Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स मुतखड्याचा त्रास आहे? तर ’हे’ नक्की वाचा

मुतखड्याचा त्रास आहे? तर ’हे’ नक्की वाचा

आजकाल वरचेवर बर्‍याच जणांना मुतखड्याचा त्रास असल्याचं ऐकिवात येतं. पण मुतखडा कशामुळं होतो? याची काय लक्षणं असतात? यावर काय उपाय आहे? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

Related Story

- Advertisement -

आजकाल वरचेवर बर्‍याच जणांना मुतखड्याचा त्रास असल्याचं ऐकिवात येतं. पण मुतखडा कशामुळं होतो? याची काय लक्षणं असतात? यावर काय उपाय आहे? हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुतखडा कसा निर्माण होतो? किडनीमध्ये क्षार निर्माण झाल्यामुळं मुतखडे होतात. बर्‍याचदा मुतखडे हे कॅल्शिमयपासून बनलेले आढळतात, तर काही मुतखडे हे युरीक अ‍ॅसिड आणि ऑक्सलेटपासूनही बनतात. किडनीमधून युरेटर या नळीमार्फत हे खडे मुत्राशयामध्ये येतात. मुतखडे लहान असल्यास, लघवीवाटे बाहेर पडतात. मात्र, याचा आकार मोठा असल्यास, मुत्राच्या मार्गात अडथळा निर्माण होऊन बराच त्रास होतो आणि वेदना होता. पाठ, पोट आणि ओटीपोट यामध्ये प्रचंड प्रमाणात वेदना होतात. हा आजार पुरुषांपेक्षाही बायकांमध्ये जास्त असल्याचं सिद्ध झालं आहे.

काय आहेत मुतखड्यांची लक्षणं?

१. सतत लघवीला झाल्यासारखं वाटणं
२. लघवी करताना त्रास होणं आणि लघवीच्या जागेवर जळजळ होणं
३. थेंब थेंब लघवी होणं
४. कधीतरी लघवीमधून रक्त येणं
५. ताप येणं, अंगदुखी, उलटी होणं आणि मळमळणं, जुलाब होणं.
६. लालसर लघवी होणं.

मुतखडा का होतो?

- Advertisement -

सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील क्षार कमी झाल्यास मुतखडा होतो. बर्‍याचदा काही व्यक्तींना अन्नपचनाचा त्रास असतो त्यामुळं शरीरातील युरिक अ‍ॅसिडवर परिणाम होऊनही मुतखडा होण्याची शक्यता असते. तर काही व्यक्तींना कामाच्या वेळेत वेळेवर लघवीला न जाण्याची सवय असते. त्यामुळं मुत्राशयावर दबाव येऊन मुतखडा निर्माण होतो. तर बर्‍याच व्यक्तींना पाणी कमी प्यायची सवय असल्यामुळंही या समस्येला सामोरं जावं लागतं. काही व्यक्तींना ही समस्या अनुवंशिकही असते. तर काहींना ही समस्या बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळंही होते.

मुतखडा असल्यास काय खाणं टाळावं ?

मुतखडा असणार्‍या व्यक्तींना काही भाज्या खाणं टाळलंच पाहिजे. यामध्ये टॉमेटो, वांग, भेंडी या भाज्यांचा समावेश आहे. मुख्यत्वे ज्या भाज्या आणि फळांमध्ये बी आहे त्या सर्व गोष्टी मुतखडा असणार्‍या व्यक्तींनी टाळाव्यात. यामध्ये पेरू आणि डाळिंबाचा देखील समावेश आहे. मुतखडा असणार्‍या व्यक्तींनी आपलं डाएट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाळणं अतिशय गरजेचं आहे.

कसा जातो मुतखडा?

- Advertisement -

मुतखडे लहान आकाराचे असल्यास, औषधं आणि जास्तीत जास्त पाणी पिऊन लघवीवाटे काढता येतात. मात्र, जर साधारण ५ मिमी इतका मुतखडा असल्यास, सर्जरी हा एकमेव उपाय आहे.

- Advertisement -