घरफिचर्सअग्रणी समाजसुधारक र. धों. कर्वे

अग्रणी समाजसुधारक र. धों. कर्वे

Subscribe

रघुनाथ धोंडो कर्वे हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत. त्यांचा जन्म 14 जानेवारी 1882 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड या ठिकाणी झाला. ते मॅट्रिक परीक्षेत मुंबई राज्यात सर्वप्रथम (१८९७). फर्ग्युसन महाविद्यालयातून बी. ए. (१९०३). १९०६ मध्ये अध्यापनाची पदविका. गणित विषयात एम. ए. झाले. मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते गणिताचे प्राध्यापक होते. महाराष्ट्रात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणार्‍या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती.

अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों. कर्वे यांनी मांडले. त्यांच्या मते संततिनियमनाचे व्यापक उद्दिष्ट सामाजिक स्वास्थ्याचे असून ते निकोप स्त्रीपुरुषसंबंधांवर आधारीत असते. आधुनिक दृष्टीने व बुद्धिप्रामाण्याच्या कसोटीवर योग्य ठरणार्‍या लोकशिक्षणाचा त्यांनी पुरस्कार केला. या हेतूने त्यांनी समाजस्वास्थ्य हे मासिक चालविले. ज्या गोष्टींची माहिती होणे समाजाच्या व व्यक्तीच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, ती माहिती निर्धारपूर्वक पुढे आलीच पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.

- Advertisement -

यासाठी त्यांनी १९२३ मध्ये संततिनियमन, विचार व आचार आणि १९२७ मध्ये गुप्त रोगांपासून बचाव (विचार व आचार) ही पुस्तके लिहिली. त्याचप्रमाणे वेश्याव्यवसाय (१९४०), आधुनिक आहारशास्त्र (१९३८), आधुनिक कामशास्त्र (१९३४) अशी इतरही काही शास्त्रीय विषयांचे विवरण करणारी पुस्तके लिहिली. आगरकरांनंतर प्रखर बुद्धिवादाचा निर्भयपणे व कोणतीही तडजोड न करता पुरस्कार करणारा मराठी विचारवंत म्हणून र. धों. कर्व्यांचेच नाव घ्यावे लागेल. त्यांच्या आचरणात जी नेकी होती, ती त्यांच्या विचारातही होती आणि तिचेच प्रतिबिंब त्यांच्या स्वच्छ, पारदर्शक, अनलंकृत शैलीत पडलेले आढळते. अशा या अग्रणी समाजसुधारकाचे 14 ऑक्टोबर 1953 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -