औद्योगिक ‘औकात’ मंत्र = ‘स्काडा’ तंत्र!

‘स्काडा’ हा शब्द आता इंटरनेट ऑफ थिंग्स आणि बिजनेस इंटेलिजेंस तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सबरोबर युती करीत जोडला जात आहे. औद्योगिक क्षेत्रात ज्ञानाच्या किंवा मुख्यतः अज्ञानाच्या सीमारेषेची मर्यादा ओलांडत औकात दाखविण्यासाठी ‘स्काडा’ हे अनिवार्य आहे. वाळूत मान खुपसत वादळ येणार नाही असा विचार करणार्‍यांनी औद्योगिक ‘औकात’ मंत्र असलेल्या ‘स्काडा’ तंत्राकडे ढुंकूनही पाहू नये.

–प्रा. किरणकुमार जोहरे

तुम्ही इंडस्ट्रीमध्ये मोठे वाखाणण्याजोगे काम करीत मोठी जबाबदारी उचलत आर्थिक सुबत्ता आणि रुतबा मिळवू इच्छितात आणि ‘तेरी औकात क्या है?’ असे आरशात पाहून स्वतःला विचारले आणि उत्तर देऊ शकला की, मेरे पास ‘स्काडा’ है! तर समजून घ्या इंडस्ट्रीमध्ये तुमची ‘औकात’ आहे आणि तुम्ही संधींच्या हायवेवरचा टोलनाका पार केला आहे. कारण औद्योगिक ‘औकात’ मंत्र म्हणजेच ‘स्काडा’ तंत्र आहे.

औकात दाखविणारा ‘स्काडा’ आहे तरी काय?

‘स्काडा’ हे ‘एससीएडीए’ अर्थात ‘सुपरवाइझरी कंट्रोल आणि डेटा अक्विझिशन’ या शब्दाचे लघुरूप होय. एक विश्वासार्ह सुपरव्हायझरी म्हणजे एखाद्या मुकादमासारखे देखरेख करीत दुरूनच नियंत्रण आणि डेटा म्हणजे माहिती गोळा करण्याची पद्धती म्हणजे ‘स्काडा’! औकात म्हणजे विश्वव्यापी इंडस्ट्रीमध्ये जाण्याचे ‘लिमिट’ होय. ‘स्काडा’ येते म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये शिरकाव करीत प्रगतीचा पासपोर्ट मिळाला. ‘स्काडा’चा पासपोर्ट मिळाला म्हणजे औद्योगिक आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न साकारण्याचे ‘लिमिटेशन’ दूर झाले. एकमेकांशी किंवा इतर लांबच्या कम्युनिकेशन डिव्हाईसचा डेटा कलेक्ट व प्रोसेस करणे आणि नियंत्रित करणे हे स्काडा तंत्रज्ञानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

‘स्काडा’ची सुरुवात

अमेरिकेत जवळजवळ १९६०च्या शेवटच्या दशकात आणि १९७०च्या पहिल्या दशकात विद्युत अभियांत्रिकी उद्योगातील व्यवसायी व्यक्तींनी ‘स्काडा’ म्हणजे लांबून यंत्रणा नियंत्रण व देखभाल सुरू केले होते, मात्र संस्कारांचा अधिकृत उल्लेख १९७३ मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ एडिसन कंपनीच्या अभियंता स्व. एच. बी. मार्शल यांनी प्रकाशित केलेल्या व विद्युत उत्पादनासाठी रिमोट मॉनिटरिंग आणि नियंत्रण प्रणाली विकसित करताना रिसर्च पेपरमध्ये आहे. आज जगभर उंटावरून शेळ्या किंवा मेंढ्या हाकण्याची ही पद्धत ‘टेलिमेट्री’ या शब्दाने ओळखली जाते.

‘स्काडा’ कसे काम करते?

रिमोट टर्मिनल युनिट, प्रोग्रॅमबल लॉजिक कंट्रोलर, ह्युमन मशीन इंटरफेस, कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर, डेटा एक्विझेशन सिस्टीम, डेटा हिस्टोरियन, डेटा बेस मॅनेजमेंट सिस्टीम, डेटा एनेलिसेस, डेटा रिडआऊट डिस्प्ले असे विविध अत्यंत महत्त्वाचे काम्पोनंटच्या समन्वयात्मक कामातून एकूण ‘स्काडा’ सिस्टीम पावरफुल पूल बनते.

उपयोग काय?

‘स्काडा’ हे अत्यंत महत्त्वाचे उद्योग शास्त्र आहे आणि या तंत्रज्ञान पद्धतीचा उपयोग जहाज बांधणी, औद्योगिक अभियांत्रिकी (इंजीनिअरिंग), ऑटोमोबाईल सेक्टर, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण संरक्षण, विद्युत आणि जल, सार्वजनिक सुरक्षा, आरोग्य, उत्पादन आणि निर्माण, ऊर्जा प्रबंधन आणि पेट्रोकेमिकल उद्योग आणि आता तर नाविन्यपूर्ण प्रकारे व्यवसाय तसेच शिक्षण-उद्योग व्यवस्थापन आदी एक ना दोन हजारो क्षेत्रांमध्ये केला जात आहे.

‘स्काडा’ संधींचा खजिना

‘स्काडा’ जागतिक बाजाराचा आकार २०२१ मध्ये ३५.३८ दशलक्ष डॉलर्स होता. २०३० मध्ये ६१.२२ दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहचेल. ‘स्काडा’ इंजिनीअरला वार्षिक १० लाखांच्या पगाराने आपले करियर भारतात सुरू करता येऊ शकते.

‘स्काडा’ आणि ‘एनएपी’

भारतातील जवळपास सर्वच राज्यांतील विद्यापीठात आणि दर्जेदार इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये ‘स्काडा’ हा या दशकात अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला, जे अत्यंत क्रांतिकारी पाऊल मानायला हवे. पुणे, मुंबई, नाशिक, बंगलोर, दिल्ली अशा सर्व शहरांत अनेक प्राध्यापक आहेत, जे स्काडा शिकून अतिरिक्त अर्थार्जन टीमवर्कने करतात, मात्र वर्षानुवर्षे जुन्यापुरान्या त्याच नोट्स वापरून राष्ट्रीय निर्माण कार्य करणार्‍या ‘ज्ञानी व अनुभवी गुरूंना’ मदत व्हावी यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये (एनएपी) ‘प्रोफेसर इन प्रॅक्टिस’ हे नवे ‘ज्ञानयोगी’ शिक्षणसंस्था म्हणजेच एज्युकेशनल इन्स्टिट्यूटला मदतनीस म्हणून धावून आले, मात्र इंडस्ट्रीमध्ये पोपटपंची करून टिमकी वाजवली जात नाही, तर तेथे क्षणाक्षणाला सामना असतो आव्हानांचा आणि अनेकदा प्रश्न असतो तो जीवन मरणाचा! एक योग्य निर्णय इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये ‘मिरॅकल’ घडवून आणू शकतो आणि इंडस्ट्रीमध्ये चांगली माणसे शोधून टीमवर्क ही बाब महत्त्वाची असते. मग एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि इंडस्ट्री यांचा संगम करण्याचे ठरले आणि ‘एज्युकेशन इंडस्ट्री’ ही जुनीच परंतु भारतात तशी नवी संकल्पना अवतरली.

‘ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं?’ इंडस्ट्री तिच्या फायद्यासाठी माणसे शोधणार आणि शिक्षणसंस्था आपल्या विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीच्या गरजेनुसार घडविणार! मग प्राध्यापकावर नवी जबाबदारी आली की त्याने स्वत:ला अपडेट करीत स्वत:चे आर्थिक प्रश्न सोडवायचे आणि एका प्राध्यापकाने किमान १० आणि साधारणतः विभागप्रमुखाने एकट्याने किमान १०० विद्यार्थ्यांना (गरजेनुसार क्लस्टर बनवत) स्वत:च्या पायांवर उभे करायचे आणि ‘मेंटी-मेंटार’ कन्सेप्टनुसार आयुष्यभर मार्गदर्शन करायचे. स्वयंपूर्ण आणि स्वायत्त (म्हणजे एटॉनॉमस) शैक्षणिक उद्योग बनतील. अशाने जिल्हानिहाय सुनियोजित होईल. शासकीय तिजोरीवरील आर्थिक बोजा वेगाने संपेल.

पर्मनंट, ग्रांट, नॉनग्रांट, पेन्शन आदी भेदभाव नष्ट होईल. ‘बाप दाखव नाहीतर श्राद्धाचे अन्नदान कर!’ अशा आयडियल सिच्युएशनकडे डार्विनचा सिद्धांत हा दीर्घकालीन ध्येय निश्चितीने सुलभ वाटचाल करणारा ठरेल याबाबत पर्याय नाही. स्काडा आणि इतरही एडव्हान्स टेक्नोलॉजीचा संगम शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्र यांच्या एकत्रित काम करण्याने होत आहे. इंडस्ट्रीची आव्हाने आणि या आव्हानांवर रामबाण उपाययोजना करीत अर्थार्जन करणारे ‘लढवय्ये ज्ञानगुरू’ आणि ‘ओन्ली सोल्यूशन’ म्हणत स्वत:बरोबरच समाज आणि राष्ट्राची उन्नती करणार्‍या विद्यार्थ्यांच्या फौजा यांच्याकडे येत्या काळात जग अत्यंत आदराने पाहून नतमस्तक होईल याबाबत कुणी शंका घेण्याचे कारण नाही.

असे काम करते ‘स्काडा’

‘स्काडा’ सिस्टीम अगदी सुलभ पद्धतीने आपल्या सर्व काम्पोनंटसह काम करते. स्काडा सिस्टीममध्ये सेन्सर आणि उपकरणांद्वारे दूर म्हणजे रिमोट ठिकाणाहून माहिती गोळा करते. नंतर ती सर्व माहिती सेंट्रल कंप्यूटर सिस्टीममध्ये आणली जाते. या माहितीवर प्रक्रिया केली जाते तसेच माहितीचे विश्लेषण केले जाते. ग्राफिकल इंटरफेसच्या माध्यमातून याचे रिझल्ट डिस्प्ले (प्रदर्शित) केले जातात. स्काडा ऑपरेटर सध्याच्या ऑपरेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी या माहितीचा थेट वापर होतो. उद्योग प्रक्रियांचे नियंत्रण करण्यासाठी स्काडा पद्धत वापरली जाते. स्काडा हे सतर्क किंवा दक्ष आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी वापरले जाते. हीच त्याची कार्य करण्याची पद्धती आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) अल्गोरीदममुळे परस्पर सुयोग्य निर्णय घेत इंडस्ट्रीमध्ये महसूल वाढवत स्काडा पैशांचा पाऊस पाडू शकते. तशी वातावरण निर्मिती करणारा हा साधा सोपा गणितीय व्यवहार आहे.