची खेळाडू येमिना, वेटलिफ्टिंगमध्ये ऑस्कर फिगोरिया, मैदानी उड्या डेईगो, रुथ बेटिया हीचा उडी प्रकारातला. अशा बर्‍याच खेळाडूंचे हे व्हिडिओ पाहताना मन स्तब्ध होऊन जातं. कारण दोन ते तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग घेऊनसुद्धा पदक न मिळणं. पण पुन्हा नव्या जोमाने फिनिक्स पक्ष्यासारखं उठून तयारी करणं आणि नंतर पदकाला गवसणी घालनं. हे फक्त तेच करू शकतात जे स्वतःच्या ध्येयासाठी झपाटलेले असतात.

त्यांची छोटीशी मुलाखत ऐकताना त्यांचा संघर्ष जेव्हा ते सांगतात. त्यावेळी माणूस थक्क होतो. की खरंच असंही असू शकतं…. अपयश ते यश यामधला प्रवास जर तुम्ही संयमानं केला तर तुमचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. हाच संदेश यातून मिळतो. येमीना जी की, खेळ सुरू असताना स्वतःशी बोलते. आणि म्हणते की, I cant lost the opportunity my way was difficult and this is the finish line I cant give up. हे तिचे शब्द स्वतःलाच आत्मविश्वास देण्यासाठी आहेत. त्यानंतर तिने मारलेली उडी आणि मिळालेले पदक हे तिच्यासाठी सर्व काही आहे. तसेच आपल्याला या सर्व अनसक्सेस स्टोरी पाहिल्यानंतर लक्षात येते की. सर्वांनी मनाशी एक गाठ बांधली होती. Never give up on your dreams. त्यानंतर संधी आपलीच आहे. या आणि अशा इतर सर्व खेळाडूंच्या यशाच्या पाठीमागं आणखी काही कारणं आहेत, जी कदाचित आपल्याकडे दिसत नाहीत. ते म्हणजेच त्याठिकाणी खेळाडू आणि त्यांच्या खेळाला असणारं पोषक वातावरण. एकदा का खेळाडूने आपला खेळ निश्चित केला की त्याला कुटुंब, समाज आणि सरकार एकूणच संपूर्ण देश मदत करत असतो. पण आपल्याकडे मात्र कुटुंबातूनच विरोध होतो. ही शोकांतिका.

- Advertisement -

भारताने उणेपुरे ऑलिम्पिकमध्ये 28 पदकांची कमाई केली आहे. पण असाही एक खेळाडू आहे ज्याने एकट्यानेच 28 सुवर्णपदकांची कमाई केली. त्या खेळाडूचे नाव म्हणजे जलतरणपटू मायकल फ्लेपस. वारंवार स्वतःचेच विक्रम मोडून गोल्डन बॉय होणं सोपं नसतं. एवढेच नाही तर पुढच्या ऑलिम्पिकमध्ये मी 8 सुवर्ण पदक जिंकेन. असं मुलाखतीत सांगणं आणि ते करून दाखवणं याच्या पाठीमागं प्रचंड मेहनत असते. आणि त्याला घडवणारे हात असतात. पण भारतात मात्र आजही आपण पाहतो खेळाडूच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याऐवजी मार्गदर्शक स्वतः टीकाटिप्पणी करतात, त्याला मागे खेचतात. मग खेळाडू घडतील तरी कसे…? अभिनव बिंद्रा, मेरी कोम, पी सिंधू, राही सरनोबत यांच्यासारखे खेळाडू समोर येतात, पण त्यांनाही या काही गोष्टींचा सामना करावाच लागतो.

आपण पाहतो की इतर देशांच्या तुलनेत आपली लोकसंख्या जास्त आहे. भारतातील युवकांमध्ये गुणवत्ता आहे. ते प्रत्येक खेळात अव्वल येतील ही क्षमता ठेवतात. तरीसुद्धा क्रिकेट व इतर दोन ते चार महत्वाचे खेळ सोडता आपण इतर खेळांमध्ये हवे तसे प्रावीण्य मिळवू शकलो नाही. त्याची कारणे मला वाटतं अशीही असू शकतील की व्यासपीठ मिळाल्यानंतर आपण त्या खेळाडूंना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकत नाही. तुमच्या आणि आमच्या वाचनामध्ये वर्तमानपत्रात किंवा मीडियातून बातम्या येत असतात, त्या अशा की, असा एक खेळाडू पैशांअभावी खेळू शकला नाही, किंवा त्याला सुविधा मिळू शकल्या नाहीत. राष्ट्रीय पातळीवर खेळूनसुद्धा आज मोलमजुरी करतो. म्हणून तो समोर जाऊ शकला नाही.

हेच वास्तव देखील आहे. आजही ग्रामीण भागात अव्वल दर्जाचे खेळाडू आहेत. पण त्यांच्यापर्यंत केंद्र सरकारकडून येणार्‍या सोयीसुविधा पोहोचत नाहीत म्हणून ते मागे राहतात. अनेक खेळाडू असे आहेत जे ऑलिंपिकसाठी गोल्ड मेडल मिळूवू शकतात. पण पण त्यांची निवड होत नाही. आणि ज्यावेळी निवड होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्या वेळी खेळामधले राजकारण आडवे येते. आपण खेळाला महत्त्व देण्यापेक्षा खेळातल्या राजकारणाला महत्त्व देतो. नेमका इथेच गुणवत्तेला आळा बसतो. एखाद्या क्रीडा प्रकारात कशाप्रकारे बदल करायला हवेत. किंवा खेळाडूंना त्या त्या खेळासाठी कोणत्या समस्या येतात. याकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले जात नाही. परिणामी खेळ भावना राहत नाही. म्हणून कदाचित आपण पदकांपासून लांबच राहतो.

ऑलिंपिकमध्ये निवड झालेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने सध्या वेगवेगळे उपक्रम हाती घेतले आहेत. जसे की दोन मिनिटांचा स्वतःचा व्हिडिओ काढून वेबसाईटवर अपलोड करणे, प्रश्नमंजुषा स्पर्धा, टी-शर्ट घालून सेल्फी पाठवणे, सोशल मीडियाच्याद्वारे चिअरअप करणे. मला वाटतं हे उपक्रम म्हणजे फक्त देखावा आहे. खेळाडू मैदानात उतरल्यानंतर त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहेच. पण मैदानात उतरण्यापूर्वी त्यांना आपण कोणत्या सोयी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. याकडेही क्रीडा मंत्रालयाने हवे ते लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच कुटुंबातून व समाजातून खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी करिअर म्हणूनही खेळाकडे पाहिले पाहिजे. जेणेकरून आपला पदकांचा दुष्काळ संपेल. आणि येणारा ऑलिंपिक काळ आपला असेल.

गुणवत्तेच्या जोरावर आपण सर्व खेळांमध्ये शिखर प्राप्त करू शकतो. त्यासाठी गरज आहे पाठीराख्यांची. कारण गुणवत्ता आता कोणाचीही मक्तेदारी नाही. जर इच्छाशक्ती असेल तर कोणतेही शिखर पार करता येते.
तूर्तास तरी वेटलिफ्टिंगमध्ये सिल्वर मेडल जिंकणार्‍या मीराबाई चानूचे मनःपूर्वक अभिनंदन….

मागील लेख
पुढील लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -