घरफिचर्स'सीआयडी' मालिकेसाठी चाहत्यांचं #SaveCID कॅम्पेन!

‘सीआयडी’ मालिकेसाठी चाहत्यांचं #SaveCID कॅम्पेन!

Subscribe

१९९७ पासून सुरु झालेल्या सीआयडी मालिकेने एकूण २१ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

सोनी टेलिव्हीजनवरील ‘सीआयडी’ (CID) मालिकेने गेल्या २१ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, आता छोट्या पडद्यावर सर्वाधिक काळ गाजलेली ही मालिका बंद होणार असल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे. या बातमीमुळे सीआयडी मालिकेचे चाहते नाराज झाल्याचं चित्र दिसत आहे. सीआयडी मालिका बंद करण्याच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी चाहत्यांनी सोशल मीडियावर, #SaveCID कॅम्पेन सुरु केले आहे. या कॅम्पेनद्वारे चाहते ‘आमची लाडकी मालिका बंद करु नका, CID इज लाईफ, वी सपोर्ट CID, CID मलिकेतील कलाकारांना आम्ही मिस करु’ अशाप्रकारचे संदेश व्हायरल करत आहेत. पाहुया या खास #SaveCID कॅम्पेनमध्ये व्हायरल करण्यात आलेल्या काही पोस्ट :

- Advertisement -

- Advertisement -


प्रेक्षकांच्या मनावर गाजवले अधिराज्य

१९९७ पासून सुरु झालेल्या सीआयडी मालिकेने एकूण २१ वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतेच या मालिकेने १५४६ एपिसोड्स पूर्ण केले. हा शो बंद करण्यामागे टीआरपीचा आलेख खाली आल्याचे कारण दिले जात आहे. या शोमधील एसीपी प्रद्युमन, इन्स्पेक्टर दया, अभिजीत, डॉ. साळुंखे या व्यक्तिरेखा आणि त्यांच्यामुळे घराघरात पोहचलेले कलाकार कायम प्रेक्षकांच्या मनात जिवंत राहतील, यात शंका नाही. CID मालिकेतील ‘कुछ तो गडबड है दया, इन्स्पेक्टर दया तोड दो दरवाजा’, हे डायलॉग्ज खूपच लोकप्रीय झाले होते. दरम्यान मालिकेत ‘दया’ हे पात्र साकरणारा अभिनेता दयानंद शेट्टीने शो बंद होण्याबाबत सांगितले की, काही दिवसांपूर्वी शोचे निर्माता बी. पी. सिंग यांचा फोन आला की हा शो बंद करायचा आहे. त्यानंतर शोमधील संपूर्ण टीम चिंतातूर झाली. मात्र जेवढी शोची टीम अस्वस्थ आहे. तेवढीच नाराजी हा शो बंद होण्यामुळे प्रेक्षकांमध्येही आहे.


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -