Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स ताडोबा जंगल सफारी

ताडोबा जंगल सफारी

निसर्गाने मुक्त हस्ताने वनराई आणि पशुसंपदेची उधळण केलेला महाराष्ट्राच वैभव आणि वाघांच स्वर्ग म्हणून ज्याची ओळख आहे .. तो म्हणजे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा जंगल म्हटलं की, डोळ्यापुढे उभा राहतो तो जंगलचा राजा म्हणजेच वाघ.

Related Story

- Advertisement -

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे विदर्भातील चंद्रपूर जिल्हात आहे. चंद्रपूर शहरापासून अवघ्या २० किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प आहे. ताडोबाला एकूण ६ प्रवेशद्वार आहेत. ताडोबामध्ये जंगल सफारी करण्यासाठी आता वन विभागाने ऑनलाईन बुकिंगची सुविधा देखील केली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने ताडोबा राज्यातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे.

१९५५ पासून अस्तित्वात असलेले ताडोबा उद्यान १९८६ मध्ये त्यात समाविष्ट करण्यात आलेल्या ५०८ स्क्वेअर किलोमिटरचे अंधारी अभयारण्य या दोन्हींचे मिळून बनलेलं आहे, ते ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. या अभयारण्यातून अंधारी नावाची नदी वाहते. त्यावरुनच या प्रकल्पाला अंधारी व्याघ्र प्रकल्प हे नाव पडले. तर ताडोबा हे नाव तिथल्या तलावावरुन पडल्याचे बोलले जाते. ताडोबा या नावासंदर्भात इथे एक आख्यायीकाही सांगितली जाते की, पूर्वी या जंगलामध्ये तारू नावाचा गृहस्थ होता…. त्याची वाघासोबत झडप झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला होता आणि त्याच्याच स्मृती प्रित्यर्थ या जंगलाला ताडोबा नाव देण्यात आल्याचे बोलले जाते. या तलावात जवळपास ३०-३५ मगरी आहेत. हा तलाव या जंगलातील सौंदर्य वाढवण्यास हातभार लावतो. या तलावावर जंगलातील प्राणी पाणी पिण्यासाठी येतात त्यामुळे पर्यटकांना हा तलाव आकर्षित करतो.

- Advertisement -

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांना आकर्षित करणारा प्रकल्प आहे. इथे असलेली वाघांची संख्या ही इतरत्र असलेल्या प्रकल्पांपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. त्यामुळे इथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला वाघाचे दर्शन हे हमखास लाभतेच… त्यामुळे इथे पर्यटकांची सतत गर्दी असते. दरवर्षी लाखोंच्या संखेने पर्यटक ताडोबाला येतात.

ताडोबा हे प्रसिद्ध आहे ते इथल्या रॉयल बेंगॉल टागरच्या प्रजातीसाठी. इथले वातावरण वाघांच्या संवर्धनासाठी तसेच सुरक्षेच्या दृष्टीनेदेखील पोषक आहे. सध्या या जंगलात एकूण ८० पेक्षा जास्त वाघ आहेत. वाघांसोबतच, बिबटे, रानमांजरी, टिपक्यांचे हरिण, बारसिंगे, चितळ, गवे, रानडुक्कर, निलगाय व रानकोंबड्या असे प्राणी इथे आहेत. तर सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये मगरी, सुसरी, अजगर आणि इंडियन कोब्रा हे इथे प्रामुख्याने आढळून येतात. पक्ष्यांच्या विविध १९५ जातींची नोंद ताडोबामध्ये करण्यात आली आहे. तर ४००० च्या जवळपास हरिण आहेत.

- Advertisement -

या जंगलात पानझडी वृक्ष, बांबूचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. ताडोबाच्या १०० टक्के क्षेत्रापैकी फक्त २० टक्के क्षेत्र पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात आले आहे. आतमध्ये पर्यटनासाठी वनविभागाकडून उत्तम सुरक्षेसह ओपन जिप्सी उपलब्ध असते. त्यामुळे पर्यटकांना या ओपन जिप्सीतून जंगल सफारीचा मनोसक्त आनंद घेता येतो. इथली वनराई देखील मनाला प्रसन्न करणारी आहे. काही काळ शांतता अनुभवण्याकरता ताडोबा हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. तर मग तुम्ही सुद्धा एकदा नक्की अनुभवा महाराष्ट्रातील ही ताडोबा जंगल सफारी.

- Advertisement -