घरफिचर्ससारांशमहिला बचतगट आणि सक्षमीकरण

महिला बचतगट आणि सक्षमीकरण

Subscribe

महिला बचतगटाच्या संकल्पनेत जात, धर्म, वय, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित असे कोणतेही बंधन नसल्याने सार्वभौम विकास साधताना मुस्लीम समाजाच्या महिला बचत गटातील गटसंघटीका तसमीना एैनुद्दीन शेख या तरुणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की, जिने मुस्लीम समाजाच्या महिलांचे संघटन बचतगटाव्दारे करून 500 महिला जोडल्या. लावण्य, सौंदर्य, प्रगल्भता; पण बुरख्याखाली त्यांना व्यासपीठ उभारण्याचे काम संस्थेतून झाले.

स्वतःच्या समस्या स्वतःच्याच पध्दतीने स्वतःच सोडविता येण्याची क्षमता स्त्रियांना लाभली पाहिजे. त्यांच्याकरिता म्हणून दुसरा कोणी ते कार्य करू शकत नाही आणि कोणी ते करूही नये. जगातल्या कोणत्याही स्त्रिया इतक्याच योग्यतेने भारतीय स्त्रियाही ते काय करू शकतील, असे उद्गार स्त्रियांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल स्वामी विवेकानंद यांनी काढले होते. आज महिला बचत गट या संकल्पनेवर काम करताना 20 वर्षात ते पदोपदी जाणवते. स्त्रियांबद्दल विश्वास व त्यांची कसोटी इतिहासकालीन घटनावरून अधोरेखित होते. 21 व्या युगातील भारत महासत्ता विकासाकडे घेणारे झेप यात स्त्रीशक्तीचा 50 टक्के वाटा अस्तित्वाने जरी असला तरी खरी कार्यशक्तीतूनच त्याची प्रचिती येऊ शकते. महिला बचत गट आज लाखोच्या घरात कार्यरत आहे. महिलांनी महिलांच्या विकासासाठी ़परस्पर समन्वयातून बचतीच्या माध्यमातून साधलेले एकत्रीकरण म्हणजे महिला बचतगट होतात यात स्वावलंबन, एकसारखी बचत समूहशक्ती या त्रिसुत्रीचा वापर केला जातो. महिलांचे सक्षमीकरण महिला बचतगटाने कसे साध्य केले याच्या खरं तर यशोगाथा अनेक वेळा आपण पहातो, ऐकतो पण माझ्या मते स्त्रीचे सक्षमीकरण टप्प्याटप्प्याच्या प्रक्रियेवर आधारीत आहे. 1)मानसिक सक्षमीकरण 2)आर्थिक सक्षमीकरण 3)सामाजिक सक्षमीकरण 4)राजकीय सक्षमीकरण एका वेळेची खाण्याची भ्रांत असलेल्या सावकारशाहीच्या कर्जात बुडालेल्या महिलांनी बचत गटात सहभागी होऊन आता आपल्या गरिबीवर मात केली आहे.

नाशिक जिल्हा महिला व बचतगट विकास सह. संस्थेमध्ये नोंदणीकृत गटाची सत्यकथा श्री इच्छामणी स्वयंसहाय्यता महिला बचत गट एकूण 11 महिला गटामध्ये आहे. सगळ्या महिला कष्ट करणार्‍या म्हणजे थोडक्यात धुणी भांडी ़रोजंदारीची कामे, स्वयंपाकाची कामे अशा कष्टकरी समाजातल्या त्यांना दुष्काळग्रस्त निर्वासित असल्याने कोणीही बँकेचे खाते उघडून दिले नव्हते. अशावेळी गटाच्या माध्यमातून त्या एकत्र आल्या. 200 रू. पासूनची बचत व गट नोंदणी करून दर महिन्याला बैठकीच्या निमित्ताने एकजीव झाल्या. आपसातले छोटे छोटे कर्ज घेऊन स्वतःच्या संसारातले प्रश्न जसे किराणा शिक्षण आजारपण यासारख्या प्रश्नावर त्यांनी मार्ग काढत आज संस्थेकडून 2,50 000 कर्ज उभारण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करून गहाण टाकलेले दागिने, अवजारे, वाहने, सोडविण्यामध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. प्राथमिक अवस्थेतला कष्टकरी समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा हा बचत गट 5 टक्के व 10 टक्के कर्जाने रकमा सावकारशाही खाजगी स्वरूपात चालणार्‍या यंत्रणेला महिला बचत गटाने लगाम घातला व आमच्या हजारो महिलांनी ही पध्दती मोडकळीस आणली आहे.

- Advertisement -

महिला बचतगटाच्या संकल्पनेत जात, धर्म, वय, गरीब, श्रीमंत, शिक्षित, अशिक्षित, असे कोणतेही बंधन नसल्याने सार्वभौम विकास साधताना मुस्लीम समाजाच्या महिला बचतगटातील गटसंघटीका तसमीना एैनुद्दीन शेख या तरुणीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की, जिने मुस्लीम समाजाच्या महिलांचे संघटन बचतगटाव्दारे करून 500 महिला जोडल्या. लावण्य, सौंदर्य, प्रगल्भता, पण बुरख्याखाली त्यांना व्यासपीठ उभारण्याचे काम संस्थेतून झाले. महिलांना कागदी बॅगा बनविणे, शिलाईचे काम, मसाले बनविणे या व्यतिरिक्त सगळ्यात मोठे काम त्याच्या आरोग्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून निसर्गोपचार व पंचकर्म क्लिनीक चालू करून योग शिक्षणाव्दारे राज्यस्तरीय नावलौकीक मिळविला आहे. तमन्ना महिला बचत गटापासून सुरू झालेला प्रवास धर्मसमानतेवर आधारीत आज शंभराहून अधिक महिलांना स्वास्थ विषयावर जागृत करत सक्षमीकरण पहावयास मिळत आहे. सामाजिक सुधारणा करत वृक्षारोपण ़स्त्रियांसाठी विविध स्पर्धा आयोजित करत करत घरातूनच मोठ्या प्रमाणात होणारा विरोध सहन करत उभी राहिली. 75 महिला बचतगट तयार करत इतिहास निर्माण केला. सौ. कावेरीताई कासार व सुनिता आहेर यांनी. समाजातल्या व्यसनाधीनता, अत्याचार, विषमता, यावर मात करण्यासाठी बचतगट स्थापन केले. देवळाली व पळसपूर भागात बघता बघता त्याचे सामाजिक नेतृत्व हे राजकीय क्षेत्रातही अग्रेसर ठरले आणि गावची सरंपच होण्याचा मान सुनिता आहेर व
कॅन्टोंमेंन्टची पहिली महिला उपाध्यक्षा होणारी कावेरीला मिळाला हे बळ फक्त या चळवळीतून मिळाले. धाडसी समाधारिष्ट्य नेतृत्वगुण विकासाला लागण्याचे काम केवळ महिला बचत गटातील कार्यपध्दती व व्यवस्थापन यातून शिकावयास मिळाले.

रचनाशिल्प महिला बचतगट मनिषा पवार या गटाच्या अध्यक्षा तर कांडेकर ताई या सचिव. घरातील पुरुष माणसाच्या बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली. महिलांनीही हिंमत सोडली नाही. महिला बचत गटातून एकत्र आल्या. सुंदर पदार्थ जसे मुगाची चकली, शंकरपाळे, चिवडा बनविणे सारखा उद्योग उभारला व सुरुवातीला 5 किलो माल तयार करण्यासही घाबरणार्‍या महिला आज 100 किलो पर्यंतचा माल तयार करू शकण्याइतकी क्षमता त्यांच्यात निर्माण झाली. बघता बघता घरात मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न घरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यासारखे प्रश्न त्यांनी लिलया सोडविले. आजही त्यांना लांबून लांबून लोक ऑर्डर करतात. 12 महिने फराळ व खाद्यपदार्थ तयार करण्याचे काम त्या करतात. नाविन्यपूर्ण उत्पादनात 30 वस्तू असलेल्या लक्ष्मीपूजनासाठी लागणार्‍या साहित्याचा एक किट तयार करणारा समृध्दी महिला बचत गट ज्याने 1000 बॉक्स विक्रीपर्यंतचे उच्चांक गाठला आहे. नोकरी करणार्‍या व्यवसायात असणार्‍या महिलांना एकत्रित आपणच आपले लक्ष्मीपूजन घरी कसे करावे या पुस्तकापासून ते छोटीशी शिरईपर्यंतची जिन्नस एकत्र ठेऊन हा बॉक्स तयार करणार्‍या समृध्दी गटाच्या महिला एकत्रित हे काम करत असतात.

- Advertisement -

योगशक्ती महिला क्षितीज महिला नक्षत्र सार्इसेवा यासारखे शंभराहून अधिक बचत गटाच्या आर्थिक सक्षमीकरणाचा आलेख जर आपण पाहिला तर थक्क व्हाल. 100 रू.पासून ते 1000 रू.पर्यंत बचत करणार्‍या गटातील महिलांनी स्वयंरोजगारातून स्वतःचे शिलार्इ मशीन ते पापड मशीन तसेच काही जणींनी मुलांचे इंजिनीअरिंग व बाहेरच्या देशातील शिक्षणासारखं अशक्य वाटणारे स्वप्न पूर्ण केले आहे. अवघ्या 5 वर्षांतच जमा केलेली बचत याव्दारे जमा झालेली मुद्दल दामदुप्पट होऊन आर्थिक व्यवहार कसे करावेत त्याचे सुक्ष्म नियोजन ़व्यवस्थापन, देखरेख नियंत्रण यातून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केला आहे. परदेशात पापड, हळद, कुंकुवाच्या कळया व इतरही काही उत्पादने पाठविण्यात यश आले आहे.

नोबेल पारितोषिके विजेते डॉ.युनूस यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मदर टेरेसा व बाबा आमटे यांच्यासारखे सेवाभाव वृत्ती जपणारी नाशिक जिल्ह्यातली ही महिला बचतगटाची चळवळ आज सुमारे 19000 ते 20000 महिलांना एकत्रित घेऊन 5 कोटींची उलाढाल त्यांच्या स्वभांडवलातून उभा केलेला आहे. कोणतेही वित्तीय संस्थेचे कर्ज न घेता स्वभांडवलावर या बचतगटाच्या महिला सार्‍याच्या एकत्रित समूह शक्तीतून महिला बचतगट कमीत कमी 10 ते 20 महिला एकत्रित येऊन विकासाच्या विचाराने झपाटलेल्या आहेत. येणार्‍या 2020 मध्ये ज्यांनी कधीही विमानप्रवास केला नाही, परदेश हे केवळ स्वप्न आहे, असे समजणार्‍या 50 महिलांचा पहिला गट विमानातून परदेश भ्रमण करणार आहे ही क्षमता केवळ आणि केवळ महिला गटातून शक्य झाली व होऊ शकते आहे़. स्त्री ही अबला नसून सबला आहे हे अनुभवांन्ती सिद्ध करून हजारो बचतगट शेतमालावर प्रक्रिया करून टाकाऊपासून टिकाऊ बचतीतून अर्थार्जन उद्योग व्यवसाय कौटुंबिक प्रगती,सामाजिक उपक्रम व शेवटी राजकीय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शैक्षणिक कामगिरी बजावत आहे. या चळवळीतला अखंड यश व शक्ती मिळण्यासाठी म्हणावेसे वाटते की, ईतनी शक्ती हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रस्ते पर, हमसे भुलकर भी कोर्इ भुल होना

डॉ. अश्विनी बोरस्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -